मेरे लिए तुम काफी हो...(भाग-६)

This story based on the young guy who wants to know about the girl who avoid him.

   ( मागच्या भागात आपण पाहिले की दूर्वा चुकून राघवची फाईल तिच्या घरी घेऊन येते. तेव्हा राघव तिला पुन्हा पहिल्यासारखी हो म्हणून समजावतो. त्याचे वाक्य ऐकून ती तिला काही वर्षांपूर्वीचा तिचा  भुतकाळ आठवतो जेव्हा  दूर्वाचे आई बाबा पुण्याला जातात आणि ती तिच्या आत्याकडे रहायला येते. आता पुढे....)

   सकाळी लवकर उठून, स्वतःचा गाण्याचा रियाज करून दूर्वा शहाण्या बाळासारखे आवरून किचनमध्ये ब्रेकफास्ट बनवत असते. हे बघून तिच्या काकांच्या कपाळावर आठ्या येतात.

काका :- संजीवनी!  परीला आपण आपल्याकडे शिकायला म्हणून ठेवलंय! तू लगेच तिला काम करायला लावलंस??

माई आत्या :- नाही ओ! मी का म्हणून तिला सांगेल काम?मी देवपूजा करत होते.  ती कधी स्वयंपाकघरात गेली मला समजलेच नाही.

दूर्वा :- अहो काका ! गाण्याचा रियाज लवकर केला. मला फाॅर अ चेन्ज म्हणून मी सॅण्डविच बनवलं आहे. तसंही फक्त पहिले दोन तीन दिवस तुम्हाला हे सुख मिळेल. माझा अभ्यास सुरू झाला की काही म्हणून हेल्प करणार नाही तुम्हा दोघांना. मग तर झालं..??

काका :- ठिक आहे!  पण हे बघ बाळ! तुझे बाबा खूप विश्वासाने तुला आमच्याकडे ठेऊन गेले. तू आता माझी जबाबदारी आहेस. हे कामं महत्त्वाची नाहीत जेवढा अभ्यास महत्त्वाचा आहे. कळलं का?

दूर्वा :- हो काका! तुम्ही अजिबात काळजी करू नका. नंतर बघा लोक तुम्हाला बोलतील हे बघा इंजिनिअर दूर्वा जोशीचे काका आहेत. 

  तिच्या बोलण्याने सगळे  हसतात. स्वतःचं आवरून दूर्वा पटापट काॅलेजला जाते. ट्रेनला गर्दी होती म्हणून ती काॅलेजला जातानाच खूप दमलेली असते. Inquiry office मध्ये तपास केल्यावर तिला कळते की तिचे लेक्चर पाचव्या मजल्यावर आहे. पहिल्याच दिवशी लेक्चरला उशीर नको म्हणून धावतच ती लिफ्टकडे धाव घेते तोच तिचा धक्का एका मुलाला लागतो आणि तो धापकन खाली पडतो.

दूर्वा :- अरे देवा...! Extremely sorry Mr. चुकून धक्का लागला. (आणि त्याला  उठण्यासाठी मदत म्हणून हात पुढे करते. पण तो तिचा हात झटकून स्वतःच उभा राहतो.)

तो :- तुझी हिम्मत कशी झाली मला धक्का देण्याची? तुला ठाऊक आहे का मी कोण आहे ते?

दूर्वा :- अमिताभ बच्चन आहेस? नाही ना? चुकून धक्का लागला बोलतेय. तरी हात पुढे केला मदतीसाठी तरी माज किती आहे? आणि तू काय एकटाच मुलगा नाहीस ईथे अजून खूप मुलं आहेत म्हणा....!

तो :- हे बघ ! राघव देशमुख म्हणतात मला! एक फोन केला ना मी तर तुला काॅलेजच्या पहिल्याच दिवशी Rusticate करू शकतो मी...!

     त्याचं हे वाक्य ऐकून एक क्षण दूर्वा स्तब्ध उभी राहते. तिला तसं तर त्याला खूप काही बोलायचे असते, पण आईने दिलेल्या सुचनेनुसार तिला कोणाशी न भांडण्याची warning मिळालेली असते. इतक्यात तिची मैत्रीण सुप्रिया येते. 

सुप्रिया :- दूर्वा!  चल पटकन क्लासमध्ये!  पहिल्या दिवशीच उशीर नको व्हायला लेक्चरला...! आधीच दहा मिनिटे उशीर झाला आहे. 

दूर्वा :- हो अगं काही Psycho लोकांमुळे उशीर झाला आहे. चल पटकन. एकतर दिवसाची सुरूवातच वाईट झाली. बघू काय होतंय पुढे?

     फणकार्‍यात दूर्वाने तिथून लिफ्टकडे  तिचा मोर्चा वळविला. जाताना वळून बघता तो मुलगा तिच्याकडे रागात बघत असतो. 

     असेच काही आठवडे निघून जातात. दूर्वा मुळात अभ्यासू असल्याने ती रोज मन लावून अभ्यास करत होती. तिच्यासवे तिच्या इतर बॅचमेट्सना फ्रेशर्स पार्टीचे वेध लागले होते; पण काही कारणास्तव फ्रेशर्स  पार्टी  ही पहिल्या युनीट टेस्टनंतर होणार असते; म्हणून सगळ्यांचा मुड ऑफ होतो. पण दूर्वा विचार करते की जर आपल्याला पहिल्या युनीट टेस्टमध्ये जास्त मार्क्स मिळाले की पार्टी खूप एन्जॉय करता येईल. म्हणून ती मन लावून अभ्यासाला सुरूवात करते. युनीट टेस्ट झाल्यावर तीन दिवसांनी रिझल्ट लागला तर त्यांच्या बॅचमध्ये तीच सगळ्यात Highest असते. हे समजल्यावर तिच्या आत्या आणि काकांनी तिचे कौतुक म्हणून तिला एक स्मार्टफोन घेऊन दिला, तिच्या आईचा विरोध पत्करून.....!


      यादरम्यान ती राघवशी चार हात लांबच राहण्याचा प्रयत्न करत होती. अभ्यासात थोडासाच हुशार पण बड्या बापाची औलाद म्हणून त्याची ख्याती होती. त्याचा दबदबा पूर्ण काॅलेजमध्ये होता. दूर्वापेक्षा तो एकच वर्ष सिनिअर होता. दूर्वा आणि राघव बरेचदा एकमेकांच्या समोर यायचे ; पण त्याचा रागीट स्वभाव आणि तिची भिडस्त वृत्ती असल्याने दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. 

         एके दिवशी ऑफ लेक्चरला राघव फर्स्ट ईयरच्या क्लासरूममध्ये जातो तर समोर पहिल्याच बाकावर दूर्वा मान खाली घालून पुस्तक वाचत बसलेली असते. ब्लॅक कलरचा कुर्ता  टाॅप आणि व्हाईट जीन्स घातलेली दूर्वा कोणताही मेकअप न करता खूप सुंदर दिसत होती. पण तो धक्क्याचा Incident आठवून राघव स्वतःला सावरत बोलतो, " So guys..!! Are you ready for freshers party...? From this year all the seniors including second, third and last year's students will organise your fresher party. The party will held on this Saturday at college. From 4pm to 8pm....! So guys.... Be ready for your freshers party. And enjoy it...! There is no any dress code for all. So good bye!!" 


    इतकं बोलून राघव क्लासच्या बाहेर जातो. Freshers party चं नाव ऐकून सगळी मुले क्लासरूममध्ये दंगा घालत असतात. दूर्वाला मात्र फार टेन्शन आलेले की हा रागीट मुलगा आपल्याला काही त्रास नको द्यायला.....

      अखेरीस शनिवार उजाडतो. सुट्टी असली तरी दूर्वा काॅलेजला जाण्यासाठी खूप उत्सुक असते. सकाळपासूनच कोणता ड्रेस घालू? केस कसे करू? नाना प्रकारचे प्रश्न तिला पडतात. ड्रेस कोड नसला तरी कोणता ड्रेस घालून जाऊ हे तिला पडलेलं खूप मोठं कोडं असतं. तिच्या खोलीत तिच्या कपड्यांनी सगळ्या  बेडला व्यापले होते. इतक्यात तिला Skype वर विडीओ काॅल येतो... गौरव दादाचा (माईआत्याच्या मुलाचा)! ती पटकन आत्याला आवाज देते. शनिवारी सुट्टी असल्याने तिचे काकाही घरातच असतात. दादाचा फोन आला तेव्हा ते दोघेही तिच्या खोलीत येतात. खोलीची अवस्था बघून दोघेही थोडा वेळ अचंबित होतात आणि नंतर खळखळून हसतात.

दूर्वा :- हॅलो दादा कसा आहेस? ऐक ना पुढल्या वेळी Texas(America ) हून येशील तेव्हा माझ्यासाठीकाय आणशील?

गौरव :- एक नवा बेड..! 


दूर्वा :- काय..?


गौरव :- मग काय? माझ्या खोलीचं काय करून ठेवलंय तू? मामी तुला सारखी ओरडते ते बरोबरच आहे.


माईआत्या :- गौरव ! लहान बहिण आहे तुझी ! असं बोलतात का? आता ही तिचीच खोली आहे.  तू आहेस ना तिथे अमेरिकेत! माझ्या लेकीला का छळतोस मग?

गौरव :-  आणि मी कधी भारतात आलोच तर ? मग माझं काय? मी कुठे राहणार? 

काका आणि दूर्वा एकसाथ बोलतात, "अडगळीच्या खोलीत..!" 

     थोडा वेळ जुजबी बोलून झाल्यावर दूर्वा आत्याने सांगितले म्हणून तिचा पिवळ्या रंगाचा वनपीस गाऊन घालून तयार होते. केसांचा हाल्फ पोनीटेल करून ती तयार होते. 

दूर्वा :- माई आत्या ! बघ मी झाले तयार! निघते आता...! तीन अठराची ट्रेन आहे माझी...!

आत्या :-  अगं थांब गं पोरी..! जरा चेहर्‍यावर थोडंसं Foundation  तरी लाव. चेहरा खुलून दिसेल गं...! 

दूर्वा :-  आत्तू ..! I hate make up! काका सांगा ना हिला?

काका :- नको गं फोर्स करूस माझ्या लेकीला. ती जशी आहे तशी खूप सुंदर आहे. चल बाळ तुला सोडायला येतो मी...! गाडी काढतो लगेच...!


दूर्वा :- नको काका! सुप्रिया येणार आहे ट्रेनमध्ये. आम्ही सोबत जाऊ. वाटलंच तर सायंकाळी तुम्हाला बोलवेल घेण्यासाठी. 

माईआत्या :- लवकर नीघ हो. रात्री उशिरापर्यंत थांबू नकोस. माझ्या जीवाला नुसता घोर लागून राहील.


दूर्वा :- हो आत्तू! बाय काका...!

काका :- बाय बेटा...! वाटल्यास फोन कर..! 

      काका आणि आत्याचा निरोप घेऊन दूर्वा काॅलेजला पोचते. काॅलेज कॅम्पसमध्ये चालत असताना खाली फरशी ओली आहे हे तिच्या लक्षात येत नाही. गुळगुळीत फरशीवरून तिचा पाय घसरतो. समोरच्या पायर्‍यांवरून ती जाऊन आपटणार इतक्यात तिच्या कंबरेला कोणाच्यातरी हाताचा विळखा पडतो. घाबरून ती तिचे डोळे घट्ट बंद करते. काही समजायच्या आत दुसर्‍या हाताने तिला वर ओढत ती व्यक्ती बोलते, "धडपडणं आवडता छंद दिसतोय तुझा...!" ओळखीचा आवाज ऐकून ती डोळे उघडून बघते तर समोर राघव असतो. 

     जवळपास सहा फुट उंच, सावळा पण थोडासा गव्हाळ रंग आणि काळेभोर डोळे बघून पहिल्यांदा तिला जरा वेगळेच वाटले. त्या क्षणी तिला नेहमीसारखा राग नव्हता आला की त्याच्या डोळ्यात राग दिसत नव्हता. त्यावर भरीस भर त्याच्या ओठावरचे मोहक हसू...! ती पटकन स्वतःला सावरते. कोणीही त्या दोघांना अशा अवस्थेत पाहिले नाही हे कळताच ती सुटकेचा निश्वास सोडते आणि त्याच्याकडे एकवार बघून ती पार्टी हाॅलकडे जाते.

     इकडे राघवची अवस्था काही वेगळी नसते. दूर्वाही काहीकमी सुंदर नसते. रंगाने गोरीपान आणि तपकीरी डोळे सगळ्यांना घायाळ करण्यासाठी पुरेसे असतात. साधारण सव्वा पाच फुट उंचीची दूर्वा  पिवळ्या रंगाचा लाॅन्ग वनपीस घालून, मोकळे केस सोडलेले जणू  एक परीच दिसत होती..! कोणतीतरी मुलगी मेकअप म्हणून साधी पावडर न लावताही सुंदर दिसू शकते हे त्याला पचनी पडत नव्हते. त्याची नजर राहून राहून तिला शोधत होती. ती दिसतास त्याच्या मनाची कळी खुलली. चोरट्या नजरेने तो तिलाच बघत होता. डिजेचा मोठा आवाज येत होता. 

     थोड्या वेळाने डिजे बंद होतो आणि सगळे शांत होतात. तिथे फर्स्ट ईयरचे HOD पेटकर सर राघवला बोलवतात  आणि त्याच्या कानाखाली मारून खूप जोरात ओरडतात, "राघव देशमुख!! तू इतक्या खालच्या थराला जाशील असे वाटले नव्हते. हिम्मत कशी झाली तुझी मुलांच्या ज्युसमध्ये ड्रिंक्स टाकायची! प्रिंसिपल सर ये आहेत, त्यांना सांगून तुला काॅलेजमधून काढूनच टाकतो."


  

राघव :- सर मी स्वतः व्यसन करत नाही. मी कसा ड्रिंक्स आणणार. मान्य आहे मी खूप राडे घालतो पण हे काही मी केले नाही. सर प्लीज ऐकून घ्या ना माझे...?

पेटकर सर :- तू नाहीस तर मग कोणी केलं हे? खोटं बोलू नकोस माझ्यासमोर..! थांब तुझ्या वडिलांना फोन करतो आता.

     इतक्यात दूर्वा त्यांच्याजवळ येऊन उभी रहाते.


दूर्वा :- थांबा सर...! हे सगळं Margaret आणि कौस्तुभ समुद्रेने केले आहे आणि तुमच्याकडे राघवचं खोटं नाव तुमच्याकडे सांगितले. 


आपले नाव ऐकून दोघेही चपापले.


कौस्तुभ(जरा अडखळतच) :- काय पुरावा आहे तुझ्याकडे की हे मी आणि मार्गारेटने केले आहे. 

  दूर्वा काही न बोलता तिच्या साईड पर्समधला स्वतःचा फोन काढून त्यातला एक विडीओ प्लेऽ करून सरांसमोर मोबाईल फोन धरते. त्यात स्पष्टपणे दिसत होते की कौस्तुभ आणि मार्गारेट ज्युस आणि ड्रिंक्स  मिक्स करत होते आणि कौस्तुभचे वाक्य सगळ्यांच्या कानावर पडते,"साला राघव देशमुख! जास्त शहाणपणा करतो ना..! आता पेटकर सरांना त्याचं नाव सांगून कसा त्याचा माज उतरवतो...!" 

    पेटकर सर :- मिस. दूर्वा...! तुम्हाला जर हे आधीच कळले होते तर मला सांगायला उशीर का केलात? 

दूर्वा :- सर मी येत होते इतक्यात मला माझ्या बाबांचा फोन आला. त्यांच्याशी बोलून होत नाही इतक्यात तुम्ही राघवला मारण्याची घाई केलीत. 


   
     तिच्या अशा भाबड्या आणि वेंधळ्या उत्तराने पेटकर सरांसोबत सगळ्यांच्या हश्या पिकल्या. खूप वेळ गालावर हात ठेवलेला राघव तो हात काढून खो खो हसत होता. तब्बल वीस मिनिटांच्या गॅपनंतर पार्टी पुन्हा सुरू होते. डिजे सुरू होतो. राघव लगेच दूर्वाच्या जवळ येतो.

राघव :- दूर्वा If you don't mind please give me your phone please. तो विडीओ शेअर इटने माझ्याकडे पण घेतो, पुरावा म्हणून...!

दूर्वा :- Sure! घे आणि सांभाळून वापर. घाई नाही पण आठशणीने दे मला..

   ओके म्हणून राघव तिथून निघून जातो. थोड्या वेळाने स्टेजवर राघव एक Announcement करतो," So guys!! Pay attention!  आपल्या समोर स्वतःच्या गोड गळ्याने गाणं गायला एक मुलगी येत आहे. Miss Durva Joshi First year Extc...!" आणि जोरजोरात टाळ्या वाजतात. इकडे दूर्वा खूप आढेवेढे घेत असते की तिला गाता येत नाही. 


   

       तिच्या समोर राघव येतो आणि हळूच बोलतो,"तुझ्या फोनमध्ये मी तुझ्या गाण्याचा विडीओ ऐकला. आता तुला गायलाच हवं नाहीतर तू ते लहान मुलीचा आवाज काढून जे गाणं गायलंस ते सगळ्यांना दाखवेन. माझ्या फोनमध्ये घेतलाय तो पण विडीओ मी..!" रागारात तिने तिचा फोन राघवच्या हातातून हिसकावून घेतला. 

     नाईलाजाने दूर्वाला स्टेजवर जावे लागले. स्टेजवर जाऊन ती कॅसिओ ऑपरेटरला तिच्या गाण्याची स्केल सांगते आणि गाणे गायला सुरूवात करते.

क्रमश:

 
     
   


     

🎭 Series Post

View all