Oct 28, 2020
सामाजिक

Men also deserves some respect

Read Later
Men also deserves some respect

          माझ्या या लेखात मी माझे काही विचार मांडणार आहे. जे याला वाचतील , त्यांना मी विनंती करतो की प्लीज त्यांचं विचार कमेंट करावं. जेंव्हा मी सुट्टी संपून परत सांगलीला बसमधून जात होतो.( कोरोनाच्या आधीच्या काळात) तेंव्हा बस मध्ये थोडी फार गर्दी होती. पण एक मोकळी सीट मला मिळाली. मी बसल्यावर सगळे सीट्स फुल्ल झाले होते. एकही सीट मोकळी नव्हती. जेंव्हा बस पुढच्या स्टॉपला थांबली. तेंव्हा काहीजण उतरले , काहीजण बस मध्ये चढले. मी हेडफोन्स घालून गाणे ऐकत होतो. एक मुलगी माझ्या जवळ आली आणि मला काहीतरी म्हणत असल्याच मला जाणवलं.मी हेडफोन्स काढून त्यांना ,' काय ?' अस म्हणालो. ती म्हणली ,' ही सीट महिलांना रिसर्वे आहे .' तिला काय म्हणायचं आहे , ते मला कळाल. मी मुकाट्यानं उठलो आणि चेक केल की अजुन कोणती सीट मोकळी आहे का?.. पण माझं नशीब एवढं चांगलं नव्हतं. एकही सीट मोकळी नव्हती. मग काय??.. उभा राहिलो. पण प्रवास अजुन खुप उरला होता. उभा राहताना सुद्धा माझं विचार काही थांबत नव्हते. महिलांच्या त्या रिझर्व सीट मध्ये केवळ महिला बसलेले होते. पण जिथे सीट्स कोणालाही रिझर्व्ह नव्हतं , तिथे सुद्धा काही महिला मंडळी बसलेले होते. पण पुरुष मंडळी काही उभे होते कारण त्यांना सीट्स मिळाले नव्हते आणि काही पुरुष मंडळी बसलेले होते , कारण त्यांचं नशीब माझ्यासारखं नव्हतं . म्हणजे ते पहिल्यापासून सीटवर बसलेले होते आणि ते सीट कुणासाठी रिझर्व नव्हते . मी स्त्री पुरुष समानतेचा आदर करतो. त्यामुळे मला कोणीही असो महिला किंवा पुरुष सगळे समान आहेत.

        आजकाल काही मुली म्हणा किंवा काहीजण फेक फेमिनिझम करतात. म्हणजे वर वर तर म्हणायचं की स्त्री पुरुष समान आहेत आणि जेंव्हा वेळ येते तेंव्हा मात्र त्यांच्या समानते ला ग्रहण लागतो. त्यात वर सांगितल्या प्रमाणे सीट्स चा मुद्दा असोत किंवा अजुन काही मुद्दा असोत. काही वर्षा अगोदर दिल्ली सरकार एक निर्णय घेतला की मेट्रो मध्ये महिलांना मोफत प्रवास असेल. त्याचा मागचा कारण ते म्हणले की महिलांच्या सुरक्षेसाठी ते हा निर्णय घेतलेला आहे. महिलांच्या सुरेक्षेसाठी हा निर्णय अगदी उत्तम असू शकतो का ?.. तर हा , असू शकतो. पण मी एक कंडीशन सांगतो . समजा एक मुलगा आहे ज्याला जॉब आहे काही २५ हजाराचा.. त्याचा महिन्याचा हिशोब तंतोतंत त्यातच बसवायचं आहे . त्यात त्याचा मेट्रोचा खर्च सुद्धा आला आणि एकीकडे एक मुलगी आहे जिला पैसेची कमी नाही. दोघेही जेंव्हा स्टेशनला गेले तर त्या मुलाला त्या मेट्रोचे तिकीट काढावे लागेल आणि त्या मुलीला मात्र मोफतमध्ये मेट्रोचा प्रवास अनुभवायला मिळेल. हीच आहे का स्त्री पुरुष समानता ???...

        काही फेक फेमिनिझम करणारे मुली म्हणत असतात की फक्त मुलंच का ड्रिंक करतात , आम्ही पण करूयात. हेच तर आहे समानता.... तुम्हाला हे खोटं वाटेल . पण हे खरं आहे... काही वेब सीरिज मध्ये असेच दाखवत असतात आणि त्या वेब सिरीज ला बघून त्यांचं नकल करत असतात. तर हेच आहे का फेमिनिझम??... काही ठिकाणी काही मुलींचं लग्न १८ वर्षाच्या अगोदरच होत असत . तेंव्हा कुठ असतात हे फेक फेमिनिझम करणारे मुली ??? काही दिवसापूर्वी मी एक उदाहरण पाहिलं. एक मुलगी एका मेटरी मोनी वेबसाईटवर मुलाच्या अपेक्षा व्यक्त केलेली होती. त्यात ती लिहिली होती की मुलगा ६ अंकी असलेला पगार कमवत असलेला पाहिजे. ती खुद मात्र २५,००० कमवणारी होती. हे कुठल्या अर्थानं समानता वाटते. तिची अपेक्षा चुकली का ?.. नाही... तिला एक मुलगा लग्नानंतर सांभाळण्यासाठी पैसे च्या मामलात चांगला पाहिजेल. पण , यात समानता नाहीये. त्यात सुद्धा मुल असिदेत किंवा पुरुष असुदेत त्यांना आदर तेंव्हाच मिळत , जेंव्हा ते पैसे कमवत असतात. जर कमवत नसेल , तर त्याला काडीचाही किंमत नसतो .

         एका जोडप्याचा डिव्होर्स जेंव्हा होतो, तेंव्हा का फक्त मुलगा त्या मुलीला पैसे देऊ लागतो. ती मुलगी कितीही कमवत असेल , ते मॅटर करत नाही. पण तरीसुद्धा त्या मुलालाच पैसे द्याव लागतं. यात मलातर कुठ समानता दिसत नाही.. कुणाला दिसत असेल , तर प्लीज कमेंट करा.

       अजुन एक मुद्दा मला एक खटकतो. जेंव्हा एक मुलगा एका मुली समोर प्रेम असल्याचा कबुली देतो. तेंव्हा काही मुली पुढचं मागचं विचार न करता त्यांचं अपमान करतात. जरी तो मुलगा चांगला असला तरी.... मुलीला हो किंवा नाही म्हणायचं पूर्ण हक्क आहे. पण त्या मुलाला अपमान करू नये. कारण , तो सिरीयसली आहे का नाही तो नंतरचा भाग आहे. पण , तो फक्त आपली फिलिंग व्यक्त करत असतो. दुसरे मुले सुद्धा असतात जे फक्त टपोरिगिरी करतात आणि छेडण्यासाठी मुलींना प्रपोज करतात. त्यांना काय करायचं हे मुलींना माहितीच असत. पण , जो मुलगा चांगलं असतो त्याच्या फीलींगला आदर मिळायला हवा एवढच मला वाटत.पण , अपमानित करू नये... जेंव्हा एक मुलगी प्रपोज करते , तेंव्हा तीच फिलिंग प्युर असतात आणि जेंव्हा मुल प्रपोज करतात तेंव्हा तो बिघडलेला असतो.. हा कसला लॉजिक आहे??.. ह्या विचार करणारे सुद्धा चुकीचे नाहीत. काही मुलांमुळे बाकीचे मुले बदनाम होतात.               शेवटी मी एवढच म्हणतो की आदर मुलीचा नक्की व्हावा , पण तेवढंच आदर एका पुरुषाचा व्हावा. समानता सगळ्यात हवी.

         Men also deserve some respect...

********************************

ऋषिकेश मठपती

या लेख बद्दल काहीही विचार मांडायच असेल , तर कमेंट मध्ये मांडा. धन्यवाद .....

Circle Image

Mathapati Rushikesh Irayya

Student

Writing and reading are my hobbies. Mathematics is in my blood.