Mar 02, 2024
कथामालिका

मेरे लिए तुम काफी हो...(भाग-३)

Read Later
मेरे लिए तुम काफी हो...(भाग-३)

       ( मागच्या भागात आपण पाहिले की बाॅसला ऐन वेळी उपस्थित राहता आले नाही म्हणून प्रेझेंटेशन राघवने दिले आणि काॅन्ट्रॅक्ट त्यांच्या कंपनीला मिळाले. आता राघवच्या खांद्यावर कोणती जबाबदारी येते ते आपण बघूया.)   

 

 

'मैं नागिन डान्स नचना" या गाण्याच्या आवाजाने  राघव  खडबडून जागा होतो. आधी कितीतरी वेळ त्याला काही कळत नाही; जेव्हा तो त्याचा फोन हातात घेतो तेव्हा त्यावर अलार्म असे लिहून येत होते. असली विचित्र टोन ख्यातीशिवाय कोणीच ठेवू शकत नाही. तो जोरात ओरडतो,"ख्याती..!" बेडवर पडलेली फोटोफ्रेम शेजारच्या ड्राॅवरमध्ये ठेवून धावतच खाली जातो आणि ख्यातीच्या दिशेने धावतो. दादा खूप चिडला हे जाणून ती घराबाहेरच्या अंगणातल्या त्यांच्या बागेत जाते. त्यांचे बाबा झाडांना पाणी घालत असतात. ख्याती पळत  जाऊन बाबांना बिलगते. राघव बोलतो,"बाबा हिला आज मी जिवंत सोडणार नाही. ही मला खूप त्रास देते." आणि तिला फटका देणार इतक्यात ती बाबांच्या पाठीमागे उभी राहते.

बाबा : अरे राघव! लहान बहीण ना ती तुझी! तुझी खोड नाही काढणार तर कोणाची काढणार? (ख्यातीकडे बघत) काय गं दादाला त्रास का दिलास? आणि केलं तरी काय रे हिने जे तू हिला धपाटा घालायला घरभर धावतोय इतका?

राघव : हिने किती विचित्र अलार्म टोन सेट केली माझ्या मोबाईलची? मी दचकून जागा झालो.

बाबा : काय? इतकंच ना! अरे एखादं गाणं असेल त्यात काय होतं?

राघव : 'मैं नागिन डान्स नचना" हे गाणं ठेवतं का कोण?

बाबा(हसतच) : काय तुम्ही आजकालची पोरं पण ना..? जा जाऊन आवरा पटापट. कामं करा सकाळची.  

बाबांचं ऐकून ख्याती पळतच घरात जाते. राघव तिच्या पाठोपाठ जाण्यासाठी वळतो इतक्यात बाबा बोलतात,"ऐक रे! आज तुझी बाईक नको घेऊस. तुझ्या ऑफिसकडे माझे एक क्लाएंट आहेत, त्यांना भेटायला जायचे आहे. आपण एकत्र आपल्या कारने जाऊ आणि...." बाबा काही बोलणार इतक्यात राघव बोलतो," बाबा मी आपला जातो बाईकने... बाईक नेली नाही की सायंकाळी माझी तारांबळ उडते. ख्यातीला काॅलेजमध्ये ड्राॅप करा जाताना. right?"

बाबा : अरे व्वा!  हुशार झालास. जा तू बाईक घेऊन... आवर जा पटकन आणि मस्ती करू नका. आई ओरडेल. आवरून झाल्यावर चौघेही डायनिंग टेबलवर एकत्र नाष्टा करतात. बाबा एक फाईल घेण्यासाठी त्यांच्या खोलीत जातात.

राघव : ख्याती तू पुढे बसतेस की मागे बोल पटकन. बाबा आज तुझे ड्रायव्हर..

ख्याती : दादा अरे मी फ्रेंड्ससोबत जाणार होते ना. तसंही माझं काॅलेज जवळच आहे. बाबा मला नेहमी कारने पाठवतात किंवा तुझ्यासोबत पाठवतात. फ्रेंड्ससोबत क्वचितच जाते मी.

राघव : आजच्या दिवस फक्त. मी सांगतो बाबांना. तू बस पुढे, मी बसतो मागे. ख्याती : ठिक आहे. हे घे आणि गाडीत ठेव मग.       

ख्याती आपली बॅग राघवच्या हातात देऊन ऐटीत बाहेर निघते. मागोमाग राघव स्वतःची लॅपटॉप बॅग, टिफीन आणि ख्यातीची जड बॅग घेऊन तिच्या मागे जातो. ख्यातीला कारमध्ये बसवून राघव बाईक घेऊन आपल्या ऑफिसकडे कूच करतो. ऑफिसमध्ये पोचताच राघव त्याच्या केबिनमध्ये जाणार इतक्यात शिपाई त्याच्यापाशी येऊन बोलतो,"साहेब! गायकवाड साहेबांनी तुम्हाला अर्जन्ट बोलावले आहे त्यांच्या केबिनमध्ये. आत्ताच्या आत्ता!" "हो आत्ताच आलोय. पाच मिनिटात येतो म्हणून निरोप द्या." राघव उत्तरतो आणि स्वतःच्या केबिनमध्ये जातो. त्याच्या टेबलवरच्या  गणपती बाप्पाची पूजा करून आणि रूममधल्या बाम्बूच्या झाडाला पाणी घालून राघव गायकवाड सर म्हणजे त्याच्या बाॅसच्या केबिनमध्ये जातो.

राघव : समीर सर! मे आय कम ईन??

समीर : येस कम ईन राघव. लेट्स हॅव अ सीट!

राघव खूर्चीवर येऊन बसतो आणि बोलतो, "बोला सर काय काम आहे? मी Phoena group चं सगळं काम केलं आहे.  लास्ट चेन्जेस केले की सुटलो एकदाचे."

"ओह वाॅव! Frankly speaking राघव! तुझी टिम खूप मेहनतीने काम करते. तू सोबत असला की सगळी कामं कशी पटापट होतात. यासाठीच तुझ्याकडे आणखी एक जबाबदारी देत आहे मी. JCLC चा प्रोजेक्ट तू पूर्णपणे तुझ्या Under घेऊन कर. किती दिवस माझ्या under काम करशील?"

राघव : अहो सर ! तुमच्याशिवाय?  मला जमणार आहे का?

समीर : हो मी म्हणतोय तर होच! आणि आज त्यांच्या कंपनीतील एक जण आपल्यासोबत काम करण्यासाठी येणार आहे. त्या व्यक्तीसाठी केबिन arrange करू पण आजचा दिवस ते तुझ्यासोबत तुझ्या केबिनमध्ये म काम करेल. तुला काही प्रॉब्लेम नाही ना?"

राघव : छे छे सर! मला काय प्रॉब्लेम? फक्त ती व्यक्ती इतकी सक्षम असावी की माझे जोक्स ऐकून तिला वैतागून नको जायला. त्यापेक्षा त्यांना आजच्या दिवस एखादा डेस्क द्या ना. तिथे ते निवांत काम करतील.

समीर(दरवाज्याकडे बघत) : येस कम इन!

   राघव वळून पाहता त्याला एक मुलगी सुंदर आणि सिंपल अशा गुलाबी रंगाच्या सलवार कुर्त्यात दिसते. तो तिच्या चेहर्‍याकडे बघतो तर ती दुसरी कोणी नसून दूर्वा असतो. आपसूकच तिला बघून राघव खूर्चीवरून उठून उभा राहतो आणि समीरही...!

दूर्वा  (समीरकडे बघत) : सर I am Miss. Durva Joshi. p Project head in JCLC.  This is the contract papers. समीर : येस दूर्वा. मी ओळखले तुम्हाला. आजपासून काम  सुरू झाले पाहिजे असे तुमचे एम. डी. बोलले. पण साॅरी तुमचे केबिन रेडी नाहीये. मग आज तुम्ही माझ्या केबिनमध्ये काम करा हवं तर!

राघव : नको समीर सर! हा प्रोजेक्ट मी हॅण्डल करतोय ना. Miss. Durva यांच्याकडे मला  काम असेल तर मला इकडे यावं लागेल, त्यापेक्षा त्या आज माझ्या केबिनमध्ये येतील. माझ्या शेजारच्या केबिनमध्ये त्यांची व्यवस्था करणार आहोत ना...!

  राघवचं हे बोलणं ऐकून समीर चकीत होतो. राघवच्या पाठोपाठ दूर्वा त्याच्या केबिनकडे जाते. राघव आधी जाऊन दरवाजा उघडतो आणि बोलतो, " आधी तुम्ही जा आत मॅम!"

दूर्वाला आता त्याच्या आवाजातला रोख लक्षात येतो पण काहीच न बोलता ती केबिनमध्ये शिरते आणि राघवच्या समोर असलेल्या दोन खूर्च्यांपैकी एका खूर्चीवर जाऊन बसते. टेबलाकडे बघताच तिचे लक्ष गणपती बाप्पाच्या मूर्तीकडे जाते आणि त्यावर वाहिलेल्या  जास्वंदीच्या फुलाकडे.....! ती गणपती बाप्पाची मूर्ती दूर्वानेच राघवला दिलेली असते. ती बघून दूर्वाच्या डोळ्यात पाणी आले पण राघवला कळू नये म्हणून ती पटकन डोकं लॅपटॉपमध्ये घालून डोळे पुसते, पण ही गोष्ट राघवच्या लक्षात आल्यावाचून राहत नाही.

क्रमश:

( मला ठाऊक आहे की दूर्वाबद्द्ल जाणून घेण्याची तुम्हालाही खूप उत्सुकता आहे. मी लवकरात लवकर पुढचा भाग घेऊन येईन तुमच्यासाठी. तोपर्यंत तुम्ही guess करा की दूर्वा आणि राघव असे का वागत आहेत आणि कमेंट बाॅक्समध्ये जरूर टाका. )

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//