Login

मेरे लिए तुम काफी हो...(भाग-१)

This story based on the young guy Raghav

       कोकिळेचा सुमधूर  आवाज ऐकून राघव खडबडून जागा होतो. बाहेर सुंदर सूर्याचा उजेड पडलेला असतो. राघव खिडकीचा पडदा उघडून  बघतो तर सगळीकडे रेलचेल सुरू झाली होती. नकळत त्याचे लक्ष घड्याळाकडे जाता त्यात साडे आठ वाजले होते.  आदल्या रात्री उशिरापर्यंत काम करत असताना अलार्म लावायचा विसरला. इतक्यात फोन ची रिंग वाजली.

राघव (फोनवर) :- हा.. कृतार्थ..! बोलना भाई.. कुठे आहेस? आज प्रेझेंटेशन देणार आहेस की नाही??

कृतार्थ (तिकडून) :- नाही रे..! आज समीर सरच देतील मला अर्जंट गावी जायचं आहे. आता निघतोय..

राघव (फोनवर) :- ठीक आहे..! पोचल्यावर फोन कर. मग निवांत बोलू.. Happy Journey..Bye.!

  घाईघाईत बाथरूममध्ये जाऊन स्वतःचे आवरून तो डायनिंग टेबलपाशी येतो आणि बोलतो,
  
   "आई! आज ऑफिसला लवकर जायचे आहे. मला ब्रेकफास्ट करायला जमणार नाही. एक्स्ट्रा एखादी पोळी दे डब्यात....!" 

     हे ऐकून त्याची धाकटी बहीण ख्याती बोलते, " आई दादाला मुळीच खाल्ल्याशिवाय पाठवू नकोस. कालच मी बोलले की मला काॅलेजला जायला उशिर झाला आहे, तर मला किती लेक्चर दिले. मला जास्तच उशिर झाला मग. आज हा पण ऑफिसला उशिराच पोचेल."

        ख्यातीचा कान पकडतच राघव बोलतो, " आमच्या छोट्या राणीसरकार आपण शिकायला जाता काॅलेजला. काही काम नसतं घरात! सारखं आपलं घरात एकट्याने कॅरम खेळत बसून असता. मी काम करतो. शांत बस आणि ग्लासातलं दूध संपव!" 

   दोन्ही भावंडांच्या गप्पा ऐकून त्याचे बाबा गालातल्या गालात हसत असतात. इतक्यात त्याची आई बाहेर येते आणि बोलते, "घे गब्बू तुझा डबा आणि ग्लासात दूध तुझं आहे ते पी.  ख्यातीने तिचे दूध पिले आहे." 
       
      "आई गं, मी लहान आहे का गब्बू बोलायला आणि नको मला दूध प्यायला! डबा दे माझा आणि राणी चल तुला काॅलेजला सोडून मग ऑफिसला जातो. मी आज जरा उशीरा घरी येईन. तू आणि बाबा जेवण्यासाठी माझी वाट बघू नका."
 
       ख्याती एक नजर दुधाचा ग्लास बघते आणि बोलते,"बाबा काल तुम्ही बोलले होते ना मला!  दूध पिण्यासाठी वयाचं बंधन नसतं! मग दादा?"
   
     "राघव!" बाबांच्या आवाजातला रोख जाणून राघव पेल्यातले दूध संपवतो आणि बोलतो,"बाबा तुमच्यामुळे ही जास्त लाडावली आहे आणि तुम्ही पण हिचीच बाजू घेता नेहमी. " आणि तिला घेऊन घराबाहेर पडतो. 
   
     राघवच्या त्याच्या बाईकने तिला काॅलेजला सोडतो आणि ऑफिसला पोचतो. "सर आजच्या मिटींगमध्ये तुम्ही  प्रेझेंटेशन करावे असे बाॅसने सांगितले आहे. सगळी तयारी झाली पण ऐनवेळी एक एमर्जन्सी आल्यामुळे त्यांना ऑफिसला येणं  शक्य नाही...." राघवच्या बाॅसचा PA साहिल राघवला सांगतो.

    "You don't worry about that. मी सांभाळून घेईल. By the way ते क्लाएंट किती वाजता येणार आहेत? " "येतीलच आता तासाभरात!" साहिल बोलतो. "चालेल! तुम्ही जा! बाॅसशी मी फोनवर काॅन्टॅक्ट करेल काही काम असेल तर..!" 
  
     राघव देशमुख ! अठ्ठावीस  वर्षांचा एक देखणा आणि उंचापुरा तरूण! लहानपणापासून अभ्यासात हुशार आणि काहीतरी वेगळे करून दाखवण्याची चिकाटी अंगी असल्याने खूपच कमी वेळात सगळ्या नोकरीत बढती मिळाली आणि सततचा मिश्किल स्वभाव असल्याने त्याचे दुश्मन असे कोणीच नव्हते.  आजच्या मिटींगची परिपूर्ण तयारी करून तो क्लाएंटची वाट बघत होता. इतक्यात शिपायाने येऊन वर्दी दिली की क्लाएंट आलेत तसा तो सरसावून उभा राहिला. मिटींगसाठी पाच जण आले होते आणि प्रत्येकाशी त्याने हस्तांदोलन करताना तो तिचा हात हातात घेतो आणि बोलतो, " हॅलो I am Raghav Deshmukh! Regional head of SS Global Networks!" ती पण त्याचा हात हातात घेऊन बोलते,"I am Durva Joshi. Product Head  in JCLC PVT. LTD." दुर्वा जोशी हे नाव कितीतरी वेळ त्याच्या कानावर पडत होते. 
   लगेच मॅनेजर बोलतात," So, Mr. Raghav Shall we start the meeting? " हे ऐकून राघव भानावर येतो आणि presentation ला सुरूवात करतो. थोड्या थोड्या  वेळाने त्याची नजर कितीतरी वेळ तिच्यावर जात होती. एकदा त्या दोघांची नजरानजर होते आणि तो पाठ वळवून पुन्हा presentation द्यायला सुरूवात करतो...

क्रमशः
   
     
    

🎭 Series Post

View all