मेरे लिए तुम काफी हो...(भाग-२०)

This story based on the girl who avoid him...

( आता मागील भाग वाचून तुम्हाला काय वाटले हे मला थोडे फार समजले. दुर्वाला समोरून येताना कोण दिसते यावरून तुमच्याही मनात अनेक ऑप्शन आले असतील...हो ना?? कोणाला वाटले कमलाकर असेल तर कुणाला वाटले की तिचे आई बाबा...! तर बघूया नेमकं कोण आलंय दुर्वाच्या समोर....)

 

दुर्वा मात्र समोर बघत होती आणि तिचा हात थरथर कापत होता. दुर्वा ज्या दिशेला बघते तिथे समोरच कमलाकर उभा होता हे बघून राघव अचंबित होऊन बघत होता. कमलाकर हळूच चालत येत तिचा हात घट्ट धरला होता. कमलाकरचं असं अचानक तिच्यासमोर येणं हे त्यालाही पचनी पडलं नव्हतं.

कमलाकर :- काय मग...? कशी आहेस डार्लिंग...?? काही फोन नाही... एक एस.एम.एस. नाही. किती शोधतोय तुला मी..? मला खूप आवडलीस तू....! तू माझ्याशी लग्न कर ना जान... तुझा डॅडी पण तुला accept करेल.

दुर्वा :- सोड कमलाकर मला...! तुझ्यासारख्या माणसाशी मला लग्न करायचं नाहीये. किती छळशील मला...? जा इथून...!

कमलाकर :- अगं तुझ्यासाठी मी काय नाय केलं...? बघ बाबांनी दुसरं लग्न लावून दिलं तरी तूच होतीस गं मनात... ती दुसरी बायको माझी एकजात बावळट होती. दिलं मी तिला हाकलून माहेरी... हुशार आहे फार म्हणे ती.. ती बघ कालच मला फोन करत होती. बोलत होती पुन्हा संसार थाटूया... माझ्यावर प्रेम करते असे बोलत होती. तू कर ना माझ्याशी लग्न...!

दुर्वा :- कमलाकर कळत कसं नाहीये तुला...? मला तुझ्याशी लग्न नाही करायचं. माझा पाठलाग का करतोय तू...?

कमलाकर :- ए...! मी काही इतका फुकट नाही. माझं काम होतं इथे म्हणून आलो तर तू दिसली मला. न राहवून आलो इथे.

दुर्वा अजुनही तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती. राघव पटकन तिच्यापाशी येऊन कमलाकरच्या हातातून तिचा हात सोडवून घेतो.

राघव :- ओ मिस्टर...! मुलींशी कसं वागतात याचं भान नाही का तुम्हाला...? सोड तिचा हात नाहीतर पोलिसात कंम्पलेन्ट करेल...

कमलाकर :- तू कोण मध्ये बोलणारा...? मी माझ्या होणार्या बायकोशी बोलतोय.

दुर्वा :- बस्स झालं कमलाकर मी तुझी होणारी बायको नाहीये... आधीच सांगितले मी तुला की मी तुझ्याशी लग्न करणार नाही.

कमलाकरने क्षणाचाही विलंब न करता पब्लिक प्लेसमध्ये तिचा हात ओढत तिला जोरात खेचले आणि ती लगतच्या जिन्यापाशी खाली जाऊन पडली. तिच्या हाताला खरचटले आणि रक्त वाहायला सुरूवात झाली.

कमलाकर :- काय समजते कोण स्वतःला...? ****** कुठली...?

राघव ( कमलाकरची काॅलर धरत) :- काय समजतो स्वतःला तू..? लायकी आहे का तुझी तिच्यासमोर उभं राहण्याची..? म्हणे तिच्याशी लग्न करतोय मी...!

दुर्वा :- राघव सोड त्याला...! तो ऐकून घेणारा नाहीये.

कमलाकर(दुर्वाकडे बघत) :- अच्छा तर मुंबईचा हाच रोमिओ आहे वाटतं...! याच्यासाठीच तू माझ्याशी लग्न करायला नकार दिलास..

आणि कमलाकरने राघवला मारण्यास सुरू केली. राघव आणि कमलाकरमध्ये जोरजोरात मारामारी व्हायला सुरुवात झाली होती. दुर्वाला काही क्षण काय करावे सुचतच नव्हते. इकडे कणलाकरने जोरात धक्का मारून राघवला पाडले आणि त्याच्या डोक्यातून भळाभळा रक्त यायला सुरूवात झाली. तिने पटकन पोलिसांना फोन करून बोलवले आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी टॅक्सीने राघवला दवाखान्यात नेले. रक्त कमी गेले तरी राघव अजुनही बेशुद्ध होता. दुर्वाने लगेचच त्याच्या घरी फोन लावून राघवला दवाखान्यात भरती केले आहे असे कळवले पण कारण सांगण्याचे टाळले. राघवला तसे बरेच लागले होते. तो अजुनही झोपून होता. दुर्वा एकटक त्याला बघत त्याच्या मऊशार रेशमी केसांवर हात फिरवत आसवे गाळत होती. राघवला शुद्ध आली आणि दोघेही काही बोलणार इतक्यात दिपक काका तिच्यासमोर उभे राहीले.

दिपक काका डोळ्यात आलेले पाणी अडवत एकटक दुर्वाला बघत होते. दुर्वा अजुनही स्तब्ध उभी होती. आणि तिचे अंग अजुनही कंप पावत होते. हळूहळू दिपक काका तिच्या दिशेने येत होते तसे दुर्वाचे हात पाय आणखीनच लटपटत होते. डोळ्यातले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत होती. राघवने तिची अवस्था पाहून आश्वस्तपणे तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि डोळे मिटून तिला दिलासा दिला.

दिपक काका :-  कशी आहेस बेटा...! माईआत्या गेली तर काकाला पण विसरलीस?

दुर्वा (अडखळतच) :- ना... नाही काका... ते..मला
..साॅरी ते मी...!

राघव :- काका तुम्हाला कसे समजले आम्ही इथे आहोत ते...! तुम्ही तर आम्हाला रेस्टॉरंटमध्ये भेटणार होता ना...!

दिपक काका :-  अरे बेटा मी  दुर्वाला  टॅक्सीत बसताना बघितले आणि समोरून तो कमलाकर दिसला तावातावाने जात होता. तिथल्या लोकांकडे विचारपूस केली तेव्हा समजले मला... आणि तसाच तडक दवाखान्यात आलो. Thank you so much beta... दुर्वाला वाचवलंस तू...!

दुर्वा :- म्हणजे तू माझी काकांशी भेट घडविण्यासाठी मला माॅलमध्ये घेऊन आला होतास...? पण का...?

राघव :- हो ना...! तू कुणालाच भेटत नाही म्हणून हा प्लॅन केला पण त्या कमलाकरने सगळ्या प्लॅनवर पाणी फेरलं..

  दिपक काका  बोलत होते  आणि राघवही त्यांच्याशी जुजबी बोलत होता. दुर्वाचे अंग अजुनही थरथर कापत होते. तिला खरं तर तिथून दूर निघून जावेसे वाटत होते पण पुढे काका आणि पाठीमागे राघव असल्याने ती शांतपणे खाली बघत होती.  कोणी काही बोलणार इतक्यात दुर्वाने बोलायला सुरूवात केली.

दुर्वा :-  Sorry Raghav.... तुझ्या ह्या अवस्थेला मीच जबाबदार आहे... आणि  काका...! I am extremely sorry....! मी परत यायला हवं होतं देवगडला..! माईआत्या माझ्यामुळे गेली ना... बाबा खरंच बोलले होते तेव्हा मी मुळात वाईटच आहे. माझं रक्त नासकं....

दिपक काका :- दुर्वा खबरदार जर पुन्हा हे माझ्यासमोर बोललीस तर...! नासकं रक्त, रक्त...! विट आलाय मला ऐकून हे सगळं.... हेच शब्द ऐकून माझी संजिवनी मला सोडून गेली. तुझी माईआत्या गेली. हा राघव होता म्हणून तरी तू भेटलीस मला...! चल आपल्या घरी. काय त्या भाड्याच्या घरात राहतेस...

दुर्वा :- काका..! पण बाबा कसे रिअॅक्ट होतील..? त्यांना हे अजिबात आवडणार नाही. ते आधीच खूप चिडले आहेत. उगीच भांडतील तुमच्याशी....! त्यांना बीपीचा त्रास आहे आधीच....

राघव :- कम ऑन दुर्वा...! इतका का पुळका आला तुला तुझ्या बाबांचा..! आधीच ते तुला मुलगी मानत नाहीत.

दुर्वा :- राघव काय बडबडतोय तू....! ते माझे बाबा आहेत आणि तुला कोणी सांगितले की ते मला मुलगी मानत नाहीत ते...?

दिपक काका :-  त्याला सगळं ठाऊक झालंय दुर्वा...! आणि तो पण खरंच बोलतोय. पाच वर्षे झाली तू जिवंत आहेस की मेली ते पण बघितलं नाही.  थोडेफार पैसे हातात ठेऊन घराबाहेर काढलं तरी त्यांचा तोरा मिरवतात. आणि काय त्या कमलाकरशी लग्न लावायला निघाले होते.

राघव :- हो ना...! आपण एखादा प्राणी पाळला तरी त्याला जपतो.  आणि ते ज्या मुलीला लहानाचं मोठं केलं तिच्याशी अशी वागणूक आणि आई पण बोलत नाही. हे अजबच वाटतंय...!

दुर्वा :- Mind your language...! तुला अधिकार नाही माझ्या बाबांना असे बोलण्याचा...!  कसेही असो मी अजुनही त्यांचंच नाव लावतेय.

राघव :- हो का.... म्हणूनच वाटतं त्यांनी तुझा विचार न करता कमलाकरशी लग्न करण्यासाठी तुला फोर्स केलं..

दुर्वा पुढे काही बोलणार इतक्यात राघवचे आई बाबा आणि डाॅक्टर रूममध्ये येतात.

राघवची आई :- गब्बू... काय झालं हे...! कसं झालं..? डाॅक्टर कसा आहे आता माझा लेक...? किती लागलंय डोक्याला...!

डाॅक्टर :- काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही आता.. ! दोन तासात डिस्चार्जड मिळेल. थोडंसं रक्त गेलंय पण होईल रिकव्हर... काळजी करू नका पण हो काळजी मात्र घ्या...

रा. बाबा :- थॅन्क यू सो मज डाॅक्टर.... तुमच्यामुळे माझा मुलगा...

डाॅक्टर :- वेट मॅम...! मला थॅन्क यू बोलण्याची गरज नाही आणि बोलायचं असेल तर  ह्या ब्रेव गर्लला थॅन्क्स म्हणा. तिने Ambulance ची वाट न बघता तुमच्या मुलाला दवाखान्यात आणले.

डाॅक्टर निघून गेले आणि राघवचे आई बाबा त्याच्याजवळ जाऊन त्याची विचारपूस करत होते. इकडे दुर्वा अजुनही शांतपणे राघवच्या फॅमिलीला आणि दिपक काकांना बघत होती.

दुर्वा :- राघव खूप उशिर झाला आहे. माझ्या मते आता मी....

रा. आई :- हो बेटा खूप उशिर झाला आहे. तू घरी जायला निघायला हवे आता. एकतर इथून तुझं घर वेगळ्याच दिशेला आहे.

दुर्वा :- काही मदत लागली तर मला सांगा.

रा. आई :- हो नक्की.

दुर्वा लगेच वाॅर्डबाहेर निघून येते तोच तिच्या मागोमाग राघवची आई येते.

दुर्वा :- काकू...! बोला ना..! काय मदत हवीय तुम्हाला...! पटकन करते.

रा. आई :- जा निघून...

दुर्वा :- हो काकू मी जातेच आहे...

रा. आई :- तसं नव्हे... माझ्या पोराच्या आयुष्यातून निघून जा... माहीत आहे मला तू इथे फक्त कामानिमित्त आली आहेस. पण माझा लेक भाबडा आहे. अजुनही तुझ्यातच गुंतला आहे. आज बघ त्याची जी अवस्था झाली आहे त्याला नाही म्हटले तरी तुपण जबाबदार आहेस. मला माहीत आहे की तू खूप छान मुलगी आहेस... तुझ्या मनात कुणाविषयी अढी किंवा राग नाही. पण तरीही...! तुमचं ऑफिसचं काय प्रोजेक्ट आहे राघवने सांगितले मला... ते लवकर पूर्ण कर आणि निघून जा त्याच्या आयुष्यातून... आणि प्लीज तू पण तुझं आयुष्य मनसोक्त जगून घे. एकदाच माणसाचा जन्म मिळतो. तो मनसोक्त जगून घ्यायला हवा. जा कुठेतरी जिथे तुला आनंद मिळेल. तुला ती आम्हाला आवडत होती ती दुर्वा पुन्हा मिळेल तिथे...

दुर्वा :- हो काकू...! मी राघवला माझ्यात आणखी गुंतवणार नाही. निघून जाईल त्याच्या आयुष्यातून..

रा. आई :- सुखी रहा बेटा...! (तिच्या कपाळावरून हात फिरवत डोळ्यात आलेले पाणी पुसत राघवची आई आत निघून गेली.)

इकडे दुर्वा धावतच दवाखान्यातून बाहेर आली आणि एका बेंचवर बसून ढसाढसा रडायला लागली. तोच दिपक काका तिथे आले आणि तिची तंद्री भंगली. तिने काकांना घट्ट मिठी मारून आपल्या आसवांना वाट मोकळी करून दिली. थोडा वेळ गेला तरी दुर्वा अजुनही खूप रडत होती. खूप रडल्याने तिचा चेहरा एकदम लालबंद झाला होता. पण तिच्या चेहर्यावर एक प्रकारचं समाधान होतं. इतकी वर्षे ओढवलेलं हे दुःख मोकळे करायला मिळाले होते तिला...

दिपक काका :- बस्स बेटा...! इतकं किती रडशील..! मी आहे ना... मी समजावतो राघवच्या आईला... ती समजून घेईल तुला...!

दुर्वा :- नाही काका याची गरज नाही. आता मला समजले आहे. मला काय करायचे आहे ते...!

दिपक काका :- म्हणजे काय म्हणायचे आहे तुला...? काहीही असो तू माझ्यासोबत आपल्या घरी येत आहेस...!

दुर्वा :- काका ते माझं घर नाही. मी हे एक प्रोजेक्टचं काम झालं की माझी स्वप्नं पूर्ण करेल. मला कोण विचारणारं नाही की कुणी अडवणारं नाही. तसंही मी अनाथच आहे...

दिपक काका (चढ्या आवाजात) :- कोण बोललं की तू अनाथ आहेस... मी

दुर्वा (त्यांचं बोलणं मध्येच तोडत ) :- थांबा काका... सत्याचा स्वीकार आपण करायलाच हवा..  आणि मी माझा निर्णय घेतला आहे.

आणि काकांच्या पाया पडून ती तिच्या घराच्या दिशेने निघून गेली. दिपक काकांना दुर्वाला भावनिक आधार घेऊन तिला अडवणे सहज शक्य होते पण तिच्यात आधीच्या दुर्वासारखी काहीतरी करून दाखवेन ही झलक दिसत होती म्हणून त्यांनी तिला अडवले नाही..

     क्रमशः

( आता दुर्वा तर निघून गेली. तुम्हाला यावर काय वाटते पटापट कमेंट करून सांगा बरं.... मागच्य वेळी अर्चना मॅमचा अंदाज कसा बरोबर ठरला..!  कमलाकर दुर्वाच्या समोर येऊन उभा राहिला म्हणून... यावेळी बघूया किती जणांना बरोबर अंदाज वर्तवता येईल ते... आणि तुम्हाला वाटत असेल की गोष्ट संपली तर तसं नाहीये.... पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त....पण दुर्वा आणि राघव एक होतील का नाही हे मला पण ठाऊक नाही. ते वेेळ आल्यवर समजेेल )

🎭 Series Post

View all