मेहंदी ची जळमटे... (भाग पाचवा)

न रंगलेल्या मेहंदी च्या जळमटांची कथा...

मेहंदी ची जळमटे... भाग पाचवा

"हे सगळं फक्त आभा च्या पायगुणा मुळेच झालय. इतका खर्च झाला त्यात लग्न सोडा आमचा एकुलता एक मुलगा कायमचा गेला. ह्या वयात दादाला अडचणीत नाही पाहू शकत आम्ही. आता एकच होऊ शकत, सगळ्या तारखा पुढे ढकलून झालेल्या बुकिंग मध्येच च सायली सोबत लग्न करणार अशील तर सांग. नाहीतर इथे पुन्हा येऊन तोंड दाखवू नकोस."

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

आत्याच्या बोलण्याने अभय खुप डिस्टर्ब झाला होता. गाडी चालवताना तो त्याच्याच विचारात होता. घरी कसं बोलावं ह्या सगळ्याचा तो विचार करत होता. घराच्या समोर येताच त्याने गाडीला पार्किंग ला लावून स्वतःच्याच विचारात गुंग होऊन चालत असताना त्याला एक मुलगी धडकली. ती दुसरी तिसरी कोणी नसुन कावेरी होती. अभय सॉरी बोलून तिथून निघून गेला. तिला त्याच्या वागण्याचं आश्चर्य वाटलं. पण परिस्थिती तशी होती की तिने ही त्याला काही विचारलं नाही.

"हो आता आयुष्यभर तुला सॉरी च बोलावं लागणार आहे."

स्वतःच्या मनाशी बोलून ती हसली आणि तिथून ती घरी निघून गेली.

संध्याकाळी अभय ने हॉल मध्ये सगळ्यांना बोलावून घेतल. नेहमी किलबिल करणार घर ह्या दिवसात खुप शांत शांत होत. अभय ने साऱ्यांना घडलेली हकीकत सांगितली. ते ऐकून सगळेच अवाक् झाले. काय बोलावं कोणाला काही सुचत नव्हतं. शेवटी बाबांनीच पुढाकार घेतला,

"हे बघ अभय बाळा, आपण पुन्हा जाणार आहोत ना त्यांच्या घरी तेव्हा समजावू त्यांना."

"हो बाबा बरोबर बोलतायत. आणि खर्चाचं म्हटलं तर आपणही कर्ज काढलं आहे. नियतीच्या मनात काय येईल कोणाला सांगता येत का.." आई.

"अभय तुला तुझ आयुष्य सॅक्रिफाइस करण्याची काही गरज नाहीये. हे सगळं माझ्या मुळे झालय. I'm sorry." आभा.

"अग तु का सॉरी म्हणतेय. यात कोणाचीही चुकी नाहीये. परिस्थिती च अशी आहे. आणि आता कोणीच कोणाला काही बोलण्याची गरज नाहीये, कारण मी सायली सोबत लग्न करायला तयार आहे."

"अभय.." आजी.

"हो आज्जी. आणि मी हे मनापासून बोलतोय."

"ठीक आहे मी कळवतो त्यांना फोन करून पण अभय नक्की तुझा निर्णय झाला आहे ना..? कारण ही एक मोठी जबाबदारी आहे आयुष्यभराची.. तुझ्या मनात कोणी.."

"नाही बाबा अस असतं तर मी का होकार दिला असता."

••••••••••••••••••••••••••••••••••••

"कावे.. अग बाळा ते लग्नात घालणार होतीस ते कपडे तसेच राहू दे हा."

"का आई..?"

"अग आभा च लग्न होणार होत ना जिथे, पुढच्या महिन्यात तिथे अभय च लग्न होणार आहे आता तिकडे."

"कोण अभय आई..?" तिने बिचकत विचारलं"

वेडी झालीय का तु. आपला अभय ग. त्याच आणि सायली च लग्न आहे. आभा चा होणारा नवरा होता ना त्याची बहीण. तडकाफडकी ठरलंय. फक्त जवळच्या लोकांना बोलावलं आहे."

कावेरी ला बाकी काही ऐकूच येईना. तिच्या कानात फक्त अभय च आणि सायली च लग्न ठरलंय हे वाक्य घुमत होतं. ती आपल्या रूम मध्ये येऊन शांतपणे बेडवर येऊन बसली. आणि आपल्या हातावर लिहिलेल्या अभय च्या नावाला भिंतीवर हात घासून पुसू लागली. पण ते नाव मिटत नव्हत पाहून तिला आणखी राग आला. ती घरच्या मागच्या बाजूला येऊन जोरजोरात तिचा हात खडकाळ जमिनीवर घासू लागली. हात खरचटायला लागला. पण ते नाव अजूनही तसचं पाहून तिला खुप रडू कोसळलं.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

(पुढच्या महिन्यात)

हॉल मध्ये खुप कमी फक्त जवळची माणसं आली होती. आभा अजूनही धक्यातून सावरली नव्हती तरीही तिने मन घट्ट करून आपल्या भावासाठी लग्नात साध्या ड्रेस मध्येच आली. तिला पाहून आदित्य च्या घरच्यांनी पाहून न पाहिल्यासारखं केलं.

मंगलाष्टके संपताच अभय आणि सायली ने एकमेकांच्या गळ्यात हार घातले. आणि तितक्यात कावेरी हॉल मध्ये आली. तिने खुप मुश्किलीने आपल्या भावनांना आवर घातला. हॉल मध्ये ती कोपऱ्यात बसून फक्त अभय ला पाहत होती. तिचे अश्रू पुन्हा बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते पण यापुढे आता अभय ला फक्त मैत्रीच्या नात्यात पाहायचे आणि त्याच्या ह्या गोष्टीचा राग मनात न ठेवता त्याने इतका मोठा निर्णय दोन्ही घरच्यांसाठी घेतला याचा आदर नेहमी करायचा. राहिली गोष्ट प्रेमाची तर अभय वर असलेल प्रेम मी आयुष्यभर मनात गुपित म्हणून जपून ठेवीन. ते माझ्या मनातून केव्हाच कोणी नाही काढू शकणार. तिने तिच्या मनाला समजवल आणि उसण हसू घेऊन ती सगळ्यांमध्ये सामील झाली.

सायलीला न मागताच अभय सारखा प्रेमळ जोडीदार तिला मिळाला. जो तिच्या सोबत दोन्ही घराची काळजी घेत होता.

एक आभा च प्रेम जे तिला न भेटताच खूप दूर निघून गेलं की आयुष्यभर तिला दिसणार नव्हत आणि एक कावेरी च, जे आयुष्यभर समोर असूनही तिच्या सोबत नव्हत. तो खडतर काळ ओसरल्या नंतर दोघीही सावरल्या आणि पुन्हा उठून नव्याने सुरुवात केली पण त्या दिवसानंतर आभा ने आणि कावेरी ने कधीच मेहंदी काढली नाही.

मेहंदी दिसली की दोघींनाही ती मेहंदी ची जळमटे आठवत.

जी कधी रंगली च नाही...

समाप्त

{ वाचकांसाठी- मनापासून आभारी आहे मी, तुमच्या प्रतिक्रियां साठी.. ही कथा, वाचकांना आवडेल अश्या अनुषंगाने लिहिताना, माझ्या परीने शंभर टक्के दिले हयात... कावेरी च मन दुखवण्याचा हेतू नव्हता पण प्रत्येक प्रेमकथेचा Happy The End नसतो.. तरीही तुम्हाला जर का माझी ही कथा आवडली असेल आणि वाटत असेल मी मेहंदी ची जळमटे ह्या कथेचे दुसरं पर्व लिहावं तर नक्की कळवा मी पुरेपूर प्रयत्न करेन.. }
????????

- अक्षता कुरडे.

🎭 Series Post

View all