Feb 24, 2024
कथामालिका

मेरे लिए तुम काफी हो...(भाग-७)

Read Later
मेरे लिए तुम काफी हो...(भाग-७)

    (मागच्या भागात आपण पाहिले की राघव आणि दुर्वाचं नेहमीच एकमेकांशी वाकडं होतं तरीही दूर्वा फ्रेशर्स पार्टीत पुढचा मागचा कोणताही विचार न करता त्याची मदत करते. राघवला तिच्या गोड गळ्याबद्दल कळते तेव्हा तो सगळ्यांसमोर तिला गाणे गाण्यासाठी स्टेजवर बोलवतो. आता पुढे.......)

 

 

 

 

 

 

 

          स्वतःचा घेरदार वनपीस घातलेली दूर्वा जरा धडपडतच स्टेजपाशी पोचते. इथेही तिची धडपड बघून राघवला हसू येते. माईक हातात घेऊन ती गाणं सुरू होण्यापूर्वी तिने एक रागाचा कटाक्ष राघवकडे टाकला. तिला रागवलेलं बघून राघव तिचे हसू आवरतो. समोर बघून ती गाणे गायला सुरूवात करते.

 

 

सूर्य डोईवर जळणारा 
चांदराती झगमगणारा
दिशा दिशा तरी कशा 
उदास रे गमल्या तुझ्याविना......सखया, तुझ्याविना 

पश्चिमवेलीवरती फुलल्या रंगफुलांच्या माळा
पौर्णिमेतूनी पहा पसरल्या 
शीतल मोहक ज्वाला
सार्‍यातूनी विरघळताना 
आत आत मोहरताना
दिशा दिशा तरी कशा 
उदास रे गमल्या तुझ्याविना....... सखया, तुझ्याविना.... 

भान हरपूनी पाय थबकले 
एका जागी आता
माझ्या पुढती धावत सुटल्या
अदृश्याच्या वाटा 
वाटा हिरव्या असणाऱ्या 
जरी क्षितिजाशी कळणार्‍या 
दिशा दिशा तरी कशा 
उदास रे गमल्या तुझ्याविना....... सखया, तुझ्याविना

 


    

     गाणं पूर्ण झाले आणि कोणी काही बोलण्याच्या आत दूर्वा स्टेजवरून उतरून खाली जाते. तिचं गाणं सगळ्यांना जरा वेगळे वाटले तरी सगळ्यांना खूप आवडले. ती तिच्या जागेवर जाईपर्यंत टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. अशा प्रकारे पार्टी संपते. सगळे जण घरी जायला निघतात. थोडे अंतर चालल्यावर तिला काकांचा फोन येतो. 

 

दुर्वा ( फोनवरून ) : हो काका! संपली पार्टी.... नाही नका येऊ. खूप जण आहेत माझ्या जोडीला... हो माझ्याच ट्रेनला आहेत..... स्टेशनवर या हवं तर घ्यायला....! अच्छा ठेवता फोन...! 

 

सुप्रिया :- काय गं! आत्या आणि  काका स्ट्रीक्ट दिसतात गं तुझे...! सारखं तुला फोन करत असतात. तुझं घर तिथेच आहे ना जवळच. तिथे का नाही राहत तू? मस्त एकटी राहीली असतीस...!

 

दुर्वा :- नाही गं...! असं काही नाही. ते माझी खूप काळजी घेतात. मी लाडकी आहे म्हणून सारखे मला फोन करत असतात. 

 

      दुर्वा आणि सुप्रिया थोडे अंतर चालतात इतक्यात कौस्तुभ तिच्या समोर उभा राहतो आणि बोलतो," काय गं स्वतःला जास्त हुशार समजतेस? थांब आता तुझा माज काढतो." असे म्हणत तिला स्वतःच्या गाडीत घालतो आणि सुप्रियाला ढकलून देतो. सुप्रिया सगळीकडे मदतीसाठी हाक मारते, पण ट्रेनसाठी दोघीच घाईघाईत पुढे आलेल्या असतात. तिच्या आजुबाजुला कोणीच नसते. मागून काही मुले येताना दिसतात तिला. ती धावत त्यांच्याजवळ मदतीसाठी जाते. त्या मुलांमध्ये राघव असतो ती त्याला सारं काही सांगते. तो धावतच दुर्वाकडे जातो तर त्याला अपेक्षित नसलेले दृश्य पाहून थबकतो. शिडशिडीत शरीरयष्टी असलेली दुर्वा बलदंड असलेल्या कौस्तुभला झोडत होती. सगळी मुले दिसल्यावर ती शांत होते आणि सुप्रियाजवळ जाणार इतक्यात कौस्तुभ त्याच्या हातातली बियरची बाटली तिच्या डोक्यावर मारणार तोच राघव त्याला अडवतो. त्या झटापटीत राघवच्या हाताला लागून रक्त यायला सुरुवात झाली. "बघून घेईल दोघांना" असे बोलून कौस्तुभ गाडी घेऊन निघून जातो.

 

     दूर्वासहीत तिथले काही मुले त्याला दवाखान्यात घेऊन जातात. ड्रेसिंग झाल्यावर सगळे घरी जायला निघाले. 


राघव :- दुर्वा! कुठे राहतेस ? मी तुला घरी सोडून माझ्या घरी जातो.


दुर्वा  :- अरे नको मी जाईल एकटी. मी कुणाला घाबरत नाही. मी ज्युडो रेड बेल्ट आहे( म्हणतच त्याचा चेहर्‍यावर फाईट देत)


राघव (तिचा हात अडवत) :- मी पण कराटे ब्लॅक बेल्ट आहे. ते जाऊदे तू राहतेस कुठे? ते तरी सांगा दुर्गा माते...! (आणि दोन्ही हात जोडतो.)


दुर्वा :- मुलुंडला...! आणि तू?


राघव :- मी पण! चल ट्रेन आहे आता. 


     स्टेशनला उतरताच समोर बघताच दुर्वाला तिचे आत्या आणि  काका दिसतात.  ती धावतच त्यांना जाऊन बिलगते आणि पार्टीत आणि पार्टीनंतर काय झाले ते सगळे सांगते आणि राघवशी ओळख करून देते.


काका :- थॅंक्स बाळ! माझ्या परीला वाचवलंस रे तू? 


राघव :- नाही ओ काका! दुर्गामुळे..... साॅरी दुर्वामुळे मी Rusticate होता होता वाचलो. 


    एकमेकांना निरोप देऊन ते आपापल्या घरी जातात. असेच दिवस जातात. राघव आणि दुर्वा आपापल्या अभ्यासात गढून जातात. वरचेवर एखादी भेट झाली तरच होत होती, पण भांडणाची जागा एका गोड स्माईलने होत होती. 

 

     एके दिवशी शनिवारी दुर्वा गणपतीच्या  मंदिरात जाते. परतताना तिला पायरीवर एक लेडीज पर्स पडलेली दिसते. पर्समध्ये काही पैसे आणि महत्त्वाचे क्रेडीट  कार्ड्स असतात. त्यातले ड्रायव्हिंग लायसन्स बघून ती त्या पत्त्यावर जाऊन पोचते. एक बैठा पण मोठा प्रशस्त बंगला होता. कोणीच दिसत नाही म्हणुन ती फाटक उघडून आत प्रवेश करते.

 

दुर्वा :- इथे सौ. कावेरी देशमुख म्हणून कोणी राहते का?


कावेरी :- हो मीच आहे पण मला क्लाएंट  ऑफिसमध्येच येऊन भेटतात. मी घरी Attend नाही करत. तुम्ही उद्या आलात तर बरं होईल. 

 

दुर्वा :- एक मिनीट...! तुमचा काही गैरसमज होतोय. मला थोड्या वेळापूर्वी ही पर्स देवळात मिळाली. ती द्यायला आले आहे.  


   दुर्वा आपल्या हातातले पाकीट कावेरीच्या हातात देते. 


तेवढ्यात एक आवाज तिला ऐकू येतो,"ए आई! मला खायला करून दे पटकन...! आणि ख्यातीला सांग माझा मोबाईल मला परत दे..." असे म्हणत ती व्यक्ती  बाहेर येते.


दुर्वा :- राघव..! तू इथे?


राघव :-  एक मिनिट!  हे माझंच घर आहे. तू का माझ्या मागे लागली आहेस? 


दुर्वा :- हे भगवान इतना घमंड़ है इस पागल को..! जरा डोकं वापर. मी तुझ्या मागे का येऊ? मी हुशार आणि सुंदर आहे तुझ्यापेक्षा.....!


राघव :- हे बघ आता जास्त होतंय...!


कावेरी :- बाबू गप रे...! माझं पाकीट मी मंदिरात विसरले तेच द्यायला आली आहे ही मुलगी...! अगं बेटा हा बावळट आहे. तू आधी आत ये बरं.


दुर्वा काही बोलायच्या आत राघवची आई हात धरून तिला घरात घेते. 


कावेरी :- साॅरी बेटा..! अगं मी पेशाने वकील आहे.  आधी मला माझे क्लाएंटच वाटले; म्हणून मी बोलले. तू माझं पाकीट द्यायला इथपर्यंत आलीस?


दुर्वा :- नाही मॅम..! I can understand. होतो गोंधळ कधीकधी....!


कावेरी :- अगं पण तू माझ्या मुलाला कशी ओळखतेस? 


दुर्वा :- हा तुमचा मुलगा आहे? तुम्ही इतक्या छान आणि हा...


राघव :- बस झालं दुर्वा..! अगं आई ही माझी ज्युनियर आहे. एकाच काॅलेजमध्ये आहोत आम्ही...


कावेरी :- अरे वाह..! बेटा तू  बस मी खायला आणते तुझ्यासाठी आणि मला मॅम म्हणू नकोस छान नाही वाटत.

 

दुर्वा :- नको मॅम.. आय मीन काकू.. मी जाते घरी. आत्या वाट बघत असेल. मी घरी एकटीच आले म्हणून आधीच चिडली आहे ती. म्हणजे माझं घर इकडे आहे चौकाकडे...! आई बाबा अर्जंट काम होते म्हणून  पुण्याला शिफ्ट झालेत. मी आता आत्याकडे असते.

 

    इतक्यात राघवचे बाबा आणि ख्याती  तिथे येतात. दहा मिनिटे जुजबी गप्पा मारल्या तोच दुर्वाला फोन येतो.


दुर्वा (फोनवर ) :- हो काका....! जरा काम होतं म्हणून मित्राच्या घरी आले होते. आले.... काय.... दादा आलाय....? लगेच निघते मग मी... बाय...


दुर्वा :- मला निघायला हवं. बाय..!


राघवचे बाबा :- अरे बाळ! तू काही खाल्ले नाही. फक्त सरबत प्यायलीस. थांब ना...!


दुर्वा :- नको काका..! उद्या माझा वाढदिवस आहे म्हणून आई बाबा आणि  माझा भाऊ पुण्याहून आलेत. 


   सगळे तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आणि ती धावतच दाराच्या दिशेने जाते. जाताजाता तिचा तोल जाणार तोच पुन्हा राघव तिला सावरतो. सगळ्यांना बाय करून दुर्वा तिच्या घरी जायला निघते. 
**************************************


     असेच दिवस सरत होते. तशी राघव आणि दुर्वामध्ये भांडण जवळपास संपलेच होते अन् मैत्री वाढतच होती. काॅलेजमध्ये ट्रॅडिशनल डे च्या तयारीसाठी सगळे मिळून जोमाने कामाला लागले. नेहमीप्रमाणे राघव कल्चरल कमिटीचा कमिटीचा सेक्रेटरी असल्याने तोच सगळा कार्यभार सांभाळत होता. ऐन कार्यक्रमाच्या दिवशी राघवने अस्सल मराठमोळ्या लूकमध्ये डॅशिंग दिसत होता. क्रिम कलरचं धोतर आणि वरती जांभळ्या रंगाचा झब्बा त्याच्या उंच, धिप्पाड शरीरयष्टीवर खुलून दिसत होता. त्यात भर म्हणून डोळ्यावर काळ्या रंगाचा गाॅगल...! 


     दूर्वा पण काही कमी  सुंदर दिसत नव्हती. तिही गडद निळ्या रंगाची नववारी साडी नेसून काॅलेजला आली होती. गळ्यात बोरमाळ, हातात बांगड्या आणि कपाळावर चंद्रकोर तिचे सौंदर्य खुलवण्यासाठी पुरेसे होते.  राघव कितीतरी वेळ तिची वाट बघत होता; कारण ऐनवेळी कार्यक्रमात गाण्यासाठी जी मुलगी येणार होती ती नेमकी येऊ शकत नव्हती. एक तरी गाणं व्हायला हवे म्हणून तो दूर्वाला शोधत होता. लांबून त्याला एक मुलगी पाठमोरी दिसली. दूर्वा असेल म्हणून त्याने जवळ जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिने वळून पाहिले तोच राघव काही वेळ तिला बघत एका ठिकाणी स्तब्ध उभा होता. दूर्वा खरंच खूप सुंदर दिसत होती...

राघव :- दूर्वा...! हाय... तू आज खूप सुंदर दिसत आहेस...! फक्त एक गुलाब मिळाला पाहिजे की लगेच तुला प्रपोज करून मोकळा....

दूर्वा :- राघव....!

राघव :- साॅरी यार.. जस्ट किडिंग...! पण खरंच खूप सुंदर दिसत आहेस तू....

दूर्वा :- हम्म ठिक आहे.. तू पण छान दिसतोयस. पण तो गाॅगल काढ..खरं सौंदर्य डोळ्यामुळे खुलून दिसतं.. 

राघव :- ओके बाॅस.. हे बघ काढला. ऐक ना मला मदत कर ... कार्यक्रमाच्या सुरूवातीला गणेशवंदना गायची आहे तुला.. मस्त एकदा वाचून घे. 

दूर्वा :- राघव तुला ठाऊक आहे मला नाही आवडत असं गायला..

 

राघव (रडण्याचं नाटक करत) :- दूर्वा.... तुम ही मेरी आखरी उमीद हो.. ऐसा मत करो...
(गुडघ्यावर बसून)
दूर्गा डार्लिंग मे तेरा ये एहसान कभी नहीं  भुलुंगा.. प्लीज...

 

दूर्वा :-  ओके... गायील मी.. उठ तू आधी....! 

  दूर्वा मुळातच गोड आवाजाची...! तिला गाणं गाताना कोणताही अडथळा आला नाही. अपेक्षेप्रमाणे कार्यक्रम खूप सुंदर पद्धतीने पार पडला. राघवच्या चिमटे तर कौतुक झाले पण विशेष म्हणजे दूर्वाचे जास्त कौतुक होत होते. 

राघव (दूर्वाजवळ जात) :- बघ..! मला थॅन्कस् म्हण..! बघ तुझं कौतुक करत आहेत सगळे तुला..

दूर्वा :- थॅन्क यू सो मच... 

************************************

 आता दुर्वा थर्ड ईयरला होती आणि राघव लास्ट ईयरला. एक दिवस राघव दुर्वाला पूर्ण काॅलेजमध्ये  शोधत असतो पण ती कुठेच सापडत नाही. इतक्यात तिला समोरून सुप्रिया त्याच्या समोरून येताना दिसते.

राघव :- सुपी....! दुरु कुठे आहे?  कधीचा शोधतोय मी तिला...! अर्धा तास झाला तरी हिचा पत्ता नाही. सकाळी फोन केला तेव्हा बोलली येतेय मी काॅलेजमध्ये.... आता कुठे गायब झाली....?

सुप्रिया :- अरे...! काॅलेजमध्ये येऊनही फोन लागत नाही म्हणजे मॅडम गेल्या असतील रेस्ट रूममध्ये....!

राघव :- ओहह.. म्हणजे लायब्ररी? 

सुप्रिया :- Obviously.....!!!

राघव :- मग जा ना प्लीज...! बोलवून आण ना तिला बाहेर. ....! 

सुप्रिया :- अजिबात नाही. तुझं काम आहे तूच जा...! मला वाडकर मॅमनी अर्जंट बोलावले आहे. तुला तिच्याकडे स्वतःच जावे लागणार...!

राघव :- अगं सुपी...! मी ह्या चार वर्षात लायब्ररीत कधीच नाही गेलो, आज जाऊ...! 

सुप्रिया :- मग नको जाऊस...! बाय!
  

     राघव काही बोलणार इतक्यात ती तिथून कधी गायब झाली हेच कळले नाही. तो धावतच ग्राऊंड फ्लोअरवर लायब्ररीच्या दिशेने धाव घेतो. राघव कितीतरी वेळ लायब्ररीच्या बाहेर उभा होता, पण आतमध्ये जायला जीवावर आले होते. त्याला खिडकीतून दुर्वा स्पष्टपणे दिसत होती पण ती शांतपणे तिच्या अभ्यासात मग्न होती. थोड्या वेळाने दोघांची एकमेकांशी नजरानजर झाली. 

राघव (इशारा करत) :- पटकन बाहेर ये. जरा काम आहे. 

दुर्वा :- तू आत ये. मी रिकामी नाही. 

    राघव तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण ती काही केल्या ऐकत नव्हती. न राहवून राघव लायब्ररीच्या आत प्रवेश करतो. त्याला लायब्ररीत बघताच सगळे चकीत होतात. काही जण त्याला बघून अक्षरशः हसत होते. तो सगळ्यांना ignore करत दुर्वाजवळ येऊन बसतो. ती मात्र स्वतःच्या अभ्यासात गढून गेली होती. राघव रागातच तिच्या हातातून पेन हिसकावून घेतो.

दुर्वा (ओरडतच):- राघव अक्कल नाही का तुला...? स्वतःचं write up बहिणीकडून करवून घेतोस. मी माझं स्वतः करते.

राघव :- ओय मी पण माझं काम स्वतःच करतो. ख्याती लहान आहे. नववीत....! तिचंच सगळं मला करावं लागतं.

दुर्वा :- गुपचूप माझा पेन दे...!

राघव :- तू तुझं काम आवर आणि माझ्यासोबत ये बाहेर. मी वाट बघतोय. 

दुर्वा :- राघव मला आत्ता वेळ नाही. नंतर येईल मी...!

    राघवला तिचा प्रचंड राग येतो. तो तिचे Writeup चे पेजेस घेऊन उठतो आणि तिची बॅग घेऊन लायब्ररीच्या बाहेर पडतो. शेवटी नाईलाजाने दुर्वा लायब्ररीच्या बाहेर येते. 

राघव :- चल जरा काॅफी शाॅपमध्ये....! तसंही आता लेक्चर नाही तुझं. ठाऊक आहे मला. 


दुर्वा :- मला अभ्यास करू दे राघव...! 

राघव :- उद्या कर...! आता चल प्लीज. महत्त्वाचे काम आहे माझे.....!  

दुर्वा :- ओके...! चल पण थोडाच वेळ हो. नंतर मी डायरेक्ट घरी जाईल. 

राघव :- हो गं दुर्गा माते...! ( आणि तिच्यासमोर हात जोडतो.)

    झपाझप पाऊले उचलत राघव आणि दुर्वा काॅफी शाॅपमध्ये जातात. राघव स्वतःसाठी आणि तिच्यासाठी काॅफी ऑर्डर करतो. काॅफी संपत आली तरी राघव काहीच बोलत नव्हता. त्याच्या मनाची घालमेल आणि चलबिचल अवस्था दुर्वाच्या नजरेस आली. न राहवून दुर्वा शेवटी बोलायला सुरुवात करते.

दुर्वा :- राघव...! काय बोलायचं असेल तर बोलून मोकळा हो...!

राघव :- I LOVE YOU.....! DO YOU LOVE  ME. ...? जेव्हा ट्रेडिशनल डे ला तुला साडीत बघितलं तेव्हाच माझी विकेट पडली पण तू मैत्री तोडली तर..? या भितीने मी काही बोललो नव्हतो..

दुर्वा :- राघव काय बोलतोय तू हे समजतंय का तुला?  मान्य आहे की तू शेवटच्या वर्षाला आहेस... पण तुझा करिअरचा प्लॅन सेट नाही. लगेच तू असं विचारत आहेस मला..... हे बघ मी खूप  focused आहे माझ्या करिअरच्या बाबतीत...! तू आहेस का? खरं सांगू तर मला पण तू खूप  आवडतोस. पण मी काही बोलले नाही. सगळ्या गोष्टी भावनिक विचाराने नसतात करायच्या. You should be practical about your carrier and think about it. तू तुझ्या अभ्यासाकडे बघ. मी पण माझा अभ्यास बघते. तू काहीतरी करिअर प्लॅन कर. वाटलंच तर बघू काय होते ते..! तू काहीतरी चांगले करिअर Choose कर आणि मगच माझ्याकडे तो विषय काढ. मला पैश्याची हाव नाही पण कर्तृत्वाची आहे. 

राघव :- जशी आपली आज्ञा दुर्गा देवी...! चला आता माझी शेवटची सेमिस्टर आहे. मला अभ्यास करायला हवा. 


      हसतच दोघे काॅफी शाॅपच्या बाहेर पडतात. असेच दिवस निघून जातात. राघव आणि दुर्वा एकमेकांशी जुजबी बोलत होते. राघवचे शेवटचे वर्ष संपते. शेवटच्या वर्षी तो टाॅप टेनमध्ये आला होता. आणि दुर्वाचे शेवटचे वर्ष सुरू होते. एव्हाना राघव आपल्याला विसरून गेला असे समजून ती निमुटपणे आपल्या अभ्यासात लक्ष घालते. नंतर काही महिन्यांनी दुर्वाच्या शेवटच्या वर्षाचा रिझल्ट लागला. ती फक्त  पूर्ण काॅलेजमध्ये तर पहिली आली नव्हती तरी युनिव्हर्सिटीत सातवी आली होती , म्हणून ती गणपती बाप्पाच्या देवळात आली होती. परतताना तिला समोर राघव उभा दिसला. नेहमीप्रमाणे जीन्स आणि ढगळा टि शर्ट घातलेला राघव जिन्सची निळी पॅन्ट आणि पांढरा  शर्ट घालून खूपच स्मार्ट दिसत होता.

राघव :- Congratulations my love...! तू माझ्यापेक्षा जास्त हुशार निघालीस...!

दुर्वा :- म्हणजे राघव तू....?

राघव :- हो लागला मला Permanent job. मल्टीनॅशनल कंपनी आहे. बघू कसं होतंय पुढे...! आणि तेव्हा प्रपोज मीच केले होते आता कमीत कमी मला होकार दिलास तरी चालेल मला....!

दुर्वा :- तेव्हा तुला... म्हणजे तू...

राघव :- मला माहित होते की तूसुद्धा माझ्यावर तितकंच प्रेम करतेस जितकं मी.....! पण मला सुधरवण्यासाठी तू खोटं नाटक केलंस.

    नकळतच दुर्वाच्या डोळ्याच्या पापण्यांच्या कडा ओलावतात. ती गुपचूप तिच्या स्कार्फने डोळे पुसते. राघव गुडघ्यावर बसतो आणि हातातल्या रंगीबेरंगी गुलाबाच्या फुलांचा बुके तिच्या हातात देत तिला विचारतो,"I love you Durva..! Will be you in my life forever??" 

दुर्वा :- Yes...!

  राघवच्याही डोळ्यात पाणी आले. तो तसाच उभा राहतो आणि तिला घट्ट मिठी मारतो तोच पावसाला सुरूवात होते. ते दोघे येऊन राघवच्या बाईकवर बसतात. 

राघव :- दुर्वा आज माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस आहे आणि खूप दिवस झाले तू काही गायलीच नाहीस.. प्लीज माझ्यासाठी काहीतरी गाशील...? 

  सायंकाळी मंद वारा आणि सोबतीला पावसाच्या अलवार सरी बरसत होत्या. राघवच्या मागच्या सीटवर बसून दुर्वा मागून त्याला घट्ट मिठी मारते आणि गायला सुरूवात करते...

"ओली ती माती 
ओला तो गंध 
ओली ती सांज 
तुझा सुगंध "

गाणे झाल्यावर राघवच्या ओठांवर छानसे स्मित झळकते.

राघव :- चल तुला घरी सोडतो. नाहीतर  माईआत्या ओरडेल तुला..! मी पण भेटेल त्यांना..! 

दुर्वा :- अरे आत्या आणि काका अमेरिकेत गेले आहेत. गौरव दादाकडे. वहिनीला बाळ होणार आहे. मी सध्या माझ्याच घरी आहे. इथेच आहे जवळ घर..! आणि मला ऑफिसचं काम आहे खूप...!


राघव :- आत्ताच रिझल्ट लागला ना....! मग जाॅब लगेच??

दुर्वा :- अरे काकांच्या मित्राच्या कंपनीत लागले. त्यांनीच शिफारस केली. 

राघव :- ठिक आहे. मी जातो आता. पण येत्या रविवारी माझ्या घरी आपण सगळं सांगू फायनल.....

दुर्वा :- म्हणजे काय? 

राघव :- माझ्या घरी सगळं माहिती आहे. आपली काॅफी शाॅपमध्ये झालेली चर्चा..! आई बाबा जरा रागवलेच आहेत तुझ्यावर. त्यांना समजावून सांगणे जरा जास्तच कठीण जाणार आहे.  पण मी समजून घेतलं तुला. तेव्हा तू समजावून सांगितले नसते तर आज मी ह्या ठिकाणी नसतो.
    

     दुर्वा राघवला निरोप देऊन तिच्या घरी जाते तोच तिच्या लक्षात येते की येत्या रविवारी म्हणजे उद्याच ती राघवच्या आई बाबांना भेटणार आहे. तिला त्यांच्या स्वभावातला शिष्टपणा ती चांगलाच जाणून होती. घरी आल्यावर आपले  काम करून ऑफिसचे काम करत होती. घड्याळात साडेबाराचे टोल पडले होते. उद्या सकाळी राघवच्या घरी जायचे म्हणून ती लॅपटॉप बाजूला ठेवून झोपण्यासाठी बेडवर अंग टाकते. पण उद्या काय होईल हाच विचार करत होती. विचार करता करता डोळा कधी लागला हे तिचं तिलाच कळाले नाही. 

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//