आठवणी .....

Unforgettable Memories
 आठवतात त्या आठवणी
सुखाचा गारवा देणाऱ्या चांगल्या आठवणी
दुःखाची झळ देणाऱ्या वाईट आठवणी
मन प्रफुल्लित करणाऱ्या सुखद आठवणी 
मन घायाळ करणाऱ्या दुःखद आठवणी
ह्रदयाला स्पर्श करणाऱ्या आठवणी
ह्रदयाला भेदून जाणाऱ्या आठवणी
खुप हव्याहव्याशा वाटणाऱ्या आठवणी
त्रासदायक असलेल्या आठवणी
आठवून आठवून आठवणीत ठेवलेल्या आठवणी
विसरायचं म्हणून ठरवलेल्या पण न विसरता येणाऱ्या आठवणी 
मनात,ह्रदयात फोटोत जपून ठेवलेल्या आठवणी
प्रेम,नाते एवढेचं काय आयुष्य संपते तरी उरतात त्या फक्त आठवणी