मासिक पाळी (भाग 3) व माझे बदललेले आयुष्य

Menstruation and my changed life a story experienced by every women

मासिक पाळी (भाग 3)

माघील भागात आपण पाहिले 
मेघना व दीपक पार्टी मध्ये पोहोचले होते 
आता पुढे

विचारात अडकलेल्या मला  दीपक ने  खाली उतरण्यास सांगितले.
तशी मी खडबडून भानावर आले,
हो उतरते म्हणून हळूच खाली उतरले. 

आम्ही गाडीतून उतरत नाही,
तोच दीपक चे काही जुनीयर्स फुलांचा मोठा गुच्छ घेऊन आले. 
त्यात काही मुली देखील होत्या 
मुलांना हातात हात देत 
काही मुली गळाभेट घेत होत्या.

मला थोडं खटकलं पण मी काहीच बोलू शकत नव्हते.  

त्या सगळ्यांचे स्वागत स्वीकारून आम्ही त्याचे बॉस मिस्टर शर्मा सर  यांच्याकडे निघालो. 

पार्टी नेमकी कशाची आहे हे अजूनही मला माहित नव्हते.

मी दीपक सोबत छोट्या छोट्या पार्ट्या ला जायचे पण अशा मोठा पार्टी ला पहिल्यांदा आले होते.

त्यांचे कपडे ,मेकअप, दागिने, ती सजावट सगळंच बघून मी थक्क झाले.

तशी मी शिकलेली, गुणवान, दिसायला सुंदर, चार चौघी मध्ये उठून दिसणारी पण आज काहीतरी कमी वाटत होतं 
कदाचित ते ठिकाण माझ्यासाठी नव्हते म्हणून वाटत असेल.
जाऊ द्या ना आपल्याला कुठे इथे कायमचे राहायचे आहे असे स्वतः ला सांगितले.

बॉस कडे जात असताना दीपक ने हळूच सांगितले आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे बर 
मी फक्त होकारार्थी मान हलवली 
मनात विचार केला, लग्नाचा वाढदिवस व असा वाजत गाजत, 
लग्न म्हणजे दोन जीवाचे मिलन व तो दिवस असा लोकात साजरा करायची गरज काय दोघांच्या आठवणी दोघांचा च दिवस मग तो दोघांनीच अनुभवावा व सोबत घालवावा असे मला वाटते त्यात साऱ्या जगाची काय गरज आणि जवळचे नातेवाईक असेल तर ठीक आहे पण या ऑफिस च्या स्टाफ चे काय काम 
व असे सेलिब्रेशन काय कामाचे ज्यात फक्त दिखाऊपणा असेल 
जाऊ द्या ना आपल्याला काय करायचे 
असे म्हणून दीपक माघे चालू लागले 

बॉस जवळ गेल्यावर आम्ही त्या दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या 
 व तेवढ्यात दीपक म्हणाला 
मॅडम फक्त तुमच्यासाठी मेघना ला घेऊन आलो,
ही मेघना माझी आवडती बायको 
माझ्या खांद्यावर हात ठेवत दीपक म्हणाला 

थोडा आधार वाटला पण हाच हात घरी ठेवला असता व मला विश्वासात घेऊन सोबत चल म्हणाला असता तर नाचत आले असते तुझ्या सोबत, 

पण तू मनात स्वार्थ ठेऊन वागला याचे वाईट वाटले.

असो जाऊ दे 

मी माझी विचार करत होते व दीपक दिसेनासा झाला 
अनोळखी जागा, 
अनोळखी माणसे,
अनोळखी वातावरण,

मी घाबरून गेले 
जोरात ओरडू देखील शकत नव्हते. 
मी इकडे तिकडे दीपक ला शोधू लागले.
पण दीपक कुठेच दिसत नव्हता. 
शेवटी मन घट्ट करून एका  कोपऱ्यात 
उभी राहिले.
खुप वेळ झाला उभी होते पायात त्राण राहिला नव्हता आता.

दीपक चा अजूनही पत्ता नव्हता 
मी मात्र शोध घेत होते वेड्यासारखा. 

जाणारा येणारा प्रत्येक जण फक्त मला बघत होता.
तेथील लोक  एका ठिकाणी उभे का राहत नव्हते हेच मला कळत नव्हते 
सारखे इकडे तिकडे फिरत होते फक्त.

प्रत्येक जण माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होता 
कारण मला ही कळत नव्हते 
एकदा तर वाटलं सरळ जाऊन विचारावं कधी बाई बघितली नाही की माझ्यात काही वेगळं दिसतंय 
का बघताय असे सगळे 
पण पुन्हा विचार केला जाऊ द्या ना मला कुठे कायमच इथे थांबायचं 

मी आपली पुन्हा लागले कामाला दीपक चा शोध घेण्यात 

काही वेळाने दीपक आला त्याला बघून मनाला खुप आनंद 
खुप बोलावं त्याला असे सोडून जाते का कुणी नवीन ठिकाणी एकटया बायकोला
पण त्याचा अगोदरच मूड गेलेला होता 
मला फक्त चल म्हणून तो गाडीकडे आला 

मी गाडीत बसले. 
त्याने दरवाजा दोरात बंद केला.
इतका जोरात की 
तुटेल अस वाटलं.
मी आपली शांतच होते 
काही बोलायची हिम्मत होत नव्हती. 
पण सगळी हिम्मत एकवटून मी विचारलेच 

दीपक ते सगळे माझ्याकडे असे का बघत होते.

इतक्यात दीपक कडाडला.

तो जोरजोरात ओरडून बोलू लागला 
गाडी चा वेग देखील वाढला त्याच्या कडून रागात. 
मला तो काय बोलतोय काहीच कळत नव्हते. 
तो खुप खुप बोलला मला मात्र काही शब्द लक्षात राहीले
 जे खुप लागले मला 

तो म्हणत होता कुठून अक्कल सुचली व तुला सोबत आणले 
एवढ्या मोठ्या पार्टी ला जातोय व तू साडी घालून आलीस किती हसले मला सगळे मित्र 
आता काय तोंड दाखवू त्यांना 
गावरान कुठली 
..................
तो बोलत होता व मी फक्त गावरान कुठली याच शब्दात अडकले 

डोळे पाणावले व मी स्वतः शीच विचार करू लागले. 

याला च प्रेम म्हणता का ?

आज इतक्या वेदना होत असताना मी फक्त यांच्यासाठी आले व त्याला साधी जाणीव ही असू नये.

अरे तू सांगशील तो ड्रेस घातला असता व तुला हवी तशी नटले असते पण फक्त तुझ्यासाठी जगाला दाखवण्यासाठी नाही 

बायको म्हणजे काय शोभेची वस्तू आहे का ?
तुला जेव्हा वाटेल,
जिथे वाटेल,
जशी वाटेल,
तू सादर करावी व लोकांनी कौतुक कराव.

एक मन असत रे बायकोत पण 
जे फक्त नवऱ्याच्या
 प्रेमाची
अपेक्षा करते.
पण तुम्हा, 
पैशाच्या माघे धावणाऱ्या 
वेळेसोबत पळणाऱ्या 
नाव कमवण्याची लालसा असणाऱ्या ना 
काय कळेल ते 

एकदा तरी माझी तब्बेत  विचारायची होतीस 
मला गृहीत धरणे कधी 
बंद करशील रे ..........

डोळ्यातील पाणी थांबण्याचे नाव घेत नव्हते कारण दीपक च्या 
गावरान 
या शब्दाने मी खुप दुखावली गेले होते.
इंजिनिअरिंग करून मी देखील तुझ्यासारखा पगार कमावला असता पण मुलीने जॉब करू नये या विचारांचा तू 
आणि विशाल व बाबा च्या काळजीत अडकलेली मी. 
कधी नोकरीचा विचारच केला नाही. 
मला गरज देखील कधी भासली नाही.
पण आज तुझ्या गावरान शब्दाने 
मी भानावर आले. 
माझ्या इंजिनिअरिंग च्या शिक्षणाला मी हाताने मातीत घातले असे वाटले मला.

दीपक अजूनही रागात होता.
त्याने जोरात गाडी गेट समोर आणली व उभा केली.
मी उतरून डोळे पुसत घरात प्रवेश केला.

दीपक घेईल का अनघाच्या मनस्थिती समजून की घालेल आणखी वाद,
बघुयात पुढच्या भागात. 
तोपर्यंत 
सोबत राहा माझ्या 
व मला फॉलो करा 
धन्यवाद

🎭 Series Post

View all