Feb 24, 2024
प्रेम

मेहंदी ची जळमटे... पर्व दुसरे (भाग पहिला)

Read Later
मेहंदी ची जळमटे... पर्व दुसरे (भाग पहिला)

वाचकांनी मला दिलेल्या प्रेम आणि प्रोत्साहना बद्दल मी त्यांची खुप ऋणी आहे.. त्यांच्या साठी मी पुन्हा प्रयत्न करत, मेहंदी ची जळमटे कथेच पुढचं पर्व लिहायला सुरुवात केली आहे. ह्या पर्वात देखील तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. नवीन वाचकांना विनंती, मागील पर्व वाचा. लगेच वाचून होईल. भाग मोठे नाहीयेत..
 

मेहंदी ची जळमटे... पर्व दुसरे
भाग पहिला

एका वेगळ्या वळणावर आलेल्या आयुष्यात कावेरी स्वतःला सावरू पाहत होती. पण अभय च मनात असलेलं प्रेम तिला ते तिला करू देत नव्हतं. कधी भावनांचा तोल जाऊ नये म्हणून अभय च्या घरी येणं जाणं देखील तिने मुद्दाम कमी केलं. पण आठवणी..? त्यांच काय..? जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात लपून राहिलं तरी प्रिय व्यक्तींच्या आठवणी आपला पिच्छा कधीच सोडणार नाही. तरीही तिने काही दिवस ह्या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी पुण्याला आपल्या काकांकडे राहायला जाण्यासाठी ठरवलं. कोणालाही न सांगता ती निघणार होती. पण तिचं मन विचलित होत होतं. म्हणून ती आभा च्या घरी त्यांना भेटायला गेली.

जाताना मुद्दाम तिने अभय च्या आवडीचा ड्रेस घातला होता. मरून कलर चा लखनवी कुर्ता त्यावर ऑफ व्हाईट कलर चा प्लाझो आणि वन साईड ओढणी. ती जेव्हा ही हा सूट घालायची तेव्हा अभय ने दिलेल्या आजवर च्या सगळ्या कॉम्पलीमेंट्स तिच्या लक्षात होत्या. सोबतीला कानात सिल्व्हर झूमके, साधी पावडर, डोळ्यांत काजळ आणि बारीकशी टिकली लावून ती तयार झाली. आपण चुकीचं वागतोय हा विचार मनात एकदा दोनदा तिच्या येऊन गेला पण आज शेवटचं म्हणून ती निघाली.

दारावरची बेल वाजवली पण बेल चा आवाज आला नाही पाहून तिने दार ढकलल तर ते उघडं होतं. तिने आत डोकावून आभा ला आवाज देणार तितक्यात तिचं लक्ष समोर गेलं. अभय ने सायलीचा हात धरला होता आणि सायली तो हात सोडवण्यासाठी लडिवाळ प्रयत्न करत होती. तिचं हृदय अगदी जोरजोरात धडकू लागलं. ती तशीच दारावर उभी होती की पाठून आभा ची आई आली.

"अग कावेरी.."

"अं.. काकु.. ते मी.." तिला खुप ओशाळल्या सारखं झालं. तितक्यात त्यांच पण लक्ष समोर जात.

"अरे अभय सायली.. काय चाललय तुमचं..? घरी कोण येतंय जातंय काही भान आहे की नाही तुम्हाला..?" आई आणि कावेरी ला समोर पाहून दोघंही घाबरले. अभय ने पटकन तिचा हात सोडला.

"आई अग ये ना आत. कावेरी ये बस.."

"तुमचे पराक्रम थांबतील तर येईल ना ती आत.

सायली मान खाली घालून कोपऱ्यात अजुनही उभीच होती.

"सायली बाहेरून आलोय आम्ही पाणी देशील का नाही. की तु सुध्दा अभय च्या पावलांवर पाऊल ठेवणार आहेस..?"

"आलेच." म्हणून ती किचन कडे वळली.

"आणि काय हे तु अजून अंघोळ केली नाहीस..?"

"नाही. जातोच आहे. कावे तु बस इथेच मी असा गेलो आणि असा आलो."

कावेरी ने ठीक आहे म्हणून सांगितलं. अभय वळला आणि समोरून सायली येताना दिसली तसा तो पुन्हा तिथेच तिला पाहत थांबला. सायली ला खुप लाजल्या सारख झाल. आईने घसा खवखवत त्याची तंद्रि मोडली.

"काय रे.. जातोय की नाही. की मी येऊ..?"

"हो आई हे काय जातोच आहे."

तो जाताच आईने दाबून ठेवलेलं हसू बाहेर काढलं.

"पाहिलंस ना कावेरी कसा हा आपला अभ्या."

कावेरी ने कसनुस हसत त्यांना प्रतिसाद दिला.

"सायली ही बघ ग आमची कावेरी. लहानपणा पासूनच आमच्या घरची लाडकी. जशी आम्हाला आभा तशी ही."

सायली ने आणलेलं पाणी देत असताना तिला हसून विचारपूस केली. कावेरी चं लक्ष तिच्यावर पडत. पिवळ्या रंगाची बांधणी साडी, हातात खळखळ वाजणारा हिरवा चुडा, छुमछुन वाजणार पायात पैंजण, भांगेत भरलेलं कुंकू, गळ्यात मंगळसूत्र आणि सगळ्यात महत्वाचं, पाणी देण्यासाठी पुढे केलेल्या तिच्या हातात असलेली हातभर मेहंदी. जी पाहून तिला तिच्या मेहंदी च्या जळमटांची आठवण झाली. सौभाग्य अलंकारात सजलेलं तीच नवी नवरीच रूप पाहून तिला स्वतःच रूप फिक वाटू लागल. उगाच इथे आलो अस तिला वाटून गेलं. आधीच झालेल्या दुखऱ्या मनावर अजूनच घाव पडत होते. दोघींशी जुजबी बोलणं झाल्यावर ती निरोप घेऊन जायला उठली. पण आईने अडवल.

"नाही खरच नको.. सामानाची बांधाबांध देखील अजुन बाकी आहे."

"मला बाई काही पटत नाही हं तुझ हे अस अचानक निघून जाणं. अग हवं तर इथेच ये काही दिवस राहायला. बरं वाटेल तुला. सायली सोबत देखील गट्टी जमेल तुझी."

"पुन्हा कधीतरी नक्की येईल काकु.. तुम्ही आता फक्त आभा ला बोलवा. नाहीतर मीच जाते खोलीत तिच्या."

"अग बाळा आभा तर बाहेर गेलीय. ते ती जात असलेल्या अनाथालायात, स्कूल किट्स डीस्ट्रीब्युशन आहे ना पर्वा. म्हणून बोलतेय तु थांब येईल ती तोपर्यंत."

ठीक आहे बसते म्हणून कावेरी तिथे बसते. नुकतीच अंघोळ करून बाहेर आलेला अभय, सायलीला आत येण्याचा इशारा करत तिथून निघतो. काही क्षणांनी सायली देखील बहाणा करून तिथून सटकते. दोघांच्या हालचालींवर नजर ठेवून असलेल्या कावेरी ला आता सगळं असह्य झाल्याने ती तिथून निघण्याचा विचार करत आपली पर्स उचलते.

"काकु मी परत कधीतरी येईल. आता मला निघाव लागेल."

"अग पण तु थांबणार होतीस ना मग अचानक काय.."

"हो काकु पण खुप काम पेंडिग आहेत ती करून जायची आहे. निघते मी सॉरी."

"अग पण.." पुढे काही बोलायच्या आतच कावेरी तिथून पटकन निघून जाते. बिल्डिंग च्या पाठीमागे सुमसान अश्या जागी येताच तिथे कोणी नसल्याची खात्री करून आपल्या डोळ्यांतील आसवांची वाट मोकळी करून देते. झालेले प्रसंग तिच्या डोळ्यापुढे सारखे उभे राहत होते. वेळीच जर का आपल्या भावना अभय ला सांगितल्या असत्या तर आज सायली च्या जागी आपण असतो ह्याचा आज तिला पच्छाताप होत होता. तिथून घरी जाण्यासाठी, स्वतःचे डोळे पुसून तिने स्वतःला शांत केलं आणि निघाली पण मनातली दाह कमी होत नव्हती.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

पर्वा असलेल्या स्कूल डीस्ट्रीब्युशन च्या तयारी साठी बाहेर निघालेली आभा, ऑटो करिता वाट बघत होती. घाईच्या वेळी एकही मिळत नाही म्हणून तिची चिडचिड होत होती. तितक्यात एक ऑटो आली आणि तिने हात दाखवला. ऑटो जवळ पोहचणार की तेवढ्यात एक व्यक्ती त्या ऑटो मध्ये बसायला गेला. आभा ने जोरात त्याला आवाज देत थांबवलं.

"अरे ओ.. काय..? मी थांबवलीय आधी ऑटो.."

"अहो मॅडम मला जाऊद्या ना! खुप उशीर झालाय."

"लवकर यायचं ना. आधी मी थांबवलीय. सरका तुम्ही. व्हा बाजूला."

"मॅडम अहो खुप काम आहेत म्हणून प्लीज."

"म त्याचा काय संबंध. काम तर सगळ्यांनाच असतात. मला ही महत्वाचंच काम आहे."

"अहो कसं सांगू तुम्हाला. जीवनाचा प्रश्न आहे. आता तरी जाऊ द्याल की नाही..?"

"अरे बापरे! आधी सांगायचं ना. जा तुम्ही मी दुसरी बघते."

"ओ चला पटकन मी सांगतो तुम्हाला कुठे न्यायचं ते." अस म्हणत ती रिक्षा तिथून निघून गेली. खुप वेळाने आभा ला रिक्षा मिळाली.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

(आभा च्या घरी)

"सायली, इथे ये बरं जरा."

"हो आज्जी आलेच." सायली हातातलं काम आटपून घाईघाईने आज्जीच्या खोलीत जाते.

"हा आज्जी. बोला ना काय झालं..?"

"काय करत होतीस. इतका उशीर लावलास यायला."

"अहो मी ते मॅगी बनवत होते."

"का घरात काही नाही खायला..?"

"आहे ना.. पण मेथीची भाजी आहे. जी मला अजिबात नाही आवडत."

"अग सायली, काय ग तु पण ना. बरं इथे ये बस माझ्यासमोर."

"अहो पण ते.."

"अग कोणी नाही खाणार तुझी मॅगी. ये बस इथे." सायली जाऊन आज्जीसमोर त्यांच्या बेडवर जाऊन बसते. आज्जी उठून आपल्या कपाटातून एक सुंदर कोरीवकाम केलेला लाकडी बॉक्स काढतात. आणि सायली पुढे येऊन बसतात. त्या बॉक्स मध्ये काय असेल, तिलाही उत्सुकता लागली होती.

"हे घे. तुझ्यासाठी." सायली तो बॉक्स उघडून पाहते. त्यात दोन सोन्याच्या पाटल्या होत्या.

"आज्जी पण ह्याची काय गरज. ह्या तर तुमच्या आहेत ना..?"

"जशी प्रत्येक सासू आपल्या सुनेला काही ना काही देत असते. तशी माझ्या सासूने देखील ह्या मला दिल्या होत्या. तसचं मी तुझ्या सासूला दिल्या. तिने सुरवातीचे दिवस ह्या घालून नंतर माझ्या कडे आणून ठेवल्या. तसं तु देखील, आता आपल्या घरी कार्यक्रमात घाल मग तुझ्या सासू कडे दे सांभाळायला."

"ठीक आहे. मी आलेच." म्हणून ती निघून गेली.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

डीस्ट्रीब्युशन साठी लागणार साहित्य घेता घेता तिला खुप उशीर होणार होता. तिने ऍडवान्स पेमेंट करून डिलेवरी ची ऑर्डर देण्याचा विचार करून हिशोब लावत होती आणि घाईतच तिथून चालत होती की समोरच तिला टपरी दिसली. खुप थकली असल्याने दोन चहाचे घोट घेऊन निघू म्हणून ती त्या दिशेने वळली. टपरी च्या जवळ येताच तिने पाहिले, समोर एक व्यक्ती उभी होती. एका हातात चहा पीत आणि दुसऱ्या हातात पेटलेली सिगारेट होती. त्याला पाहून आभा चा पारा मात्र खुप तापला कारण हा तोच व्यक्ति होता जो मगाशी तिने थांबवलेल्या रिक्षात बसून गेला होता. ती जाऊन त्याच्या समोर उभी राहिली.

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Akshata Kurde

Author

स्वप्नातली सुंदर दुनिया शब्दांत व्यक्त करायला चालतेय ह्या वळणावर..

//