मेरे लिए तुम काफी हो...(भाग-४)

This story based on the young guy who wants to know about the girl who avoid him

(  "तू जिथे मी तिथे" ह्या कथेच्या चौथ्या भागात आपले मनापासून स्वागत आहे. मागल्या भागात आपण बघितले की राघवच्या कंपनीत सहाय्यक म्हणून दुसरी कोणीही नसून दूर्वाच येते आणि समस्त प्रोजेक्ट राघवच्या देखरेखीखाली होणार असल्याने दूर्वाला त्याच्यासोबत काम करण्यावाचून कोणताही पर्याय उरत नाही. तिच्यासाठी बनवायचा केबिन अजून तयार नसल्याने तिला एका दिवसासाठी राघवच्या केबिनमध्ये बसावे लागते. तिने दिलेली गणपती बाप्पाची मूर्ती आणि दूर्वानेच त्याला लावलेली सवय "देवाला जास्वंद वाहण्याची" राघव अजूनही विसरलेला नसतो. हे बघून तिचे डोळ्यात आपसूकच डोळे भरून येतात. आता पुढे)...

राघव :- Any problem Durva..? चहा किंवा काॅफी     काही मागवू का? You'll feel better. 

दूर्वा :- नाही सर मी ठिक आहे. जरा डोळ्यात काहीतरी खडळत होते. 

राघव :- डोळ्यात की मनात...? (तोच दूर्वा रागात त्याच्याकडे बघू लागली.)

राघव :- I am extremely sorry!  And please call me Raghav! माझी पूर्ण टीम मला राघवच म्हणते. सर कोणीच म्हणत नाही. 

दूर्वा :-  ओके ! राघव! जर बोलून झालं असेल तर ती मेल केलेली फाईल एकदा बघाल का? करेक्शन करायचे असतील तर लवकरात लवकर पूर्ण करते मी...! नाहीतर वीस मिनीटांनी तुमचा लंच ब्रेक होईल आणि काम सोडून जाल.

     भरपूर वर्षांनी दूर्वाचं असं दुर्गेचं रूप धारण केलेलं बघून राघवला हायसे वाटले. तो पटकन त्याचा मेल ओपन करून फाईल चेक करतो. 

राघव :- काम तर फत्ते केलं की मिस. दुर्गा साॅरी साॅरी दूर्वा...! चला लंच ब्रेक झाला आहे. कॅन्टीनमध्ये जातो आम्ही सगळे जेवायला. तू जाॅईन झालीस तर सगळ्यांना आवडेल.

दूर्वा :- हो! हे थोडंसं काम झाल्यावर येते. पाच मिनिटात. You continue.  (हसून त्याला निरोप देते आणि राघव तिला पहिले बोलायचा तसे मिस. दुर्गा बोलला हे ऐकुन तिला नकळत हसू फुटलेच होते. )

    इकडे राघव फ्रेश होऊन कॅन्टीनमध्ये जात असताना वळून तिच्याकडे बघतो आणि बोलतो,"दूरु काय अवस्था करून घेतली स्वतःची? पण मी आहे ना आता. तुला पहिल्यासारखी खोडकर दूर्वा केली नाही तर मी पण नावाचा राघव देशमुख नाही.

      थोड्या वेळाने दूर्वाही तिचा डबा घेऊन कॅन्टीनमध्ये जाते. बसायला जागा मिळाली नाही म्हणून ती परत केबिनमध्ये जाणार इतक्यात राघव मागून येतो आणि तिचा हात पकडून बोलतो,"अगं किती उशीर? आम्ही सगळे तुझी जेवणासाठी वाट बघतोय तुझी. चल पटकन." आणि तिला घेऊन एका टेबलापाशी येतो आणि दूर्वाची ओळख त्याच्या कलिग्स समृद्धी आणि हर्षदशी करून देतो. सगळे हसत खेळत जेवत असतात. दूर्वा मात्र शांततेत जेवण करत असते आणि मध्येच स्मितहास्य करते. इतकं सगळं होऊनही राघव अजूनही आपली तितकीच काळजी घेतो हे बघून तिच्या डोळ्यात पाणी आले. राघवची आणि समृद्धीची नजर दूर्वाकडे जाते. 

समृद्धी(तिच्या खांद्यावर हात ठेवत) :- दूर्वा डोळ्यांना काही त्रास होतोय का? आली तेव्हापासूनच लाल झाला आहे. राघव प्लीज माझ्या डेस्ककडे जा आणि first aid kit मधून डोळ्याचं औषध आण. 

दूर्वा :- नाही!  म्हणजे नको राघव सर! काल रात्री उशिरापर्यंत काॅम्युटरसमोर बसले होते आणि आज पण काम त्यामुळे लाल झालेत डोळे. मॅम डोन्ट वरी! मी ठिक आहे. 

समृद्धी :- काळजी घे गं..! आणि तुला आम्हाला सर किंवा मॅम बोलायची गरज नाही. नावानेच हाक मारली तरी चालेल आणि ती पण एकेरीच...! 
  
  जेवण आटोपून सगळे जण आपापल्या कामाला लागतात. सायंकाळी ऑफिस सुटल्यावर दूर्वा घरी जाण्यासाठी रिक्षा बघत असते तर तिला रिक्षा मिळतच नाही. इतक्यात राघव त्याची बाईक घेऊन तिच्यासमोर येऊन उभा राहतो. 

राघव :- अगं आत्ता इथे रिक्षा मिळणार नाही. ये चल पटकन मी सोडतो तुला घरी..! म्हणजे नाक्यावर. तिकडून जा पायी.
  
     दूर्वाकडे काही पर्याय नसल्याने ती लगेच जाऊन राघवच्या मागे बसते. थोड्या वेळाने राघव त्याची बाईक एका बाजूला उभी करतो आणि बोलतो, "एक मिनीट. माझा फोन वाजतोय. घेऊ का?" ती फक्त ह्म्म बोलते.

राघव (फोनवर) :- हॅलो..! हा बोल ना ख्याती. अगं चौक यायला दहा मिनिटे आहेत.
  जुजबी बोलून झाल्यावर राघव बाईक स्टार्ट करतो तोच दूर्वा बोलतो,"ए ख्याती कशी आहे? मी भेटले तेव्हा नुकतीच  सातवी  होती ना!" 

राघव :- हो! आता Mass media करतेय.

दूर्वा :- किती गोड होती रे ती तेव्हा! एकदम क्युट! Mass media म्हणजे खूप हुशार आहे रे ती. कॅरम पण किती छान खेळायची! आधीपण ती तुला कुठे आहेस म्हणून फोन करायची. तिची खूप आठवण येते रे अजून. 
   
    नकळतच दूर्वा तिचा उजवा हात त्याच्या खांद्यावर ठेवते तशी राघवने गाडी थांबवली. 

दूर्वा :- साॅरी राघव! बोलण्याच्या ओघात चुकून झाले. मी ते...

राघव (हसतच खांद्याकडे बघत) :- अगं ! मी त्यासाठी नाही थांबलो. तुझं घर आता येईल म्हणून थांबलो. आत आलो असतो पण खरं सांगू तर माझ्या काही आठवणी जाग्या झाल्या तर काही खरं नाही. 

दूर्वा :- सावकाश जा घरी आणि थॅन्क्स मला घरापर्यंत सोडल्याबद्दल!

राघव :- का वागलीस तू असं? नातं का तोडलंस आपलं?

दूर्वा :-  राघव अनभिज्ञ असण्यात खूप सुख असतं. उगीच कशाला स्वतःला दुःखाच्या गर्तेत ढकलत आहेस? 

राघव :- वेळ आली की सगळं काही कळल्यावाचून राहणार नाही मी दूरु....! ते जाऊदे. तुझी माईआत्या कशी आहे? आणि तिचे मिस्टर दिपक काका! मला फार जीव लावला त्यांनी. एकदा तरी भेटायचे आहे मला त्यांना

दूर्वा :-  माईआत्या हे जग सोडून कायमचीच निघून गेली. आता इथे  घरी मी एकटीच आहे. काका असतात कोकणात कधीतरी येतात. चल बाय उशीर झाला असेल तुला.
   
      डोळ्यात आलेले पाणी ओढणीने टिपत दूर्वा तिच्या घराकडे जाते. राघव कितीतरी वेळ तिथेच उभा असतो. जेव्हा दूर्वा डावीकडल्या गल्लीकडे वळते, तेव्हा राघव त्याची बाईक स्टार्ट करून घराच्या दिशेने धाव घेतो.

क्रमश:

🎭 Series Post

View all