मेहंदी ची जळमटे... (भाग चौथा)

न रंगलेल्या मेहंदी ची कथा

मेहंदी ची जळमटे... भाग चौथा

दुसरीकडे ह्या साऱ्याशी अन्नभिन्न असलेली कावेरी, आभा च्या लग्नानिमित्त आपल्या हातातल्या मेहंदी मध्ये कोणालाही दिसणार नाही अश्या जागी खास व्यक्तीचं नावं लिहिलेल पाहून गालातल्या गालात हसत होती. ते नाव दुसर तिसर नसून अभय च होत..

कावेरी अभयची बालमैत्रिण सोबतच तिच्या आणि अभय च्या घरच्यांचा घरोबा होता. आभा ची आई तिला आभा प्रमाणेच वागवत. पण कावेरी अभय ची मैत्रीण कमी आभा ची जास्त वाटे. दोघांचा ही छत्तीस चा आकडा असल्याने एकमेकांची खोडी काढत. लहानपणी एकदा खेळताना कावेरीच्या हातून अभय च्या आजीचा चष्मा चुकून खाली पडून फुटला आणि ते अभय ने पाहिलं. आता नक्कीच ओरडा बसणार म्हणून कावेरी खुप घाबरली. तितक्यात आई खोलीत आली आणि खाली फुटलेला चष्मा पाहिला. आईने विचारताच अभय, कावेरी च नावं सांगणार च होता तितक्यात त्याला तिचे पाणावलेले डोळे पाहून त्याला वाईट वाटलं. आणि ही चूक त्याच्या हातून घडल्याचे आईला सांगितले. अभय ला खूप ओरडा बसला. आभाला कळताच तिने बाबांना बोलावून आणलं. अभयला बाबांचा सुद्धा ओरडा खावा लागला. मुकाट्याने मान खाली घालून तो एक अक्षर ही न बोलता सगळ ऐकुन घेत होता. दूर उभी कावेरी अभयची दुसरी बाजू पाहून त्याच क्षणापासून अभय ला आपलं मानू लागली. जसजसे दिवस जाऊ लागले तस अभय च स्थान तिच्या मनात घट्ट रुजत गेलं पण ह्या सगळ्याची तीच्याव्यतिरिक्त कोणालाही कल्पना नव्हती. मेहंदी कडे पाहता पाहता, लहानपणी पासून ते आतापर्यंत ह्या सर्व आठवणींना मनात उजाळा देत आपल्या खोलीत बसली होती.

अचानक दारावरची बेल वाजली. त्याने तिची तंद्री उडाली. बेडवरून खाली उतरून ती दार उघडायला गेली, तोपर्यंत आईने दार उघडले. बाबा घरी आले होते. बाबांचा चेहरा तिला मलूल वाटला. आल्या आल्या काही न विचारता ती किचन मध्ये जाऊन पाणी घेऊन आली. आता बाबांसोबत आईचा चेहरा ही पडला होता. दोघांना काळजीत पाहून तिने काय झालं विचारलं. बाबांनी तिच्या हातातलं पाणी घेऊन घोटभर पिऊन खाली बसले.

"बाळा, आभाचा होणारा नवरा देवाघरी गेला."

"काय..? असं अचानक कसं काय झालं आणि मला का नाही सांगितलं कोणी..?"

"मला सुद्धा सकाळी कळलं तेही बाहेर मी दूध आणायला गेलो होतो तेव्हा तिथे त्यांच्या शेजारच्या सुमा काकीकडून. मग मी लगेच घरी जाऊन आलो."

"बाबा कसे आहेत सगळे..?"

"सगळ्यांना धक्का बसला आहे. खरं सांगू तर आभा ची प्रकृती खुप खराब आहे. कालपासून काहीच खाल्ल नाहीये. खोलीच्या बाहेर आलीच नाही."

"बाबा मी जाते."

"थांब कावे मी पण येते." असं म्हणून कावेरी आणि तिची आई दोघीही निघतात.

•••••••••••••••••••••••••

रात्रभर रडून रडून आभा चे डोळे लाभडक झाले होते. ती सारखी आपल्या मेहंदी वर काढलेल्या आदित्य च्या नावाला पाहत होती. तो हात स्वतःच्या हृदयाशी कवटाळून जणू काही तोच आदित्य चा हात असल्यासारखं तिला वाटत होत. आदित्य आदित्य करत त्याला हाक मारत होती. फक्त एकदा भेटायला ये अस तिच्या हाताला नावाला पाहून त्याला विनवणी करत होती.

"आभा दार उघडं ग बाळा. बघ आम्ही खुप काळजीत आहोत. असं नको करुस"

तितक्यात कावेरी आणि तिची आई घरी येतात. कावेरी ची आई आभा च्या आईला मिठी मारून, सगळं सुरळीत होईल म्हणत शांत करते. कावेरी पुढे होऊन दार ठोकावत म्हणते,

"आभा आम्हाला तुझी परिस्थिती कळतेय ग. पण जर तु अशीच राहिलीस तर आदित्य च्या घरच्यांची कोण काळजी घेईल."

कावेरी च हे वाक्य ऐकून आभा भानावर येते. ती लगेच दार उघडते. तिचा अवतार पाहून आईला रडूच येत. पण सगळ्या मिळून तिला सावरतात. कावेरी तिला जबरदस्ती करून खायला लावते. तिकडे उभा असलेला अभय दुरूनच सगळं पाहत होता. त्याला कावेरी च खुप कौतुक वाटलं. त्याने तसं म्हणून तिचे आभार मानून निघून गेला. कावेरी ला तो निघत असताना त्याला थांबवून तिथेच प्रेम व्यक्त करावं वाटत होत. पण ह्या परिस्थिती पाहता तिने तिच्या मनाला आवर घातला. पण आधीच खुप उशीर झाल्याने तिने पुढच्याच आठवड्यात त्याला मनातलं सगळं सांगण्याच ठरवलं. मग हवा तितका त्याला वेळ देऊ पण काहीही करून अभय ला सांगायचं तिने ठरवल.

तिकडे अभय आदित्य च्या वडिलांना भेटायला जातो. तिकडे गेल्यावर त्यांना ते खुप टेन्शन मध्ये असल्यासारखे वाटतात. त्यांची विचारपूस केल्या वर कळत की त्यांनी आदित्य च्या लग्नासाठी कर्ज काढल होत. आता ते फेडत बसणार की घरचं करणार. त्यात सायली ला (आदित्य ची बहीण) नोकरी नाही. कर्ज जरी बाबांनी काढलं होतं, पण ते आदित्य फेडणार होता पण आता एकट्याच्या जीवावर शक्य नाही होणार म्हणून त्यांना खुप काळजी वाटत होती.

अभय ने शांततेने त्यांच म्हणण ऐकुन घेतलं. मग ह्या घरची जबाबदारी घेण्याचा त्याने घेतलेला निर्णय आदित्य च्या बाबांना सांगितला. त्याच बोलणं ऐकुन तर ते क्षणभर बोलायचे थांबले. ते त्याला नकार देत असल्याचं पाहून, पाठीमागून सगळ ऐकत असणारी आदित्य ची आत्या पुढे येऊन बसली. तिने अभयला नको नको ते बोलायला सुरुवात केली.

"हे सगळं फक्त आभा च्या पायगुणा मुळेच झालय. इतका खर्च झाला त्यात लग्न सोडा आमचा एकुलता एक मुलगा कायमचा गेला. ह्या वयात दादाला अडचणीत नाही पाहू शकत आम्ही. आता एकच होऊ शकत, सगळ्या तारखा पुढे ढकलून झालेल्या बुकिंग मध्येच च सायली सोबत लग्न करणार अशील तर सांग. नाहीतर इथे पुन्हा येऊन तोंड दाखवू नकोस."

क्रमशः

🎭 Series Post

View all