Login

रमणीय आठवणी

मनातल्या आठवणी

प्रत्येकाच्या मनाच्या कप्प्यात कडू-गोड आठवणी साठवलेल्या असतात. कधी नकोशा वाटणाऱ्या तर कधी हव्याहव्याशा वाटणाऱ्या आठवणी. कधी एकांतात आठवतात त्या, तर कधी गर्दीतही हळूच मनाला स्पर्श करून जाणारी आठवण. नकळत त्या आठवणींच्या गुंत्यात आपण कधी गुंतत जातो हे कळतच नाही. छान असतो ना मैत्रिणींनो हा मनातील आठवणींचा कप्पा . आठवणींचा कप्पा थोडा उलगडून बघा. कधीतरी स्वतःला आरशात बघून मिठी मारून बघा. आपण स्वतःलाच मारणारी मीठी ही आठवणीं सारखी असते. ती फक्त आपल्यालाच कळते. या जीवनाच्या रहाटगाडग्यात कधीतरी खोलून बघा आपल्या जीवनातील आठवणींची ती  सुगंधित कुप्पी

आणि अनुभवा जीवनातील सर्वात अमूल्य क्षण आपण व आपल्या आठवणी. मैत्रिणींनो आठवणींशी गट्टी करून तर बघा. या यंत्र युगातल्या खेळण्यांशी खेळण्यापेक्षा आठवणीत रमून तर बघा. कोणत्या आठवणी आठवायच्या आणि कोणत्या नको ते तुम्हीच ठरवा आणि एक दिवस तरी आठवणीत घालवा. मला तर फक्त हे करण्याच्या  आठवणीनेच अंगावरती शहारा आला आणि एवढया उन्हाळ्यातही गारवा अंगाला स्पर्शून गेला

 चला तर मग अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हाळ्यात थोडा आठवणींचा गारवा अनुभवूया. आपल्याच आठवणींमध्ये आपण रमूया,,,,,,,,,,,,,




🎭 Series Post

View all