Mar 02, 2024
कथामालिका

मेरे लिए तुम काफी हो...(भाग-९)

Read Later
मेरे लिए तुम काफी हो...(भाग-९)

     (काय मग?...!! कसा वाटला मागचा भाग? राघवने सांगितल्याप्रमाणे त्याचे आई बाबा तिची कडक परीक्षा घेतात. खरं सांगायचे तर ते तिची मस्करी करत होते. खूप छान प्रकारे दुर्वाचा वाढदिवस  साजरा होतो आणि  राघवचे कुटुंब तिला राघवची भावी जोडीदार म्हणून सहजरीत्या स्वीकारतात. तिला फक्त एकच चिंता भेडसावत आहे
की तिचे आई बाबा तिच्या आणि राघवच्या नात्याचा स्वीकार करतील की नाही...?) आता पुढे

 

 

 

दूर्वा घरी पोचते आणि सोफ्यावर इतक्यात फोन ची रिंग वाजली. अनोळखी नंबर पाहून ती जरा साशंक होऊन उचलते.

दूर्वा :- हॅलो... कोण बोलतंय?

तिकडून :- अगं बाळा मी राघवची आई...! अगं मी राघवला सांगितले होते की तुला घरी सोडायला. पण तो बावळट बघ ना, इतक्या रात्री तुला एकटीला पाठवले.

दूर्वा :- डोन्ट वरी काकू... मला सवय आहे रात्री उशिरा स्कूटीवरून यायची आणि तसंही...

काकू :- ठाऊक आहे तू ज्युडो रेड बेल्ट आहेस... 

ह्या वाक्याने दोघी हसू लागल्या..

दूर्वा :- काकू तुम्हाला लक्षात आहे तर...

काकू :- मग काय..! तू आमच्या घरी आल्यावर तू  आणि राघव  अभ्यास आणि गप्पा कमी आणि ते मारामारी जास्त करायचात. थांब हे घे  राघवशी बोल...

आई गेली हे निश्चित केल्यावर राघव बोलू लागतो

राघव :- hey sweetie घरी पोचलीस ना..?

दूर्वा :- हो थोडा वेळ झाला. पण तू इतक्या हळू आवाजात का बोलत आहेस...?

राघव :- अगं दिवसभर लक्षात आलं नाही की फोन ची बॅटरी लोऽ आहे आता स्विच ऑफ झाला. हा आईचा नंबर  आहे. ती मागायला येऊ शकते. सेव करून ठेव. 

दूर्वा :- ओके.. गुड नाईट...

राघव :- wait wait, listen बुधवार आपले गॅन्ग मेम्बर्स भेटणार आहेत सायंकाळी... शालीमार कॅफेत... येशील तू पण? सुप्रिया ला मीफ बोलावलं आहे...?

दूर्वा :- पण असं अचानक का? हे बघ राघव माझ्या घरी आपल्याबद्दल काही ठाऊक नाही. उगीच announcement करू नकोस... 


राघव :- नाही गं दुर्गे...! तो प्रियांशू चोणकर GRE पास झाला. चालला तो Denmark ला शिकण्यासाठी. म्हणून तो भेटण्यासाठी बोलावत आहे. 

दूर्वा :- ठीक आहे. येईल मी.. पण मी सांगितले ते ध्यानात ठेव.

राघव :- हो चल बाय. गुड नाईट

दूर्वा :- बाय...

#बुधवारी

  शालीमार कॅफेत जायचे म्हणून दूर्वा ऑफिसमधूनच कॅब बुक करून डायरेक्ट कॅफेत आली. किती वेळ होईल ठाऊक नसल्याने तिने तीची लाडकी स्कुटी नेण्याचे टाळते. शालीमार कॅफेत पोचते तोच तिच्या सगळ्या मित्रमैत्रिणींचा गृप तिचीच वाट बघत होता. लांबसडक किंचित कुरळे केलेले केस, डोळ्यात जाई काजळ आणि गर्द हिरव्या रंगाचा अनारकली ड्रेस तिचे सौंदर्य खुलवण्यासाठी पुरेसा होता. तिला बघून सुप्रिया धावतच तिच्यापाशी आली अन् बोलली,"दूरू यार... टवका दिसत आहेस..शपथ सांगते जर मी मुलगा असते तर तुला आत्ता प्रपोज केले असते..." "चल काहीतरीच काय??.. सगळे वाट बघत असतील चल टेबलापाशी..." असे म्हणून दूर्वा टेबलापाशी जाते. सगळे मित्रमैत्रिणी भेटले म्हणून दूर्वा खूप आनंदी असते पण तिची नजर ज्या व्यक्तीचा ठाव घेऊ पाहत होती तो राघव काही तिला दिसत नव्हता. 

सुप्रिया :- काय गं दूर्वा... शांत का बसलीस.. ? काय झालं..?

दूर्वा :- काही नाही...असंच.. प्रियांशू अरे राघव नाही आला का?? तो येणार आहे की नाही?

प्रियांशू :- तो जरा लेटच येणार आहे. बोलला होता. पण तुला काय काम आहे त्याच्याकडे? जेव्हा भेटता तेव्हा भांडण सोडून काय करता??

दूर्वा :- तसं नाही रे....त्यानेच मला फोन केला होता आज खूप दिवसांनी आपण भेटू म्हणून विचारते...

   इतक्यात एक हाताचा स्पर्श ओझरता तिच्या खांद्यावर हलकेच येतो. वळून बघताच राघव दिसताच तिच्या मनाची कळी खुलली. दोघांनीही आपल्या भावनांना आवर घातला आणि गप्पा मारायला सुरुवात केली.

ध्वनी :- Guys...! I have to go.. उद्या माझा class आहे सकाळी दहा वाजता... You guys enjoy the party... 

दूर्वा :- काय गं तू पण.. कसला क्लास आहे...? तू पण परदेशात जायचा विचार करतेस की काय प्रिसांशूसारखा...

ध्वनी :- No.. Not at all! MBA preparation करतेय मी..

प्रियांशू :- Okk bye..! Guys I think मी पण जातो आणि जाताना ध्वनीला सोडतो. राघव मी बिल पे केले आहे. तुम्ही करा एन्जाॅय...

प्रियांशू , ध्वनी असे करून सगळे घरी जातात.. कॅफेत फक्त सुप्रिया, राघव आणि दूर्वा होते. सुप्रिया आणि दूर्वा हळू आवाजात एकमेकींशी बोलत होते.

राघव :- ओय हॅलो... तुम्ही काय एकमेकींशी बोलत आहात. मी आहे अजून इथे...

दूर्वा :- अरे काही नाही असंच आमचं मुलीमुलींचं बोलत होतो...

सुप्रिया :- खोटारडी...

दूर्वा :- सुपे ... शांत बस नाहीतर जीव घेईल तुझा... 

सुप्रिया :- घेऊन तर बघ... मी राघवला सगळं खरं सांगून टाकेन.... 

राघव :- काय झालं ? काय खरं? सुपे क्लियरली सांग काय झालं??

दूर्वा :- सुप्रिया गप्प बस...

राघव :- सुप्रिया तुला तुझ्या आवडत्या हिरो कोण तो michelle morrone ची शपथ सांग...

सुप्रिया :- हिला तुला प्रपोज करायचं होतं... पण वेडीने घाबरून अजुनही केले नाही.. 

राघव (जरासा गोंधळून) :- काय बडबडत आहेस तू? नीट सांग..

सुप्रिया :- ओके.. तर मन घट्ट करून ऐक... दूर्वाला तू आवडतोस.. ती तुला प्रपोज करणार होती म्हणजे आहे काय ठाऊक नाही मला...जेव्हा फ्रेशर्स पार्टीत तू तिचा जीव वाचवलास तेव्हाच ती तुझ्या प्रेमात पडली आहे... ती म्हणाली होती की कोणाशी रिलेशनशीप ठेवली तर तुझ्याशीच ठेवेन नाहीतर नाही...

  राघवला हे सगळं एका स्वप्नासारखं वाटत होतं. तो जरा संभ्रमात होता. तो एकवार सुप्रिया आणि दूर्वाकडे बघत होता..

दूर्वा :- सुप्रिया... Raghav and me... We are in relationship..

सुप्रिया :- wow.. that's great.. पण मला सांगितले नाही की तू.. तू कधी प्रपोज केले याला...

राघव :- wait.. wait.. She never proposed me.. I proposed her for two times.. First time when we were in college and second time when your results are declared...

राघवला हे सगळं काहीच ठाऊक नव्हतं. पण आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती व्यक्ती आपल्यावर आधीपासूनच प्रेम करते हे ऐकून त्याला खूप आनंद झाला होता. नंतर तिघेही एकमेकांचा निरोप घेऊन आपल्याला घरी निघून जातात. 

दुर्वा आणि राघव रोज नाही पण वरचेवर भेटतच होते त्यांच्या आवडत्या ठिकाणी, गणपती बाप्पाच्या मंदीरात... 

 


काही दिवसांनी....


   दुर्वा :- हॅलो आईई..! कशी आहेस? ( आळोखेपिळोखे देत)

आई :- दुर्वा! हे काय? आत्ता उठलीस? आज ऑफिसला नाही जायचे? साडेआठ वाजलेत...! किती आळशी झाली आहेस? 

दुर्वा :- नाही गं..! रियाज करून झाला. सगळं आवरून झाले. आता नऊ वाजताची ट्रेन आहे ना...!

आई :- तुला दादाने जे सांगितले त्याबद्दल काय विचार केला आहेस? तो मुलगा खरंच खूप चांगला आहे.   पर्मनंट जाॅब आहे. तू होकार दे म्हणजे तुझं लग्न करून आम्ही जबाबदारीतून मोकळे...!

दुर्वा :- काय गं आई..! नेहमी तुझं लग्नाचं पालुपद..! तुम्हाला माझ्यासाठी स्थळ बघण्याची गरज नाही. 

आई :- म्हणजे? कोण आहे? नाव काय आहे? 

दुर्वा :- ह्म्म्म्म!  आई तू येणार आहेस ना पुढच्या महिन्यात... तेव्हा बोलूया सविस्तर या विषयावर....!

आई :- ठिक आहे. काळजी घे..! पण आमच्या मर्जीतील असेल तरच आम्ही होकार देऊ..!

दुर्वा :- आई..! गुड बाय.

@काही आठवड्यांनी

दुर्वाचे आई बाबा घरी येणार असतात म्हणून दुर्वा घराची पूर्ण साफसफाई करून घर खूप छान सजवते.  आई बाबा येणार म्हणून तिने खास स्वतःच्या हाताने श्रीखंड पुरीचा बेत केला. फ्रीजमधील श्रीखंड बरोबर सेट झाले का नाही हे बघायला ती फ्रीज उघडतेच इतक्यात  तिच्या घराच्या दारावरची बेल वाजली. दार उघडताच तिला आई, बाबा आणि तिचे मधले काका गोविंदकाका दिसतात.  दुर्वा पटकन जाऊन बाबांना घट्ट मिठी मारते आणि तिचे बाबा तिच्या कपाळाचा मुका घेतात. हे सगळं बघून गोविंदकाकांच्या कपाळावर आठ्या येतात.

गोविंदकाका :- गजू..! पोरीच्या जातीला असा वांडपणा शोभत नाही. पाया पडणं सोडून गळ्यात काय पडते.. माझी लेक बघ चैताली माझ्यासमोर मान वर करून बघतही नाही. 

दुर्वा :- काका..! मी बाबांना मिठी मारली आहे. गळ्यात नाही पडले. आणि बाबा माझे बेस्ट फ्रेंड आहेत. (आणि
काकांच्या पाया पडते.)

काका :- ह्म्म! सुखी रहा.

सगळे आतमध्ये जात असताना आई तिचा हात धरून तिला रोखते.

आई :- दुर्वा....! गोविंद भाऊजी तुझ्या बाबांपेक्षा मोठे आहेत. त्यांच्याशी नीट बोलत जा.

दुर्वा :- पण आई आत्ता तर...

आई :- दुर्वा...

दुर्वा :- ओके आई..! (असे म्हणून आईला मिठी मारून घरात येते.)

   आई बाबा आले म्हणून दुर्वा खूप आनंदी होते पण गोविंदकाका आलेले तिला अजिबात आवडले नव्हते. त्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांचा खाष्ट स्वभाव.... दुपारची वामकुक्षी घेऊन सगळे जण दिवाणखान्यात गप्पा मारत होते. दुर्वाही ऑफिसचे काम उरकून त्यांच्यात सामिल झाली.

गोविंदकाका :- अरे गजू..! आपल्या दुर्वाचं शिक्षण पूर्ण झाले. आता तिचे हात कधी पिवळे करणार..?

दुर्वा :- काका प्लीज..! आई बोलत असते ते ठीक आहे. आता तुम्ही तरी असे बोलू नका. 

बाबा :- नाही गं परी..! तुझ्या लग्नाची तशी घाई नाही पण चांगली मुले शोधायला वेळ लागतोच.. बरं तू सांग तू शोधलंय का कुणी? (आणि हसू लागतात.)

दुर्वा  (दिर्घ श्वास घेत) :- हो...

काका आणि बाबा (एकत्रच) :- काय?

बाबा :- कोण आहे तो? नाव काय आहे त्याचं? करतो काय?

काका :- आपल्यातलाच आहे ना? आपलं जोश्यांचं घराणं तालेवार आहे हे लक्षात ठेव.

दुर्वा :- हो बाबा.  तो पण इंजिनिअर आहे. जाॅबही करतोय. नाव राघव देशमुख..! 

आई :- मला त्याला भेटायचं आहे. आम्ही आहोत दहा पंधरा दिवस तरी..! तोवर आण घरी त्याला. आपण बोलूया.

गोविंदकाका :- गजा..! हे काय? मला नाही पटत हे..! लहान आहे दुर्वा. तिला काय कळतं यातलं?

बाबा :- लहान आहे तर तिच्या लग्नाचा विचार करतोय आपण? एकदा भेटून तरी घेऊ आपण त्या मुलाला..

गोविंदकाका :- मला बाबा नाही पटत हे..! बाकी तूच बघ.

   दुर्वा घराच्या ओपन टेरेसमध्ये जाते आणि  राघवला फोन करून सगळे सविस्तर सांगते.


राघव :- दुरू डार्लिंग..! डोन्ट वरी. मी आहे ना. तू  टेन्शन नको घेऊस. जशी तू माझ्या आई बाबांना पसंत आहेस तसा मला पण पसंत करतील तुझे आई बाबा...!

दुर्वा :- कधी येशील तू माझ्या घरी?

राघव :- विकेंडला चालेल? 

दुर्वा :- हो चालेल.

राघव :- बाय लव यू

दुर्वा :- लव यू टू

   दुर्वा  (घरात येऊन):- बाबा..! राघव विकेंडला येणार आहे आपल्या घरी. 

बाबा :- ठिक आहे. तू जा आता काही काम असेल तर कर नाहीतर रियाज कर.

दुर्वा :- ओके बाबा. 


@विकेंडला

   राघव आणि दुर्वा एकाच शहरात राहत असुनही राघव कधीही तिच्या घरी आला नव्हता. तिची आत्या होती तोपर्यंत तिला भेटायला जाताना त्याला कधीच दडपण आले नाही पण आज मात्र त्याला खूप टेन्शन आले होते. 

राघव :- दुर्वा जोशी इथेच राहतात का? 

दुर्वाची आई :- हो. आपण कोण आहात? काय काम आहे? 

राघव :- मी राघव देशमुख. मी दुर्वा...

दुर्वाची आई ( त्याला मध्येच थांबवत) :- समजलं. ये आत ये. असा बाहेर का उभा आहेस?

   राघव घरात आल्याआल्या तिच्या आईच्या, बाबांच्या आणि काकांच्या पाया पडतो. दुर्वा आणि राघव त्यांच्या प्रेमाची इत्यंभूत गोष्ट तिच्या घरच्यांना सांगतात. राघवचा स्वभाव दुर्वाच्या घरच्यांना आवडतो फक्त तिच्या काकांना सोडून...! 

राघव :- काका काकू..! मी निघतो आता उशीर होतोय. 

दुर्वाचे बाबा :- सावकाश जा रे आणि पोचलास की दुर्वाला फोन कर. 

दुर्वा :-  बाबा मी राघवला बाहेरपर्यंत सोडून येऊ..

दुर्वाचे बाबा :- हो जा. 

काका :- लवकर परत ये. 

दुर्वा :- हो काका. आलेच.

  दुर्वा राघवला सोडायला सोसायटीच्या गेटपर्यंत येते. 

राघव( दोन्ही हातांचे तळवे चोळत):- दुर्वा तू उगीच घाबरत होतीस. तुझे आई बाबा भारी आहेत. त्यांना मी आवडलो. किती ओपन माईंडेड आहेत. मी फक्त एक वाक्य बोललो की आम्ही लग्न तीन वर्षांनी करू तर हसत हसत तयार झाले.  फक्त तुझे काका जरा नाराज दिसत होते. असो!

दुर्वा :- आपलं ठीक आहे पण तुझ्या आणि माझ्या आई बाबांची भेट व्हायला हवी. आणि त्यांची मनं जुळतील तेव्हाच आपलं सगळं सुरळीत होईल. 

राघव(तिचा चेहरा ओंजळीत घेत) :- किती काळजी करतेस गं..! होईल सगळं नीट. चल बाय. 

दुर्वा :- तू म्हणतोस तर ठीक आहे. बाय..!

  राघवचा निरोप घेऊन दुर्वा घरी येताना वर बघते तोच तिचे काका तिला बघत असतात. ती हलकेच हसून घरात येते. असेच काही दिवस जातात. आई बाबांसमवेत काकांनीही मुंबईतला मुक्काम वाढवला होता. काकांचे काम झाल्यावर तिघेही पुण्याला रवाना होणार होते. असेच एके दिवशी सायंकाळी दुर्वा कामावरून आली तोच बाबा बोलले.

बाबा :- दुर्वा जरा बोलायचे आहे तुझ्याशी. 

दुर्वा :- बाबा..! I am so tired. नंतर बोलू ना.

बाबा :- दुर्वा...! मला महत्वाचे बोलायचे आहे. 

दुर्वा :- ठिक आहे. बोला.

  क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//