मेरे लिए तुम काफी हो...(भाग-१०)

This story based on the young guy who wants to know about the girl who avoid him..

( नमस्कार मंडळी.. कसे आहात सगळे.! स्वतःची काळजी घ्या. खूप वाचा, खूप लिहा आणि सगळ्यात महत्त्वाचं ईरा वरच्या कथा वाटतात ना?? वाचायालाच पाहिजेत.. मागल्या भ ा गात पाहिले की दूर्वा राघवशी भेट   तिच्या आई वडिलांशी करून देते. ) आता पुढे....

 

  राघवचा निरोप घेऊन दुर्वा घरी येताना वर बघते तोच तिचे काका तिला बघत असतात. ती हलकेच हसून घरात येते. असेच काही दिवस जातात. आई बाबांसमवेत काकांनीही मुंबईतला मुक्काम वाढवला होता. काकांचे काम झाल्यावर तिघेही पुण्याला रवाना होणार होते. असेच एके दिवशी सायंकाळी दुर्वा कामावरून आली तोच बाबा बोलले.

बाबा :- दुर्वा जरा बोलायचे आहे तुझ्याशी.

दुर्वा :- बाबा..! I am so tired. नंतर बोलू ना.

बाबा :- दुर्वा...! मला महत्वाचे बोलायचे आहे.

दुर्वा :- ठिक आहे. बोला.

बाबा :- दुर्वा. तू राघवला विसर. तो काही चांगला मुलगा नाहीये. त्याच्यापेक्षा चांगल्या मुलाशी तुझं लग्न लावून देऊ आम्ही.

दुर्वा ( डोळ्यातील आसवे रोखत) :- बाबा. काहीतरी गैरसमज झाला असावा तुमचा!  तो खूप चांगला मुलगा आहे.

गोविंदकाका :- काही चांगला मुलगा नाही तो. मी मुद्दाम मुंबईत थांबलो होतो त्या मुलाविषयी माहिती काढायला...! कोण तो विकास समुद्रेचा माझा चांगला मित्र आहे. त्याच्याच घरी गेलो होतो काल मी.. तेव्हा त्याचा मुलगा  कौस्तुभ भेटला मला. तो बोलला मला  त्याच्यासोबत टपोरेगिरी करायचा...

दुर्वा :- काका असं काही नाही. तो कौस्तुभ तर स्वतः वाईट प्रवृत्तीचा आहे.. खोटं वाटत असेल तर माई आत्या किंवा दिपक काकांना विचारा. त्याने माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.

गोविंदकाका :- बघा.. बघा.. किती चुरूचुरू बोलतेय ही पोरगी.. मी हिच्यासाठी इतके दिवस काम सोडून थांबलो आणि ही मलाच बोलत आहे..! शोभना हेच संस्कार दिलेस का पोरीला. हिच्यापेक्षा माझी चैताली खूप चांगली..

दूर्वा :- हे बघा काका...

आई :- दुर्वा! काका तुझ्या चांगल्यासाठी सांगत आहेत. त्यांनी तुझ्यासाठी आजवर खूप काही केले आहे.  त्यांना उत्तर दिले तर याद राख.

बाबा :- तुला जर राघव हवा असेल तर मी मेलोच समज.

दुर्वा (रडतच):- बाबा...

बाबा :- वचन दे मला तू त्या राघवला आयुष्यातून टाकशील.

नाईलाजाने दुर्वाला तिच्या बाबांना वचन द्यावे लागले.

@ दुसर्‍या दिवशी (फोनवर)

दुर्वा :- राघव जरा महत्त्वाचे बोलायचे आहे. सायंकाळी भेटशील पाच वाजता? 

राघव  :- काही टेन्शन आहे का?

दुर्वा :- नाही. फक्त तू ये.

राघव :- ओके बाय लव्ह

दुर्वा :- बाय.

ठरल्याप्रमाणे  सायंकाळी पाच वाजता राघव गणपतीच्या देवळाबाहेर दुर्वाची वाट बघत असतो.

राघव :- डार्लिंग. चेहरा का उतरला आहे तुझा? काय झालं?

दुर्वा :- राघव! विसर मला.

राघव :- काय बडबडत आहेस तू? डोकं ठिकाणावर आहे का तुझं?

दुर्वा :- राघव मी आता तुझी नाही होऊ शकत. बाकी मी काही सांगू शकत नाही तुला.

  आणि त्याच्या हातात गणपती बाप्पाची छोटीशी मुर्ती देऊन तिथून जायला निघते. इतक्यात तिथे जोरदार पावसाला सुरूवात होते आणि राघवची आकृती पुसटशी होत होती.

***************

दुर्वा पाच वर्षांआधीचा तो दिवस आठवत असते. आणि राघवने तिला वाढदिवसाला गिफ्ट म्हणून दिलेली गुलाबी डायरी छातीशी कवटाळून रडत असते. आणि तिच्या कानावर एकच वाक्य पडत असते,"दुरु मला सोडून का निघून गेलीस?" आणि राघवचा केविलवाणा चेहरा...!

********************************************

 

  

   

   आईच्या बोलण्याने राघव चिडून त्याच्या खोलीत जातो. खोलीलगतच्या ओपन टेरेसमध्ये जाऊन तो एकटाच बसला होता. दुर्वाची आठवण त्याला वेळोवेळी असह्य करत होती. इतक्यात त्याला खोलीत कुणीतरी आल्याचा आवाज येतो.

ख्याती :- दादा...! चल खाली जेवायला. आई बाबा बोलावत आहेत.

राघव :- ख्याती मला भूक नाही. तुम्ही जेवण करा. मला आराम करू दे.

ख्याती :- ओके. बाय. (असे म्हणत ती खोलीबाहेर जाते.)

  पुन्हा पाच मिनिटांनी ख्याती राघवच्या खोलीत येते.

ख्याती :- दादा चल जेवायला. बाबांनी बोलावले आहे.

राघव :- बाळ मी बाहेर खाल्ले होते. भूक नाही मला. जा तू जेवून घे.

ख्याती :- आई बोलली की तुझ्या भावाला घेऊन ये त्याशिवाय खाली येऊ नकोस. (आणि त्याचा हात ओढू लागते. )

राघव :- ख्याती.. Grow up...! काय वेडापणा चालू आहे. एकदा सांगितले तर कळत नाही का? जा जाऊन जेव गुपचूप.

   ख्याती रडतच खाली निघून जाते. राघव जरा जास्तच रागात होता. त्याने तिला अडवले नाही. खाली डायनिंग टेबलशर काय चर्चा झाली याची त्याला काडीमात्र कल्पना नव्हती. जवळपास दोन-अडीच तासांनी राघवचे बाबा खोलीबाहेर येतात. राघव आपला लॅपटॉप घेऊन ऑफिसचे काम करत असतो आणि दुसरीकडे Saregama Carva किशोर कुमार यांची वर जुनी गाणी लावलेली होती.

बाबा :- राघव आत येऊ का रे? कामात नसशील तर.....

राघव :- या ना बाबा..! तुम्हाला कधीपासून माझ्या खोलीत येण्यासाठी परवानगी घ्यावी लागते.

बाबा :- तसं नाही. ख्याती आली होती तुला जेवायला बोलवण्यासाठी. तू खूप जोरात ओरडलास तिच्यावर. आवाज खालपर्यंत आला. घाबरली ती खूप आणि रडतही होती.

राघव :- साॅरी बाबा ते मी जरा टेन्शनमध्ये होतो आणि ती ऐकतच नव्हती. थांबा मी तिच्याशी बोलून येतो.

( आणि लॅपटॉप ठेवून तो बेडवरून उतरू लागला.)

बाबा :- अरे आत्ता नको जाऊस. कसंतरी जेवून झोपवलं तिला मी. उद्या सकाळी बोल. तिचा राग लगेच शांत होतो.

राघव :- ओके...! साॅरी बाबा.

बाबा :- बरं अचानक काय झालं तिच्यावर ओरडायला.....?

आई :- आईचा राग बहिणीवर काढलाय. अजून काय.. ! मी आई आहे तुझी. तुझ्या चांगल्यासाठी बोलतेय. त्या दुर्वाशी संबंध नको ठेवू. चांगली मुलगी नाही ती. आधी तुला  सोडून गेली आणि नंतर बोलावले काय..? नंतर पुन्हा एकदा तुझ्याशी नातं तोडलं.

राघव :- आई प्लीज...! ती फक्त काही महिने आमच्या कंपनीत येतेय. Contract आहे आमचं. ते झालं की मग नाही भेटणार मला ती. 

बाबा :- तुझं अजूनही प्रेम आहे तिच्यावर राघव...! तुझ्या डोळ्यात दिसतं. पण तिचं नाही ना काही कळत. आणि पुन्हा  तू तिच्या घरी गेला होतास देवगडला. तेव्हा  तिचं लग्न होतंय हे कळलं. नंतर तू सांगितले की तिने लग्न केले नाही.  नेमकी काय भानगड आहे?  आम्हाला काही समजायला मार्ग नाही.

राघव :- ते तर मलापण कळत नाहीये. मी सगळं प्रकरण काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. दुर्वापण पहिल्यासारखी नाही राहिली.

खूपच introvert झाली आहे. तिच्या संगीत विषारदेची परीक्षा पण देत नाहीये.... शेवटच्या टप्प्यात आहे तरीही...

नाही बघवत मला तिची अशी अवस्था. नुसतं कामात जुंपली आहे ती.

(दुर्वाबद्दल बोलताना राघवच्या डोळ्यात अचानक पाणी तरळले.)

बाबा :- जाऊदे राघव...! काही गोष्टी स्पष्ट होत नसतील तर त्यांच्या मागे लागू नकोस. टेबलावर दुध ठेवलं आहे ते घे आणि उद्या ख्यातीशी बोल.

राघव :- हो बाबा... Good Night बाबा! Good night आई...!

आई :- Good night बाळा...

@ दुसर्‍या दिवशी सकाळी

  राघव :- चिऊताई. चिऊताई. लवकर उठा. उशीर होण्याआधी काॅलेजला पळा.

ख्याती मात्र रागातच असते.

राघव :- अरे बापरे...! इतक्या छोट्या नकट्या नाकावर टनभर राग...!

ख्याती :- माणसाने ओरडण्याआधी विचार करावा.

राघव :- साॅरी ना पिल्लू. खूप टेन्शन आले आहे ऑफिसचे.... म्हणून चिडलो. माफ कर पा दादाला.

ख्याती :- ओके.. विचार करेल. पण पेनल्टी भरावी लागेल.

राघव :- कितीची पेनल्टी भरू सांग. चाॅकलेट आईस्क्रिम की पिझ्झा. की शाॅपिंग??

ख्याती :- अममम ! ह्या संडेला मला दोन नवीन टाॅप हवेत. सायंकाळी आईस्क्रीम आणि पिझ्झा दोन्ही. आणि समोर माझा ड्रेस आहे त्याला इस्त्री स्वतःच्या हाताने करायची. आईला किंवा शांता मावशीला नाही करू द्यायची.

राघव :- Okkk...! So Dada is at your service to my angelic sister aka Princess Khyaati..

   आपला दादा नाॅर्मल झाला बघून ख्यातीच्या मनाची कळी खुलली. राघव मनोमन देवाला म्हणतो,"बाप्पा आता ख्याती जशी खूश आहे तशीच नेहमी खूश असू दे.. तिला कधीच माझ्यासारखी तडजोड करावी लागणार नाही. " आणि तिच्या ड्रेसला इस्त्री करू लागतो.

@ संडेला

ख्याती :- दादू मला हा लाल ड्रेस खूप आवडला पण मला हा ब्लू पण आवडला. सांग ना रे कोणता घेऊ?

राघव :- तुला जो आवडेल तो घे. मला नाही कळत काही यातलं.

ख्याती :- हा बघ...! पिवळा एक घेतला. आता एकच हवाय. सांग ना कोणता घेऊ?

राघव :-  बेटा दोनच घेणे कंपल्सरी नाही. तुला हवे असेल तर घे आणखी तीन चार.

ख्याती :- जाऊदे. हा पिवळा फिक्स आहे. इथे एकच घेऊ. दुसरीकडे बघू आणखी.

राघव :- ख्याती...!

ख्याती :- (डोळे किलकिले करत) दादा... प्लीज.. आणि तुझी पेनल्टी आहे ही.

राघव :- ओके राणीसरकार...! चला.

   ख्यातीसोबत तो एका दुकानात जाऊन स्टुल पकडून बसतो.

राघव :- तुला जितके हवे तितके ड्रेस घे. पण मला विचारू नकोस. खूप दमलोय मी.

ख्याती :- Okk

   Shopping करून दोघेही एका आईस्क्रीम पार्लरमध्ये जातात. तिथे फरशी नुकतीच पुसली होती म्हणून ओली असते. ओल्या फरशीवरून तिचा पाय सटकतो आणि चुकून   ख्यातीचा धक्का एका मुलीला लागला. ती मुलगी ख्यातीला पडण्यापासून वाचवते.

ख्याती :- साॅरी मॅम...! ते चुकून झाले.

ती मुलगी :- What sorry...! नीट चाल जरा. मला काही नाही. तूच जोरात पडली असती आणि कपाळमोक्ष झाला असता.

राघव :- साॅरी मॅम ते... सुपी साॅरी सुप्रिया तू?

सुप्रिया :- राघव...! कसा आहेस? काय करतोयस?

राघव :- थांब आपण बाहेर बसून बोलूया.

सुप्रिया :- ओके

बाहेर आल्यावर....

सुप्रिया :- साॅरी ख्याती..! मी तुला ओळखलं नाही. तुला लगलं असतं म्हणून ओरडले मी तुला.

ख्याती :- It's Okk ताई..

राघव :- बाकी काय सुरु आहे. आमचे भावोजी कसे आहेत? आणि आमचं छोटं पिल्लू?  ते केवढं झालं आहे ?

सुप्रिया :- अनुराग एकदम मजेत आहे. बिझनेस सांभाळत आहे सासरेबुवांचा आणि आमची पिल्लू झाली आता आठ महिन्यांची...! तिच्यासाठी वस्तू घेण्यासाठी आले होते. By the way दुर्वा कशी आहे?  Contact आहे का तिच्याशी ? Sorry असे विचारणे चुकीचे  आहे. पण...

राघव :- ती आता मुंबईतच आहे की...!

सुप्रिया :- काय ? ती मला काही बोललीच नाही. ते देवगडला incident  झालेला त्यानंतर ती खूप वेगळी वागतेय रे..

राघव :- सुपी प्लीज सांग ना काय झालं होतं नेमकं त्या वेळी. तू दुरूच्या जवळच होती ना...

सुप्रिया  (ख्यातीकडे बघत) :- या विषयावर आपण नंतर बोलू. पिल्लू आईंना त्रास देत असेल. एकतर बाबा नणंदेच्या घरी गेलेत. हे माझं कार्ड घे आणि आपण बोलू नंतर...

ख्याती आणि राघवला मिठी मारून सुप्रिया निघून जाते

क्रमशः

🎭 Series Post

View all