संदेश मीराला परत आमच्या रूमवर यायचं नाही असं बोलला....... याचा मीराला राग नाही आला फक्त वाईट वाटलं...... त्या रात्री खूपवेळ तिला झोप नाही लागली......झोप तरी कशी लागणार कारण तिच्या मनात अनेक विचारांनी गर्दी केली होती. ...आजपर्यंत तिला खूप मुलं आवडली होती......पण तिचा जिवलग मित्र कोणीही बनलं नाही. तसे कॉलेजला असताना वरवर बोलणारे मित्र होते पण जवळचे नाही........ ती विचार करत होती......."मला मान्य आहे माझ्यात कमी आहे......पण त्याला मी काही करू शकत नाही ना...........मी एक माणूस आहे, मलापण भावना आहेत, मला मन आहे, माझी ईच्छा आहे एखाद्या मुलासोबत मनातलं बोलण्याची......पण कोणीही समजून घ्यायला तयार नाही.......... जाऊदे......मी कशाला विचार करतेय....... विचार करून करून थकलेय आता....... संदेश आपल्यावर फक्त रागवला आहे..... त्याने \"नाही\" तर नाही म्हटलं ना.....आपला प्रयत्न आपण चालू ठेवायचा..... जे होईल ते बघू". असा ठाम विचार करून मीरा झोपली.
आज फिल्डवर काहीतरी काम असल्यामुळे संदेश दिवसभर बाहेरच आहे. एका क्लायंटशी बोलणं चालू असताना त्याला फोन येतो.......नवीन नंबर आहे...... तो मोबाईल जरा जवळ घेऊन पाहतो तर truecaller मीराचं नाव आहे. नाव बघताक्षणी त्याचं डोकं फिरलं...... त्याने फोन म्यूट केला..…...त्याच्या मनात एक विचार आला की, हिच्याकडे माझा नंबर कसा काय?.........कोणी दिला असेल?......तो लगेचच विचारातून बाहेर आला व पुन्हा क्लायंटशी बोलू लागला........
संध्याकाळी संदेशला यायला जरा उशीर झाला. तो आल्या आल्या आधी पटकन फ्रेश झाला. अशोक समोरच्या रूममध्ये आहे..... मुलींसोबत गप्पा मारत आहे तिथे मीरा पण आहे. ती हळूच दरवाजातून डोकावून समोरच्या हॉलमधील संदेशला पाहण्याचा प्रयत्न करत आहे कारण त्याचा दरवाजा उघडाच आहे. तेवड्यात सचिनदेखील येतो. सचिन मीराला म्हणतो, "अरे मीरा कशी आहेस?" मीरा लगेच बाहेर येते, "मी मस्त, आज एवढा लेट कसा काय?" तिला बोलायला विषय मिळाला ती मुलांच्या दरवाजात येऊन उभी राहिली......."ऑफिसमध्ये खूप कामे पेंडिंग होती, त्यामुळे जरा जास्तवेळ थांबावं लागलं." सचिन बोलत बोलत आतमधे गेला.........संदेशने अशोकला आवाज दिला. अशोक पटकन आला......त्याने दरवाजातून येता येता मीराला काहीतरी खुनावल.......
"काय रे, का बोलावलस?"....अशोक
"तिकडेच मुक्काम करण्याचा विचार होता का?......संदेश
"अरे आत्ताच आलो मी.....जस्ट तुझ्या आगोदर....... फ्रेश झालो आणि बसलो होतो समोर".......अशोक
बरं ते जाऊदे....... चल काहीतरी खायला बनवूया मला खूप भूक लागलीय"......संदेश
"एवढ्या लवकर नऊ वाजता बनवूया ना"......अशोक
"का ......तुला तिकडं जाऊन पांचट गप्पा मारायच्यात?.....चल भाजी बनवायला घे?"......संदेश
अशोक जास्त काही न बोलता कामाला लागला.
या दोघांच बोलणं चालू असताना मीरा तिथून निघून गेली.

काम करत असताना अशोक संदेशला चिडवण्यासाठी विचारतो, "तुला आज मीराचा फोन आला होता काय?
संदेश....."हो रे, तुला कसं काय माहीत?"
अशोक......"तिने मलापण फोन केला होता, ती बोलली की, तू फोन नाही उचलत म्हणून? तिला कामाचं काहीतरी बोलायचं होतं वाटतं."
संदेश...... "अरे पण तिच्याकडे माझा नंबर आला कुठून?"
अशोक....... "घेतला असेल फेसबुक वरून वगैरे....?
संदेश......"फेसबुक वर माझा नंबरच नाहीये."

अशोक......."तू फोन उचलायचा ना........असेल तिचं महत्वाचं काम. बोलायचना ना बिचारीला ती तुझ्यासाठी किती काय काय करत असते. बरोबर ना सचिन".......या बोलण्यावरून संदेशला वाटत होतं की, अशोकनेच तिला माझा नंबर दिलेला असणार.........पण तो त्याला डायरेक्ट बोलू शकत नव्हता आणि मीराला देखील विचारू शकत नव्हता.
मीरा संदेशच्या पाठी लागली आहे हे सगळ्या मित्रांना माहिती झालं. जो त्यांच्या रूमवर येतो तो संदेशकडे वेगळ्या नजरेने पाहतो व त्याच्यावर हसतो. खालच्या आणि वरच्या माजल्यावरदेखील काही लोकांना हे कळलं........... संदेशला मात्र काय करावं काही सुचेना......याच्यातून बाहेर कसं पडता येईल यावर तो विचार करू लागला.......... एक दोन वेळा मिराबरोबर भांडण केली........ अशोकबरोबर भांडणं केली. पण कोणीही त्याला चिडवायच थांबेना....... काहिदिवस हे असंच चालू राहील.........

एकदिवस संदेशच्या डोक्यात असाच विचार आला की, मीराला मैत्रीण बनवायला काहीही हरकत नाहीये. असंही तिच्याबद्दल आपल्या मनात काही नाहीये....... तिच्याबरोबर आपण बिनधास्त बोलायचं...... नाहीतरी सगळे आपल्याला चिडवत आहेत.......आपण बोलल्यावर तिलातरी बिचारीला समाधान मिळेल.........मग हळूहळू संदेश तिच्यासोबत बोलू लागला. एखाद्यावेळी बोलता बोलता तिला समजुन देखील सांगू लागला.
त्यांच्यात छान मैत्री झाली........ मीरामात्र अजूनही कुठेतरी त्याच्यावर प्रेम करत आहे..... सणाला आई जे स्पेशल बनवते ते .......संदेशच्या रूमवर ती आणून देते.

संदेश आणि त्याच्या मित्रांनी तो फ्लॅट सोडून तीन माळे वर नवीन फ्लॅट केला......तरीपण मीराच त्यांच्या रूमवर येणं थांबलेलं नाहीये.
Sham M Bhosle ©