मेरी बिल्ली मुझिको म्यांव

आई आणि मुली मधील प्रेमळ आठवण

©®शितल ठोंबरे (हळवा कोपरा )

मेरी बिल्ली और मुझिको म्यांव ????????????

आम्ही तीन भावंडं… मोठी ताई, मधवी मी तर लहान भाऊ… 

त्यामुळे सगळं कौतुक आणि लाड हे फक्त त्यांच्या वाट्यालाच आहेत… असं मला वाटायचं… 

त्यावरून आईसोबत वाद ही व्हायचे….. ताई मोठी समजूतदार म्हणून तिचा लाड करतेस…. आणि भाऊ लहान शेंडेफळ म्हणून त्याचाही लाड होतो…

लाड कोणाचा होत नसेल तर तो फक्त माझा ????मी तुमची मुलगी नाही म्हणूनच असा भेदभाव करता तुम्ही…

 तू ही तशीच अन पप्पा ही तसेच…

 त्यावर आईचं पेटंट उत्तर असायचं... "हो गं बाई लाड न होताच तू एवढी मोठी झाली आहॆस… (तब्ब्येतीने नाही बरं )...तुला आम्ही खाऊ पिऊ थोडीच घालतो… तुझ्या वाटणीचं सगळं या दोघांनाच तर देते… "

"हो हो नाहीच करत मुळी माझा लाड…. नेहमी आपलं त्या दोघांचच कौतुक असतं तुम्हाला….????"

माझं रडणं पाहिलं की मात्र आई आणखीनच चिडवायची…. "हो तुला तर आम्ही देवळातून उचलून आणली आहे न त्यामुळे तुझा लाड नाही करत… "

हे ऐकलं की छोटा भाऊ वाकुल्या दाखवत चिडवत असे…." हे……… तुला तर देवळातून उचलून आणली…"

 ढिंकचिका…. ढिंकचिका… करत माझ्याभोवती गोल फिरत असे…. 

मग काय  मी आपलं भोकाड आणखीनच जोरात पसरून…. आजूबाजूच्या चार घरातल्या लोकांचे कान फुटतील इतक्या जोरात रडत असे… ????????

मग मात्र मला शांत करण्यासाठी…. आईला माझी समजूत काढण्यासाठी ….

 मी तिचीच मुलगी आहे आणि माझा जन्म कसा हॉस्पीटल मध्ये झाला हे पटवून द्यायला एक तासही कमी पडे…

 वरून मी डिमांड केलेला खाऊ तातडीने माझ्या पुढे हजर करावा लागे ते वेगळंच… ????????

पण हा किस्सा घरात नेहमी घडे… 

आपल्याला  देवळातून आणले नाही हे माझ्या बालसुलभ मनाला समजायला बऱ्याच वर्षांचा कालावधी जावा लागला… 

माझ्या बालपणीच हे रामायण महाभारत सांगण्यामागचा मूळ उद्देश म्हणजे…. माझी दोन पिल्लं… 

सात वर्ष पूर्ण व्हायला काहीच दिवस शिल्लक असणारी लेक सन्वी???? ( या दोन नोंव्हेबर ला आमची प्रिंसेस सात वर्ष पूर्ण करून आठव्या वर्षात पदार्पण करीत आहे ) आणि धाकटा… चार वर्षांचा मुलगा प्रीत….. ????

माझ्या लेकीत मी माझाच भूतकाळ पाहते… 

कारण ज्याप्रमाणे मी आई सोबत वाद घातले तेच वाद आता माझ्या घरात होतात की मम्मा तू फक्त प्रीतचाचं  लाड  करतेस माझा नाही… 

शेवटी त्या दिवशी वैतागून तिला म्हटलं…. "हो नाही करत तुझा लाड…. तुला मी हॉस्पिटल मधून उचलून आणली आहे… म्हणून नाही करत मी लाड तुझा… तुझी मम्मा दुसरीच कोणी आहे मी नाही…. आता खुश… "

त्यावर एक सेकंदाचाही विलंब न करता पठ्ठी ने अगदी हजरजबाबी उत्तर दिलं (हा गुण माझा नाही बरं आपल्या वडिलांकडून आंदण घेतला आहे पठ्ठी ने )

"ह्या ह्या ????????मम्मा कायपण बोलतेस… तू नाही काही मला उचलून आणलंस…. मीचं आले तुझ्या मागे तेही चालत चालत… तू मम्मा म्हणून आवडलीस मला म्हणून… ????????????"

आणि गळ्यात हात टाकून गोड पापी दिली… ????

घ्या आता झाली ना माझीच बोलती बंद…. मेरी बिल्ली और मुझिको म्यांव ????????????????

चार दिवस झालं विचार करतेय ????????माझ्या लहानपणी मला का नाही सुचलं हे उत्तर… जे माझ्या लेकीने क्षणाचाही  विलंब न करता दिलं… 

आता काय बिशाद माझी पुन्हा तिची फिरकी घ्यायची ????????????????

(लेख आवडल्यास लाईक करा शेअर करा पण लेखिकेच्या मूळ नावासहित )