मेरे लिए तुम काफी हो..(bhag-24)

Raghav And Shrutikas Engagement Fixed...
( वाचक देवो भवं

माफ करा दोस्ताहहो भाग उशिरा टाकतेय... आता जरा काही वैयक्तिक अडचणी आहेत. पण मला ठाऊक आहे कि तुम्ही तुमच्या दुर्वा आणि राघव वर तसेच प्रेम अजूनही करता जसे आधीही करत होता...

मागल्या भागात आपण की राघवने श्रुतिकाला लग्नाला होकार दिला. दुसरीकडे दुर्वाने नोकरीचा राजीनामा देऊन   परस्पर कुणालाच न सांगता निघून गेली. आता तुम्हाला पण वैताग आला ना दुर्वाच्या वागण्याचा मग बिचाऱ्या राघवची काय अवस्था झाली असेल. चला तर मग बघूया पुढे काय होते ते...! )


    दीपक काकांचा निरोप घेऊन हताश मनाने राघव घरी पोचतो तर आई मामी , ख्याती त्याच्या साखरपुड्याची खरेदी करून आलेले होते.

ख्याती :- दादा हे बघ आईने मला नवी साडी घेतली ते ही कोटा वर्क ची. काशी आहे सांग ना? तुझ्यासाठी झब्बा पण घेतलाय.

राघवची आई :- हो गब्बू.. घालून दाखव माप बदलायच  तर उद्याच बदलुन आणूया.

राघव :- आई गं! खूप दमलोय, नंतर बघू, ख्याती प्लीज माझ्यासाठी कॉफी आणशील का माझ्या खोलीत..? थोड्या वेळाने..!

ख्याती :- हो दादा आणते.

थोड्या वेळाने राघव फ्रेश होऊन बाहेर येतो तेव्हा ख्याती त्याच्या टेबल वरच्या दुर्वाचा फोटो घेऊन बसली होती.

राघव :- थँक्स बच्चा खरंच गरज होती मला कॉफीची.

ख्याती :- हिला कधी बाहेर काढणार आहेस?

राघव :- म्हणजे ?

ख्याती :- लग्न ठरलंय आता. दुर्वाला विसर दादा. श्रुतिकला हे अजिबात पटणार नाही. की तू तिला होकार दिला आणि  दुर्वाला विसरला नाहीस.

राघव :- ज्या गोष्टींची अक्कल नाही तिथे पाजाळू नकोस. लहान आहेस लहानच रहा.

ख्याती :- मला काही गरज नाही दादा.. तू कुणाचाही फोटो ठेव तुझ्या खोलीत. आज दुपारी श्रुतिकाचे आई बाबा आले होते. तिची आई तुझ्या खोलीत आली होती. हा फोटो बघून जर तिने काही विचारले असते तर..? पहिली गोष्ट आपण मुळात हे लपवत आहोत याचा राग येतोय मला.. त्यात आई पण मामा मामीच्या सोबतीने तिला हवे तसे करत आहे. ह्या घरात तुझ्या साखरपुड्याकरता तू सोडून बाकी सगळे खूप excited आहेत. नेमके काय चालले आहे तुझ्या मनात. ऐन वेळी काही गोंधळ घालू नकोस म्हणजे झालं...

राघव :- माता ख्यातेश्वरी आपलं प्रवचन झाले असेल तर प्लीज थांबा. कारण मी असे काहीच करणार नाही ज्यामुळे देशमुख घराण्याला मान खाली घालावी लागेल.

ख्याती पुढे काही बोलणार इतक्यात आईने आवाज दिला,"राघव, राणू खाली या. श्रुतिकाचे बाबा आले आहेत."

ख्याती :- हे तर आत्ता दुपारी आले होते न. खरेदीला पण आम्ही सोबतच गेलो होतो. काय काम असेल.

राघव :- बेटू ते आपण खाली गेल्यावरच कळेल. चल बरं जाऊन बघूया...


    दोघेही भाऊ बहीण खाली आले. श्रुतिकाचे बाबा सोफ्यावर बसले होते.

श्रुतिकाचे बाबा :- मला माफ करा मी एक छोटीशी चूक केली तुम्हाला सांगितले नाही. आपण साखरपुडा जो पुण्यात करणार होतो तो मुंबईत केला तर चालेल का?

राघवचे बाबा :- पण असे अचानक कसे ठरवले..? आधी तुम्ही बोललात की तुमच्या घरी कोकणात म्हणजे वैभववाडीत करायचा. मग हडपसर आता मुंबई बोलत आहात. तुम्हाला नक्की साखरपुडा करायचा आहे की नाही?

श्रुतिकाचे बाबा :- आहो करायचा आहे हो.. पण ते कसे सांगू.. आमच्या गावचे लोक चांगले नाहीत हो. लगेच विघ्न आणू पाहतात.

राघवची मामी :- अहो माझे माहेर पण कोकणचे आहे. मला थोडेफार ठाऊक आहे तिथले. असे का बोलत आहात...? तुमचे काही वाकडे आहे का लोकांशी..?

श्रुतिकाचे बाबा :- नाही हो.. तरीही.. आणि इथे कसे आम्हाला मुंबई सोयीस्कर आहे. श्रुतीची मावशीचे घर इथेच आहे ना. आम्हाला बरे पडेल. आम्हाला पैश्याची अजिबात अडचण नाही. फक्त स्थळ म्हणून!!

राघवची आई :- अहो पण ऐनवेळी कसं होईल सगळं...?

राघवचे बाबा :- कावेरी अगं काही हरकत नाही. तसंही आपले पाहुणे मुंबईतले आहेत. फक्त फोन करून सांगायचं काम आहे. ते माझी ख्याती करेल. करशील ना बच्चा?

ख्याती :- हो बाबा.. थोड्या वेळाने करेल.

श्रुतिकाचे बाबा :- चला मग देशमुख साहेब येतो मी!

राघवची आई :- अहो भाऊ चहा पाणी तरी घ्या. ख्याती जा बरं काकांसाठी चहा कर...

ख्याती :- हो आई...! लगेच आणते.

श्रुतिकाचे बाबा :- नको बेटा.. मला ते जरा महत्त्वाचे काम आहे. मी सवडीने एक दिवस फक्त तुझ्या हातचा चहा घ्यायला येईन.

ख्याती :- नक्की या काका... मी वाट पाहीन।।।

श्रुतिकाचे बाबा गेले याची खात्री करून ख्याती आई बाबांना बोलते.

ख्याती :- आई गं तुला असे नाही वाटत का हे काका काही लपवत आहेत आपल्यापासून..

राघवचे बाबा :- कशावरून गं..

ख्याती :- बघा ना यांना लग्नाची rather than साखरपुड्याची इतकी घाई झालीये. आणि सारखे गोंधळात असतात. म्हणजे जरा आलबेलच वाटतेय मला...

राघवची आई :- असे काही नाही बाळ.. लेकीचे लग्न आहे म्हणून जरा चलबिचल होते aahe त्यांची. साहजिकच आहे. जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हा बघ तुझे बाबा किती गोंधळ घालतील.

ख्याती :- आई माझे बाबा प्रत्येक गोष्टीत परफेक्ट आहेत. ते सुपर मॅन आहेत. ते कधीच काम करताना चुका करणार नाहीत.

राघवची आई :- हो आली मोठी बाबांची चमची... जा जाऊन बाबांनी सांगितलेले काम कर.

राघवचे बाबा :- माझी लेक माझ्यासारखी हुशार आहे. तिचे काम चोख असते. तू तुझ्या लाडोबाकडे लक्ष दे. कुणाचच लक्ष नसताना घराबाहेर पडला.

राघवची आई :- हो बोलते त्याच्याशी..
******************************************

अखेर तो दिवस उजाडला. राघवच्या साखरपुड्याचा... ठरल्याप्रमाणे साखरपुडा कार्यालयात होणार होता तरी राघवच्या घरी खूप माणसांची, पाहुण्यांची लगबग सुरु होती.. सगळे जण उत्साही होते.. फक्त राघव सोडून... तो आपला तयार होऊन बेडवर हताश बसला होता. त्याचा हा उदासवाणा चेहरा पाहून सगळे शांत होते पण ख्यातीला त्याचा हा शांतपणा बोचत होता. जर आपल्या भावाला लग्न करायचे नाही तर त्याने होकार का दिला आणि करायचे आहे तर तो उदास का हे तिला समजत नव्हते.. ती स्वतःच्या स्टाईलने दादाला खुश करण्याचा प्रयत्न करत होती.

ख्याती :- दादा आत येऊ का तुझी हेल्प हवी आहे..

इतका वेळ तंद्रित असलेला राघव भानावर आला.. समोर त्याची लाडकी बहीण फिकट गुलाबी रंगाच्या घागऱ्यात खूप सुंदर दिसत होती.

ख्याती :- दादा आई बघ ना स्वयंपाक घरात कामात व्यस्त आहे आणि मामा मामी साखरपुडा तयार करत आहेत. बाबा काय करत आहेत?? अम्म ते पाहुण्यांना चहा देत आहेत.

राघव :- मग तुला रुसायला काय झालं? भूक लागली का?

ख्याती :- नाही रे दादा.. माझ्या केसात गुंता झालाय. कोणी काढुनच देत नाहीये.. तुला वेळ आहे का..?

राघव :- हो.. चाल ये मी केस विंचरून देतो.. क्लिप आणि कंगवा आण.

राघवने ख्यातीचे केस विंचूरायाला सुरुवात केली. जरी तो कामात होता तरी स्वतःतच गुंतलेला होता. इकडे ख्यातीची अखंड बडबड सुरु होती. घरात आलेले पाहुणे राघव कशी त्याच्या बहिणीची काळजी घेतो याचे कौतुक करत होते. तर कोणी ख्याती कशी भावाकडून सेवा करून घेतेय असे टोमणे देत होते. पण राघव सगळ्यांकडे साफ दुर्लक्ष करत होता.. ख्यातीची पूर्ण तयारी झाली होती. राघव पण पिस्ता रंगाचा जब्बा घालून राजबिंडा दिसत होता. ख्यातीने हट्टाने त्याला खुर्चीवर बसवून tyacha मेकअप करत होती. इतक्यात त्याच्या खोलीच्या दारावर टाकटक आवाज झाला. बघतो तर समोर सुप्रिया, सुहृद आणि सुहृदच्या कडेवर हृदया होती.

सुप्रिया :- राघव आत येऊ का..?

राघव :- अरे या कि.. आले माझी हृदू कशी आहे.. बघ माझ्या हृदू ने मामासारखा कॉलोरचा फ्रॉक घातला मस्त मस्त (आणि तिला कडेवर घेऊन खेळवू लागला.)

सुहृद :- साळेसाहेब.. मेक अप लावून काय लपवत आहात..

ख्याती :- खूप काही.. जे आपल्याला सांगत नाहीये तो..

राघव :- (कडक आवाजात )ख्याती.. जा आवरून झालं असेल तर.. बाळाला घेऊन जा बाहेर.. खेळवा तुम्ही मुले तिला.. आम्ही जरा नंतर येतो..

ख्याती हृदयाला घेऊन राघवच्या खोलीबाहेर निघून जाते.

राघव :- अगं सुपी ती बाळाच्या निमित्ताने सारखी खोलीत आली असती म्हणून तिला बाळासोबत बाहेर पिटाळले.

सुप्रिया :- राघव.. तू लग्नाचा निर्णय का घेतलास...? तो ही इतक्या सहजासहजी.. का करतोय असे.. आता दुर्वा पण कुठे आहे ते ठाऊक नाही तुला.. कोणावर राग काढतोय तू..?

राघव :- सुपी काही प्रशांची उत्तरे देता येत नाहीत.

सुप्रिया :- पण तू जिच्याशी लग्न करणार आहेस.. तिचे नाव काय आहे..? कुठली आहे..? गाव कोणते..? परवा पासून विचारतेय मी.. तू सांगतच नाहीयेस मला..

राघव :- अगं तीच नाव...

राघवचे मामा (बाहेरून ) :- राघव बेटा चल.. मुहूर्ताच्या आधी पोचायला हवे कार्यालयात...

तो विषय तसाच बाजूला राहतो आणि सगळे कार्यालयात जायला निघतात.

कार्यालयात पोचल्यावर श्रुतीकाचे आई बाबा आणि तिची दोन्ही भावांडे राघवचे आणि त्याच्या कुटुंबाचे स्वागत करतात. श्रुतिकाचे आई बाबा आणि भावंडे वगळता सगळे जण राघवला बघून काहीतरी कुजबुजत होते तर कोणी तिरपा कटाक्ष टाकून निघून जात होते. ती लोकं अर्थात मुलीकडचे पाहुणे होते. पाहुण्यांचे असे राघवकडे बघणे कुतूहलाचे नक्कीच नव्हते. राघवच्या घरच्यांना आणि राघवला हे लक्षात आल्यावचून राहिले नाही. राघव मात्र काही झालेच नाही अश्या अविरभावात वावरत होता.. ख्याती मात्र तिच्या भावासोबतच होती.. सुप्रिया लगेचच राघवपाशी आली. तिच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता..

ख्याती :- दीदी काय झाले गं..?

सुप्रिया :(हातातली पिशवी देत):- काही नाही हे तुझ्या जीजूला दे आनि सांग दीदीने बोलावले आहे..

ख्याती :- ओके..(ख्याती निघून गेली )

सुप्रिया :- राघव हा सगळा काय प्रकार आहे..? तू आधी का नाही सांगितले...? काय चालू आहे तुझ्या डोक्यात..?

राघव :- just wait and watch..!!

सुप्रियाला राघवचे वागणे पटत नव्हते आणि ती काही बोलुही शकत नव्हती..

इकडे राघव आणि श्रुतिका साखरपुड्याची विधी करत होते. दुसरीकडे श्रुतिकाचे बाबा आणि काका विधी पटापट आटपण्यासाठी भटजी बुवांमागे तगादा लावत होते..

सगळ्या विधी आटोपल्यावर अंगठी घालायची वेळ येते...

भटजी बुवा :- आता मुलामुलीनी एकमेकांना अंगठी घाला..

राघवने श्रुतिकाच्या बोटात अंगठी घालायणासाठी हात हातात घेतला. तो तिच्या हातात अंगठी घालणार इतक्यात मागून आवाज आला.., " थांबा.. हा साखरपुडा थांबवा.. ही शुद्ध फसवणूक होते आहे..हा साखरपुडा झाला तर खूप अनर्थ होईल.."

त्या व्यक्तीला बघून सगळे जण आवाक झाले..

क्रमश
ऋचा निलिमा

1) राघवचा साखरपुडा होईल का..?
2) सुप्रिया राघव वर का चिडली?
3) साखरपुडा थांबावंणारी व्यक्ती कोण असेल..?
पटापट कमेंट करून सांगा..



🎭 Series Post

View all