Mar 02, 2024
कथामालिका

मेरे लिए तुम काफी हो...(भाग-११)

Read Later
मेरे लिए तुम काफी हो...(भाग-११)

(काय मग  दोस्तहो... कसे आहात?? कोरोना वाढतोय.. आपली आणि घरच्यांची नीट काळजी घ्या बरं...  आता बघा तुम्ही बोलता म्हणून आपल्या गोष्टीचा  पुढला भाग मी किती लवकर प्रकाशित केला, आता तुम्ही पण एक काम करा. गोष्ट वाचली की निदान कमेंट तरी करा.. या वेड्या जीवाला कसं हायसं वाटतं...
 मागच्या भागात आपण पाहिले होते की राघवच्या आई वडिलांना राघवची दुर्वाशी सलगी त्यांना पसंत नव्हती. पण तरीही तो गोष्टीचं मुळ शोधण्यासाठी अथक प्रयत्न करत असतो. त्यात अनायासे त्याला त्याची काॅलेजची मैत्रीण सुप्रिया भेटते. तिच्याकडून काही जाणून घेण्यासाठी राघव प्रयत्न करत होता. आता पुढे....)

 

 

#घरी आल्यावर 


ख्याती :- दादा तुझ्या त्या मैत्रीणीने माझ्या ड्रेसची पिशवी उचलून नेली. आणि ही बघ साडी आहे तिची यात. ही घे पिशवी आणि आत्ताच्या आत्ता जाऊन माझा ड्रेस घेऊन ये. 


राघव :- ख्याती..! सुप्रिया काही पळून नाही चालली. तुझी पिशवी जशीच्या तशी तुला देईल. एकदा ओरडली म्हणून काय झालं?


इतक्यात त्याच्या फोनची रिंग वाजली. बघतो तोच सुप्रिया फोन आलेला आता.


राघव :- हे बघ. तिचाच फोन आहे वाटतं. Truecaller वर नाव येतंय.


ख्याती :- तू बोल फोनवर. मी चालली माझ्या खोलीत.


तिकडून :- Hello..! May I speak to Mr. Raghav Deshmukh..! I am Supriya...


राघव :- अगं सुप्रिया मीच आहे राघव. अगं चुकून आपल्या बॅग्स बदलल्या आहेत.


सुप्रिया :-  हो ना अरे. एकतर ती माझ्या मावस सासूबाईंसाठी घेतलेली साडी आहे. उद्या भेटशील का? प्लीज...! सासूबाईंना गावी जायचे आहे लग्नात. त्यापेक्षा एक काम कर ना. माझ्या घरी ये ना. डिनरलाच ये. मागच्या वेळी आला होतास तेव्हा न जेवताच गेलास. तेव्हा सासूबाई किती नाराज झाल्या. 


राघव :- हो येईल. पण माझी एक अट आहे. 


सुप्रिया :- कसली अट? 


राघव :-  तू देवगडला असताना काय झाले ते इत्यंभूत मला सांगशील. तरच मी तुझ्या घरी येईन.


सुप्रिया :- पण राघव...! 


राघव :- सुपी तुला माझी शपथ....! खरं काय झाले ते सविस्तर सांग मला. 


सुप्रिया :- ओके..! आता तू शपथ घेतलीच आहेस तर मला दुसरा पर्यायच नाही.  उद्या  सायंकाळी खूप वेळ काढून ये. चल बाय...!


राघव :- ओके बाय...


इतक्यात राघवला आईचा आवाज येतो. "गब्बू, राणी दोघेही खाली या पटकन जेवायला." आईचा आवाज ऐकून दोघेही जेवायला डायनिंग टेबलवर येतात. 


ख्याती :- दादा..! माझा ड्रेस..!

राघव :- हो. उद्या जाणार आहे मी. घेऊन येतो. 


रा. आई :- काय रे..! ड्रेस अल्टरला कुठे दिलास? दुकानातच की बाहेरच्या टेलरकडे?


राघव :- नाही गं आई..! माझी एक मैत्रीण आहे बघ ती सुप्रिया.  ती भेटली होती आज. तिची आणि आमच्या बॅगची अदलाबदल झाली चुकून. उद्या जाईल तिच्या घरी. सायंकाळी जेवण करूनच येईल तिथून..


रा. आई :- ठिक आहे..! जा. तिला बाळ आहे तिच ना? खूप गोड आहे ती.... बाळासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन जा. रिकाम्या हाताने गेलेलं चांगलं नाही वाटणार. 


राघव :- हो आई...! 


  जेवण झाल्यावर राघव आणि ख्याती  डायनिंग टेबल साफ करून आपापल्या खोलीत निघून गेले. थोड्या वेळाने ख्याती राघवच्या खोलीत आली.


ख्याती :- दादा..! माझ्या खोलीत नेटवर्क प्राॅब्लेम आहे. तुझ्या खोलीत बसू थोडा वेळ प्लीज..


राघव :- हो बस..! पण तुझा पसारा नको मला. आधीच सांगून ठेवतोय.


ख्याती :- नाही करणार. लॅपटॉप दे फक्त एक पीपीटी बनवायची आहे. 


राघव :- हे घे.. आणि तुझा चिवचिवाट बंद कर. मी गॅलरीत बसलोय. मला त्रास देऊ नकोस.


ख्याती :- ओके...!


   राघव त्याच्या खोलीलगतच्या गॅलरीत बसून फोनवर काहीतरी करत असतो. स्वतःचं काम झाल्यावर  जवळपास अर्धा तास घुटमळत असलेली ख्याती राघवजवळ येते.


राघव :- बोला राणू काय बोलायचं आहे ? अर्धा तास टाईमपास करतेय. बोल..!


ख्याती :- ऐक ना...! अनायासे तू उद्या सुप्रिया ताईकडे जात आहेस. दुरूबद्दल विचार एकदाच...! जेव्हा तू देवगडहून परत आलास तेव्हाच आईने मला तिच्याबद्दल काही न बोलण्याची ताकीद दिली आहे. म्हणून जेवताना मी काहीच बोलले नाही. 


राघव (तिचा गाल ओढत):- आमचं कोकरू इतकं शहाणं कधी झालं? 


ख्याती :- I am born intelligent. हलं तर बाबांना विचार. पण मी जे सांगितले ते लक्षात ठेव. रिलेशनशीप destroy झाली पण तिचं खरं कारण जाणून घे. नाहीतर इथे तू दुःखी तिकडे ती..! आणि तू प्रयत्न केला नाही ही तुझ्या मनातली सल तरी दूर होईल...!


राघव :- जो हुकूम....! जा आता जाऊन झोप. नाहीतर बाबा ओरडतील. 


@ दुसऱ्या दिवशी ऑफिसला


  राघव आज नव्या उमेदीने ऑफिसला जायला निघाला. आज त्याने त्याचा आवडता नेव्ही ब्ल्यू रंगाचा शर्ट आणि त्यावर ऑफ व्हाईट कलरची ट्राऊझर घातली. आणि स्वतःचे रेशमी आणि काळेभोर केस जेलने सेट केले होते. ऑफिसात जातो तोच त्याला एका डेस्कजवळ खूप जणांचा गराडा घातलेला दिसला.... "आले महाराज सुट्टी संपवून वाटत" हलकेच पुटपुटला. राघव त्या व्यक्तीच्या पाठीवर हात ठेवतो तोच ती व्यक्ती त्याच्याकडे वळून बघते. तपकिरी डोळे, साडेपाच फुट उंची, निमगोरा वर्ण आणि हनुवटीवर छोटीशी खळी सौंदर्यासाठी पुरेसे होते.

 

राघव :- काय मग...! कशी होती सुट्टी?  श्री. कृतार्थ मोहिते पाटील....! आणि आईने माझ्यासाठी काय दिले ते दे पटकन...! मला काम आहे आणि आज जरा लवकर निघायचे आहे. 


कृतार्थ :- आल्या आल्या खादडायला पाहिजे. आल्यावर जरा मित्राची विचारपूस करायची सोडून खायला मागतोय. हावरट...!


   कृतार्थ हा राघवच्याच वयाचाच होता. राघव त्याचा बाॅस असुनही दोघांची घट्ट मैत्री होती. दोघांची चर्चा सुरू असताना कृतार्थची नजर दूरून येणाऱ्या दुर्वावर जाते. पर्पल कलरचा फाॅर्मल शर्ट आणि ब्लॅक जिन्स घालून आली होती. चेहर्‍यावर मेकअपचा लवलेश नव्हता तरीही ती एका परीसारखी सुंदर दिसत होती. सगळ्यांना असथ एकत्र बघून दुर्वा जराशी बावचळली पण हलकेच हसून सगळ्यांना गुड मॉर्निंग विश करून ती आपल्या केबिनमध्ये निघून गेली. सगळे जण आपापल्या कामाला लागले तोच कृतार्थ राघवला अडवतो. 


कृतार्थ :- राघवा...! ही हुर कोण आहे..? न्यु जाॅईन झाली का ऑफिसला...?


राघव :- नाही..!  She is Miss. Durva Joshi...! She is project head of JCLC...! एका प्रोजेक्टपुरतं आपल्या ऑफिसमध्ये आली आहे. काम होईपर्यंत ती इथेच काम करणार आहे.


कृतार्थ :- तुला बरी तिच्याबद्दल इतकी माहिती आहे? 


राघव :- ती माझ्या टिममध्ये काम करत आहे. म्हणून ठाऊक आहे मला. तू काम कर तुझं..! 


कृतार्थ :- ओके..! ऐक ना सायंकाळी मस्त बाहेर डिनरला जाऊया...! 


राघव :- आज नाही जमणार रे..! मला अर्जंट बाहेर जायचे आहे. घोडबंदरला...! पाचलाच निघणार आहे मी...! नंतर कधीतरी..! 


कृतार्थ :- ओके मॅन! आजची पार्टी उधार मग...!


राघव :- चल बाय...! कंटिन्यू कर. माझा डबा दे. 


  आणि राघव केबिनमध्ये निघून जातो. सायंकाळी लवकर जायचे म्हणून लंच स्किप करून तो कामच करत होता. साडेचारच्या सुमारास तो ऑफिसातून बाहेर पडतो. आज सुप्रियाकडे जाण्यासाठी तो खास कार घेऊन आला होता. 


राघव :- हॅलो सुपी...! आहेस ना घरी ? मी येतोय...! 


सुप्रिया :- हो ये बाबा...! सावकाश ये पण... गाडी हळूच चालव...! पिल्लू तिच्या राघव अंकलची वाट बघत आहे. आणि आई पण तुझ्यासाठी खास जेवणाचा बेत करत आहेत.


राघव :- अगं जेवणाची काय गरज होती....? मी पार्सल आणले असते ना मस्त....


सुप्रिया  :- नाही..! तू जेवायला येणार म्हणून आम्ही इतकं जिन्नस बनवतोय आणि तू असा...!


राघव :- हो येतो... बाय...! 


फोन ठेवून राघव त्याच्या मोबाईल बॅगेत ठेवतो. दिर्घ श्वास  घेऊन तो कार स्टार्ट करतो आणि घोडबंदरला जायला निघतो... त्याचे प्रेम का त्याच्यापासून का दूर गेले हे जाणून घेण्यासाठी...... कदाचित कारण कळले तर त्याला त्याचे प्रेम पुन्हा मिळेल या आशेने....


क्रमश:

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//