मेरे लिए तुम काफी हो..(भाग-२१)

This Story Based On the Girl Who Avoid Him....


माफ करा दोस्तहो काही अपरिहार्य कारणांमुळे मला भाग प्रकाशित करणे जमले नाही. तुम्ही माझ्यावर रूसला आहात हे ठाऊक आहे मला... पण प्लीज तुमच्या लाडक्या दुर्वा आणि राघववर प्लीज रागवू नका... आधी केलंत तितकंच प्रेम तुम्ही त्या दोघांवर कराल हे मला पुरेपूर ठाऊक आहे..
( मागल्या भागात आपण पाहिले राघवच्या आईने सांगितले
म्हणून दुर्वाने राघवपासून दूर रहावे असे  सांगते. पण ती खरंच दूर राहील का राघवपासून.... ती लाख राहीलं हो पण राघव राहील का? ) आता पुढे....


दिपक काकांना दुर्वाला अजिबात अडवायचे नव्हते. त्यांना सहज शक्य होते तरी त्यांनी तिला टाळले....

त्यांना दुर्वा त्यांच्यापासून दूर जात असताना दिसत होती. अचानक काही तरी आठवून त्यांनी तिला अडवले.

दिपक काका :- दुर्वा बेटा... तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे...तुझे आई बाबा...

दुर्वा :- काय काका... काहीच उरले नाही आता... तरी तुम्हाला खूप खूप थॅन्क्स...! की तुम्ही तरी मला अजुनही आपलं मानता. पण सत्य परिस्थिती वगळता येणार नाही. मी एक अनाथ आहे. दुर्वा जोशी ही फक्त नाममात्र जोशी आहे. ती खरी नेमकी कोण आहे..? कोणाची मुलगी आहे?? हे कुणालाच माहित नाही. तुम्ही आणि माईआत्या माझ्यावर जीव ओवाळून टाकत होतात. तुमची दोन्ही मुलं म्हणजे साहीलदादा आणि गौरव दादा मला सख्ख्या बहीणीचं प्रेम करतात. अजुनही माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मेल करतो साहील दादा...  आणि त्यांच्या आईच्या जाण्याचं कारण मी...! माझ्यामुळे माईआत्या गेली.

दिपक काका :- नाही बेटा...! संजीवनीला हार्ट अॅटऽक आला. त्यात तुझा काय दोष...? तू दिसली नाहीस म्हणून तिला त्रास झाला. खरं तर दोष माझाच आहे..... मी आ...

दुर्वा (अडवत) :- काका प्लीज नको ते सगळं... मीपण विसरण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही पण करा... आता खूप उशीर झालाय. मला निघायला हवं....

दिपक काका (अडखळत):- तुझे आई बाबा....

दुर्वा :- काका जे गेलं ते जाऊद्या.. आणि जमल्यास आई बाबा मला विसरलेत तसेच तुम्ही पण मला विसरून जा. गुड बाय...

   दुर्वा टॅक्सीत बसून निघून गेली तरी कितीतरी वेळ दिपक काका तिच्या वाटेकडे डोळे लावून बघत उभे होते. इकडे दुर्वा रडत रडतच घरी पोचली. दुर्वा स्वतःजवळची किल्ली घेऊन दार उघडणार कुणीतरी दार उघडलं..... तर समोर तिची फ्लॅटमेट कस्तुरी होती. कस्तुरी जवळपास दुर्वाच्याच वयाची होती. ती दुर्वाला अगदी लहान बहिणीप्रमाणे जपायची.

दुर्वा :- कस्तुरी....! तू अशी अचानक...! कशी आहेस? न कळवताच आलीस?

कस्तुरी :- माझं जाऊदे तू तुझं बघ.... डोळे लाल झाले आहेत. रडत होतीस ना... 

दुर्वा :- छे गं... कुठे काय? आता तू प्लीज आत येऊ दे मला आणि प्लीज थोडंसं पाणी दे. नंतर स्वयंपाक करते मी...

कस्तुरीने दुर्वाला आत घेतले आणि दार लावून घेतलं. इकडे दुर्वा डोक्याला हात लावून पहुडली होती. आणि डोळे अजुनही पाणावले होते. कस्तुरी किचनमधून तिच्यासाठी पाण्याचा पेला घेऊन येते तर तिचा बॅण्डेज लावलेला  हात तिला दिसला.

कस्तुरी :- अगं दुरू हे काय...? हाताला किती लागलंय... बावळट सांगता येत नाही का तुला? दवाखान्यात जाऊन आलीस का...? बॅण्डेज तर आहे. पण टि.टी. चं इंजेक्शन घेतलंस का..? खबरदार जर या पुढे ती खटारा स्कुटी वापरली तर... कसं लागलं..? कुठे लागलं...? बोल ना सुक्काळी... तोंड शिवलं का तुझं...?

दुर्वा :- आत्ता कुठे मला आमचा कोल्हापुरी प्लस मुंबई डायलाॅग ऐकायला मिळाला. आता कसं झ्याक वाटतंय.

कस्तुरी :- फालतुपणा झाला असेल तर नीट सांग. नाहीतर कानफट फोडंल.

दुर्वा कितीतरी वेळ तिला टाळण्याचा प्रयत्न केला पण कस्तुरी हटून बसली होती. नाईलाजास्तव दुर्वाने तिला सारे काही सांगितले. कस्तुरीच काय तिच्या संपर्कात असलेल्या एकाही व्यक्तीला तिने आजवर काहीच सांगितले नाही.

कस्तुरी :- दुर्वा आता पुढे काय करणार आहेस ते सांग मला...!

दुर्वा :- पुढे काय...? उद्याच ऑफिसमध्ये जाऊन राजीनामा देते आणि निघून जाते इथून... माझं freelancing चं कामही आहे की जोडीला. ते करेल मी... मुळात मी मुंबईत आली हीच खूप मोठी चूक झाली. माझ्या येण्याने राघवला त्रास झाला.

कस्तुरी :- अगं पण ह्या ऑफिसमध्ये तुला एक वर्ष पूर्ण झालं नाही. आज काय तारीख आहे, दहा...! अठरा तारखेला तुझा BOND पूर्ण होतोय. तेव्हा कर रिजाइन..  तसंही तो कमलाकर कितीही बेरकी असला तरी तू पण रेड बेल्ट आहेस... टाक गुद्दा आणि पाड हाणून.... आजवर एकटी होतीस तेव्हा घाबरली आता का घाबरतेय...

दुर्वा :- हो अगं... तू सांगते  ते बरोबर आहे. कस्तुरी THANK YOU SO MUCH.....

कस्तुरी :- खूप झालं आभार प्रदर्शन आता...! चल आवरून ये मी तुझ्यासाठी पालक सूप बनवून आणते.

दुर्वा :- ओके....!

ती खोलीतून आवरून येते तोवर कस्तुरी तिच्यासाठी खाण्याच्या वस्तू घेऊन टेबलावर मांडते.

कस्तुरी :- दुर्वा...! पालक सूप गरम आहे तोवर पटकन घे आणि नंतर गोळ्या घेताना हळदीचं दूध घे.

दुर्वा(मोबाईल चाळत) :- हो...

कस्तुरी :- अगं तो फोन अजुनही हातात आहे का तुझ्या...? ठेव बरं आधी...!

दुर्वा :- अगं हाॅस्पिटलमध्ये फोन केला होता गं आत्ताच मी खोलीत असताना... राघवला डिस्चार्जड मिळाला आहे. फार काही लागलं नाहीये. राघवला फोन करणं ही मुद्दाम टाळतेय. आणि मी माझ्या वाटणीचं प्रोजेक्टचं काम पूर्ण केलंय. आता फक्त  analysis बाकी राहीलंय ते काम राघवच्या पर्सनल टिमचं आहे. आता मी त्याच्या ऑफिसमध्ये जाण्याची काहीच गरज नाही. उद्यापासून मी माझ्याच ऑफिसला जायचे ठरवले आहे. बाॅसशी तेच डिस्कस करत होते.

कस्तुरी :- अगं पण तिथे तुझ्या वस्तू असतील त्यांचं काय..? त्या कधी आणशील...?

दुर्वा :- उद्या नाही पण उद्या सकाळी लवकर जाऊन घेऊन येईन सो डोन्ट वरी...! तसंही तिथे माझी शेवटची मिटींग आहे....

कस्तुरी :- ठिक आहे... चल जेवून घे...

  इकडे राघवची अवस्था काही निराळी नसते. तो इकडे दुर्वाच्या आठवणीत झुरत होता. पण आईने घरी आल्यावर त्याचा फोन   हिसकावून स्वतः कडे  स्विच ऑफ करून ठेवला होता. इकडे दुर्वा कशी आहे या अनामिक भीतीने त्याची मनस्थिती पूर्णपणे ढासळत होती.  आज जी भेदरलेली दुर्वा त्याने पाहिली होती ती मुळात कधीच तशी नव्हती. कोणे एके काळी कौस्तुभ समुद्रे सारख्या  हाणून पाडणारी दुर्वा कमलाकरला बघून का घाबरली हेच कोडं त्याला उलगडत नव्हतं म्हणून त्याला तिची काळजी वाटत होती. त्याने हाक मारून ख्यातीला खोलीत बोलवले.

ख्याती :- काय रे दादा... इतकं लागलंय तर झोपायचं सोडून काय मला बोलवलंस. झोप आता रात्र खूप झालीये. आई तुला तर ओरडेलच पण मला त्याहून जास्त ओरडेल.

राघव :- आजीबाई.. जरा गप्प बसा.. आणि तुमच्या हातातील फोन प्लीज मला द्याल का...? लॅण्डलाइन नको...

ख्याती :- तुला जर दुरूशी बोलायचं असेल तर थांब... आई झोपी आली असेल एव्हाना... आई बाबांच्या खोलीची लाईट बंद झाली की मग मी तुला सांगायला येते. तेव्हा तिला फोन कर....

राघव :- बापरे...! इतकं कसं कळायला लागलं आमच्या बाळाला...

ख्याती :- दादा तुला माहिती नाही की मिस.....

राघव :- हो... मिस. ख्याती कृष्णकांत देशमुख इझ् मोस्ट इंटेलिजंट गर्ल ऑफ व्होल देशमुख फॅमिली... जा पळ आता आणि दिवे बंद झाल्यावर सांगायला ये मला...

ख्याती :- अरे दादा पण तिचा नंबर आता नाहीये माझ्याकडे... तुझा फोन तर आईकडे.... कसं मॅनेज करणार??

राघव :- अगं मला महत्वाचे नंबर पाठ असतात...

ख्याती :- ओके... चल मी जाते आता...

राघव :- अगं तुझा फोन...

ख्याती :- तुला हवाच आहे ना नंतर...? राहूदे तुझ्यापाशी. उद्या सकाळी दे मला.... तसंही उद्या सण्डे आहे.

असे बोलून ख्याती तिच्या खोलीत निघून गेली. जातानाही त्याच्या खोलीतल्या खाऊच्या डब्यातून मुठभर खाऊ घेऊन निघून गेली. ख्यातीचा हा अल्लडपणा बघून त्याला दुर्वाची खूप आठवण आली. अशीच तर होती दुर्वा अगदी अल्लड, स्वच्छंदी, खोडकर आणि तितकीच  लोभस सुद्धा..... पण आताची दुर्वा बघता ती खूप अबोल, शांत आणि मितभाषी झाली होती. काॅलेजमध्ये असताना जेव्हा  दुर्वा त्याच्या घरी यायची तेव्हा सगळ्यांना आपल्या लाघवी आणि गोड बोलण्याने भूरळ घालत असे. सतत बडबडणारी आणि आपल्या गोड आवाजात गुणगुणणारी दुर्वा क्वचितच एक शब्द बोलत असे. हा विचार करताना राघवचे डोळे नकळत पाणावले तोच ख्याती खोलीत आली....

ख्याती :- दादा... आई झोपली रे... माझा फोन... दादा एक मिनिट तू रडतोय..? काय झालं..?

राघव ( डोळे पुसत) :- काही नाही गं... ते मार लागलाय त्याच ठिकाणी हात लागला म्हणून ठणकत होते तर डोळ्यातही पाणी आले. तू बोल काय बोलत होतीस...?

ख्याती :- हेच की आई झोपली आहे. तू बोल दुरूशी.. ! मी जाते झोपायला....

राघव :- दुर्वा तुझ्यापेक्षा मोठी आहे. तिला ताई बोलत जा गं. नावाने हाक मारणं चांगलं नाही दिसत. किती वेळा बजावलंय मी तुला...!

ख्याती :- दादा मी तिला दुरूच बोलते मी तेच बोलणार... मला तर तिला वहिनी बोलावं वाटतं. पण तुम्ही काही करतच नाहीत. तुम्ही दोघं पटकन पॅच अप करून घ्या.

राघव :- हो माते... तू जाऊन झोप आता...की तुला ऐकायचं आहे आमचं बोलणं...?

ख्याती :- नाही..  तुमचं बोलणं नाही ऐकायचं पण तुमचं पॅच अप झालंय हे ऐकायचं आहे.. बाय.. ऑल द बेस्ट...!

ख्याती निघून गेली याची खात्री करून राघवने दुर्वाला फोन केला...

दुर्वा (तिकडून)  :- हॅलो कोण बोलतंय...?

राघव ( फोनवर ) :- दुर्वा मी आहे राघव.. हा नंबर ख्यातीचा आहे...

दुर्वा :- ओह... तुझी तब्येत ठीक आहे ना? डोक्याला मार लागला आहे. काळजी घे स्वतःची... आणि इतक्या रात्री फोन करतोय...? झोपला नाहीस अजून..  राघव स्वतःच्या तब्येतीविषयी इतकी हयगय करू नकोस...

राघव :- हेच जर मी तुला म्हटलं तर....?

दुर्वा :- तुला नेमकं काय म्हणायचं आहे राघव...?

राघव :- यार... दुर्गामती तू स्वतः कडे बघ जरा...! किती बदलली आहेस ? त्या कमलाकरला काय घाबरलीस आज...? काॅलेजमध्ये असताना त्या कौस्तुभला कसला हाणून पाडला होतास आणि आज अचानक अशी काय बिथरलीस... दुर्वा इतकी घाबरून का जगत आहेस...? नेहमी हसणारी, भांडणारी माझी दुर्गा कुठे आहे...? मला काही बोलायचं नाही. उद्या ये माझ्या घरी..  आपण सविस्तर बोलूया माझ्या घरच्यांशी.. ते तुला स्विकारायला तयार होतील...  आणि राहिला आईचा प्रश्न.. तिला समजावणे इतके अवघड नाहीये. माहितीये मला तुम्हा दोघींचं दवाखान्यात काय बोलणं झालं ते... आईनेच सांगितलंय मला... पण तिला समजावणे अवघड नाहीये.... तुझ्या घरचं तसंही कोणीच नाहीये. आणि बाबांना आणि राणूला( ख्यातीला) आपलं रिलेशन मान्य आहे...

दुर्वा :- पण आता हे रिलेशन मला मान्य नाहीये.

राघव :- काय बडबडतेय तू  दुर्वा...? इतक्या सहजासहजी आपलं नातं तुटू शकत नाही.

दुर्वा :- राघव आपलं नातं कधीच तुटलंय पण तुला अजुनही समजत नाहीये रे... तू ज्याला प्रेम म्हणतोय ते फक्त एक मृगजळ आहे, काटेरी कुंपणाचं... तुझ्या प्रेमाला इथे काडीचीही किंमत नाहीये रे....

राघव :- प्रेम फक्त माझं आहे का...? तुझं नाहीये का माझ्यावर..?

दुर्वा :- ते तितकसं महत्वाचं नाहीये राघव...

राघव :- दुर्वा तुझ्या मनात नेमकं काय आहे मला नीट सांग यार... का अशी वागतेयस.....

दुर्वा (जरा चढ्या आवाजात) :- ऐकायचं आहे ना तुला... माझ्या मनात काय आहे..? तर ऐक शांतपणे... माझं नाही आता कुणावर प्रेम... नातीगोती, जिव्हाळा, प्रेम, वात्सल्य,   आपली माणसं, आपुलकी या शब्दांचा तिटकारा येतोय मला... नाही मी कुणाला आनंदी ठेवू शकत.... माझं रक्त नासकं रक्त आहे. मी माहीत नाही कुणाचं पाप आहे... तू प्लीज विसर मला... तू किती दुःखी आहेस... तुला त्रास होतोय याची मला काहीच पडली नाहीये... I beg of you Raghav...

इतके बोलून झाल्यावर तिचे आवसान गळाले आणि ती हुंदके देऊन रडू लागली. इकडे तिचे हुंदके ऐकून राघवचेही डोळे पाणावले होते. तोही रडत होता पण मनातल्या मनात....

दुर्वा :- राघव मी फोन ठेवते... तू झोप आता खूप उशीर झाला आहे. बाय....

  इतके बोलून दुर्वाने फोन ठेवला आणि राघव कितीतरी वेळ शांत बसून एकटक dialed list मधील दुर्वाचा नंबर एकटक पाहत बसला होता. फोन हातात ठेवून तो कधी झोपी गेला हे त्यालाही समजलं नाही.


पुढल्या दिवशी राघव  फाॅर्मल व्हाईट कलरचा शर्ट, ब्लॅक पॅण्ट, शुज आणि मॅचिंग टाय घालून खाली आला.

राघव :- राणू.... हा घे तुझा फोन.. चार्ज करून दिलाय... आणि फोनमध्ये किती ते गेम खेळत असते.. अभ्यास करत जा जरा..

ख्याती ( हळू आवाजात ) :- हो दादा.. पण काल काय झालं ते तर सांगशील..! बोल ना. काय बोलली दुरू...

राघव ( चढ्या आवाजात ) :- तुला कसल्या चांभार चौकश्या... अभ्यासाकडे लक्ष दे... लहान आहेस लहानच रहा. मोठी होऊ नकोस...

राघवचा आवाज ऐकून राघवचे आई बाबा त्याच्याजवळ येतात. राघवची चिडचिड बघून त्यांनी डोळ्याने ख्यातीला शांत बसण्याचा इशारा केला.

राघवची आई :- गब्बू... बेटा आज इतकी तयारी करून कुठे चाललाय... काल इतकं लागलंय... आणि त्यात रविवार.. मी अजिबात तुला कुठेच जाऊ देणार नाही..

राघव :- आई ऑफिसमध्ये एक अर्जंट मिटिंग आहे. एका तासातच संपेल. मला जावं लागेल. मी नाही गेलो तर माझ्या कामाचं श्रेय कुणी दुसरं घेऊन जाईल.

राघवची आई :- अरे बाळा पण इतकं लागलंय तुला.. ठीक आहे. पण कारने जा बाबांना घेऊन... ते तरी ऐकशील ना...

राघव :- नको आई... परवा ख्यातीचा वाढदिवस आहे. The 18th birthday... माझ्या वाढदिवसासारखाच मोठा झाला पाहिजे. तसंही आपण दरवर्षी वाढदिवस साजरा करत नाहीत. बाबांना तयारी करू दे... मामा मामी  येणार आहेत ना गावाहून. त्या दोघांशी डिल करणं मला अवघडच जातं जरा... मी ola बुक केलीये. येईल अर्ध्या तासात..

राघवचे बाबा :- अरे हो.. मी पाहुण्यांचं विसरलोच होतो बघ... बरं झालं बेटा तू आठवण करून दिलीस.. 

ख्याती :- बाबा नको ह्या वर्षी बर्थडे... दादाला पण इतकं लागलंय..आता माझा मुड नाहीये...

राघव :- आता तुझ्या मुडला काय झालंय...? वाढदिवसाच्या दिवशी केक कापण्याचं काम आहे.. जास्त शहाणपणा करू नकोस.. बाबा मी घरी आल्यावर केटरिंगचं आणि केकचं बघतो. तुम्ही फक्त त्यांचं बघून घ्या... आणि हो आई.. कृतार्थ, हर्षद आणि समृध्दी पण येणार आहेत..


इतके बोलून राघव खूर्चीवरून उठला. नेहमीप्रमाणे ख्यातीच्या डोक्यावर मायेने हात फिरवून घराबाहेर निघून गेला.

ख्याती :- आई बाबा... इतकं सगळं झालं तरी दादा बोलतोय की माझा बर्थडे साजरा करायचा. सांगा ना त्याला... समजवा ना त्याला... किती सॅड आहे तो कालपासून... त्यात माझा बर्थडे...

राघवचे बाबा :- राणी.. करू दे त्याला त्याच्या मनासारखं... आधीच खूप दुखावला आहे तो..

राघवची आई :- अगं होऊ दे तुझा वाढदिवस... तेवढाच तो रमेल... जेव्हा तुझ्यासाठी काही करतो ना तो तेव्हा बघ त्याचं दुःख विसरून जातो तो... काल इतकं सगळं झालं तरी तुझ्या वाढदिवसाचं कौतुक त्याला... बघ कालच तुझ्या वाढदिवसासाठी नवा ड्रेस घेऊन आला आहे. आता शेवटी तू त्याचं लाडकं बाळ आहेस... आता तू तरी त्याचा हिरमोड करू नकोस...

ख्याती :- ओके...

राघवची आई ख्यातीचे पाणावलेले डोळे पुसून स्वतःच्या खोलीत निघून गेली आणि बाबा नाश्त्याची प्लेट किचनमध्ये ठेवण्यासाठी घेऊन गेले...


इतके राघव ऑफिसमध्ये पोचताच लिफ्ट थांबलेली दिसली. Wait, wait wait असे म्हणून धावतच लिफ्टमध्ये जाऊन पोचला. त्याच्यासाठी लिफ्ट अडवणारी व्यक्ती  दुर्वा होती. दुर्वाला  राघव एकटक पाहत होता. राघवला जरी दुखापत झाली होती तरी दुर्वा खूप दुखावली आहे हे तिच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होते. राघवने स्वतःला सावरत बाराव्या मजल्याचे बटण दाबले. लिफ्ट सुरू झाली तसे दोघेही एकमेकांना पाठ करून उभे राहिले. राघवला डोक्याला लागले होते म्हणून त्याची जखम खूप त्रास देत होती. तो राहून राहून जखमेला हात लावत होता.

    एकदा जखमेला हात लावताच त्याच्या डोक्यात तीव्र सणक गेली. लगेच तो विव्हळला... आई गंऽऽऽ...

राघवचे विव्हळणे ऐकून दुर्वाने त्याच्याकडे वळून पाहिले. जखमेवरची पट्टी थोडीशी सरकली होती. तिने पटकन ती पट्टी तशीच नीट बांधून दिली. पट्टी बांधत असताना तिचा रडवेला चेहरा पाहून राघवही ह्ळहळला.


दुर्वा :- अक्कल नाही का राघव तुला.. लहान आहेस का समजावून सांगायला... ओल्या जखमेला त्रास होतो. खूप दुखत असेल ना...

राघव :- माझी जखम आहे ती... तुला का इतका त्रास होतोय... तुला तर कुणाचीच पडली नाहीये... बरोबर ना...

दुर्वा काही बोलणार इतक्यात बारावा मजला आला आणि दुर्वा आणि राघव ऑफिसमध्ये गेले. ऑफिसमध्ये आल्यावर दोन्ही कंपनीचे टिम मेंबर बसले होते. राघवला लागले आहे हे कुणालाच माहित नव्हतं म्हणून सगळे त्याची विचारपूस करत होते. कृतार्थ तर जणू चिडलाच होता. राघवने त्याला ह्याबद्दल काही सांगितले नव्हते म्हणून... मिटींगमध्ये  दुर्वाने तिचे काम पूर्ण झाले आणि आता पुढे फक्त analysis बाकी आहे. म्हणून ती उद्यापासून ह्या ऑफिसला न जाता तिच्या ऑफिसमध्ये जाणार हे declared केले होते. जे काही उरलेले थोडेफार काम होते ते दुर्वाऐवजी तिच्या ऑफिसमधील एक जण करणार होता. हे सगळे राघवला अजिबात ठाऊक नव्हते. त्याला मनातून खूप अस्वस्थ वाटत होते. तो एकवार कृतार्थच्या बाजूला बसलेल्या दुर्वाला समोरून न्याहाळत होता. दुर्वाला त्याचे दीनवाणी न्याहाळणे खूप वेदनादायी वाटत होते.  मिटींग झाल्यावर सगळ्यांनी दुर्वाला एक send off गिफ्ट दिले होते.  सगळे तिच्या कामाचं भरभरून कौतुक करत होते. राघवला काही बोलण्याची इच्छाच नव्हती. त्याला जितक्या लवकर ऑफिसमधून जायला मिळेल तितक्या लवकर जायचे होते. पण ते त्याच्या पोझिशनला शोभले नसते म्हणून तो तसाच शांत बसून होता.


    हळूहळू सगळे निघून जात होते तोच दुर्वा जायला निघाली. तिला बघून राघव जागेवरून उठला. थोडेसे अंतर ठेऊन का असेना तो तिच्या मागे जात होता. कृतार्थ ही दुर्वाच्या मागे जात होता. राघवही त्यांच्या मागोमाग बाहेर पडला. दुर्वा दुसरीकडे वळणार इतक्यात कृतार्थने तिला अडवले.

कृतार्थ :- दुर्वा.. If you don\"t mind आपण कॅफेटेरियात जाऊया का...? प्लीज...! काॅफी घेऊया नाही तर चल खाऊया काहीतरी.. तसंही आता साडे अकरा वाजलेत.

दुर्वा :- पण कृतार्थ सर... मला अजिबात भूक नाहीये... नको मला काही..

कृतार्थ :- कम ऑन दुर्वा... आता तू इथे कधीच नाही येणार...

दुर्वा :- ओके.. येते मी...

   इकडे राघव आल्या पावली मागे फिरणार तोच समीरने त्याला अडवले.

समीर :- अरे राघव. जरा कॅफेटेरियात ये ना.. आता हे JCLC चे शौर्य दमाणे तुझ्यासोबत असणार आहेत महिनाभर तरी... तेच जरा डिस्कस करूया...

राघव :- ओके सर हरकत नाही.

ते तिघेही कॅफेटेरियात येऊन बसले. राघवच्या मागच्या टेबलावर कृतार्थ आणि दुर्वा काॅफी घ्यायला बसले होते. दुर्वा पाठमोरी होती म्हणून राघव तिच्या मागे बसला आहे हे तिला समजले नाही.

दुर्वा :- कृतार्थ सर...! तुम्ही असं अचानक मला कॅफेटेरियात का आणले आहे..? म्हणजे काही महत्वाचे बोलायाचे आहे का तुम्हाला?

कृतार्थ :- हो... पण पहिली गोष्ट मी तुला किती वेळा सांगितलं आहे की मला सर नको बोलू... नुसतं कृतार्थ बोल...! मी काही तुला हिटलर बाॅस वाटलो का तुझा...?

दुर्वा :- पहिली गोष्ट म्हणजे माझे बाॅस हिटलर नाहीयेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी तुम्ही मला सांगत नाही आहात. (घड्याळाकडे बघत) गेली आठ मिनिटं झाली तुम्ही मला नुसतं बसवून ठेवलंय...

कृतार्थ(दीर्घ श्वास घेत) :- आय लव्ह यू दुर्वा... Will you marry me... खरं तर परवा Valentine\"s day लाच तुला विश करणार होतो पण तू आता आमच्या ऑफिसला नाही येणार.... मी तुझ्या मागे तुझ्या ऑफिसमध्ये येणार ते योग्य दिसत नाही. म्म्हणून आत्ताच विचारतो...

दुर्वा :- सर माझ्यात काय इतकं बघितलं आहे तुम्ही ज्यामुळे तुम्ही मला पसंत केले...? तुमची आणि माझी तितकी किती ओळख आहे..? तुम्हाला माझ्याबद्दल काय माहिती आहे..?

कृतार्थ :- हेच की तू खूप helpful नेचरची मुलगी आहेस... जेव्हा आमच्या ऑफिसचे शिपाई गोविंदकाका ऑफिसमध्ये चक्कर येऊन पडले तेव्हा तू बाकी कसलाही विचार न करता त्यांना दवाखान्यात नेलं. तू शांत आहेस खूप... जास्त हसायला, खिदळायला आवडत नाही. मोबाईल क्वचितच हातात असतो तुझ्या...! म्हणजे तुला नाच-गाण्याचा अजिबात शौक नाही... आजकालच्या फालतू मुलींसारखा.... कोणाशी जास्त बोलत नाहीस. विशेषकरून जेन्टस स्टाफशी... म्हणजे तू खूप समंजस आहेस...!!! म्हणून तू मला पसंत आहेस. आता माझा प्रश्न मी तुला पसंत आहे की नापसंत...?

दुर्वा :- ओके... मी शांत आहे. मी helpful आहे हे ठिक आहे पण आजकालच्या मुलींसारखी फालतू याचा अर्थ कळला नाही मला... आजकालच्या मुली तुम्हा मुलांच्या बरोबरीने काम करतात हे बोचतं ना तुम्हाला... आणि हो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेन्ट्स स्टाफशी जास्त बोलत नाहीये म्हणून ती मुलगी समंजस... मग तू तुझ्या लेडी स्टाफशी बोलतोय हा असमंजसपणा आहेच ना... जाऊ देत आपले विचार पुर्णपणे वेगळे आहेत. I think you are good man, but I don\"t like you...! मला तू नापसंत आहेस...

कृतार्थ :- अगं पण माझ्यात काय कमी आहे..? चांगल्या मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करतो. घरचं सगळं काही चांगलं आहे माझ्या..! आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. तुला कशाची कमतरता वाटणार नाही.

दुर्वा :- पण तुझ्या विचारांची कमतरता...! त्याचं काय कृतार्थ..? ती कधी भरून काढशील..? मी तुला नकार तसंही देणारच आहे पण त्या मागचे सगळ्यात मोठे कारण तू स्त्री जातीला पाण्यात पाहतोस... आठवतंय काही दिवसांपूर्वी तुमच्या accounts department मध्ये promotion list आली. तेव्हा समृध्दीचं नाव जाहिर केले होते. तेव्हा तिने किती आनंदाने सगळ्यांसाठी समोसा ट्रीट दिलेली होती. तेव्हा सगळ्यांसमोर तिला ऑफिस काय सांभाळतेस. घरी नवरा आणि मुलगा आहेत. त्यांच्याकडे लक्ष दे.. हे प्रमोशन वगैरे बायकांचं काम नाही हे बोलून तू तुझ्या बुरसटलेल्या विचारांनी तिच्या आनंदावर विरजण टाकलं. अरे एक स्त्री म्हणून नाही पण ती तुझ्यापेक्षा दोन तीन वर्षं तरी मोठी आहे. याचं भान ठेऊन तरी बोलायचंस. तेव्हा तू जे काही बोललास त्यामुळे सगळे वरचेवर जरी हसत होते, पण तुझ्या माघारी तुझीच खिल्ली उडवत होते. That\"s why I am reject you... Good bye and all the best for your future...

इतके बोलून दुर्वा तिच्या खूर्चीवरून उठली आणि मागे बघते तर राघव तिचं बोलणं ऐकून गालातल्या गालात हसत होता. दुर्वाचा त्याचा फेवरेट दुर्गा हा अवतार बघून तो मनोमन सुखावला होता. तो काही बोलणार इतक्यात दुर्वा तिथून निघून गेली. इकडे कृतार्थ चेहरा पाडून बसला होता. राघव आणि कृतार्थ दोघेही विचारांनी अगदी वेगळे होते तरी दोघेही खूप चांगले मित्र होते. राघवने उठून कृतार्थच्या पाठीवर हात फिरवून दुर्वाकडे मोर्चा वळवला.

राघव :- दुर्वा wait a minute... durva listen to me...

दुर्वा :- काय झालं..? दुखतंय का..? दवाखान्यात जायचं का आपण..?

राघव :- नाही मी ठिक आहे... ऐक ना.. परवा ख्यातीचा वाढदिवस आहे. येशिल घरी...?

दुर्वा :- राघव मी आता जुन्या गोष्टी विसरून नव्याने सुरूवात करणार आहे. स्वतःसाठी जगणार आहे. मला नाही रमायचं जुन्या आठवणीत... तू माझ्या आयुष्यात होतास ते काही वर्षे खूप सुंदर होती माझी... पण सगळ्यांना सगळं मिळतं हे गरजेचं नाही ना....

राघव :- दुर्वा पण एक गोष्ट सांगतो. कृतार्थ जरी विचारांनी पुरोगामी वाटला तरी तो एक माणूस म्हणून खूप सज्जन आहे. कोणत्याही मुलीकडे किंवा स्त्री कडे त्याने वाईट नजरेने पाहिले नाही. एकुलता एक असल्याने जरा लाडावला आहे इतकंच.. तू स्वतःसाठी त्याचा विचार करू शकतेस... कृतार्थ आणि तू जर एकत्र आलात तर माझी काही हरकत नाहीये. तू जर आनंदी असशील तर मी पण खुश असेल..

दुर्वा :- राघव...! तुझी हरकत आहे की नाही हे सांगायला मी तुझी परवानगी मागत नाहीये. मी जरी अल्लड वाटत असले तरी मला समजतो माणूस कसा आहे ते..! कृतार्थ विषयी मला जर तशी शंका असती तर मी कदाचित त्याच्याशी कधीच बोलले नसते. तसा माझा अधिकार नाहीये पण मी त्याला नकार का देतेय हे त्याला स्पष्टपणे कळावे म्हणून मी त्याला ही गोष्ट सांगितली. आता कृतार्थ नाराज झाला असेल पण त्याच्या मनात माझ्या विषयी चिमूटभरही राग नसेल हे मी तुला आत्ता लिहून देते. रिक्षा आली. मला निघायला हवं. GOOD BYE...


दुर्वा रिक्षामध्ये बसून निघून गेली आणि राघव त्याच्या दुर्वाला पुन्हा एकदा स्वतःपासून दूर होताना बघत होता... कायमचं असावं कदाचित..... कृतार्थ कितीतरी वेळ मागे उभा राहून त्या दोघांचं संभाषण ऐकत होता.. त्यांचं बोलणं ऐकून कृतार्थ आणखी हळवा झाला.

कृतार्थ :- राघव म्हणजे तू सांगितले होतेस मला ती मुलगी दुसरी कुणी नसून ही दुर्वा आहे.

राघव :- हो...!

कृतार्थ :- I am extremely sorry Raghav...! मी माझ्या बावळटपणामुळे तुला जर हर्ट केलं असेल तर... मला जर हे आधीच ठाऊक असते तर मी कधीच तिच्या मागे गेलो नसतो.

राघव :- अरे हरकत नाही. In fact thank you so much तुझ्यामुळे मला माझी दुर्वा दिसली. मागच्या वेळी पण अशीच मला सोडून गेली होती. पण तेव्हा खूप रडत होती ती... पण आज माझी दुर्गा मला दिसली त्यात.. एकदम बिनधास्त... बेधुंद आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःत कुढत न बसता स्वतःसाठी विचार करणारी...

कृतार्थला मिठी मारून राघवने त्याचा निरोप घेतला आणि बुक केलेल्या कॅबमध्ये येऊन बसला... आणि आईला फोन केला...

राघव :- हॅलो आई.. ख्याती कुठे आहे..?

राघवची आई :- राघव अरे ती सायकल चालवायला जाते आहे काही काम आहे का...?

राघव :- नको जाऊ देऊ... तिला माॅलमध्ये पाठव. मी पण तिथेच जातोय.. आम्ही माॅलमध्ये जरा शाॅपिंग करू... बाबा पण असतील ना...

राघवची आई :- अरे वा.. माझा गब्बू खूप खुश वाटतोय.. कारण काय आहे कळेल का मला...

राघव :- कारण असं काहीच नाही गं आई... मी आता मागचं सगळं विसरून नव्याने जगायचं ठरवलं आहे...

इकडे राघवने फोन ठेवला आणि त्याची आई मनोमन सुखावली. आपलं लेकरू आनंदी आहे ह्याहून मोठं सुख कोणत्या माऊलीला असतं...?

~ऋचा निलिमा

( काय मग दोस्तहो.. कसा वाटला हा भाग...? स्पेशली दुर्वाचा the durga अवतार...)
आता तुम्हाला काही प्रश्न...
1) आपली गोष्ट इथेच थांबवूया की पुढे चालू ठेवू...?
2) दुर्वाने कृतार्थला नकार दिला हे योग्य आहे की अयोग्य...?
आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न
3) दुर्वा आणि राघव ह्यांनी एकत्र यायला हवे की नाही...?
आणि नेहमीप्रमाणे कमेंट बाॅक्समध्ये कमेंट करा पटापट...विसरू नका अजिबात....

🎭 Series Post

View all