मेहंदी ची जळमटे... पर्व दुसरे (भाग सहावा)

न रंगलेल्या मेहंदी च्या जळमटांत रंग भरताना...

मेहंदी ची जळमटे... पर्व दुसरे

भाग सहावा

इतकं बोलून दोघं एकमेकांना आपले नंबर शेअर करून कुठे आणि केव्हा भेटायचं ठरवून निरोप घेतात. जाता जाता आभा ला आठवलं की कावेरी देखील पुण्यात तिच्या काकांकडे आलेली असते.

तिला लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मार्गी लावायच्या होत्या. काहीही करून तिला सगळं जाणून घ्यायचं म्हणून ती लगेच तिला कॉल करून, ती देखील पुण्यात असल्याचे सांगते आणि तिच्या काकांच्या घरचा पत्ता घेऊन ती तिला भेटायला जाते. तिकडे गेल्यावर ती तिचा पाहुणचार झाल्या नंतर काकांची विचारपूस करून त्यांची रीतसर परवानगी घेऊन कावेरी ला तिच्या हॉटेल मध्ये आजच्या दिवसासाठी घेऊन आणि उद्या सकाळी इथे तिला सोडून जाण्याचे प्रॉमिस करून घेऊन जाते.

रस्ता भर अबोल असलेली कावेरी, हॉटेल च्या रूम मध्ये आल्यावर देखील ती गप्प गप्प होती. तिच्या चेहऱ्यावर आलेली दुःखाची छटा, आभा पहिल्यांदाच पाहत होती. फ्रेश होऊन दोघी खाली नाश्ता करण्यासाठी गेल्या. कावेरी ला काहीच खायची इच्छा नसताना ही आभा ने तिला बळजबरीने आणलं होतं. कावेरी ने थोडफार नावाला खाल्ल. दोघी पुन्हा रूम मध्ये आल्या. आभा ला अजुन हा अवघडलेपणा नको होता म्हणून तिने सरळ विषयाला हात घातला. तिने अलगत तिच्या डोक्यावर हात फिरवत तिला, तिच्यावर पूर्ण विश्वास असल्याचे कावेरी ला सांगितले.

तशी कावेरी जोरजोरात रडू लागली. आजवर थांबवलेल्या आसवांना तिने वाट मोकळी करून दिली होती. आभा ने देखील तिला न थांबवता रडू दिलं. थोड्या वेळाने ती शांत होतच तिला पाणी दिलं. लहानपापासूनच ते आतापर्यंत कावेरी ने तिचं अभय वर असलेलं प्रेम तिच्यापुढे मांडल. त्या दिवशी भावनेच्या भरात तिच्या कडून झालेली चूकही तिने मान्य केली. पण सोन्याच्या पाटल्यांबद्दल तिला काहीच माहीत नसल्याचे तिने सांगितले.

इतक्या वर्षात आपल्याला कसे कळले नाही म्हणून आभा ला आश्चर्य वाटले. अभय वर असलेलं प्रेम पाहून तिला कावेरी बद्दल वाईट वाटू लागलं. कावेरी चा स्वभाव ओळखून असल्याने तिला ह्या गोष्टीचा काहीच राग आला नव्हता. उलट आता वेळ उलटून गेल्याचे आणि तिने वेळीच व्यक्त न झाल्याची खंत तिला वाटली. खुप वेळ झाल्याने दोघी झोपायला गेल्या पण आभा ला काही झोप येत नव्हती. आता लवकरात त्या चोराला कसं पकडाव म्हणून ती विचार करू लागली.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

सारसबागेत

कावेरी ला तिच्या काकांच्या घरी आणताच तिलाही तिथे राहण्याचा आग्रह कावेरी ने केला. मग दुपार च जेवण तिथेच करून आणि काही गप्पा गोष्टी करून आभा संध्याकाळी श्रीकांत ला भेटायला गेली. खरतर तिला खुप अवघडल्या सारखं वाटत होत, पण त्याची काल ओळख आणि आणि मदत ही खुप झाल्याने ती तिने त्याला भेटण्याचे ठरवले होते. श्रीकांत कावेरी ची वाट बघत होता. तिला पाहताच क्षणी तो तिच्यात हरवून गेला जसा पहिल्या भेटीत हरवला होता. त्याला स्वतःला त्याच्या नशिबाच खुप कौतुक वाटलं की तिला पुन्हा भेटली. त्याच क्षणी तिला लग्नाची मागणी घालून कायमची आपली बनवण्याचा विचार त्याच्या मनात डोकावून गेला पण एका भेटीतच प्रेम कसं होईल आकर्षण देखील असू शकतं म्हणून त्याने त्या विचाराला बाजूला केलं. तिच्या साठी त्याने आणलेली कॅडबरी देऊन तिच्याशी मैत्री केली.

"वाऊ.. कॅडबरी..? मंडळ आपलं मनापासून आभारी आहे." दोघे ह्या वाक्यावर खळखळून हसले.

"आभा तुम्हाला काही विचाराचे असेल तर विचारून घ्या मला."

"का आपण मॅट्रीमोनियल साईड वर भेटलो आहोत का..?" आभा त्याची फिरकी घेत बोलली.

"अहो नाही तसं नाही म्हणजे तसा मी अनोळखी च वाटत असेल ना."

"सगळे आधी अनोळखी च असतात मग ओळख वाढून त्याच रूपांतर मैत्रीत होतं. आणि तसंही काल तुम्ही सगळं काही सांगितलं तर होत तुमच्या बद्दल."

"अं..हो बरोबर आहे."

दोघं बोलत असताना च त्याने तिला कालच्या गोष्टीची आठवण करून दिली. आभा ने देखील त्याला सगळं खर खर सांगून टाकलं. त्याला खुप वाईट वाटलं. आदित्य चा विषय आल्याने आभा देखील खुप दुःखी झाली. त्याने तिची माफी मागितली. आणि त्याचा फोटो दाखवण्यास आभा ला विचारले कारण तसेच त्याच्या घरी देखील असाच त्याच्या भावाचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

आधीच त्याच्या विचाराने दुःखी झालेली आभा त्यावर दुर्लक्ष करून त्याला त्याचा फोटो दाखवण्यास तिने टाळलं. पुढे त्याच्या कामानिमित्त च दोन दिवस मुंबईत यावे लागले असं श्रीकांत सांगत असताना त्याच्या बोलण्यात आदित्य चे नावं आले. दोघांचे नाव सारखे च आढळून आल्याने आता मात्र आभा ने त्याचा फोटो दाखवण्यास सांगितला. योगायोगाने म्हणा किंवा नियतीचे चक्र पण त्या फोटोतला व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसुन आदित्य होता.

तो फोटो पाहून आभा थक्कच झाली. तिला काहीच कळतं नव्हतं काय बोलावं. तिने हाच तो आदित्य असल्याचे सांगताच श्रीकांत देखील सुन्न झाला. आपल्या भावाची होणारी बायको ही होती आणि आपण नको ते विचार करत बसलो म्हणून त्याला त्याची लाज वाटू लागली तर दुसऱ्या बाजूला त्याचा हिरमोड झाला. आभा ला हवी नको ती सगळी माहिती श्रीकांत कडून मिळाली होती. जी ऐकुन तिलाही तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता. त्याचा निरोप घेऊन ती निघू लागली.

"निघते मी. आज पुन्हा एकदा तुम्ही मला अशी मदत केलीय की खरच कसे तुमचे आभार मानू कळत नाही."

"आभार मानले नाही तरी चालेल पण आपली मैत्री कधी नका तोडू."

"मैत्री फक्त नात नाही तर बंधन असतं. आणि अशी बंधने कधी सहजा सहजी तुटत नाहीत." ती हसून म्हणाली आणि तिथून जाऊ लागली. श्रीकांत तसाच तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला. आता पुन्हा कधी भेट होईल नाही त्याला काहीच माहीत नव्हत. हताश होऊन तो तिथेच बसून राहिला.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

आभा नुकतीच तिच्या हॉटेल मधल्या रूम वर आली होती की तितक्यात तिला अभय चा कॉल आला.

"हॅल्लो बोल अभी."

"कधी येणार आहेस तु..?"

"अरे थोड काम होत म्हणून थांबले होते पण आता झालाय सगळ काम सुरळीत. लवकरच येईल उद्या." अभय च बोलणं तिला खटकत होत म्हणून ती त्याला फोर्स करून काय झालं विचारते.

"तु सांगणार आहेस की नाही अभी. हे बघ मी.."

"सांगतो.. ऐक.. सायली घर सोडून निघून गेलीय पुण्याला."

"काय..? का पण..?"

"आल्यावर सांगतो तुला सगळं तु आधी घरी ये."

"नाही अभी. आता तु सगळ्यांना घेऊन इथे पुण्यात येणार आहेस. ते ही उद्याच."

"म्हणजे..?"

"उद्याच सगळा सोक्षमोक्ष लावून टाकणार आहे मी. तु प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. कसं ही करून घरातल्या सगळ्यांना घेऊन पुण्यात ये. बाबांना हवं तर मी समजावते."

"ठीक आहे."

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

रात्री जेवताना अभय हा विषय काढून सगळ्यांना उद्या पुण्याला जाण्यासाठी निघायचं आहे म्हणून सांगतो.

"मला तर काही कळत नाहीये काय चाललंय आपल्या घरात. कुणास ठाऊक कुणाची नजर लागली." आज्जी कुत्साहित पणाने बोलली.

"आई.. तिथे गेल्यावर कळेल ना नेमकं काय कारण आहे. मग का विचार करत त्रास करून घेताय तुम्ही. आम्ही कळवू तुम्हाला काय होईल तिथे ते."

"कळवू म्हणजे मी सुद्धा येणार आहे तिथे. वसंता कितीही नाही बोलला तरी मी येणार."

"बरं आई आणि आज्जी तुम्ही जा लवकर झोपून घ्या म्हणजे सकाळी लवकर उठू."

"अभी तु जा हे येतील तो पर्यंत मी जागीच राहणार आहे. तुम्ही जाऊन झोपा जा."

"बरं आई..!"

बाबा आल्यावर आई त्यांना सगळं सांगतात आणि उद्या पुण्याला जायचं आहे हे देखील सांगते. त्यावर त्यांना आधीच आभा ने सार काही सांगून ठेवलंय हे सांगतात आणि तिच्यावर विश्वास ठेवून उद्या काय ते कळेल म्हणून चर्चा थांबवतात. पण घरात कोणालाही आभा च्या डोक्यात काय विचारचक्र चालू आहे ह्याचा काहीच अंदाज नसतो. अभय देखील विचार करून थकला होता. त्याला देखील नीट शांत झोप येत नव्हती. सायलीची काळजी देखील वाटत होती. आणि दुसऱ्या बाजूने तिचं आजचं वागणं त्याच्या मनाला खुप दुःखवून गेलं. घरातले सगळे इतके प्रेम करत असताना सुद्धा तिने अस घर सोडून निघून नको जायला हवं होतं. एकप्रकारे सगळ्यांचा अपमान च झाला होता.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

(दुसऱ्या दिवशी)

सकाळपासून च घरात गडबड चालू होती. अभय आज्जी ला हाथ धरून गाडीत बसवत होता. आई घरात कुलूप शोधत होती. बाबा राहिलेलं सामान गाडीच्या डिक्कित ठेवत होते. आभा ने सकाळीच कॉल करून निघण्याची तयारी सुरू झाली का विचारायला अभयला कॉल केला होता. तिकडे ती सुद्धा सगळ्यांच्या जेवणाची आणि रूम्स व्यवस्था करायला हॉटेल च्या मॅनेजर ला सांगायला गेली.  बाबा आणि अभय आई ला आवाज देत होते.

"अग आई चल ना लवकर. ट्रॅफिक लागतं ग मग उशीर झाला की."

"थांब झालंच. कुलूप लावतेय." तितक्यात आईचा फोन वाजतो. आई अभय ला आवाज देत त्याला फोन उचलायला सांगतात.

"आई, सायली च्या आत्या चा फोन आहे. धर बोल तु." आई फोन उचलतात.

"हॅल्लो..बोला."

"अहो कुठे आहात तुम्ही..?"

"आम्ही पुण्याला यायला निघालोय." सायली च्या आत्याला कदाचित हे अपेक्षित नव्हतं. त्या चपापल्या.

"का..?"

"आभा च काही काम आहे महत्वाचं. त्यासाठी च."

"आभा च काय इतकं महत्त्वाचं काम आहे की तुम्हा सगळ्यांना इथे तिने बोलवलं आहे..?"

"ते आम्हाला ही काही माहीत नाही. त्यासाठीच जातोय."

"बरं. पुण्याला आलात की सगळे घरी या. आम्हाला देखील तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचय."

"हे बघा आता तुम्ही नका आमच्या जीवाला घोर लावू. इथे आम्ही आधीच खुप काळजीत आहोत. काय ते सांगा ना आत्ताच."

"नाही नाही. ते तर तुम्ही इथे आलात तरच कळेल."

आधीच काळजीत असणारे पाटील कुटुंब आत्याच्या बोलण्याने आणखीनच काळजीत पडतात. आज्जी विठू माउली च नामस्मरण करत पुढे काय असेल त्या वाढलेल्या आव्हानांना तोंड देताना त्याच पाठबळ मागते. तिच्यासोबत सगळे माउली च नावं घेत पुण्याला निघतात.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

आभा कावेरी ला फोन करून तिच्या हॉटेल वर बोलावून घेते. तिला आधीच सगळ्या गोष्टींची कल्पना ती देऊन ठेवते. दोघीही सगळे येण्याची वाट पाहत असतात. थोड्या वेळात सगळे हॉटेल वर पोहचतात. आभा खाली जाऊन त्यांना रूम मध्ये घेऊन येते. तिथे असलेल्या कावेरी ला पाहून सगळे अचंबित होतात आणि अभय ला कधी नव्हे तो पहिल्यांदा तिला पाहून राग येतो.

"आभा ही इथे काय करतेय..?" तो जरा चिडून च बोलला.

"हो आभा, झाला तितका तमाशा पुरे नाहीये का. की अजुन काही नवीन..?" अभय सोबत आई देखील आभा ला विचारू लागल्या. कावेरी बिचारी मान खाली घालुन न केलेल्या चुकीचे बोलणे खात होती. आपली माणसं म्हणून काही बोलू देखील शकत नव्हती. तिचा स्वभाव च तसा होता. तसही आभा ने आज ह्याच गोष्टींचा छडा लावण्यासाठी सगळ्यांना बोलावून घेतले होते. म्हणून ती तिच्या बोलण्याची वाट पाहत होती.

"मी सगळं सांगते. त्यासाठीच बोलवलं आहे. आधी तुम्ही बसून तरी घ्या." आभा ने सगळ्यांना बसायला सांगितलं. सगळ्यांना पाणी वैगरे देऊन ती देखील समोर बसली आणि बोलू लागली.

"आई बाबा आज्जी आणि अभय, आपल्या घरातल्या पाटल्या हरवल्या गेल्या आणि नाव कावेरी वर आलं. पण त्या कावेरी ने नाही घेतल्या."

"हे सांगायला तु इथे बोलवलं आहे का..? आणि बाबांनी तो विषय संपवला होता ना, मग परत परत का तोच विषय..?" आई जरा चिडतच कावेरी वर एक कटाक्ष टाकत, आभा ला विचारते.

"आई, ऐक जरा माझं. त्या पाटल्या हरवल्या नाहीयेत."

"आभा काय बोलतेय तु..? आम्हाला कोणालाही काही कळत नाहीये. सगळ्यांना कळेल असं सांग बाळा." आज्जी

"बरं. मी पहिल्यापासून सांगते. अभय तुला सायली ने काही सांगितलं होत तिच्या लग्नाआधी च्या प्रेमाबद्दल..?"

"नाही. आणि मला जाणून देखील नाही घ्यायचंय. तो भुतकाळ होता. झाला संपला."

"तुला वाटतं तितकं सोपं नसतं अभी. भुतकाळ कधीच आपला पिच्छा सोडत नाही. आजही तुझ्यावर कोणीतरी प्रेम करणार आहे, जे तुला कधी दिसलंच नाही. दुसरी तिसरी कोणी नाहीये. आपली कावेरी आहे अभी ती." अभय सोबत च बाकी सगळे देखील हे ऐकुन थक्क होतात. आभा पुढे आतापर्यंत झालेला सगळा वृत्तांत सांगून टाकते. कावेरी च अभय वरील प्रेम, आदित्य च्या अपघातामुळे तिला व्यक्त न करता आलेल्या भावना, मग अचानक तुझ ठरलेलं लग्न, लांब होण्याचा प्रयत्न, भावनेच्या भरात केलेली चूक, आणि हे पाटल्या प्रकरण. सगळ सगळ काही ती सांगून टाकते. ज्याने घरचे सगळे अचंबित होतात. कोणालाही ह्या सगळ्या गोष्टींचा थांगपत्ताही नसतो. कितीही झालं तरी सगळे कावेरी ला ओळखायचे. तिचा स्वभाव जाणून होते त्यामुळे त्यांना तिच्याबद्दल फार वाईट वाटलं. खासकरून अभय ला अपराधी वाटायला लागलं. पुढे काय बोलावं कोणाला काही कळत नव्हतं. मग अभय च शांतता मोडत कावेरी सोबत समजावणी च्या सुरात बोलायला लागतो.

"बघ कावेरी मला काय बोलू काही कळत नाहीये ह्यावर. तरीही मी तुझ मन दुखावल्या बद्दल सॉरी बोलतो. प्लीज मला माफ कर."

"आणि काय ग जर का आधीच तु सगळं हे सांगितलं असत तर आमची देखील काही हरकत नसती. अभय ला नाही तर निदान आभा ला तरी सांगायचं." इतका वेळ शांत असलेले आभा चे बाबा बोलले.

"हो पण आता हे सगळं बोलून काही फायदा आहे का..? अभय च लग्न झालंय ना सायली सोबत. मग आता हे सगळं कशाला बोलायच." आज्जी आभा ला उद्देशून म्हणाली. आभा काही बोलणार तितक्यात कावेरी बोलू लागली.

"नाही आज्जी मी कोणत्या हेतू ने तुम्हाला हे सगळं सांगत नाहीये. फक्त मनातलं सांगायचं होत सगळ्यांना. तुम्हा सगळ्यांशी असलेलं नातं अतूट वाटायचं मला. पण सध्या सगळ्यांशी दुरावले गेलीय मी. एकाकी पडत जातेय. आणि त्यात हे गैरसमज, त्याने अजूनच भर पडली आणि मनात अढी निर्माण झाली. एकतर्फी प्रेम जपून ठेवणार होते स्वतःजवळ. पण नाही रोकू शकले स्वतःला. स्वतःच्या भावनांना. मी ही चूक मान्य करते पण खरच मला पाटल्यांविषयी काहीही माहीत नाही. लागलेलं लांच्छन दूर करायचे होते म्हणून बाकी अभय सायली च्या आयुष्यातून मी कायमची दूर निघून जाईल. विश्वास ठेवा माझ्यावर."

तितक्यात आईचा फोन वाजतो. परत आत्याचा फोन आला असतो.

"हॅल्लो"

"...."

"नाही आम्ही पोहचलो आभा थांबली आहे त्या हॉटेल वर."

"..."

"हो पण आभा ला आता घेऊनच येऊ तिथे. परस्पर कसं येणार. आणि काय आहे ते सांगाल का कारण चैन नाही ओ पडत आहे इथे कोणालाच."

"...."

"काय...? खर बोलता आहात का तुम्ही..?"

"...."

"हो हो. नाही. आम्ही लगेच निघतो." आईच्या चेहऱ्यावर क्षणा क्षणाला बदलणारे हावभाव पाहून सगळ्यांना काय झालं ते जाणून घेण्याची उत्सुकता झाली. फोन ठेवताच सगळे आईच्या उत्तराची वाट पाहू लागले.

"अभी चल आपल्याला लवकर निघायला हवं."

"झालं काय आई..?"

"अरे तु बाबा होणार आहेस. आणि मी आज्जी."

क्रमशः

🎭 Series Post

View all