( सर्वप्रथम माझ्या सर्व वाचक मित्रमैत्रीणींची माफी मागते, कारण मागला म्हणजेच कथेचा सातवा भाग वाचून पुढे काय होणार ही तुमची उत्सुकता शिगेला पोहोचली हे मला ठाऊक होते. पण माझ्या भ्रमणध्वनीला संधिवात नामक आजार झाला असल्याने पुढला भाग टाकण्यात उशिर झाला ( सरळ भाषेत सांगायचे तर Phone Hang झाला होता). पण आता तुमच्यासाठी मी पुढचा भाग घेऊन आले आहे. मागच्या भागात आपण बघितले की राघव किती रोमॅण्टिक होऊन दुर्वाला प्रपोज करतो . राघवने सांगितल्याप्रमाणे त्याच्या आई बाबांना सगळे आधीच ठाऊक होते, त्यांच्या नात्याबद्दल.. ते दुर्वावर नाराज आहेत हे सांगितले. आता या भागात आपण बघणार आहोत की दुर्वा राघवच्या आई बाबांचा रूसवा घालवेल की नाही? ते तिला समजून घेतील की नाही? त्यांच्या नात्याला नुकतीच सुरूवात झाली होती तोच पुर्णविराम तर लागणार नाही ना...? चला तर मग गोष्ट वाचूया...)
नेहमीप्रमाणे पहाटे पाचचा गजर बंद करून दुर्वा आवरून गाण्याचा रियाज करते. राघवकडे जायचे म्हणून ती मस्तपैकी बांधणीचा हिरव्या रंगाचा चुडीदार घालून तयार होते. सकाळी दहा वाजता त्याच्या घरी तिला हजर व्हायचे होते. हो हजरच..! कारण राघवच्या घरी तिची हजेरीच घेणार होते. सगळं काही सुरळीत पार पडले तर बरे होईल असा विचार करत ती तिच्या लाडक्या गणपती बाप्पासमोर निरंजन लावून उदबत्ती पेटवते. देवाचा कुंकू कपाळावर लावते तोच तिचा फोन खणखणला.
दुर्वा :- राघव मी रेडी आहे. किती वाजेपर्यंत पोहोचू मी ?
राघव :- ये..! कधीही ये. मी येऊ का तुला घ्यायला? टेन्शन आले आहे असं वाटतंय तुझ्या आवाजावरून..!
दुर्वा :- टेन्शन आहेच रे...! पण मी येईल. तू थांब घरीच.
राघव :- okkk Love.. And all the very best . .
दुर्वा :- Bye...! See you soon.
फोन बंद करून ती घराबाहेर पडते. मनात असंख्य विचारांचे काहूर माजले होते. ती तिची लाडकी स्कुटी घेऊन राघवच्या घराच्या दिशेने वाटचाल करते.
@राघवच्या घरी
दूर्वा राघवच्या घरी जाऊन पोचते. तब्बल एक वर्षानंतर तिला तिची लाडकी छोटी मैत्रीण ख्याती दिसते. लाल फुलाफुलांचा फ्राॅक आणि दोन वेण्या घातलेली ख्याती त्यांच्या बागेतल्या झाडांना पाणी घालत असते. दुर्वा धावतच जाऊन तिला मागून गच्च मिठी मारते.
दुर्वा :- ख्याती...! बच्चा कशी आहेस? हे बघ मी तुझ्यासाठी तुझी फेवरेट अॅपल पेस्ट्री आणली आहे( आणि
तिच्या गालाचा पापा घेते.)
ख्याती( कोरड्या आवाजात ) :- हाय दुरू...! मी बरी आहे. आई बाबा आत आहेत. जा तू मी येते मागून...!
दुर्वा :- हे तुझी पेस्ट्री....
ख्याती :- आज माझा मूड नाही. तू दादूला दे.
दुर्वाला ख्यातीच्या वागण्यातला कोरडेपणा जाणवतो. पण आवंढा गिळून ती दारापाशी जाते तोच तिला राघवची आई दिसते. ती मोकळेपणाने हसते पण त्या कसनुसं हसून तिला आत येण्याचा इशारा करतात. घराच्या दिवाणखान्यात ती सोफ्यावर येऊन बसते. समोर राघव आणि त्याचे आई बाबा बसलेले होते. घरातल्या स्वयंपाक करणाऱ्या सुमन मावशींनी दिलेला चहा पिऊन झाल्यावर राघव विषयाला हात घालतो.
राघव :- आई, बाबा....! मी आणि दुर्वा एकमेकांवर प्रेम करतो. मी लग्नकरेल तर हिच्याशीच.
आई :- राघव! याआधी हे वाक्य मी ऐकले आहे. मला आणि तुझ्या बाबांना दुर्वाशी जरा बोलायचे आहे. (एक कटाक्ष दुर्वाकडे टाकून ) तर दुर्वा तुझं नाव काय पूर्ण? आणि तुझे गाव कुठले...?
दुर्वा :- माझं नाव दुर्वा गजानन जोशी.! आणि माझं मुळ गाव देवगड आहे.
बाबा :- अरे वाह..! म्हणजे तू कोकणातली आहेस तर..?
आई :- वेळ न दवडता मी तुला सरळ विचारते. तुला खरंच माझा लेक आवडतो का? म्हणजे तुझं खरंच प्रेम आहे त्याच्यावर?
दुर्वा :- हो आहे माझं राघववर प्रेम...!
आई :- हे बघ दुर्वा..! मी आधीच क्लिअर करते. तू तशी चांगली आहेस. पण तू जसे राघवचे प्रेम नाकारले होते ते मला आणि त्याच्या बाबांना तुझे वागणे अजिबात आवडले नाही. माझ्या राघवमध्ये काय कमी आहे? दिसायला राजबिंडा आहे आणि त्याच्या घरचं चांगलं आहे. मी त्याची आई एक वकील आहे. त्याचे बाबा एका कमर्शियल कंपनीत Legal adviser आहेत. राघव काय त्याची मुलंही बसून खातील इतकं आहे आमच्याकडे.
बाबा :- आणि तू जेव्हा माझ्या लेकाला बोललीस की त्याच्याकडे कर्तृत्व नाही तेव्हा तुला माहित आहे का त्याला किती त्रास झाला ते...! ऐन परीक्षेच्या काळात तो उदास होता म्हणून काॅलेजमध्ये सहावा आला नाहीतर तो पहिलाच आला असता....! आणि तू म्हणतेस की त्याचं अभ्यासात काहीही लक्ष नाही. आता बघ तो जाॅब करून MBA पण करतोय. तुझ्यापेक्षा चांगली मुलगी त्याला मिळेल.
आई :- नाहीतर काय...! हिच्यापेक्षा सुंदर तर माझ्या भावाची लेक तन्वी आहे, पण कधी राघवला असं बोलली नाही. दुर्वा तुला शेवटचं सांगते. माझ्या पोरापासून दूर रहा. तुझ्यामुळे तो अस्वस्थ होतो.
इतकं सगळं ऐकून दुर्वाला खुप रडू येते. एकवार तिने राघवकडे नजर टाकली तर तोही चेहर्यावर कोणताही भाव न दाखवता तिच्याकडे बघतो. "अच्छा तर...! त्या काॅफी शाॅपमधला बदला घेण्यासाठी ह्याने इतकं सगळं केलं" असं मनातल्या मनात बोलते. गालावर ओघळलेले स्वतःचे अश्रू रूमालाने पुसून दुर्वा उठून उभी राहते.
दुर्वा :- हे बघा...! काकू साॅरी मॅम आणि सर.. ! मी काही तुमच्या मुलाला त्रास देण्यासाठी काॅफी शाॅपमधे त्याला असे बोलली नव्हती. तो माझ्या प्रेमात होता तशी मी पण त्याच्या प्रेमात पडले होते. फक्त बोलून दाखवण्याची हिम्मत राघवमध्ये होती; म्हणून त्याने मला त्याच्या मनात जे आहे ते सगळे सांगितले. माझ्या बोलण्यातून तुम्हाला आता मी खूप Rude वाटली तरी त्याची फिकीर नाही मला...! कारण मी नेहमी खरंच बोलते. राघवची लास्ट सेम होती. त्याला आधीच प्लेसमेंटमध्ये जाॅब नव्हता. त्याने जर तेव्हा मी आणि प्रेम हे सगळं केलं असतं तर तो आज ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी नसता. त्याच्या या प्रगतीत माझा वाटा अजिबात नाही. तो तुमच्यामुळेच आज इतका पुढे गेला. सर तुम्ही म्हणता की राघवचं मन मी मोडले तर मी मोडलेच...! तुम्ही म्हणता की राघवचा पहिला नंबर आला असता, तो अभ्यास तरी करत होता का...? Forget it..! I am extremely sorry. Good bye...!
स्वतःच्या डोळ्यातले अश्रू पुसत दुर्वा राघवच्या घराबाहेर जाताना ख्याती तिला दिसते. भांबावलेल्या नजरेने ख्याती तिच्याकडे आणि आई बाबांकडे बघत असते. दुर्वा तिच्या हातातली खाऊची पिशवी ख्यातीच्या हातात सोपवून तिच्या गालावर हलकेच थोपटले आणि घराबाहेर जाणार तोच ख्याती तिला अडवतो.
ख्याती :- दुरू वहिनी...! अशी रडत काय चाललीस गं? मी पेस्ट्री तेव्हा घेतली नाही कारण राघव दादा मला बोलला की काहीच तुझ्याशी बोलू नको...! आपण नंतर तिला सरप्राईज देऊ...!
दुर्वा :- मी नाहीये तुझी वहिनी. आणि कसलं सर...सरप्राईज?
इतक्यात राघवची आई कावेरी तिला मागूच गच्च मिठी मारते.
कावेरी(कान पकडून) :- साॅरी बेटा....!आम्ही दोघे कधीची तुझी गंमत करत होतो.. Indirectly तुझी परीक्षा घेत होतो. अगं तुझ्यामुळे माझा बावळट मुलगा सुधरला. तू तर मला जेव्हा पहिल्या दिवशी भेटलीस तेव्हाच आवडलीस. पण माझी आणि ह्यांची पूर्ण चुक नाही. हा प्लॅन राघवचा होता. त्याला तुला रडवायचे होते.
दुर्वा :- काय..? (राघवकडे बघत) का असं केलंस?
राघव :- Remember...! जेव्हा मी थर्ड इयरला होतो आणि माझा वाढदिवस नेमका प्रॅक्टिकल एक्झामच्या वेळी होता तेव्हा माझी फाईल लपवली होतीस तू...? माझा रोल काॅल आधी असून तुझ्यामुळे मी सगळ्यात शेवटी Viva झाली तो बदला फिट्टूस...!
दुर्वा:- असं होय..! पण आज रडवून तुझा बदला कसा पूर्ण झाला? तुझ्या कांडमध्ये बिचारे काका काकू आले.
राघव (डोक्यावर हात मारून) :- आजची तारीख काय आहे?
दुर्वा (मोबाईलमध्ये बघत) :- ८ ऑगस्ट..! अरे हो आज तर...
राघव ( हात पुढे करत) :- वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दुर्गा... साॅरी साॅरी दुर्वा
बाबा :- Happy birthday Durva beta...! या चला आतमध्ये. राघवच्या नादात बिचारी खूप रडली.
दुर्वा सगळ्यांसोबत घरात येते तेव्हा सुमन मावशी आणि ख्याती केक टिपाॅय वर ठेवला होता. ज्यावर Happy birthday Durva असे लिहीले होते आणि नावापुढे लाल बदाम काढला होता. दुर्वा केक कापून पहिला घास ख्यातीला भरवणार तोच ती बाजूला होते आणि राघवला केक भरवण्याचा इशारा करते. सगळ्यांसोबत वाढदिवस साजरा करून दुर्वाला खूप छान वाटते. केकवर ताव मारून सगळे डायनिंग टेबलवर जमा होतात.
राघवचे बाबा :- दुर्वा बाळ..! केक कसा वाटला..? चव कशी होती..?
दुर्वा :- जाम भारी होता. मला आधी homemade वाटला पण टेस्ट एकदम मस्त होती. माझा आवडता स्ट्राॅबेरी फ्लेऽवर होता.
कावेरी :- केक राघवने बनवला होता.
हे वाक्य ऐकून दुर्वा काही वेळासाठी स्तब्ध होते.
दुर्वा :- काय ?? एकदा मी आले होते तेव्हा त्याचा हातचा चहा तर एकदम कसातरी होता. अचानक कसं शिकला.
राघव :- शिकलो..! अपने प्यार के खातिर...!
आणि हातातली चाॅकलेट तिच्याकडे देत बघत असतो.
कावेरी :- राघव...
जेवण झाल्यावर सगळे आपापल्या कामाला सुरुवात करतात. सगळ्यांचा निरोप घेऊन दुर्वा आणि राघव बागेत येतात.
राघव :- एक गड जिंकला दुर्वा...! आता दुसरा तुझ्या घरचे...!
दुर्वा :- मला आई बाबांचं टेन्शन येत आहे. बाकी दादा आत्या आणि काका ओपन माईंडेड आहेत. ते कसे रिअॅक्ट करतील?
राघव (तिच्या खांद्यावर हात ठेवत) :- डोन्ट वरी दुर्वा...! ते पण समजून घेतील. After all इतका स्मार्ट आणि हुशार जावई मिळत असेल तर
दुर्वा :- चल खूप उशीर झाला. बाय...!
ख्याती (धावत येऊन) :- वहिनी हे घे गिफ्ट माझ्याकडून... पॅक करायला वेळ मिळाला नाही.
दूर्वा :- थॅन्क यू प्रिन्सेस.. हे तू दिलेला पेन सेट मी माझ्याकडेच ठेवणार..
दूर्वाच्या गालाचा पापा घेऊन आणि राघवला एकदा घट्ट मिठी मारून दुर्वा त्याचा निरोप घेते. आता तिच्या मनात एकच विचार येतो की आता आई बाबांना कशी समजावर..! आणि दुर्वा तिच्या स्कुटीला किक मारून घराच्या दिशेने गाडी वळवते...
क्रमशः