मेरे लिए तुम काफी हो... (शेवटचा भाग)

Finally Raghav Find Durva..


( वाचक देवो भवं

माफ करा दोस्ताहहो भाग उशिरा टाकतेय... आता जरा काही वैयक्तिक अडचणी आहेत. पण मला ठाऊक आहे कि तुम्ही तुमच्या दुर्वा आणि राघव वर तसेच प्रेम अजूनही करता जसे आधीही करत होता...)


मागल्या भागात आपण पहिले कि दुर्वा अचानक इतक्या जणांना बघून भांबावली आणि बेशुद्ध झाली...

दीपक काका :- गजाननराव! तुमच्यामुळेच दुर्वाची अवस्था अशी झाली आहे. तुम्ही जा इथून प्लीज. आता आणखी उपकार नको आम्हाला.

गजाननराव :- असे का बोलता हो भाऊजी? दुर्वा माझी लेक आहे. लहानच मोठं केल तिला मी.

दीपक काका :- हो का..? म्हणून तुमचं तोंड काळं केलेल्या पुतणीच पितळ उघडं पडू नये म्हणून तिची बळी देत होता..

गजाननराव :- हो पण मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे.. मी माफी मागतोय ना. मला बघू द्या तिला.

राघव (जोरात ओरडत) :- बस्स झालं गजुकाका. तुम्ही पण ego दाखवत आहात.गोविंदकाकांपेक्षा तुम्ही पण काय वेगळे आहात. मी माझ्या डोळ्यांनी बघितले तुम्ही तिला किती त्वेशाने लाथ घातली होती. मागली चार वर्षं तुम्ही कुठे होता..?

इतक्यात dr. बाहेर येतात..

राघव :- डॉक्टर.. दुरु कशी आहे..? आली ना शुद्धीवर. काय झालं माझ्या दुरुला..?

डॉक्टर :- काळजी करण्यासारखे काही नाही इतके. जरा शॉक बसला तिला. त्यात थोडासा विकनेस आहे. तिचे रिपोर्ट तसें नॉर्मल आहेत. रक्त पातळी कमी झाली होती.आली आहे ती शुद्धीवर. पण एकेक जण जाऊन बोला तिच्याशी.

गजाननराव :- मी जाऊ.. नको नको भाऊजी तुम्ही जा. तुम्हीच बोला तिच्याशी. माझं धाडस होत नाहीये. तिला तोंड पण दाखवण्याच्या लायकीचा नाही मी..

दीपक काका :- नको त्यापेक्षा राघव तू जा..

राघव :- ठीक आहे. मी जातो..

राघव खोलीचे दार उघडून हळूच दुर्वाच्या बाजूला खुर्चीवर जाऊन बसतो. नेहमी डॅशिंग, मारामारी specialist त्याची दुर्गा बेडवर अशी निपचित पडलेली बघून त्याचे डोळे भरून आले..

राघव ( आवंढा गिळून) :- दू.. दुरु.. मी राघव.. तुझा राघव.. उठ अशी काय म्हाताऱ्या बाई सारखी झोपलीस. मला किती महिने झाले मारले नाही तू..

दुर्वा :- (जोरात किंचाळत )का आला आहेस राघव? मी आधी बोलली होती ना. नको माझ्यात गुंतू. तुझं आयुष्य जग. तुझ्यासाठी जग. मी तुझ्या लायक नाहीये. मी एकदा नाही नाही दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण आप्पांनी जीव वाचवला माझा.. मी looser आहे. मी एक अनावरस आहे.

हे वाक्य बोलून रागारागातच दुर्वा खोलीबाहेच्या अंगणात आली.. बाहेर दीपक काका आणि गजाननराव उभे होते.. ते रागमिश्रित आसवं डोळ्यात साठवून होते..

दीपक काका :- बाळा तू अनावरस नाहीस. मी तुझा बाबा आहे. तू माझी मुलगी आहेस.

दुर्वा :- काका तुम्ही आणि माई आत्या मला तुमच्या मुलीसारखे मानता.. पण मी नाही तुमचीच मुलगी.. मला सांभाळणारे आई वडील, माझे जन्मदाते माझा तिरस्कार करतात.. त्यात तुम्ही तर..

गजाननराव :- नाही बेटा.. भाऊजी खोटं नाही बोलत आहेत. तेच तुझे वडील आहेत. त्यांनी तुला आमच्या पदरात टाकले आणि मी.. ( आणि ढसाढसा रडू लागले..) आणि तिच्या जन्माचे सारे सत्य तिला सांगितले..

गजाननराव रडू लागले तसेच एका खुर्चीवर बसून रडू लागले. न राहवून दुर्वा त्यांच्यापाशी गेली आणि बोलली..

दुर्वा :- बाबा प्लीज रडू नका. BP वाढेल तुमचं. त्यात आधीच स्ट्रोक होऊन गेलाय तुम्हाला..

गजाननराव :- तुला कसं माहित.. मला..

दुर्वा :- मला सगळे ठाऊक आहे. तुम्हाला consult करणारे डॉक्टर माझ्या मित्राचे बाबा आहेत.

गजाननराव :- म्हणजे त्या डॉक्टरांनी माझे पैसे घेतले नाहीत ते.. तुझ्या सांगण्यावरून त्यानी मला फ्री ट्रीटमेंट दिली..

कौस्तुभ :- काका तुमचा सख्खा मोठा भाऊ तुमच्याकडून पैसे घेण्यावाचून राहिला तर हे तर डॉक्टर आहेत.

गजाननराव :- पण माझ्याकडून ऑपेरेशन चे काहीच पैसे घेतले नाहीत त्यांनी.

कौस्तुभ :- कारण...

दुर्वा :- shut up kaustubh..

कौस्तुभ :- oh.. You shut up दुर्वा.. काका कारण दुर्वाने तुमचे बिल पे केले.. आणि हे खोटं नाहीये कारण दुर्वा ज्या कंपनीत काम करायची त्या कंपनीची मालकीण माझी ताई आहे.. दुर्वाने तिच्या start up साठी टाकलेला पैसा सगळा तुमच्या आजारपणात खर्च केला..

राघव :- पण तुला हे सगळं कसं कळलं.. जेव्हा आपण बोललो तेव्हा काहीच का सांगितले नाही तू मला..

कौस्तुभ :- अरे मला हे सगळे तू भेटला त्यानंतर समजले.. मी तुला सांगायला घरी आलोच होतो तर तुझ्या एंगेजमेंट ची तारीखच काकांनी सांगितली मला.. हिची flatmate कस्तुरी तिने सांगितले मला सगळे..

दीपक काका :- पण तिने आम्हाला काहीच का नाही सांगितले ह्याबद्दल..

कौस्तुभ :- काका विचारण्याची पण एक पद्धत असते.. मी माझ्या style ने विचारले तिला..

दुर्वा :- पण आता तुम्ही का आला आहात..? मला माझ्या मर्जीने, आनंदात का जगू देत नाहीत तुम्ही..?

सुप्रिया :- तू जगतीयेस...?

दुर्वा :- what do you mean Raghav...?

सुप्रिया :- हेचं कि तू खरंच जगतीयेस..? कि आयुष्याचा प्रत्येक दिवस पुढे ढकलत आहेस..? सांग ना तू शेवटचं कधी डान्स केलास.. शेवटचा कोणता picture बघितलं..? कोणाला जोरात एक कराटेची fight दिलीस.. ह्या गोष्टी तर तुझ्या स्वतःच्या होत्या..?

दुर्वा :- अ.. ते..

सुप्रिया :- नाहीये ना उत्तर. आता का गप्प झालीस.. कॉलेजला असताना रोज माझ्याशी भांडायची तू.. पण आता का गप्प झालीस..? बघ त्या राघवकडे बघ.. केविलवाणा होऊन बघतोय तुझ्याकडे. बेशुद्ध तू होतीस जीव त्याचा तीळ तीळ तुटत होता. कधी आईच्या सोडून कोणाच्या पाया न पडलेला राघव तुझ्यासाठी देवाला साकडं घालत होता.. त्याच्यासाठी तू थांबली नाहीस..

दुर्वा :- सुप्रिया अगं जिथे माझ्या जीवावर मरणाची टांगती तलवार होती.. त्यात राघवला काही झालेलं मला पाहवलं नसत गं.. तो तर अजूनपर्यंत माझ्याशी लग्न करायचा विचार करत होता.. मी त्याच्यासाठी परफेक्ट मॅच नाहीये.. ना त्याच्या फॅमिली साठी..

राघव :- हे तुझं मत आहे दुरु..

दुर्वा :- नाही राघव ही रिऍलिटी आहे.. तू जरी माझा स्वीकार करशील पण तुझ्या घरचे.. मला घराच्यानविरुद्ध काहीच करयचे नाही.

राघवची आई :- आणि जर आम्हाला तू हवी आहेस असे बोललो तर..

दुर्वाने मागे वळून पाहिले तर मागे तिची आई शोभना, राघवचे आई बाबा आणि ख्याती पण होती..

दुर्वा :- काकू तुम्ही.. तुम्ही सगळे..

राघवची आई :- दुर्वा बाळ माफ कर.. मी दवाखान्यात तुझ्याशी खूप वाईट वागले.. तू माझ्या मुलाला होकार दे आणि ये बरं तुझ्या हक्काच्या घरी कायमची..

दुर्वा :- पण काकू राघवचं आणि माझं एकमेकांवर फक्त प्रेम आहे.. आधीच इतके विघ्न आलेत ह्या नात्यात... आता पुरे झाले..

दुर्वा मागे वळून खोलीत जाणार इतक्यात राघव तिच्यासमोर आला. त्याने तिचा एक हात स्वतःच्या हातात घेतला आणि हलकेच त्यावर ओठ टेकवले..

राघव :- तुला पाहिले पहिल्यांदा..
तेव्हा जरा बावरलो..
राग आला होता थोडासा तुझा
पण तुझ्या गोड गळ्यात हरवलो..
तू आलीस एक परिस होऊन
माझ्या आयुष्यात...
थोडेसे drame झाले
परि जीव गुंतला ह्या परीत (हकलेच तिची हनुवटी वर केली.)

( गुडघ्यावर बसून )
दुरु .
तू असशील परीकथेची परी किंवा
कोणाची दुर्वा..
पण ह्या तुझ्या वेड्या गुब्बूला तू हवी आहेस..
Will you marry me..

दुर्वा काहीच न समजल्याने कावरीबावारी होऊन सगळीकडे बघू लागते..

सगळे जण तिला हो म्हण असे बोलतात.. डोळ्यातले अश्रू पुसून ती राघवच्या हातात हात देते..

ख्याती :- दादा ही घे अंगठी.. पटकन घाल तिला.. पांढरंच सेकंड बाकी आहेत..(आणि अंगठी राघवच्या दिशेने फेकते..)

राघव पटकन धावत जाऊन अंगठी घेतो.. दुसरीकडे सगळे जण count करतात..

दहा, नऊ, आठ, सात, सहा, पाच, चार, तीन, दोन...

एक म्हणायच्या आत राघवने दुर्वाला अंगठी घातली आणि तिला घट्ट मिठी मारली.

प्रमुख :- अरे थांबा.. आधी आमचं तोंड गोड करा मग सगळ्यांचं...

हे बोलल्यावर राघव आणि दुर्वा अतिशय गोड लाजले.. आणि बाकीचे सगळे जोरजोरात हसू लागले.. हे ऐकून राघव आणि दुर्वाला खूप awkward वाटू लागले..

प्रमुख :- असं करा. दोघेही आत्ताच किचन मध्ये जा..

सारे जण :- काय...?

प्रमुख :- अरे नाही म्हणजे.. आपल्या सगळ्यांसाठी तोंड गोड करायला साखर घेऊन येतील ना ते.. जरा वेळ लागला तिथे तरी चालेल आम्हाला.. बरोबर ना मंडळी..

सारे जण :- हो.. हो.. Take a time....

दुर्वा आणि पाठोपाठ राघव पण लाजतच किचन मध्ये येतात..

दुर्वा :- का केलंस राघव इतकं माझ्यासाठी.. इतकं प्रेम करतोस माझ्यावर.. मी तुला इतके दुखावले तरी..

राघव :- दुनिया में मेरे हिस्से में जितने भी गम हो..
कोई गम नाही..
क्योंकी मेरे लिए तुम काफी हो..

ह्या वेळी स्वतःहून दुर्वाने राघवला मिठी मारली.. आणि तिच्या डोळ्यात अश्रूऐवजी आनंद होता, प्रेम होते..

©®ऋचा निलिमा

बस.. इतकीच होती आपली गोष्ट.. माझ्या साऱ्या वाचक मित्रमैत्रिणींचे खूप खूप आभार.. तुम्ही दुर्वा आणि राघव वर इतके भरभरून प्रेम केलेत.. पुन्हा भेटू लवकरच.. एक नवी कथा आणि एक नवा अध्याय घेउन...
तोवर टाटा बाबाय....



🎭 Series Post

View all