मेरे लिए तुम काफी हो...(भाग-१३)

This story based on the young guy who wants to know about the girl who avoid him.

( सर्वप्रथम सगळ्यांना खूप म्हणजे खूपच खूप साॅरी.. आपल्या कथेचा हा भाग मी अतिच उशिरा प्रकाशित करत आहे. पण मला माहित आहे तुम्ही सगळे माझे फ्रेन्ड्स आहात ना...! मला विश्वास आहे की तुम्ही माझ्यावर रूसणार नाहीत. सध्या कोरोनामुळे परिस्थिती खूप बिकट आहे. त्यात मी कसेही लिहीले तर चुकीचे राहील ना.. म्हणून जरा उशिर झाला मला.. पण तुम्ही सगळे काळजी घ्या बरं स्वतःची... घरच्यांची.. आणि आपली गोष्ट पण वाचा.. जमल्यास अभिप्राय द्या. कम्पल्सरी नाही पण छान वाटतं म्हणून बोलले. 
   मागल्या भागात आपण पाहिले की राघव दुर्वाचं सत्य जाणून घेण्यासाठी सुप्रियाच्या घरी जातो. तिच्या घरचे खूप छान आहेत. राघव कितीतरी वेळ शांत बसून होता. त्याच अचानक दिपक काकांची एण्ट्री झाली आणि तुम्ही सगळे शाॅक झालात.. ) आता पुढे..


    "दिपक काका तुम्ही इथे कसे काय??" राघव आश्चर्यचकित होऊन विचारतो. 

  "अरे राघव.. हे माझे लांबचे काका आहेत. चुलत नात्यानेही आणि बाबांचे चांगले मित्र पण आहेत. ते पण जोगळेकर आणि आम्ही पण..." सुहृद बोलला.

  "काका.. तुम्ही जेवण करा म्हणजे आपण थोड्या वेळाने गप्पा मारायला मोकळे.. पुण्याहून दमून आलात ना.." सुप्रिया बोलते. 

   राघव एकीकडे स्वतःच्या संमिश्र भावना मनात दाबून ठेवत स्तब्ध उभा होता.  दिपक काकांना बघून त्याचं डोकं सुन्न झालं. 

सुहृद :- राघव..! चल ओपन गॅलरीत जाऊन बसू या.. काका आणि सुप्रिया येतील थोड्या वेळाने...

  राघव आणि सुहृद गॅलरीतल्या झोक्यावर येऊन बसतात. दोघांमध्ये कोणत्याही प्रकारे संवाद होत नव्हता. थोड्याच वेळात पाठीमागून एक हात त्याच्या डोक्यावर फिरला. दिपक काका मायेने त्याच्या डोक्यावर हात फिरवत होते आणि त्यांच्या डोळ्याच्या कडा नकळत पाणावलेल्या होत्या पण तरीही ते अश्रू रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. राघवलाही राहवलं नाही. त्याने उठून पटकन त्यांना घट्ट मिठी मारली..

दिपक काका :- कसा आहेस राघव बेटा... काय करत आहेस सध्या...

राघव :- मी... जगतोय फक्त एवढंच.. mnc मध्ये regional head आहे तुम्ही कसे आहात..? भाई आत्या बद्दल कळलं मला.. तुम्ही साधा फोन करून सांगितले सुद्धा नाही मला.. मी इतका  परका झालो आहे का तुम्हाला...?

दिपक काका :- बेटा.. मी मनस्थितीत नव्हतो मुळात. गौरव मला एक वर्ष अमेरिकेत घेऊन गेला, पण तिथं वातावरणही झेपलं नाही रे.. म्हणून निघून आलो. मुंबईत कोणीच नाही. म्हणून आता पुण्याला राहतोय... थांब.. एक मिनिट.. तुला संजिवनी बद्दल कसं कळलं...?

राघव :- दुर्वाने सांगितले..

दिपक काका :- काय..? तिने तुला फोन केलेला का तेव्हा..? पण तिने तर तुला कधीच न भेटण्याची शपथ घेतली होती. ती तर शब्दाला पक्की  आहे. 

राघव :- नाही..! फोन नाही केला. आमची कंपनी तिच्या कंपनीसोबत एक प्रोजेक्ट बनवत आहे. आम्ही एकाच टिम मध्ये आहोत. बोलता बोलता तिने सांगितले.

दिपक काका :- म्हणजे..! दुर्वा मुंबईत आहे..? 

राघव :- तुम्ही सगळे असे का विचारत आहात..? तेव्हा सुप्रियाला ठाऊक नव्हते आता तुम्हाला..! देवगडला काय झालं नेमकं हे पण सांगितले नाही तुम्ही मला.. मला तर हाकलून दिले. दुर्वाने लग्न पण केले नाही. मी हात जोडून विचारतोय काय झालं प्लीज सांगा मला..

सुप्रिया :- राघव आवर स्वतःला.. तुला मी सांगणारच होते पण हिंमत नाही झाली. म्हणून फोन करून परस्पर काकांना घेतले मी.. काका तुम्हीच सांगा नेमकं काय झालं ते...

दिपक काका :- अरे राघव.. तू दुर्वाला पहिल्यापासूनच आवडत होतास. जेव्हा रिझल्ट लागल्यावर तू तिला प्रपोज केले तेव्हाच तिने आम्हा दोघांना सांगितले. पण नंतर कळले की दुर्वाचे बाबा म्हणजे आमचे सालेसाहेब गजूराव यांना तुमचं नातं पटलं नाही म्हणून.. नंतर तिला पुण्यात शिफ्ट व्हायला भाग पाडले.. ती पुण्यात जाॅब करत होती. 

राघव :- ते ठाऊक आहे काका मला.. पण नंतर काय झालं ते सांगा मला प्लीज...

दिपक काका चेअर त्याच्याजवळ जाऊन बसले आणि सांगायला सुरूवात केली.

***********************
(भूतकाळात)


माईआत्या (फोनवरून) :- शोभना वहिनी..! कसा वाटला गं राघव. हा गौरवचा लेक त्याच्याहून आगाऊ आहे. त्याच्यातच वेळ निघून जातो. फोन करायला फुरसत मिळत नाही. मला तर बाई तो मुलगा आपल्या परीसाठी योग्य वाटत आहे..

दुर्वाची आई :- नाही वन्स.. आम्ही त्या मुलाला नकार दिला आहे. तो एकदम वाईट वळणाचा आहे. भाऊजींनी तपास करून सांगितले. आम्ही दुर्वाला घेऊन पुण्याला जात आहोत. 

माईआत्या :- अगं पण.. तो चांगला आहे मुलगा.. गोविंद दादाचा गैरसमज झाला असेल. 

दुर्वाची आई :- ते मला बाकी माहीत नाही. तिच्या बाबांना पटले नाही. तिला पण ताकीद दिली आहे. त्या मुलाशी मी तिला देणार नाही. फोन पण काढून घेतला आहे तिचा मी..

माईआत्या :- वहिनी हा खूप टोकाचा निर्णय घेतला आहेस तू.. जरा तिच्या मनाचा विचार कर.. 

दुर्वाची आई :- पोरीची जात आहे. मन बाजूला ठेवून कुळाची अब्रू जपणं तिचं कर्तव्य आहे. एकतर भरपूर गोष्टी मी पोटात ठेवल्या आहेत. तिला समजल्या ना तर ती मी सांगितल्याशिवाय पाणी सुद्धा पिणार नाही..

माईआत्या :- हे बघ वहिनी...

दुर्वाची आई :- चला वन्स.. मी फोन ठेवते आता...

  असेच  दिवस जात होते. आई बाबांच्या सांगण्यावरून ती पुण्याला शिफ्ट झाली. तिच्या गोड आणि हळव्या स्वभावाने तिने तिच्या किंचित शिष्ट अशा वहिनीचे मन जिंकले होते. एरवी कुणाला एक कप चहा न देणारी तिची वहिनी स्वतःहून दुर्वाच्या आवडीचे जेवण करायची. जाॅबवरून येताना तिच्यासाठी स्कार्फ, जुन्या गाण्यांची कॅसेट असे काही घेऊन यायची.. दुसरीकडे मात्र तिचे आई वडील आणि काका तिच्यासाठी वरसंशोधन करत होते.. दुर्वाचे गाव कोकण असल्याने तिथलाच मुलगा ते तिच्यासाठी शोधत होते. तोपर्यंत दुर्वाच्या आईने तिला तिचा फोन परत केला होता.... पण राघवशी न बोलण्याच्या अटीवरून.. ती वरचेवर सुप्रियाशी तेवढी बोलत होती. 
   

     एक दिवस सगळे दिवाणखान्यात बसून गप्पा मारत होते.

गोविंद काका :- दुर्वा तुझ्यासाठी एक स्थळ आलं आहे.. कमलाकर मोने नाव आहे मुलाचं मुलगा बी. एस्स्ई. अॅग्री आहे. स्वतःची शेती वाडी आणि खूप जमीन जुमला आहे. खूप हुशार आहे बरं.. पण मुलगा खुद्द खोडद्याचा आहे. गावातच राहणारा.. लग्न झाल्यावर तुला गावीच रहावं लागेल.


दुर्वाची वहिनी :- काका आपली दुर्वा इंजिनियर आहे. हुशार आहे नाही म्हटले तरी तिचा आजचा पाच आकडी पगार उद्या सहा आकडी पण होऊ शकतो. अशात तुम्ही तिला  गावी पाठवता. बघत आहात तर पुण्यातलाच मुलगा बघा ना तिच्यासाठी...

दुर्वाची आई :- सुनबाई.. घरातल्या मोठ्या माणसांमध्ये बोलणं  शोभून दिसत नाही..

दुर्वा :- आई! वहिनी बरोबर बोलत आहे. मी गावी नाही राहू शकत. सध्या तरी मला जाॅब करू द्या. मला लग्नाची घाई नाहीये. मला सध्या कामात खूप वाव आहे.

दुर्वाचे बाबा :- बस्स झालं.. तुझं ऐकून आम्ही आधीच आमची इज्जत घालवली. आता आणखी नाही. तुला जर आमच्याशी नातं ठेवायचं असेल तर आम्ही सांगू त्याच मुलाशी लग्न करावं लागेल.

दुर्वा :- पण बाबा...

दुर्वाचे बाबा :- बस्स्स.. आता पुढे बोलणं नको. आपण दोघांची कुंडली मॅच केली आहे. मुलगा दादाने बघितला आहे. बघण्याचा कार्यक्रम आपण आपल्या घरी करूया, देवगडच्या..! पुढल्या आठवड्यात दिवाळीसाठी आपण जाणारच आहोत तेव्हा..! सगळी तयारी करा..

आणि तिचे बाबा निघून गेले. तिचा मोठा भाऊ सुजल फक्त बघ्याची भुमिका बजावत होता. तिची वहिनी सोडून सध्या तरी तिचं कोणीच ऐकून घेणारं नव्हतं..

असेच काही दिवस झाले. अखेर तो दिवस आलाच..! डोळ्यात पाणी साठवून जड अंतःकरणाने दुर्वा देवगडला जायला निघाली..

क्रमश:
~ऋचा निलिमा

🎭 Series Post

View all