वाचक देवो भव..
( मागल्या भागात आपण पाहिले कि दुर्वाचे खरे आई वडील कोण आहेत हे साऱ्यांना समजले पण इतक्यावर गोष्ट संपली नाही आपली... आता पुढे..)
इतक्यात मागून आवाज आला ..
थांबा मला माहित आहे दुर्वा कुठे असू शकते..
सगळे वळून बघतात तर मागे ख्याती उभी होती...
कौस्तुभ :- थांब जरा ख्याती.. तुझे लॉजिक वापरू नकोस.. सकाळपासून डोकं खातेय तू आमचं ... राघव आपण आपल्या पातळीवर बघूया दुर्वा कुठे असेल.. नाही भेटली तर पोलिसात जाऊया..
राघव :- अरे तिने तर रिझाइन केले ना आधीच्या ऑफिस मधून..
कौस्तुभ :- अरे हो.. ती माझ्या जिजुंच्या ऑफिस मध्ये होती. मुंबई ब्रांच ला येण्याअगोदर ती नाशिक ब्रांच मध्ये कामाला होती.. कदाचित आपण तिला तिथे भेटू शकते..
ख्याती :- मला माहित आहे दुर्वा कुठे आहे ते..
कौस्तुभ :- तुम्ही काहीही करा.. मी ह्याच पद्धतीने शोधतो तिला..
सुप्रिया :- कौस्तुभ तू असं काहीही करू नकोस ज्याने दुर्वा सनकेल.. तिचा हात किती जोरात लागतो हे तुला पण माहित आहे.
कौस्तुभ :- अरे पण पोलीस स्टेशनला गेलो तर तिचं नाव खराब नको व्हायला ही भीती आहे मला... आणि तिची मिसिंग कंप्लेंट फाईल कोण करेल.. मित्र मैत्रिण करतील तर पोलीस लक्ष देतील का..?
ख्याती :- अरे दादा माझं ऐकून तरी घ्या दोघे.. मला खरंच माहित आहे दुर्वा कुठे आहे ते... ती मला भेटली होती माझ्या बर्थडे च्या दिवशी.. त्यावरुन मी सांगतेय..
राघव :- काय..?? ती तर पार्टीला आली पण नव्हती.. तेव्हा ती कुठे भेटली तुला..? तिने सांगितलं का तुला कि ती कुठे चालली आहे ते..?
ख्याती :- थांब दादा सांगते.. धीर धर.. आमचा तसा काहीच संवाद झाला नाही.. ती मला देवळाबाहेरच्या मेडिकल मध्ये भेटली.. हातात दोन आणि पाठीवर एक अश्या तीन बॅग्स होत्या तिच्याकडे.. हाताला पण बँडेज होते.. मी खूप विचारण्याचा प्रयत्न केला.. तिने सांगत नव्हती कि ती कुठे चालली आहे.. शेवटी जाताना बोलली कि मी ही गोष्ट कोणाला सांगू नये. तसं वचनही घेतले माझ्याकडून.. हे कडं तिचच आहे.. तू हटकले होते बघ मला.. हे तुझ्याकडे कुठून आले.. मी खोटं बोलले कि हे मी देवळाबाहेर असलेल्या दुकानातून घेतले.. खरंतर हे तिने मला त्याचं दिवशी दिले. माझ्या डोक्यावर हात फिरवून आलेल्या टॅक्सीत बसून निघून गेली.. पण तिच्या बॅग मधून ही चिट्ठी पडली.. त्यात ह्या अनाथाश्रमाचं नंबर आणि नाव पण आहे.. पण लोकेशन आहे .. .
राघव :- नाव काय आहे अनाथाश्रमाचं...
ख्याती :- ***** बाल सदन... तिथे तिने कसला तरी कॅम्प सुरु केलाय.. ती फोनवर बोलत होती तेव्हा ऐकलं मी...
राघव :- थँक गॉड हे तरी कळले.. डॅड मी जातो पोलिसात.. आपण missing कंप्लेंट करूया... मग दुर्वा येईल इथे..पण ख्याती तू इतके दिवस गप्प का होतीस..? का सांगितले नाही मला..?
ख्याती :- ते दादा.. ते.. मी सांगणार होते पण.. दुरु नाही बोलली..
राघव :- अशी तर सारखी चुरूचुरू बोलत असते.. इथे सगळ्यांच्या जीवाला घोर आणि तू आता बोलतेय सगळे.. अक्कल गहाण ठेवलीस का..
सुप्रिया :- राघव.. लहान आहे ती अजून.. ओरडू नकोस तिच्यावर.. राणी तू खूप छान काम केलेस.. आपल्याला आता पोलिसात जावे नाही लागणार.. तू डोळे पूस बघू.. तू खूप छान काम केलेस..
गोविंदराव(हळूच पुटपुटले ):- नशीब.. चांगलं काम केलस बेटा.. नाहीतर आयुष्यात पहिल्यांदा जोश्यांच्या घरातलं कोणी पोलीस स्टेशन ची पायरी चढावी लागली असती.... त्या पोरीपायी..
गजाननराव :- पुरे झालं दादा.. यापुढे माझ्या पोरीला काही बोललास तर मी विसरून जाईल कि माझा कोणी भाऊ आहे ते.. गौरव,राघव बाळांनो तुम्ही माझी मदत कराल ना? माझी प्रकृती नीट नाहीये. माझ्यासोबत याल ना माझ्या परीला घ्यायला?
राघव :- काका काळजी नका करू आम्ही घेऊन येऊ दुरु ला...
गौरव :- मामा.. मला वाटते कि तू नको यायला आमच्या सोबत.. तुला बघून दुर्वा भांबावली तर.. आधीच तुला बरं नाहीये.. इतका हडपसर हुन मुंबईत आलास.. आता तू इथेच कुठेतरी थांब.. मी जातो राघव पण सोबत आहे माझ्या..
गोविंदराव :- बरोबर बोलतोय गौरव.. गजू तू आपला थांब इथे.. तू तिकडे गेलास कि इथे माझ्या जीवाला घोर लागून राहील..
गजाननराव :- वाह दादा.. आज तुला खूप पुळका आलेला दिसतोय माझा.. मला मुलगा नाही म्हणून आपल्या वडिलांच्या नावावरची शेती माझ्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन स्वतःच्या नावावर करून घेतलीस.. माझ्या नावावरचे माझे स्वकष्टाचे घर विकून माझ्या दवाखान्याचा खर्च केलास.. त्यातले अर्धे पैसे तर स्वतः कडे ठेऊन घेतलेस.. तेव्हा कुठे होतास..? शोभना मी माझ्या मुलीला घ्यायला जातोय.. तू देवाला प्रार्थना कर.. ती लवकर भेटू दे ह्या पत्त्यावर..
शोभना :- अहो.. येऊ का ओ मी पण सोबत..??
गजाननराव :- नको.! ती भांबवली तर सावरायला अवघड जाईल आपल्याला. त्यापेक्षा तू इथेच थांब..
राघव :- अरे ज्यांना यायचे त्यांनी या.. पण लवकर चला.. आता दुपार टळत आलीये. पावणे दोन वाजलेत... आता निघालो तर सायंकाळ व्हायच्या आत पोचूया..
सगळे जायला निघाले तोच श्रुतिका राघव समोर येते..
श्रुतिका :- राघव ही घे अंगठी.. दुर्वाचा हिच्यावर हक्क आहे. माझा नाही..
राघव :- अगं पण ही श्रेयसने तुला घातली होती.. मी कसा घेऊ..
श्रेयस :- नाही राघव.. माझ्या ऐपतीप्रमाणे मी श्रुतीसाठी अंगठी घेतली आणि तिच्या बोटात घातली सुद्धा.. ही दुर्वाला घाल.. आणि आठवणीने मला तुमचा दोघांचा फोटो पाठव..
काही तासांनी सारे जण त्या बालसदनात येऊन पोचले.. राघवने घड्याळात बघितले तर अजून साडे चारच वाजले होते.. राघव सैरभैर नजरेने दुर्वाला शोधत होता.. त्याला तिचा थांगपत्ता लागत नव्हता.. तिथेच एका आरामखुर्चीवर साधारण पासष्टी ओलांडलेले एक गृहस्थ त्या सदनातील चार पाच चिमुकल्या मुलांना गोष्ट सांगत होते..
राघव :- नमस्कार काका.. माझे नाव राघव जोशी.. मला या बाल सदनचे प्रमुख श्री. दत्ताराम चौधरी यांना भेटायचे आहे..
ती व्यक्ती :- हो दत्ताराम चौधरी मीच आहे बोला काय कम आहे?
राघव :- अ ते.. काका.. सॉरी सर..
प्रमुख :- काका म्हटले तर चालेल मला.. तसं मला सगळे जण अप्पा बोलतात. पण तुम्ही काकाच बोला... काम काय काढलत.. मला मुलांचे पाढे घ्यायचे आहेत..
राघव :- काका.. दुरु.. I mean to say दुर्वा कुठे आहे..?
प्रमुख :- अहो इथे एकूण सत्तर मुलं आहेत.. त्यात दुर्वा नावाच्या पाच मुली आहेत.. तुम्हाला कुठली दुर्वा हवीये.. दुर्वा मुकणे, दुर्वा चांभार, दुर्वा साठ्ये कि..
गजाननराव :- नाही नाही.. आम्हाला दुर्वा जोशी.. दुर्वा गजानन जोशी हिला भेटायचे आहे..ती तुमच्या इथल्या कॅम्प साठी आली होती.. मागच्या आठवड्यात.. पंचवीस वर्षांची आहे..
प्रमुख :- अच्छा म्हणजे परी वाटतं..
गजाननराव :- तुम्ही तिला.. परी बोलता..
प्रमुख :- अहो ती पोर इतकी गोड आणि सालस आहे कि आमच्या आश्रमात तिला परीताई म्हणूनच हाक मारतो.. तुम्ही कोण..? आणि तिच्याकडे काय काम काढलत..?
गजानराव :- अहो माझी मुलगी आहे ती.. तिला न्यायला आलोय मी..
प्रमुख :- अहो पण ती तर बोलली कि ती अनाथ आहे म्हणून.. तिला स्वतःचं असं कुणीच नाहीये.. मग तुम्ही कसे बोलता कि तुम्ही तिचे वडील आहात..?
इतक्यात मागून एक साधारण तेरा चौदा वर्षांची मुलगी पुढे येऊन बोलते, "अप्पा हे परीताईचे बाबा आहेत कि नाहीत हे ठाऊक नाही पण परीताईच्या पर्स मध्ये एक फोटो आहे. त्यात ती, हे काका आणि एक काकू पण आहेत.."
प्रमुख :- हे बघा मला काही समजत नाहीये.. तुम्ही परीताई आली कि तिच्याशीच बोला.. ती आत्ता दवाखान्यात गेलीये.. जरा बरं नाहीये.. आल्यावर तुम्ही बोला सविस्तर. तोवर आत येऊन बसा..
राघव :- काका तुम्ही न चिडता, न कंटाळत आमची बाजू ऐकून घेतली.. थँक यू सो मच... आणि तुमचा दुर्वावर राग पण नाहीये..
प्रमुख :- बाळा.. परी म्हणजे तुमची दुर्वा.. उगीच नाही आम्ही तिला परी म्हणतो.. जसा परिसस्पर्शाने दगडाचं सोनं होतं तसं ह्या लेकरांसाठी ती खूप काही करते.. ते ही उपकाराची परतफेड म्हणून..
राघव :- कसली परतफेड..
प्रमुख :- ते तुम्ही तिलाच विचारा.
इतक्यात काही मुलं ओरडू लागली.. परी ताईने खाऊ आणला...
हे ऐकून सगळे जण बाहेर आले.. राघव, गौरव, दीपक काका राघवचे बाबा आणि बरेच जण उभे होते.. दुर्वा काही क्षण न बोलताच त्या सगळ्यांना बघत होती.. तिने बोलायला सुरुवात केली, "तुम्ही सगळे..." ती पूर्ण वाक्य बोलणार इतक्यात गजाननराव बाहेर आले आणि दुर्वासमोर उभे राहिले..
एक क्षण दुर्वाला काहीच समजले नाही..ती फक्त, "बाबा" इतकंच बोलली आणि चक्कर येऊन बेशुद्ध पडली...
क्रमश...
©® ऋचा निलिमा
©® ऋचा निलिमा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा