शाळेतील काही मजेदार किस्से..(#विनोदी कथा स्पर्धा)

School Memories Of Some Happiness In That Time.


शाळेतील काही मजेेेेदार किस्से.....(#विनोदी कथा स्पर्धा)

©साक्षी

*******************************************


आज आपण सगळे इथे जमलोय कशासाठी माहितीये? नाही माहिती.... अहो, असं काय करताय आपण इथे जमलो आहोत, कारण आपल्या लाडक्या ईरा ब्लॉगिंग ची विनोदी कथांची स्पर्धा आहे ना...! विसरलात का?? काय म्हणता, मीच विसरले होते....आज शेवटची तारीख आहे.... अरे बापरे...!मग मला लगेचच विनोदी कथा लिहावी लागेल....तशी मी ही कथा किंवा किस्से पहिल्यांदाच लिहिणार आहे...नक्की वाचा हं...!

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेतील काही ना काही गमती-जमती या असतातच....माझ्या आहेत का? अहो, आहेत की, त्यातले काही किस्से किंवा प्रसंग मी तुम्हांला सांगणार आहे.....तसेच आपण काल्पनिक सुद्धा काही किस्से बघू....

मी स्वतः शाळेत असताना माझ्या मित्रिणी बरोबर झालेली गंमत म्हणजे अशी की.....

आम्ही सगळे 8वी 9वीत असू तेव्हा मी आणि माझ्या मैत्रीणी आमच्या एका मैत्रिणीला एका मुलाच्या म्हणजे तो आमचाच मित्र होता... अजूनही आहे....त्याच्या नावाने चिडवत होतो...

मी खरंतर नाव सांगितलं असतं पण सध्या मी तिचं आणि त्याच नाव सांगितलं तर मला दोघही फाडून खातील.....कारण त्याला आम्ही तिला त्याच्या नावाने चिडवत होतो हे अजूनही माहिती नाही.....

तर झालं असं, की आम्ही तिला ऑफ तासाला चिडवत होतो.... आणि अचानक तिला कोणाचातरी धक्का लागला.... आमच्या शाळेतले बेंच म्हणजे ते जॉईंट असतात ना ते लिहायचा आणि बसायचा बेंच खालून जॉईंट असतो अगदी तसेच होते...अजूनही असतील....

नेमका त्यात मैत्रिणीचा पाय अडकला..... आणि ती नेमकी आमच्या त्याच मित्राच्या अंगावर जाऊन पडली, ज्याच्या नावाने आम्ही तिला चिडवत होतो.....

सगळ्यांनी ते पाहिलं आणि पूर्ण वर्ग हसायला लागला....आमचा तो मित्र गांगरून गेला, पूर्णपणे गोंधळला आणि त्याने तिला ढकलून दिलं....

ती बिचारी त्याने अचानक ढकलल्याने तिला काहीच अंदाज आला नाही..... तिचा पाय अडकला आमच्या त्या जॉईंट बेंच मध्ये आणि बिचारी जोरात कंबरेवर पडली....बहुदा पार्श्व भागावर....पण ती हे आम्हाला कशी सांगेल ना...!

अख्खा वर्ग बिचारीवर हसत होता...आणि ते मैत्रीत म्हणतात ना, तू पडलीस तर मी तुला उठायला मदत नक्की करेन पण माझं हसणं संपल्यावर.....

तसंच काहीसं झालं आम्ही सगळ्या मैत्रिणी हसण्यात गुंग झालो आणि नंतर तिला उठायला मदत केली.....
आणि जी मैत्रीण पडली तीसुद्धा हसून लाल झाली होती....

अजूनही आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आहोत... हा किस्सा आठवला की आम्ही अजूनही तेवढ्याच मोत्याचे हसतो....बहुतेक आमच्याबरोबर हा किस्सा घडला म्हणून असेल कदाचित, पण हे लिहितांना सुद्धा मला खूप हसायला येतंय....

*******************************************


शाळेतल्या बेंच वर कोणी कोणी काय काय लिहिलं असेल, मला माहिती नाही.... पण आम्ही मात्र आमच्या बेंच वर फार काही लिहून ठेवायचो.... काय काय लिहून ठेवायचो विचारताय?

गाणी, मित्र- मैत्रिणींची नावं सगळं सगळं लिहायचो....

आम्ही त्यावेळी शाळेत असतांना संस्कृत घेतलं असल्याने आम्हाला संस्कृतला एकच मॅडम होत्या... अगदी तिन्ही वर्षी म्हणजे 8वी, 9वी आणि 10वी....

आम्हाला संस्कृत च्या तासाला बाजूच्या वर्गात जावं लागायचं.... आणि त्या वर्गात गेल्यावर जिथे जागा मिळेल तिथे पटकन बसायचं...हे आमचं ठरलेलं होतं....

एक दिवस असंच आम्ही जाऊन बसलो... आणि नेमक्या त्या मॅडम आमच्या बेंच जवळ येऊन उभ्या राहिल्या.... आणि त्यांनी बेंच वर लिहिलेलं एक वाक्य वाचलं ते वाक्य असं होतं...

"i love you M...." आणि नेमकी माझी जीवा भावाची मैत्रीण तीचं नाव सुद्धा M वरून सुरू व्हायचं....पण आता काय मॅडम ना वाटलं की ते आम्हीच लिहिलं आहे....

पण ते वाक्य लिहिणारं सुद्धा कार्ट आमचाच मित्र होता... हो, पण ते वाक्य त्या मैत्रिणीसाठी नव्हतं...

मॅडम नी आम्हाला खूप वेळा विचारलं की हे सगळं कोणी लिहिलं.... पर दोस्ती तोडना नहीं चाहते थे हम......म्हणून आम्ही या वर्गात नाहीये आम्ही बाजूच्या वर्गात आहोत आम्ही या वर्गातल्या कोणालाही ओळखत नाही असं खोटं कारण देऊन विषय संपवावा लागला.....

पण हा विषय असा तसा संपणार नव्हता, मॅडमची बरीच बोलणी आम्हाला खावी लागली.... आणि आमचं अक्षर सुद्धा त्यांनी जुळवून पाहिलं....त्यांच्या नजरेत आम्ही दोषी ठरलो....

नंतर मात्र त्या मित्राला आम्ही चांगलंच धारेवर धरलं..... ते म्हणतात ना आपण लिहितो कोणासाठी, वाचत कोण, आणि गैरसमज झाल्याने ओरडा कोणा भलत्यालाच पडतो तसं काहीसं आमच्या बाबतीत घडलं..... चूक आमची नसतानाही आम्हाला त्याची शिक्षा भोगावी लागली.....


*******************************************


आम्हाला शाळेच्या बेंचवर आम्ही स्वतःच्या हातांनी लिहिलेलं गाणं अजूनही आठवतं.....

मी आणि माझ्या मैत्रिणीने दोघींनी मिळून \"यारा \"तेरी यारी को\" ह्या गाण्याचं एक कडवं बेंचवर लिहिलं होतं....त्याखाली आमच्या दोघींची नावं सुद्धा होती....

पण आम्हाला आमचा बेंच ओळखू यावा म्हणून आम्ही या करामती करायचो.... असं का करावं लागायचं? अहो, कारण बेंचवर जरी आम्ही दोघीच बसणार असू, तरी आम्हाला तीन जण बसतील असा मोठा बेंच लागायचा....

आम्ही लवकर शाळेत पोहोचलो की बदललेला बेंच पुन्हा आमच्या बेंचच्या जागी घ्यायचो....

एक दिवस आम्ही बेंच बदलत असताना,एका मैत्रिणीने पाहिलं.... बरोबर आहे सगळ्यांनाच आरामात बसायासाठी मोठे बेंच लागायचे....

पण ते म्हणतात ना, आपल्या स्वार्थासाठी कोणीही काहीही करू शकतं.... तसंच झालं, तिने सरांना आमचं नाव सांगितलं....

"तुम्हाला तो बेंच का हवा आहे? असू देत कोणीही आज पासून बेंच सरकवायचे नाहीत..." सरांनी सगळ्यांनाच ताकीद दिली....

मग आम्ही एक दिवस मोठा बेंच घेतला आणि त्यावर आमचं नाव आणि गाणं लिहून आमचा बेंच बुक केला.....


*******************************************


ट्रॅप तयार आहे का? व्यवस्थित सगळ्या ठिकाणी माणसं उभी आहेत की नाही? आज जर तो हातून निसटला तर आपलं काही खरं नाही....

त्याला पकडायला त्याचा विक पॉईंट शोधला आहे मी.... मी सांगतो तसं तुम्ही करा, आता जर तुम्ही माझं ऐकलं नाहीत ना तर .....

"सगळं करून सुद्धा काय उपयोग झाला तुमचा, गेलाच ना तो पळून....पुन्हा एकदा काही ना काही करून ठेवेल तो....माझं किती नुकसान झालं कळतंय का तुम्हाला..." चिडलेला आवाज ऐकू आला....

आणि तेवढ्यात बाहेरून आवाज आला, "येस, येस....! " तुम्हाला दोघांना म्हंटल होतं ना की काहीही तक्रार येऊ न देता त्याला पकडून दाखवेन....

हे बघा दाखवलं की मी करून...आता मला चॉकलेट्स पाहिजेत म्हणजे पाहिजेत.... दिनकर आणि दिव्या चा मुलगा अरुण बाहेरून आता आला आणि त्याच्या हातात एक उंदीर होता....

जो घरात घुसल्याने कालपासून अरुणचे आई-बाबा वैतागले होते.....आईच्या साड्या आणि बाबांच्या फाईल्स उंदराने कुरतडल्या होत्या...

अरुण ने नवीन ट्रॅप तयार करून त्या उंदीर मामाला पकडायची तयारी केली होती....आणि ती सफल झाली..... आता त्यांच्या घरात सगळेच खुश आहेत....

*******************************************


सध्या राजनचं ऑफिस कोरोनामुळे ऑनलाईन सुरू आहे....आणि राजन हा सेल्स मॅनेजर असल्याने त्याला प्रत्येक वेळी मीटिंग अटेंड करावीच लागते....

आज नेमका त्याला उठायला उशीर झाला....नंदिनी ने त्याला उठवलं...

"राजन अरे उठ ना...! मीटिंग आहे ना..."

राजन घाईघाईत उठला आणि काय सगळं ऑनलाईन असल्याने,सगळं आवरायचं सोडून फक्त तोंड धुवून पावडर लावून मस्त वर कोट-बिट घालून तयार झाला... आणि व्हिडिओ चालू करून बसला...

मीटिंग अगदी व्यवस्थित सुरू होती.... त्याला अचानक क्लिक झालं की त्याने एक फाईल घेतलीच नाही... म्हणून तो फाईल घ्यायला उठला आणि सगळ्या मीटिंग मधले लोकं त्याला हसू लागले....

का हसू लागले विचारताय? अहो, तो फक्त वर कोट घालून बसला होता... खाली त्याची बरमोडा तसाच होता.....त्यांनतर राजन कधीच ऑनलाईन मीटिंग साठी नुसता वर कोट घालून बसला नाही....


*******************************************

विनोदी किस्से लिहिण्याची पहिलीच वेळ असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रतिक्रिया कळवा....आणि काही चूक असेल तर नक्की सांगा.....