सहवासाच्या आठवणी
विरहात कामी येतात
दूर असूनही त्या क्षणांत
तिथे अलवारपणे नेतात
विरहात कामी येतात
दूर असूनही त्या क्षणांत
तिथे अलवारपणे नेतात
दुराव्याचा ग्रीष्म प्रखर
कोसळे आठवणींच्या सरी
भास आभासांचा खेळ सुरू
भेट होईल तेव्हा वाटे खरी
कोसळे आठवणींच्या सरी
भास आभासांचा खेळ सुरू
भेट होईल तेव्हा वाटे खरी
भावना कैद होतात मनी
आस मिलनाची लागे फार
अंतर कमी होईल कधी?
चिंता होईल ना हद्दपार?
आस मिलनाची लागे फार
अंतर कमी होईल कधी?
चिंता होईल ना हद्दपार?
गेलेल्या क्षणांची उजळणी
पुरे चालू ठेवण्यास श्वास
कधी खाण्यास मिळेल ?
संगतीने सुखाचा घास
पुरे चालू ठेवण्यास श्वास
कधी खाण्यास मिळेल ?
संगतीने सुखाचा घास
© विद्या कुंभार
सदर कवितेचे हक्क लेखिकेकडे आहेत.
फोटो सौजन्य:साभार गुगल
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा