मेरे लिए तुम काफी हो...(भाग-23)

Raghav Will Meet Durva Or Not...

(      वाचक देवो भवः

सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्यांची माफी मागते की कथेचा भाग मी खुप उशिररा टाकला. माझी परीक्षा होती म्हणून लिखाण सोडून अभ्यास करण्याशिवाय काही गत्यंतर नव्हते... पण आता मी आले पुन्हा... तुमच्या राघव आणि दुर्वाला घेऊन....

मागल्या भागात आपण पाहिले राघव मनावर दगड ठेऊनच मुलीला बघायला होकार देतो. दुर्वा ख्यातीच्या वाढदिवसाला का आली नाही..? हा प्रश्न आपल्याला पडला असेल.. मिळेल या ही प्रश्नाचं उत्तर मिळेल.. आता पुढे...)



असेच काही दिवस झाले. दुर्वाला हाताला दुखापत झाल्याने तिने चार दिवस सुट्टी घेतली होती. आजपासून  दुर्वाला आता आपण आपल्याच ऑफिसमध्ये जायला सुरुवात करणार, तिला खूप आनंद झाला होता; आणि त्याहूनही जास्त आता राघव तिच्या समोर येणार नाही म्हणून तिच्या मनाला बरे वाटत होते. आज  सकाळी ऑफिसला लवकर जाण्यासाठी  दुर्वा घरातून निघते. परंतु ट्रॅफिक जाम झाल्याने तिला तब्बल अर्धा तास उशिर झाला. ती बिचारी घाईघाईतच ऑफिसमध्ये पोचते. पाहते तर समोर सगळा स्टाफ वेळेतच पोचला होता आणि JCLC चे Managing director श्री. जगदिश चिमणकर तिथेच उभे होते. वयाने जरी पाच वर्षापूर्वी साठी  उलटली तरी शरीरयष्टीने ते नुकतेच पन्नाशीकडे झुकलेल्या माणसासारखे दिसत. एरवी C.E.O येत असत. पण आज चक्क JC सरांना बघून दुर्वाचे धाबे दणाणले. सर जरी सगळ्या स्टाफला आपल्या मुलांसारखा जीव लावत परंतु उशीर झालेला ते अजिबात खपवून घेत नसत. त्यांनी एकवार दुर्वाकडे पाहिले. सरत्या ओरडतील की काय म्हणून तिनेच स्वतः बोलायला सुरुवात केली.

दुर्वा :- सो सो साॅरी सर... ट्रॅफिकमुळे मला उशीर झाला. आता नाही होणार. (कानाला हात लावून ती केविलवाण्या नजरेने सरांकडे  पाहत होती.)

सर (हसतच) :- It\"s okk... Miss Joshi... No worries... याआधी तुम्ही कधीच उशीर केला नाही ठाऊक आहे मला.. मी तुमचीच वाट बघत होतो. (घड्याळाकडे बघत)  लंच ब्रेकच्या अर्धा तास आधी माझ्या केबिनमध्ये या.. जरा महत्वाचे काम आहे..

दुर्वा :- हो सर.. थॅन्क यू सर...

सर :- आणि हो..! लिहीत्या हाताला मार लागला आहे. जरा जपून...! ते बघा. बॅग्ड एड् केलेल्या पट्टीतून रक्त दिसतंय.. (काय ही आज कालची पिढी... ह्या पोरांना स्वतःची काळजी घेता येत नाही. आणि नंतर वाढलेली जबाबदारी कशी सांभाळतील देव जाणे...) असे तोंडातल्या तोंडात पुटपुटत सर निघून गेले.

दुर्वा पटकन तिच्या डेस्कवर जाऊन बसली तोच तिच्या डेस्कवर दोन छोटे छोटे डबे  दिसले. दुर्वाने कुतुहलाने पहिला बाॅक्स उघडला तर त्यात तिच्या आवडीचे बेसनाचे लाडू आणि दुसरा डबा उघडून बघितले तर त्यात व्हेज चाॅकोलेट कपकेक  होते. आजुबाजुला बघितलं तर कुणीच नव्हतं पण एक चिठ्ठी पडलेली दिसत होती. त्यावर प्रिन्ट टायपिंगने "Proud of you Little Angel" असे लिहीले होते.

दुर्वा :- एरिना , अन्वित सर, अभिलाष या... कळलंय तुम्ही दोघांनी मिळून हा खाऊ आणलाय माझ्यासाठी... ठाऊक आहे मला..

मागून तीन जण येऊन दुर्वाला घट्ट मिठी मारतात.

एरिना :- यार.. दुर्वा इतने दिन तक उस ऑफिस में थी यार तू। तुझे कितना मिस किया हम ने। और तुझे कैसे पता चला की ये स्नैक्स हम दोनो ने लाया तुम्हारे लिए।।

दुर्वा :- सिंपल आहे गं.. असा कप केक तुझ्याशिवाय कोणीच करणार नाही. आणि असे कमी तुपात केलेले बेसनाचे लाडू फक्त सुहानी वहिनीला जमतात. बरोबर ना अन्वित सर...!

अन्वित :- येस माय एंजल...

एरिना :- सर एक बात बताओ आप हमेशा दुर्वा को एंजल क्यो बोलते हो। और वो आप को ब्रो। हम सब से ज्यादा प्यार आप इसे ही करते हो।

अभिलाष :- अगं ही आली तेव्हापासून लाडकी झाली संरांची.. मानलेली बहीण ना शेवटी.. माझे लाड कधीच केले नाही. आणि ही नकटी यांची एंजेल आहे.

अन्वित :- कारण ती एक एंजल आहे.. माझी एंजल.. तुला माहित आहे मागल्या वर्षी ही नवीन जाॅईन झाली होती. माझ्याच अंडर काम करत होती. एरिना तू हिच्या नंतर आलीस. त्या दिवशी सुहानी..

दुर्वा :- सर नो...

अन्वित :- दुर्वा..! Keep quiet..  सुहानीचा अॅक्सिडेन्ट झाला होता.. she was तिचा रेअर ब्लड गृप होता. O -ve... सगळ्यांना विचारले. कुणीच पुढे आले नाही. रात्री अकरा वाजता हिला फोन केला मी.  हिने पुढाकार घेतला आणि माझी सुहानी वाचली आणि आमची तिच्या पोटातली बाळंही...

एरिना :- Means Ahana and Sanvi...?

अन्वित :- हो त्या दोघी झाल्या आणि अर्ध्या तासाच्या आत ह्या आत्याबाईने नावं पण ठेवली दोघींची...

अभिलाष :- पण सर हिचे तुम्ही जास्त लाड करता.. आणि हे काय गं हाताला नवीन दागिना..!

अन्वित :- एंजेल तुझ्या हाताला इतकं काय लागलंय..? JC संरांनी पण नोटीस केले मघाशी. ऐकले मी. तुला स्कुटी हळू चालवता येत नाही का..?

अभिलाष :- नाही सर.. ती स्कुटी चालवत नाही. विमानासारखी उडवते. दुर्वा बरोबर ना.. सांग कुठल्या रनवे वर विमान बंद करायचं विसरलीस सांग..

दुर्वा :- आपण या विषयावर नंतर बोलूया..? आत्ता मला ऑफिसमध्ये आलीये तर काम करू द्या. एकतर ही माझी चेअर, माझा डेस्क....खूप मिस केले. तिकडे एक केबिन होते पण इतकी मजा येत नव्हती. आपण लंच ब्रेकमध्ये बोलूया...

सगळे जण आपापल्या डेस्कवर जाऊन बसले. दुर्वा पण तिच्या डेस्कवर जाऊन बसली. समोरच तिला तिचा आणि तिच्या आईबाबांचा सोबत असा फॅमिली फोटो दिसला. जो तिने तिच्या डेस्कवर ठेवला होता. दुर्वाला फोटो बघून भरून आले पण तिने आपल्या भावनांना आवर घातला आणि स्वतःला कामात गुंतवून घेतले. काम करता करता किती उशिर झाला हेच कळले नाही. तोच मागून शिपाई हरिदादा आले.

हरिदादा :- दुर्वा मॅडम..! JC साहेबांनी बोलवले आहे तुम्हाला...!

दुर्वा :- अरे हो.. थॅन्क यू हरिदादा.. संरांनी पाठवले तुम्हाला...?

हरिदादा :- नाही ओ मॅडम.. सकाळी नाही का सर बोलले तुम्हांला... लंच टाईम आधी या केबिनमध्ये... जाल तर सांभाळून जा.. सर जरा चिडलेले दिसत होते.

दुर्वा :- थॅन्क यू हरिदादा.. आठवण करून दिल्याबद्दल तुम्हाला हे बक्षिस.. ( आणि स्वतःकडील एक छोटीशी चाॅकलेट शिपायाच्या हातात देऊन ती चेअरवरून उठली.)

अन्वित :- एंजल.. लंच टाईम व्हायला पंधरा मिनिटं आहेत. सर ओरडतील विनाकारण.. आधीच सकाळी उशिर झाला आहे तुला...

दुर्वा :- त्यांनीच बोलवले आहे. हरिदादा आठवण करून द्यायला आले होते बघ..

अन्वित :- ठीक आहे जा... चल लंच टाईमला एकत्रच जेवण करूया..

दुर्वा :- मला किती वेळ लागेल अंदाज नाही. तुम्ही करून घ्या लंच.

अन्वित :- ठिक आहे. ऑल दी बेस्ट...बाय

दुर्वा :- बाय..

दुर्वा केबिनबाहेर उभी राहून दारावर knock करते. तरी सरांच्या लक्षात आले नाही. आतमध्ये कंपनीचे CEO ललित चिमणकर आणि MD जगदीश चिमणकर  दोघेही बसले होते.

दुर्वा :- सर, मे आय कम ईन?

ललित  सर :- कम ईन मिस. दुर्वा जोशी.. प्लीज सीट डाऊन..

दुर्वा (खुर्चीवर बसून) :- थॅन्क यू सर..

जगदिश  सर :- मिस. दुर्वा जोशी आज सकाळीच मला SS Global Infotech मधून फोन आला होता. मला ही अपेक्षा नव्हती तुमच्या कडून तरी...  तुम्ही असं कराल असे जन्मात वाटले नव्हते मला..

दुर्वा :- सर माझं काय चुकलं..? मी तर माझं सगळं काम चोखपणे पार पाडलं आहे.  सर मी काय चुकीचे केले? मी तर जवळपास 90% काम तरी पूर्ण करून ठेवले होते. मि. दमाणे यांना फक्त प्रोडक्टचं GPS analysis बरोबर होतंय का याची खात्री करायची होती. ज्याला फार फार तर दिड आठवडा जाईल. पहिली गोष्ट म्हणजे मला ललित संरांनी ( C.E.O.) यांनी सांगितले होते म्हणून मी तो प्रोजेक्ट हॅण्डल केला होता.

ललित सर :- हो माहिती आहे मला.. म्हणून मी तुम्हाला बोलावले आहे. आणि मला सांगायला आनंद होतोय की आपला प्रोजेक्ट म्हणजे आपलं प्रोडक्ट बनवून रेडी झालंय काल..! फायनल सबमिशन्स पण झालीत.. तुम्ही खूप छान काम केले आहे. असंच काम कराल तर तुमचं पुढल्या पाच सहा महिन्यांत प्रमोशन नक्की होईल.

दुर्वा :- पाच सहा महिन्यांत ?? सर मी काही दिवसांपूर्वी तुम्हाला एक मेल केला आहे. तो चेक करा ना जरा...

ललित सर :- हो ते application.. ते मी रिजेक्ट केलं मी.. मला तुमच्या सारखे कर्मचारी हवे आहेत माझ्या ऑफिसमध्ये...  इथे तुम्हाला खूप ग्रोथ आहे. तुम्ही जास्तीत जास्त एक वर्ष पण नव्हता या कंपनीत..? हे नियमांच्या विरूध्द आहे..

दुर्वा :- सर पण मला आता इथे काम करायचं नाही. प्लीज माझ्या राजीनाम्याचा स्विकार करा..


जगदीश सर :- मिस. दुर्वा मला तुमचा हा attitude खूप आवडला. ऑल दी बेस्ट फाॅर युअर फ्युचर... तुम्ही हा जाॅब सोडत आहात हे तुमच्या फ्रेन्डसना कधी सांगणार..?

दुर्वा :- आत्ता लंच ब्रेकमध्येच..

ललित सर :- जशी तुमची इच्छा.. या आता तुम्ही..

दुर्वा :- थॅन्क यू सर..

दुर्वा दोघांशी हस्तांदोलन करून निघून गेली. दोघेही तिला पाठमोरं जाताना बघत होते. आणि मनोमन विचार करत होते की हिच होती का ती दुर्वा.. लाजरीबुजरी.. कुणाला काही उलटून न बोलणारी.. सतत मिळाले ते काम करणारी.

ललित सर :- डॅड ह्या दुर्वा जोशीत माज आलाय असे वाटत नाही तुम्हाला..?

जगदीश :- ह्याला माज नाही म्हणत. Self confidence बोलतात. जरा over झालेला दिसतोय पण जाऊ द्या.


इकडे दुर्वा पटकन कॅन्टीनमध्ये आली आणि जोरात ओरडली, "Guys Good news...!"

अभिलाष :- काय गं प्रमोशन मिळतंय की काय..?

अन्वित :- मी पाच वर्षे आहे तरी मला एकदाच मिळाले आहे. हिला काय लवकर मिळणार.. काय गं नवीन प्रोजेक्ट मिळाला आहे का..?

दुर्वा :- दोघेही चुक आहात..

एरिना :- तो फिर क्या..? Increment..?

दुर्वा :- never..

दुर्वा :- Actually I am quitting a job.. Today is my last day in office..

अन्वित (जरा रागातच ) :- काय..? तुला का काढताय ते जाॅबवरून..?

दुर्वा :- काढत नाहीयेत. मीच resigned केलंय. आज फक्त formalities पूर्ण करायला आले आहे.

अभिलाष :- हे तू आत्ता सांगतेय आम्हाला..?

दुर्वा :- साॅरी पण...

अन्वित :- दुर्वा तुझं हे वागणं आम्हाला अजिबात आवडलं नाही. हे चुकीचं आहे. Ethics वगैरे तुला काही कळत नाहीत का..?

दुर्वा :- ब्रो.. माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही. मला माझं एक काम करायचं आहे. मला आता मुंबईत झेपत नाहीये.

अभिलाष :- मग तू जिथून आलीस तिथे परत जाणार आहेस?

दुर्वा :- कदाचित हो.. पण मी ट्रान्स्फर घेत नाहीये. रिझाइन केले. लंचच्या आधीच मी सगळी प्रोसिजर पूर्ण केलीये. डेस्क पण आवरून ठेवलाय. आजचा माझा शेवटचा दिवस आहे ऑफि...ऑफिसमध्ये..

अभिलाष :- नशीब हे  तरी सांगितले. नाहीतर तशीच गायब झाली असती.

दुर्वा :- असं झालं असतं तर अन्वित सरांनी  माझा जीवच घेतला असता.


सायंकाळी घरी आल्यावर दुर्वा नेहमीप्रमाणेच गाण्याचा रियाज करत होती, पण आज तिच्या  डोळ्यात एक वेगळेच समाधान दिसत होते. कस्तुरी पण तिला असं समाधानी बघुन सुखावली होती.... 


दुर्वा :- कधी आलीस गं?  थांब पाणी देते तुला... 

कस्तुरी :- राहूदे... मी घेईन.  तू सांग की तू इतक्या लवकर घरी कशी? 

दुर्वा :- फायनली तिथली नोकरी सोडली मी... 

कस्तुरी :- मग पुढे काय...? 

दुर्वा :-पुढचा एक प्लॅन आहे. बघू काय होते..? चल मी ही पेटी ठेवते. स्वयंपाकाला लागूया.. 

कस्तुरी :- अगं नेहमी ते राग आलापच गातेस..  आज एखादं गाणं होऊन जाऊ दे... एखादं हिंदी...


दुर्वा :- ओके..  आज की महफील जिंदगी के नाम, 

आणि गायला सुरुवात करते...... 


कुछ तो लोग कहेंगे।  लोगो का काम है कहना। 

छोडो बेकार कीबाततो को अभी,  बीत न जाए रैना।। 




***********************************


सायंकाळी राघवला मुलगी बघायला म्हणून मुलीकडचे येणार होते. राघवची आई आणि मामी सगळं घर आवरत होते.

राघवची मामी :- राणू बेटा.. जा बरं दुकानातून ह्या वस्तू घेऊन ये.  मुलीकडचे तासाभरात येतीलच.

राघवची आई :- अगं बघत काय बसलीस? जा पटकन...

ख्याती :- आई आपल्याकडे मुलाकडचे मुलीला बघायला येतात. ही फॅमिली वेगळी नाही वाटत?? 

राघवची आई :- तू उगिच तुझं डोकं वापरू नकोस. जे सांगितले ते घेऊन ये आणि ऐक ते लोक आल्यावर बडबड करू नकोस नेहमीसारखी. दुर्वाबद्दल काहीच बोलू नकोस.

ख्याती :- हो गं आई।।।  मी तसंही नसणार बहुतेक घरी. मैत्रिणीकडे जाऊन प्रोजेक्ट करायचा आहे. दुपारी चार ला जाईल मी. 

राघवची मामी :- अगं ती मंडळी चारला येतील तू जुजबी बोलून जा की। साडेचार ला जा हवं तर..

राघवची आई :- ते नंतर बघू.  आता तू वाणसामान घेऊन ये बरं. 

आई आणि मामीचा निरोप घेऊन ख्याती दुकानात गेली. भावाचे असे अचानक लग्न ठरणे तिला पचनी पडत नव्हतं.


मुलीकडची मंडळी वेळेनुसार चार वाजता हजर झाली. राघव अनिच्छेने का होईना मुलगी बघायला म्हणून उपस्थित होता. त्याने एकवार मुलीकडे बघितले तर ती जराशी उदासच वाटत होती. पायाच्या अंगठ्याने जमिनीवर रेघोट्या मारत होती. इकडे राघवची आई आणि मामा मामी राघवची खूप स्तुती करत होत्या.

मुलीचे वडील :- ही माझी मुलगी श्रुतिका b.. comp. झालीये. अभ्यासात हुशार आहे पण घरकामात अतिशय निपुण आहे. मी तिला नोकरी करू देत नहिये. शेवटी काय मुलीला चूल आणि मुलं सांभाळायला हवे. शिवाय नाच गाण्याची थेरं तर नाहीत.

राघवचे बाबा :- असे का बोलता तुम्ही.. कोणतीही कला जोपासणे म्हणजे थेरं नव्हे. आवड आणि छंद असतात.

राघवची मामी :- आमचा राघव ही लाखात एक आहे हो... ना कसले व्यसन कि वाईट वळण.. सरळमार्गी आहे. आई बाबा तर आहेतच पण ख्याती तर त्याचा जीव कि प्राण आहे.  मल्टिनेशनल कंपनीत मॅनेजर आहे.

ख्याती :- मामी regional head....

राघवची आई :- हो हो regional head.... Khyati
तुला मैत्रिणीकडे जायचे ना अभ्यासाला. पळ बरं तू...
(तिला बोलण्यातला रोख पाहून सांगितले )

ख्याती साऱ्यांचा निरोप घेऊन निघून गेली. इकडे राघव बिचारा एकटाच ताटकळत बसून होता.

मुलीचे वडील :- म्हणजे होकार समजावा का आम्ही..? आम्हाला तुमचा मुलगा पसंत आहे.

राघवची मामी :- आम्हाला पण पसंत आहे मुलगी.. नाही ka रे राघव...

राघवची आई :- अहो पण मुलीला तर विचारा. तिची पसंत आहे का.. लगेच तुम्ही निर्णय देऊन मोकळे झालात.

मुलीचे वडील :- अहो तिला काय कळतंय..? ती तुमच्या हो ला हो करणार.. काय..?

राघवचे बाबा :- थांबा जरा.. राघव बेटा तुला काही बोलायचे असेल तर बोल.. निर्धास्तपणे...

राघव :- आम्ही एकट्यात जाऊन बोललो तर चालेल का..?

राघवची आई :- हो जा दोघेही तुझ्या खोलीत...

मुलीचे वडील नाखुशीने का होईना मुलीला पाठवतात.

राघव आणि श्रुतिका दोघेही त्याच्या खोलीत येतात. राघव काही बोलणार इतक्यात तिनेच बोलायला सुरुवात केली.

श्रुतिका :- माफ करा मला. मी काही बोलले नाही खाली. पण मला तुमच्याशी लग्न करण्याची इचछा नाही. पण जर तुम्ही मला नकार दिला तर... (आणि डोळ्यातले अश्रू पुसले..)

राघव :- तसाही मी तुम्हाला नकार देणार होतो. माफी मागू नका. रडू तर अजिबात नका.

श्रुतिका :- माहित आहे मला... तुम्ही मला नकार देणार आहात. आणि तुमच्याशी लग्न करून मी खूप मोठे पाप केले असते. आणि मला जीव लावणाऱ्या दोन  व्यक्तीशी खूप मोठी प्रतरणा झाली असती.

राघव :- म्हणजे काय? मी समजलो नाही.. जरा सविस्तर सांगा. खाली पण मला पाहून तुमचे डोळे पानावले होते.

आता राघव ऐकत होता आणि फक्त श्रुतिकाच बोलत होती. राघव तिचे बोलणे ऐकून शॉक झाला. थोडा वेळ दोघेही शांत बसून होते.

राघव :- असे आहे तर.. मामीला जर हे ठाऊक असते तर तिने आधीच नकार दिला असता पण असो अजून काही बिघडले नाहीये. आपण आता तरी आपल्याकडून होकार किंवा नकार ठरलं नाही असे सांगूया. बाकी प्लॅन रेडी आहे.

श्रुतिका :- म्हणजे तुम्ही करणार काय आहात..?

राघव :- तर ऐका. होकार देऊ या.

श्रुतिका :- पण...

राघव :- ऐका तर पूर्ण...

आणि राघव एक योजना आखतो

श्रुतिका :- पण तुम्ही माझ्यासाठी इतके का करणार आहात..?

राघव :- ऐका माझं... काही नाही होणार...


थोडे जुजाबी बोलणे झाल्यावर दोघे हसत खोलीबाहेर आलेले पाहून राघवच्या आईला खूप बरे वाटले.

मुलीचे वडील :- काय मग होकार ना.. नाही ते हसत खोलीबाहेर येताना पाहिले म्हणून विचारलं.

राघव :-  आम्हाला हे लग्न मंजुर आहे आणि नाही सुद्धा.. म्हणजे जाणून घेतल्याशिवाय आम्ही होकार कि नकार देऊ शकत नाही..पण मला आणि श्रुतिकाला विचार करायला वेळ हवाय. तडकाफाडकी बार नाही उडवायचा मला .. द्याल ना मामा (मुलीच्या वडिलांकडे बघत)

मुलीचे वडील :- घ्याघ्या हवा  तितका वेळ घ्या जावईबापू..

इकडे मुलगी आणि तिचे आई बाबा आनंदात दिसत होते तर राघवच्या घरातले बुचकळ्यात पडले होते.. जो राघव तासाभरापूर्वी मुलीकडचे येणार म्हणून रागारागात वस्तू अस्तव्यस्त करत होता तो आता हसत बाहेर आला हे पाहून त्यांना काही समजले नाही. राघवची मामी उत्साहात होती. शेवटी तिच्या लाडक्या भाच्यासाठी बायको तिने शोधली होती ह्या गोष्टीचा तिला अभिमान वाटत होता.

राघवची मामी :- काय हो... तुम्ही श्रुतिकाच्या मावशीला आणणार होता ना..? त्या का नाही आल्यात..?

मुलीची आई :- अहो.. माझी बहिण देवगड हुन इतक्या लांब येऊ नाही शकत. एक तर तिचं आजारपण आहे. पोरगा परदेशात, पोरीचं तर विचारूच नका.. मीच बोलले कि नको येउस..

राघवची मामी :- पण तुम्ही तर बोललात कि हिची मावशी मुंबईत असते...?

मुलीची मावशी :- छे हो.. ती माझ्या बहिणीची जाऊ आहे. पण सध्या ती मुंबईत नाही. आली कि नक्की भेट घडवून देईल.

असेच दिवस पुढे जात होते. मुलीचे वडील बोलणी पुढे वाढवण्यासाठी राघवच्या घरच्यांच्या मागे तगादा लावत होते. इकडे राघवच्या बहिणीला त्याच्या निर्णयाचा राग आला नसून त्याच्या वागण्याचा खूप राग येत होता. एकीकडे  श्रुतिकाचा विषय अजिबात न काढणारा राघव दुर्वाला फोन करून त्याचे लग्न ठरले असे खोटे सांगीतले होते.  हो नाही म्हणता राघव होकार देतो आणि राघवचा आणि श्रुतिकाचा साखरपुडा ठरतो. ही गोष्ट दुर्वाला तर समजली होतीच पण कुठूनतरी दीपक काकांना पण समजली होती. म्हणून एकदा रस्त्यावर राघवशी भेट झाली असूनही ते त्याच्याकडे रागाचा कटाक्ष टाकून निघून गेले.

अश्याच एका दिवशी राघव त्याच्या ऑफिसच्या बाहेर पडत असताना त्याच्यासमोर दीपक काका स्वतःहून समोर आले. थरथरणार अंग आणि डोळ्यात किती तरी वेळ लपवलेले अश्रू त्याला स्पष्ट जाणवले. त्याला प्रसंग आणि स्थळ बघता कल्पना सुचली.

राघव :- दीपक काका खूप crowd आहे इथे... चला coffee shop मध्ये जाऊन बोलूया.

दीपक काका :- चालेल.

दोघेही शॉप मध्ये येऊन एका टॅबलेवर येऊन बसतात.

राघव :- बोला काका... काय झाले..? (आणि अलगदपणे त्यांच्या हातावर हात ठेवला.) काका तुम्हाला ताप आला आहे. चला डॉक्टरांना दाखवूया.


दीपक काकांना राघवचे बोलणे ऐकून गहिवरून आले आणि ते रडू लागले.

दीपक काका :- माफ कर बाळ मला.. परी च्या सुखासाठी मी स्वार्थी होऊ बघत होतो. पण शेवटी तुला पण तुझं आयुष्य आहेच. कर लग्न आणि सुखाचा संसार कर.

राघव :- काका calm down..

दीपक काका :- कसा सवरू रे... तुझी माई आत्या जाताना बोलून गेली कि तिच्या लाडकीला मी जपाव. पण मी असा करंटा कि.. जाऊदे..

राघव :- काका नीट सांगा... काय झाले..?

दीपक काका :- नको बाळ... तुझा साखरपुडा आहे ना पाच दिवसांनी.. तू तुझ्या तयारीच बघ..

राघव :- काका.. तुम्हाला तुमच्या परीची शपथ.. सांगा काय झाले..?

दीपक काका :- अरे माझी लेकरू कुठे गेली कळत नाहीये.. घरी जाऊन पहिले तर मालक बोलतोय कि ती डेपोसिट घेऊन घर खाली करून निघून गेली.. तिच्या सोबतच्या मुलीला पण ठाऊक नाही.. परवाच आमचे एक फॅमिली डॉक्टरांना भेटलो तर तिला रक्त आणि पेशी कमी आहेत हे समजले.. अशक्तपणा.... एकतर जन्मापासून नाजूक आहे. तिने रिपोर्ट घ्यायला म्हणूनही डॉक्टर कडे जाण्याची तसदी घेतली नाही..

राघव :- काका काळजी करू नका... तिच्या officela जाऊन तपास करूया..

दीपक काका :- काही उपयोग नाही.. तिने जवळपास महिना झाला तिथली नोकरी सोडली आहे.. फोन पण लागत नाहीये तिचा.. मी फक्त तुझी माफी मागायला आलो आहे.. आता मी चाललो कोकणात.. कायमचा..

राघवने बिलाचे पैसे चुकते केले आणि दोघेही बाहेर आले..

राघव :- काका आपण काहीही करून दुर्वाला शोधून काढूया...

दीपक काका (राघवाच्या डोक्यावर हात ठेवत ) :- तू मला मुलासारखाच.. निदान तू तरी आयुश्यात पुढे जा.. सुखी राहा.. आणि दुर्वाचा विचार सोड.. नाहीतर तुझी बायको म्हणून येणाऱ्या लेकरावर अन्याय होईल..
क्रमशः 

ऋचा निलिमा

1) राघव खरंच श्रुतिकाशी लग्न करेल का? 

2) दिपक काका दुर्वाला शोधण्यात यशस्वी होतील का? 



🎭 Series Post

View all