( तर दोस्तहो! मागचा भाग आपण नक्कीच वाचला असेल. मागच्या भागात आपण पाहिले राघव एक हुशार तरूण जो आपल्या घरी आणि ऑफिसमध्ये सगळ्यांचा आवडता असतो. ऑफिसमध्ये एक महत्त्वाचे प्रेझेंटेशन पार पाडण्याची जबाबदारी त्याच्यावर येते आणि अनपेक्षितरीत्या त्याच्या समोर दूर्वा जोशी नावाची व्यक्ती येते. आता पुढे...!!)
दूर्वाशी नजरानजर होताच राघव तिला टाळत त्याचे प्रेझेंटेशन पूर्ण करतो. दोन तासांनंतर एकेकाच्या शंकेचे निरसन आणि काही महत्त्वाचे मुद्दे मांडून राघव त्याच्या खूर्चीत जाऊन बसतो. तितक्यात त्याचे बाॅस म्हणजे करण गायकवाड येतात,"Sorry! I can't joined the meeting because of an emergency. I hope Mr. Raghav यांनी तुम्हाला सगळी माहिती दिली असेलच. " असे बोलून गालातल्या गालात हसतात.
" Yes sir! आम्हाला तुमचे presentation आवडले. मला वाटते की आपण ही डील फाईनल करायला काही हरकत नाही. पण सर आमची एक अट आहे. " JCLC चे मॅनेजर बोलतात.
कपाळावर जराश्या आठ्या आणत बाॅस विचारतो, " सर कसली अट? काही टेन्शन आहे का? की प्रोजेक्टमध्ये काही बदल करायचे आहेत?"
" छे! छे! त्याची काही चिंता नाही. पण JCLC PVT. LTD. कंपनीची एक पाॅलिसी आहे. की आम्ही कोणतेही काम दिलेले काम वेळेवर किंवा वेळेआधीच पूर्ण करतो. आम्हाला एका दिवसाचाही उशीर झालेला चालत नाही. हवं तर आमच्या कंपनीतील कोणी तरी एक जण तुमच्याशी Co-ordinate करेल."
" ठिक आहे! आम्हाला मान्य आहे. तुमचं काम वेळेत पूर्ण होईल ह्याची हमी मी तुम्हाला देतो." गायकवाड बोलतात.
"So..! Deal is final. मी बाकीच्या डिटेल्स तुम्हाला परवा दुपारी दोन वाजेपर्यंत देतो." मॅनेजर सगळ्यांशी हस्तांदोलन करून निघून जातात आणि मागोमाग दूर्वा पण जाते.
जाताना दोघेही एकमेकांना वळून बघतात पण दोघांच्याही चेहर्यावर निश्चल भाव असतात. प्रेझेंटेशन पूर्ण होते म्हणून राघव मिटींग रूममधून बाहेर आला आणि त्याच्या केबिनमध्ये मोर्चा वळवला. कितीतरी वेळ कोणतेही काम न करता तो त्याच्या ऑफिस चेअरला रेलून डोळे मिटून पडलेला असतो. समोरून केबिनमध्ये त्याची ऑफिसमधली मैत्रीण समृद्धी डायरेक्ट knok न करता केबीनमध्ये येऊन चेअरवर बसते आणि राघवला बोलते,"मि. राघव आपण ऑफिसमध्ये कामासाठी येता. विचार करण्यासाठी नाही. चला लंच ब्रेक झालाय जेवायला जाऊ."
"नको सॅमी! मला भूक नाहीये. ने माझा टिफीन आणि तुम्ही मिळून संपव...!!" असे बोलून तो तिच्याकडे आपला डबा सरकवतो आणि डोक्याला हात लावून बसतो.
समृद्धी उठून त्याच्या कपाळाला हात लावून बोलते, "ताप तर नाहीये तुला? इतका का नर्व्हस आहेस? चल थोडंसं खा खूप छान वाटेल आणि आज मी डब्यात तुझे आवडते पनीर कोफ्ते आणले आहेत. हर्षद पण वाट बघतोय केव्हाचा. "आणि त्याचा हात ओढू लागते.
"समृद्धी! मी तुझा मुलगा नाहीये बळजबरी करायला. बिचारा तुला कसं सहन करतो कुणास ठाऊक! तू जा गं आत्ता मला आराम करू दे." असं म्हणत राघव खुर्चीवर ताठ बसतो आणि लॅपटॉप चालू करतो.
"माझा मुलगा तुझ्यापेक्षा खूप लहान आहे, पण तो तुझ्यासारखा हट्टी नाहीये. चल ऊठ जेवायला. हवं तर केबिनमध्येच खा. नाहीतर मी जेवणार नाही. " असे बोलून ती राघवच्या समोर असलेल्या खुर्चीवर बसते
"तुला माहिती आहे मी सगळे जण सोबतीला असतील तरच जेवतो. चल कॅन्टीनमध्येच." तो उठून स्वतःचा आणि समृद्धीच्या हातात असलेला डबा घेऊन तो कॅन्टीनकडे जातो आणि मागोमाग समृद्धीही.
राघव जेवताना जरा उदासच वाटत होता. त्याच्या हर्षदच्या पण लक्षात आले पण समृद्धीने गप्प बसण्याचा इशारा केल्याने तो शांत बसला. सगळ्यांनी आपापले जेवण उरकले आणि कामाला लागले.
राघव त्याच्या कॅबिनमध्ये खूप वेळ काम करत होता. काम करताना त्याने घड्याळातही पाहिले नसते. खूप उशीर झाला म्हणून तो घरी निघायला निघतो. पार्किंग लॉटमध्ये येऊन बाईक चालू करणार तेवढ्यात त्याला फोन येतो आणि फोनवर ख्यातीचं नाव वाचून तो पटकन फोन उचलतो आणि बोलतो," हा बाळ बोल. अगं माझं काम झालंय. मी निघतोय घरी यायला. "
"ओके दादा..! ऐक ना आई म्हणाली की दादाला सांग येताना Whatsapp वर एक लिस्ट दिली आहे ते सगळं सामान घेऊन ये. उद्या आईच्या काही मैत्रीणी घरी येणार आहेत. " ख्याती बोलते.
" साॅरी बाळ. मला नाही जमणार. मी तुला लिस्ट पाठवतो आणि गुगल पे करतो तू घेऊन येशील? खूप थकवा आला आहे. आणि ऐक तुझ्यासाठी पण काहीतरी तुझ्या आवडीचं स्नॅक्स वगैरे घे. मला ट्रॅफिकमध्ये खूप वेळ होईल, तर तुम्ही जेऊन घ्या." राघव बोलतो.
"ओके दादा! मी करते सगळं! तू सावकाश घरी ये. तू चिंता करू नकोस. मी आता मोठी झाली आहे. मी काम जबाबदारीने करू शकते." ख्याती आत्मविश्वासाने बोलते.
"मला माहित आहे माझं बाळ हुशार आहे." राघव एका दमात बोलून जातो.
"दादा काही टेन्शन आहे का रे? बोल ना!" ख्याती काळजीच्या स्वरात विचारते.
"नाही गं! ऑफिसमध्ये खूप काम आहे मी येतो चल बाय!" आणि फोन ठेवतो.
घराकडे निघताना तो वाटेतल्या गणपतीच्या देवळासमोरच्या पार्किंगमध्ये गाडी उभी करून तो देवळात जातो आणि कितीतरी वेळ डोळे बंद करून नुसताच मांडी घालून बसतो. थोड्या वेळाने जेव्हा तो मंदिराच्या बाहेर जाताना घंटा वाजवणार इतक्यात कोणाचातरी हात त्याच्या हाताला लागतो. तो हात दुसर्या कोणाचा नसून दूर्वाचा असतो. दोघांची पुन्हा नजरानजर होते पण दोघे काही बोलत नाहीत. दूर्वा तत्क्षणी तिच्या वाटेने जाते तोच राघव तिला आवाज देतो, "दूरू...!" ही हाक ऐकून दूर्वा जागीच थिजून उभी राहते आणि राघव तिच्या समोर येऊन उभा राहतो. तिच्या डोळ्यात नकळतच पाणी आले. तो पुढे काही बोलणार इतक्यात ती तिच्याकडच्या प्रसादाच्या ताटातून दोन पेढे काढून त्याच्या हातावर ठेवते आणि पुढे जाणार इतक्यात राघव बोलतो, " दुरु... इतकी वर्षे होतीस कुठे? कधी आलीस मुंबईत? बोल ना गं? तुला किती फोन केले तरी काही बोलली नाहीस... " ती काहीच न बोलता रिक्षा पकडून निघून जाते. हातातल्या पेढ्यांकडे बघतो. पेढे टिश्यू पेपरात गुंडाळून खिशात ठेवून आपला मोर्चा घराकडे वळवतो.
घरी आल्यावर ख्यातीने दार उघडताच राघवने तिच्या हातात प्रसाद ठेवतो आणि काहीच न बोलता फ्रेश होण्यासाठी निघून जातो. राघवचे हे रूप ख्यातीला नवेच वाटते. दादा आवरून येईपर्यंत ख्याती डायनिंग टेबलवर त्याच्यासाठी जेवण वाढून ठेवते आणि टिव्हीवर गाणे ऐकत तिच्या college चे writeup करत बसते . राघव त्याचे ताट घेऊन तिच्यापाशी येऊन बसतो आणि तिला एक छोटीशी स्माईल देतो.
"काही हवं असेल तर सांग मला. मी पटकन आणून देते." ख्याती बोलतो.
" नाही! नको! मला जास्त भूक नाहीये आज! तू आपला अभ्यास कर." राघव उत्तरतो.
ख्याती तिचा अभ्यास पूर्ण करण्यात गुंग असते आणि दुसरीकडे राघव दूर्वाचा विचार करत असतो. जेवण झाल्यावर तो उठून स्वयंपाकघरात जातो आणि स्वतःचे ताट धुवून ख्यातीसाठी पाण्याची बाटली घेऊन येतो आणि तिच्या हातात देत बोलतो, "ख्याती! बाळ पटकन झोप आता उशीर झाला आहे. बाबा ओरडतील इतक्या उशीरापर्यंत जागी आहेस म्हणून."
दादाच्या आवाजातला नू ओळखून ख्याती बोलते, "दादा! काही टेन्शन आहे का? मला सांग. मी बाबांना नाही सांगणार. Don't worry, you just tell me."
"नाही गं आजीबाई..! फक्त कामामुळे दमतोय मी. आता आवरून पटकन झोप. गुड नाईट...!" ख्यातीला मिठी मारून तिच्या कपाळाचा मुका घेऊन राघव त्याच्या खोलीत निघून जातो. ख्यातीला कळते की दादाचे काही बिनसले पण तिला विचारताच नीट आले नाही.
इकडे राघव खोलीत येऊन त्याच्या कपाटातून एक फाईल काढतो. त्या फाईल मध्ये एक फ्रेम केलेला फोटो , एक ग्रिटींग कार्ड आणि एक चिठ्ठी असते. तो फोटो दुसरा तिसरा कुणाचा नसून त्याचा आणि दूर्वाचा असतो. लाल रंगाच्या बदामाच्या डिझाईनच्या ग्रिटींग कार्डवर लिहिलेले असते,
" I love you too Raghav." आणि त्या चिठ्ठीवर लिहीलेले असते,
" प्रिय राघव,
Sorry Raghav! मला विसरून जा. हेच आपल्या दोघांसाठी योग्य राहील. मी कधीच तुझी होऊ शकणार नाही. तू आयुष्यात नेहमी पुढे जा. तुझ्यातलं ते लहान बाळ आहे ना ते खूप गोड आहे त्याला कधी तुझ्यापासून दूर करू नकोस, फक्त माझ्यासाठी!!
तुझीच
दूरु( जी आता तुझी राहीली नाही)"
ते पत्र वाचताना राघवला खूप रडू येतं. तो ते पत्र आणि ग्रिटींग कार्ड पुन्हा कपाटात ठेवतो पण त्या दोघांचा छातीशी कवटाळून बोलतो,"दूरु तू असं का केलंस? तू वेगळं होण्याचं कारण मला सांगत नाहीस आणि आता इतक्या वर्षांनी भेटल्यावर तू एकही शब्द माझ्याबोलली नाहीस. का?"
कितीतरी वेळ राघव रडत असतो आणि रडतच झोपी जातो आणि त्यांचा फोटो त्याने घट्ट धरून ठेवलेला असतो.
क्रमश: