Login

मेरे लिए तुम काफी हो...(भाग-१२)

This story based on the young guy who wants to know about the girl who avoid him..

  ( काय मग सगळे जण काळजी घेताय ना...? विनाकारण घराबाहेर पडू नका बरं..? आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली गोष्ट वाचताय ना...? मागच्या भागात आपण पाहिले की राघव दुर्वाचं त्याच्यापासून दूर जाण्याचं सत्य जाणून घेण्यासाठी सुप्रियाला त्याची शपथ देतो. आता तुम्हाला वाटत असेल की राघव इतका हुशार मुलगा.. त्याला कोणीही मुलगी मिळू शकते, पण प्यार भी तो कोई चीज होती है बाॅस.. चला तर मग सगळे तयार ना सुप्रियाकडे गेल्यावर राघवला काय कळते ते...) आता पुढे....


    ऑफिसमधून राघव ठरल्याप्रमाणे घरी न जाता सुप्रियाच्या घरी जायला निघतो. वाटेत सुप्रियाच्या बाळासाठी खेळणी आणि घरच्यांना खाऊ म्हणून काजू कतली विकत घेतो. काही वेळातच राघव एका टोलेजंग इमारतीत प्रवेश करतो. मोबाईल मधून  पत्ता चेक करून तो तिच्या घरासमोर आला आणि सुप्रियाच्या घराचा दरवाजा ठोठावला. तोच तिच्या सासूबाईंनी दरवाजा उघडला.

राघव :- नमस्कार..! मी राघव.. ते सुप्रिया दातार साॅरी सुप्रिया जोगळेकर मित्र..ते..

सु. सासूबाई :- अरे.. तुच का तो राघव ये आत ये.. आणि सुप्रियाचं लग्न झाले मान्य आहे पण ती दातारच आहे. तिला मी सांगितले की तुला जर आवडेल तरच आडनाव बदल.. ये आत ये... 
  

  सुप्रियाची सासू  एकदम आधुनिक विचारांची होती. कोणे एके काळी सिनिअर काॅलेजच्या प्राध्यापिका असतील म्हणून असेल कदाचित..घरात आल्यावर त्यांनी राघवा सोफ्यावर बसायला सांगितले. त्याच्या शेजारी एक छोटंसं बाळ त्याच्या टेडीने राघवला मारू लागले...

सु. सासूबाई :- हृदू बेटा.. अंकलला असं त्रास द्यायचा नाही. साॅरी म्हणून दाखव अंकलला...

ते बाळ राघवकडे बघून आपले दोन्ही कान धरते. न राहवून राघवने बाळाला स्वतःच्या कवेत घेऊन त्याचा पापा घेतला..

राघव :- पिल्लू.. तुला माहिती आहे का..? मी तुझा राघव मामा आहे. तुझी आई आणि मी शोबत अभ्याश कलायचो... तू पण खुप खुप अभ्याश कर हो.. हे बघ मी तुझ्याशाठी काय आणले आहे... ही बघ डाॅल.. हिने पण पिंक ड्रेस घातला आणि आमच्या पिलू ने पण.. 

  राघव कितीतरी वेळ बाळासोबत खेळत होता आणि बाळ त्याचा खेळ बघून टाळ्या वाजवत होती. सुप्रिया कदाचित आपल्याला सांगणार नाही असे त्याला वाटत होते. खूप वेळ झाला असे बघून तो घरी जाण्याचा विचार करतो. हातातला मिठाईचा बॉक्स त्याने आधीच सुप्रियाच्या सासूबाईंना दिला होता. त्यांनीही मस्तपैकी काॅफी आणि शिरा त्याला खायला म्हणून दिले.

राघव :- आई मी निघतो. तुम्ही सुप्रियाला माझा निरोप द्या. 

सु. सासूबाई :- अरे बाळा.. मागल्या वेळी आलेला तेव्हा पण तू जेवला नाहीस.. आता तरी जेऊन जा... सुप्रियाला विचारून सगळं काही बनवलं आहे मी तुझ्यासाठी.. ते दोघे आत्ता येतील..! 

राघव पुढे काही बोलणार इतक्यात सुप्रिया आणि तिचा नवरा सुहृद दोघेही येतात. 

सुहृद :- अरे.. सालेसाहेब..! कसे आहात..? आज अचानक कुठून रस्ता चुकलात... भाचीच्या बारश्याला पण आला नव्हतास. आता आलाच आहेस तर जेवण करूनच जा.. कोणतीही सबब चालणार नाही.

राघव :- नाही.. म्हणजे खूप उशीर झाला आहे. नंतर कधीतरी येईल.. 

सु. सासूबाई :- अरे आत्ताशी सात पण वाजले नाहीत. थांब ना...! आणि सुप्रियाशी महत्वाच्या विषयावर डिस्कस करण्यासाठी आला आहेस ना तू..! 

सुप्रिया :- अरे राघव.. मी कधीकधी सुहृदला मदत म्हणून जात असते ऑफिसला. आज नेमकं महत्वाचं काम होतं म्हणून नाही तर मी घरीच असती. 

राघव :- अगं थांबायला हरकत नाही पण (आणि मनगटावरील घड्याळाकडे पाहत) जाऊ देत..

सुहृद :- राघव थांब ना रे.. हवं तर आजची रात्र इथेच थांब. आपण जेवण करू. नंतर सुपी आणि तू निवांत बसून गप्पा मारायला मोकळे..! आणि ती बघ तुझी भाची पण तुला थांब बोलतेय.. 

राघव खाली बघतो तर सुप्रियाची मुलगी त्याची पॅण्ट ओढत होती आणि त्याला दोन्ही हात उंचावून घे म्म्हणून खुणावत होती. क्षणाचाही विलंब न करता राघव तिला कडेवर घेऊन तिच्याशी खेळू लागतो. सुहृद आणि त्याची आई किचन मध्ये जातात. सुप्रिया बेडरूममध्ये जाताना राघव तिला अडवतो.

राघव :- सुप्रिया..! माझ्या मनात खूप धमकी भरत आहे. एकतर मी चुकीच्या वेळी आलो तुझ्या घरी. ओघात आलो पण जातो असे वाटतेय. युझ्या घरचे चांगले आहेत पण नकोच.. त्यांना काय वाटेल..?

सुप्रिया :- राघव.. खरं जाणून घेण्याची वेळ आली आहे आता.. तू काळजी करू नकोस. माझ्या सासूबाई ओपन माईंन्डेड आहेत त्यांना काही वाटत नाही. राहीली गोष्ट सुहृदची तर त्याला सगळं ठाऊक आहे. म्हणून तू चिंता करू नकोस.. 

राघव :- थॅन्क यू सो मच सुपी.. बाय द वे आपण बोलायचं कधी..? 

सुप्रिया :- जेवण झाल्यावर..? नाहीतर आई रागवतील.. सध्या त्यांना घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या हातचं जेवण बनवून खाऊ घालायला आवडते. 

  इतके बोलून सुप्रिया बेडरूममध्ये निघून जाते. नंतर सुप्रिया आणि तिच्या सासूबाई स्वयंपाक घरात कामासाठी निघून जातात. इकडे राघव सुहृद आणि छोट्या बाळासोबत खेळत असतो. 

सुहृद :- सहसा ही माझे बाबा गावी गेल्यावर इतकी खूश नसते पण तुला बघून तिला मनापासून आनंद झाला आहे. असाच येत रहा. आम्हाला छान वाटते.

राघव :- खरं सांगू सुहृद लहानपणच छान असतं. कोणाचं दडपण नाही. कसली चिंता नाही. कोणत्या गोष्टीबद्दल अनभिज्ञ असलो तरी त्याचं दुःख नाही... खरंच छान वाटतं.. ते जाऊदेत.. बाळाचं नाव हृदू कशावरून ठेवलं तुम्ही? युनिक वाटतं...

सुहृद :- अरे नाही.. तिचं नाव हृदया आहे. सुप्रिया आणि सुहृद या दोन्ही नावांचं combination..! सुप्रियाला सुहाना नाव आवडले होते आणि मला हृदया.. चिठ्ठी टाकून नाव निवडले. नंतर घरातल्या सगळ्यांनी हृदू केले..

राघव :- छानच केले.. हृदू .. छानच आहे नाव..!

सुहृद (राघवच्या खांद्यावर हात ठेवत) :- काळजी नको करूस. सगळं ठीक होईल. सुपीने सगळं काही सांगितले आहे मला..!

राघव :- तुला जर ठाऊक आहे तर प्लीज सांग ना मला..

सुहृद :- राघव प्रत्येक गोष्ट कळण्यासाठी एक ठराविक वेळ असते, तशी ती नेमकी गोष्ट काय आहे हे कळण्यासाठी ठराविक व्यक्ती असते. 

राघव :- म्हणजे काय म्हणायचे आहे सुहृद तुला..?

सुहृद :- काही नाही..! तू हृदूला माझ्याकडे दे आणि हात पाय धुवून ये.. मग जेवायला बसू या..

सुहृद आणि राघव डायनिंग टेबलावर येतात तेव्हा पूर्ण टेबलावर खाण्याचे जिन्नस ठेवलेले होते. पालक पनीर,  कुलचा पराठा, कश्मिरी पुलाव, दही रायता आणि गोडासाठी म्हणून गुलाब जामून केले होते.  त्याचा खमंग वास सुटला होता. 

सुहृद :- ये राघव.. बस जेवायला.. 

राघव :- हृदू कुठे आहे..? तिला जेवायचं नाहीये.

सुहृद :- अरे थोड्या वेळापूर्वी आपण दोघांनी नाही का तिला चारलं..? आता तिला झोपवून आलो आहे मी..! 

राघव :- भारी आहे ना..! तिला आईपेक्षा बाबा जास्त आवडतो. माझी बहीण पण अशीच आहे.. सारखी बाबा बाबा करत असते.

सु. सासूबाई :- बघ.. इतका वेळ गप्पा मारत बसले पण विचारायचं राहून गेलं. आईला फोन करून सांगितले का तू इथेच थांबतोय ते.. आणि तू ख्यातीला घेऊन आला असता ना.. सुप्रिया त्या दिवशी मार्केट हून आली तेव्हा तिच्याबद्दल भरभरून बोलत होती.. किती गोड आहे ती..  एकदम शांत..

राघव :- शांत..? तुम्ही तिला एक दिवस सांभाळून दाखवा.. एक हजार रूपये रोख बक्षिस मिळवा.. नुसती अल्लड आणि खोडकर आहे अजुनही.. आणि आईला आत्ताच फोन केला मी..

  चौघेही जेवायला बसले. जेवता जेवता हसत खेळत संवाद सुरू होता.

सुहृद :- राघव तुला पुलाव कसा वाटला..? म्हणजे चव कशी आहे..? 

राघव :- खूप छान.. In fact मी कमी भात खाणारा 
असुनही मला आज पुलावच खात आहे... तू बनवला का..?

सुहृद :- नाही रे.. डबा बर ठेवला होता ना तांदळाचा.. तो तुझ्या बहिणीला काढून दिला..

या बोलण्यावर सगळे जोरजोरात हसायला लागले..

सु. सासूबाई :- जरा हळू हसा रे.. माझी पिल्लू उठले नाहीतर... 

  जेवण झाल्यावर सगळे सोफ्यावर येऊन बसले. राघवच्या मनाची घालमेल त्याच्या डोळ्यात दिसत होती.. ती सुप्रिया आणि सुहृदच्या नजरेतून सुटली नाही. सुहृदने आश्वासकपणे डोळे मिटून राघवला सावरले. घड्याळात साडे आठ वाजले होते. राघव कितीतरी वेळ शांत बसून होता.  सुप्रियाच्या  सासूबाई बाळाला सांभाळायला म्हणून खोलीत होत्या. सुप्रिया किचनमध्ये सगळे आवरून बसली होती. इतका वेळ शांत बसलेला राघव  सुप्रियाला काही विचारणार इतक्यात दारावरची बेल वाजली. सुप्रियाच्या  सासूबाई जातीने आल्या आणि दार उघडले आणि बाहेरील व्यक्तीला आत घेतले...
  
   ती व्यक्ती आत आली आणि राघवने त्यांना बघितले तसे तो खाडकन सोफ्यावरून उठला आणि त्याच्या तोंडून आपसुकच शब्द निघाले  ,"दिपक काका? तुम्ही इथे..?"

क्रमश :

🎭 Series Post

View all