Feb 28, 2024
प्रेरणादायक

आठवणी!

Read Later
आठवणी!
आठवणी!

काही गोष्टी घडून गेलेल्या असतात. आणि त्या भूतकाळात जमा होतात. जर त्या चांगल्या असतील तर त्या कायम आपल्या मनात प्रेरणास्थान म्हणून राहतात व आपल्याला उल्हास आणि आत्मविश्वास देतात. पण काही प्रसंगी त्यातल्या काही गोष्टी बद्दल त्या आपल्याला अधिकाधिक प्रयत्नांसाठी प्रवृत्त करतात. मग ते जर आपण सकारात्मकतेने घेतलं तर उत्तमच. पण याचे नकारात्मक विचार अनाहूतपणे आपल्या भोवती नकळत निर्माण होतात.
आणि तेच दुसरीकडे जर त्या आठवणी कटू असतील तर त्या काट्यांप्रमाणे आपल्या मनाला टोचत राहतात. त्याबाबतीतली गोष्ट करताना त्या आपल्याला बेचैन करतात. पण शेवटी आपण त्या गोष्टी पून्हा अनुभवू शकत नाही मग त्या चांगल्या असो वा वाईट...
म्हणूनच मागील आठवणीत जास्त काळ गुंतून न राहता आपण वर्तमान आणि भविष्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कारण आपण कायम भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यांना एकमेकांशी बांधून ठेवू शकत नाही. आठवणी त्या आठवणीच राहतात. मग याच आठवणींमध्ये पूर्णतः अडकून न पडता जीवन जगणं भाग आहे.

आनंदाच्या सागरात किती काळ वाहवत राहायचं,
दुःखाच्या डोहात किती काळ घुटमळत राहायचं,
आठवणींच्या हिंदोळ्यावर किती काळ झुलत राहायचं,
घडून गेलेल्या गोष्टीत का उगाच अडकून पडायचं..!

©️®️ Aboli Dongare
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Aboli Dongare

//