मेहंदी ची जळमटे... पर्व दुसरे (भाग पाचवा)

न रंगलेल्या मेहंदी च्या जळमटांत रंग भरताना...

मेहंदी ची जळमटे... पर्व दुसरे

भाग पाचवा

तिने हो म्हणत अभयला सगळं सुरळीत होईल म्हणून समजावून तिथून निघू लागली. आणि मनात ह्या गोष्टींचा लवकरात लवकर छडा लावण्याचा विचार करू लागली. त्यासाठी लवकरात लवकर कावेरी ला भेटाव लागेल म्हणून तिने तिला उद्याच भेटण्यासाठी बोलवायचं होत म्हणून कॉल करायला गेली.

आभाने खोलीत येऊन मोबाईल हातात घेताच पाहिले, कावेरी चे भरपूर मिस्ड कॉल्स येऊन गेले होते. तिने लगेचच तिला कॉल केला पण लागला नाही, म्हणून तिला उद्या संध्याकाळी भेटण्यासाठी मेसेज केला.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

(कावेरी च्या घरी)

"कावेरी रडणं थांबव आणि काय ते खरं खरं सांगून मोकळी हो एकदाची. नको अजुन आम्हाला काळजीत पाडू."

"बाबा मला माफ करा माझ्या कडून चुकी झाली. माझं अभय वर लहानपणापासून प्रेम होत पण मी कधीच त्याला कळू दिलं नाही. त्याला सांगणारच होते पण त्याने त्याच लग्न ठरवलं सायली सोबत. मी खूप माझ्या भावनांना आवर घातला पण आज चूक झाली मी त्याला भावनेच्या भरात मिठी मारली." आणि कावेरी अजूनच हुंदके देत रडू लागली.

"बघ बाळा आता काहीच होऊ शकत नाही कारण त्याच लग्न झालंय. आता फक्त त्या पाटल्या मिळू दे आणि तुझ्यावरचा दोष मिटू दे. बास्स.. तरच माझ्या जीवाला चैन पडेल."

"बाबा मी उद्याच पुण्याला जायचं ठरवलं आहे. मला नाही आता राहायचं इथे."

"ठीक आहे बाळा. जा आता जाऊन आराम कर."

कावेरी तिच्या खोलीत झोपायला येते तेव्हा मोबाईल वर आलेला आभा चा मेसेज पाहते. उद्याच ती पुण्याला तिच्या काकांकडे जात असल्याचे सांगून तिला भेटता येणार नाही म्हणून तिला ती रिप्लाय करते. आणि फोन ऑफ करून ठेवते.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

(दुसऱ्या दिवशी)

दरवर्षी आदित्य पुण्यातल्या अनाथ मुलांच्या शाळेत स्कूल किट्स चे वाटप करायचा. ह्या वर्षी आभा ने त्याच्या वतीने त्या शाळेत जाऊन वाटप करण्याचं ठरवलं होत. निघताना आई बाबा, आणि आज्जी च्या आशिर्वादा सोबतच तिने आदित्य च्या फोटोला पाहून त्याच्या कडून बेस्ट लक विश मागून घेतलं होत. जाताना सायली सोबत बोलावं म्हणून ती गेली होती तिच्या खोलीत पण दरवाजा बंद होता म्हणून ती दार ठोकावणार तितक्यात आईने तिला थांबवलं. थोडावेळ एकटीला राहू द्या म्हणून तिने आईला सांगितलं होत तसं. मग आभा ने सुद्धा जास्त काही न विचारता पुण्याला रवाना झाली.

तिकडे कावेरी देखील आपल्या आईची गळाभेट घेऊन आपल्या बाबांसोबत पुण्याला निघाली. कालचे प्रसंग सारखे तिच्या डोळ्यांसमोर येत होते. स्वतःवर चोरीचा आळ आल्यामुळे ती खुप खचली होती. यापुढे भेटणं तर दूर आता अभय आणि त्याच्या घरच्यांसोबत चे सगळे संबंध संपुष्टात येणार होते. अभय च्या बाबांनी जरी विषय संपवला असला तरी लवकरात लवकर त्या पाटल्या मिळाव्यात म्हणून ती देवाकडे धावा करू लागली.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

(पुण्यातल्या आदर्श विद्यार्थी शाळेत)

आभा ला पुण्यात पोहचून बराच वेळ झाला होता. तिने हॉटेल मध्ये जाऊन घरी तसं कळवल होत. आता ती त्या शाळेत होती. तिथल्या शिक्षकांनी तिचे स्वागत करून सगळ्यांशी ओळख करून दिली होती. तितक्यात तिला स्कूल किट्स ची डिलिव्हरी देणाऱ्या माणसाचा कॉल येतो. तिथून ती शाळेच्या गेटवर जाते. तिथे एक टेम्पो आणि बाहेर माणूस उभा असतो. तिला पाहताच तो विचारतो.

"आभा पाटील..?"

"हो मीच."

"मॅडम ह्या टेम्पो मध्ये तुम्ही सांगितल्या तितक्या किट्स आहेत. आमची माणसं आत ठेवून येतील. त्याची चिंता करू नका."

"हो समोर जो हॉल आहे ना तिथेच ठेवायच्या आहेत."

"ओके. ते तुम्ही हाफ पेमेंट केलंय ना त्याची पावती द्या."

"पावती..? एक मिनिट बघते हा मी." आभा तिच्या बॅग मध्ये पावती शोधू लागते पण ती मिळत नाही. आधीच अर्ध पेमेंट केल्याने तिने येताना बाकी अर्ध पेमेंट आणलं होत. आणि आता पेड केलेल्या पेमेंट ची पावती तिला सापडत नव्हती. ती त्या माणसाला पावती नसल्याचं सांगून आणलेलं अर्ध पेमेंट त्याला देते सांगत, आता ह्या किट्स देण्याची रिक्वेस्ट करते. पण नियमानुसार पावती दाखवूनच तसं तो करू शकतो नाहीतर शक्य नसल्याचे तो सांगतो. आभा ला काहीच सुचत नव्हतं. ती पावती नक्की घेतल्याचे ही तिला आठवेना. तो माणूस टेम्पो मधील किट्स तो घेऊन जाणारच असतो की मागून त्याला आवाज येतो.

"ओ एक मिनिट थांबा. ही घ्या पावती." पावती देणारा माणूस तोच होता जो आभा ने थांबवलेली रिक्षा पकडून गेला होता आणि पुन्हा टपरी वर दिसला होता. टेम्पो वाल्याने पावती घेऊन ती तपासली. त्यानंतर तिची माफी मागून सामान उतरवायला सुरुवात झाली केली.


"तुम्ही..?" आभा त्याला पाहून आश्चर्य चकित झाली होती.

"हो मीच. त्यादिवशी टपरी वर ही तुमची पावती खाली पडली होती. तुम्हाला किती हाका मारल्या पण तुम्ही थांबल्याच नाही.

"मग म्हणून तुम्ही ही पावती द्यायला इथवर आलात..?"

"अहो नाही. मी पुण्यातला च आहे. इथे जवळच माझं घर आहे. तुमची पावती पहिली तर त्यावर ह्या शाळेचं नाव पाहिलं. अर्ध पेमेंट केलेलं आणि आज ची तारीख लिहिली होती पावती वर. म्हटलं, महत्वाचं असेल म्हणून देऊन येऊ आणि त्यादिवशी झालेला गैरसमज देखील दूर करून येऊ."

"कसला गैरसमज..?"

"इतक्या लवकर विसरलात. त्यादिवशी पाहताच मला आग ओकत निघून गेलात. आणि मी काही खोटं बोललो नव्हतो. तिथे हॉस्पिटल मध्ये माझ्या मित्राची आई ॲडमीट होती. लवकरात पोहचायच होत तिथे आणि किती वेळ झाला होता एकही रिक्षा भेटत नव्हती म्हणून तुमच्या रिक्षात बसलो. पण सॉरी जर वाईट वाटलं असेल तर.. "

"अच्छा.. ते तुमच्या हातातली सिगारेट पाहून वाटलं की तुम्ही.." आभा च वाक्य ऐकून तो जोरजोरात हसू लागला.

"अहो मला सुपारीच देखील व्यसन नाहीये. माझा मित्र गाडी लावत होता म्हणून मी त्याने ती पकडायला दिलेली."

"ओहह.. आय एम रिअली वेरी सॉरी. खरच मी अस नको वागायला हवं होतं."

"इट्स ओके. जाऊद्या आता तो विषय. बाय द वे, मी श्रीकांत जोशी."

"मी, आभा पाटील."

"तुम्हाला भेटून खुप छान वाटलं. आय होप नेक्स्ट टाईम भेटू आपण."

"नेक्स्ट टाईम का आज तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही येऊ शकता शाळेत माझ्यासोबत."

"तुम्हाला चालेल..?"

"हो का नाही."

शाळेतला स्कूल किट्स वाटपाचा कार्यक्रम सुरळीत पार पडला. श्रीकांत तिथल्या मुलांना हसवत होता. त्यांच्याशी गप्पा मारत खेळत होता. त्याच्या सोबत आभा देखील सगळ्यांमध्ये मिसळली. आज खुप दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर पूर्वी च हसू आलं होतं, फक्त श्रीकांत मुळे. पुन्हा लवकर भेटण्याचं आश्वासन देत आभा आणि श्रीकांत ने तिथल्या मुलांचा निरोप घेतला.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

आभा च्या घरी

अभय नुकताच कामावरून घरी आला होता. कालच्या प्रकाराने त्याला खुप मनस्ताप झाला होता. दिवसभर त्याच गोष्टीचा विचार केल्याने त्याच कामात लक्ष लागत नव्हतं आणि डोकं देखील खुप ठणकत होतं. आल्या आल्या आईने त्याला पाणी दिलं. थोड्या वेळाने फ्रेश होऊन, कपडे चेंज करून हॉल मध्ये येऊन त्याने सोफ्यावर अंग झोकून दिले.

"आई आभा आली नाही का अजुन पुण्यावरून आणि सायली पण कुठे दिसत नाहीये..?"

"आभा दोन दिवस पुण्यात राहून येणार आहे. आणि सायली गेलीय तिच्या घरी." आई जरा वैतागत च बोलली.

"का आणि कधी आणि मला कसं कोणी सांगितलं नाही..?"

"अरे थोड्या वेळा पूर्वीच गेलीय ती. तुला प्रवास करताना काही टेन्शन नको म्हणून आईंनी सांगितलं घरी येऊन तुला सांगायला." अभय काळजीत पडतो.

"पण अशी का अचानक.."

"ते काही मला माहित नाही पण हे बघ अभी तुला राग येईल तरीही घरात कोणी मोठे आहेत त्यांना निदान सांगून तरी जावं ना तिने. बाहेर दिसली म्हणून कळलं नाहीतर अशीच परस्पर जात होती. आणि आता बाबांनी तो विषय संपवला आहे ना तर का ती उगाच त्रास करून घेतेय त्या गोष्टीचा..?"

"आई मी बोलतो तिच्याशी."

"तुला बोलाव लागेलच अभी. असं आपलं घर सोडून कोणी जात का..?"

अभय सायली ला कॉल करत करतो पण ती कॉल कट करते. तरीही तो पुन्हा दोन तीन वेळेस कॉल करतो पण ती उचलत नाही. मग ती सरळ फोन स्विच ऑफ करून ठेवते.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

( शाळेच्या गेटपाशी )

"मग आता पुन्हा कधी भेट होईल आपली..?" श्रीकांत आभा ला उत्साहात बोलतो.

"सध्या मी दोन दिवस पुण्यात च आहे. नक्की भेटू. आणि हो खरच तुमचे खुप उपकार झाले. आज तुम्ही नसता तर माझं आजचं उदिष्ट पूर्ण नसत झालं."

"उलट मी तुमचा आभारी आहे की मुलांच्या चेहऱ्यावरचं इतकं गोड हास्य मी पाहू शकलो. आणि उदिष्ट पूर्ण कसलं मी काही समजलो नाही."

"उद्या भेटू तेव्हा सांगेल." इतकं बोलून दोघं एकमेकांना आपले नंबर शेअर करून कुठे आणि केव्हा भेटायचं ठरवून निरोप घेतात. जाता जाता आभा ला आठवलं की कावेरी देखील पुण्यात तिच्या काकांकडे आलेली असते.

क्रमशः

🎭 Series Post

View all