Login

मीरा (भाग २)

जगातील सर्व प्राणीमात्रांना भावना असतात...... मीरा ही प्रेमकथा नसून एका प्रेमाची कथा आहे.


क्रमशः.......
एक दिवस संदेश दुपारी आपल्या ऑफिसची कामे आवरून मोबाईलवर फेसबुक चेक करत असताना त्याला एक नवीन फ्रेंड रिक्वेस्ट आलेली दिसते. तो त्याच्यावर टच करतो तर ती मीराची रिक्वेस्ट असते. तो थोडा विचारात पडतो. ......रिक्वेस्ट स्वीकारावी की नाही कारण तिचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. ती सारखी आपल्याकडे चोरून पाहत असते, जर रिक्वेस्ट स्वीकारली तर ती वेगळच समजून बसेल. म्हणजे आपल्याला मान्य आहे असं.......तो विचारारून बाहेर येतो. रिक्वेस्ट स्वीकारत नाही. फेसबुक मध्ये पुढे बघतो तर त्याचे सर्व फोटो तिने लाईक केलेले आहेत. आता तर त्याला कन्फर्म वाटतं की ती आपल्याला लाईक करते...... तेवड्यात तिथे त्याचा बॉस येतो व कामाविषयी बोलू लागतो. मोबाईल बाजूला ठेवून संदेश त्याच्या कामात व्यस्त होतो.

संध्याकाळी घरी येताना प्रवासात त्याला खूप वेळ ट्राफिक लागते. रस्त्यात खूप वेळ लागल्यामुळे संदेशला थकवा जाणवत आहे. त्याची रिक्षा इमारतीच्या गेटवर येऊन थांबते...... तसा तो पटकन पैसे देऊन घाईत लिफ्टकडे जातो........लिफ्टजवळ येतो .......पाहतो तर खूप लांब रांग लागलेली आहे. तीन लिफ्ट असून एवढी रांग? तो तसाच पुढे जाऊन बघतो..... तर एक लिफ्ट बंद दिसते. मग तो परत मागे येऊन रांगेत उभा राहतो. रांगेत उभे असणारी माणसं बोलत आहेत की, दर आठ-दहा दिवसांत लिफ्टला काहीतरी प्रॉब्लेम होतोच. एकदाच त्यांना नीट तपासायला काय होतं?.........तेवढ्यात दुसरा बोलतो कमिटीच लक्षच नसतं ओ........ फक्त दिवसभर ऑफिसमध्ये बसलेले असतात. काही महिलादेखील आप-आपसात बोलत आहेत. संदेश कुतूहलाने सर्व चर्चा ऐकत आहे. एक लिफ्ट येते काही लोकं त्यात जातात. संदेश पुढे सरकतो आता त्याचा थकवा गेलेला आहे........तो मनात विचात करतो, अरे ती इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे कधी बिघडेल त्याचा काही नेम नाही.....आणि गरज नसताना सहा च्या जागी आठ-आठ लोकं लिफ्टमध्ये असतात.......विचारात असतानाच त्याची नजर बाहेर जाते तर मीरा तिच्या मैत्रिणी सोबत लिफ्टकडे येताना दिसते. संदेश मोबाईल काढतो व त्यात काहीतरी बघत उभा राहतो.
त्या दोघी येऊन रांगेत उभ्या राहतात तशी तिची नजर संदेशकडे जाते. ती थोडी लाजते. लगेच ती तिच्या मैत्रिणीला काहीतरी सांगते व संदेशकडे बोट करते. ती मुलगी संदेशकडे पाहून गालातल्या गालात हसते. हे सर्व संदेश तिरक्या नजरेने पाहतो. त्याला खूप राग येतो. ......अरे ही कोण? आपला हिच्याशी काहीही संबंध नाही आणि ही मैत्रिणीला काय सांगतेय. वेडी आहे काय जरा........ तेवड्यात लिफ्ट येते, संदेश लिफ्टमध्ये शिरतो.
संदेश रूममध्ये येतो. अशोक आधीच ड्युटीवरून आलेला आहे. आज समोरच्या मुली घरी नसल्यामुळे तो मोबाईलवर साऊथची कुठलीतरी फिल्म पाहत बसला आहे. कानात हेडफोन्स लावलेले आहेत. संदेश फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये जातो. फिल्म पाहत असताना अशोक अधून मधून मोठ्याने हसत आहे. फ्लॅटमध्ये तशी शांतता आहे. संदेश फ्रेश होऊन बाहेर येतो. अशोक जोरात हसतो संदेशला त्याचा राग येतो. तो सरळ जाऊन त्याच्या कानातील हेडफोन्स काढतो व बोलतो, "अरे जरा हळू हास ना......एकटाच हसतोय कसं वाटतं ते.....नाहीतर मलातरी दाखव काय पाहतो ते." अशोक थोडावेळ त्याच्याकडे बघतो व नंतर मोबाईल बाजूला ठेऊन देतो.
थोड्यावेळात बरोबर रोजच्या वेळेला मीरा दारात येते. तिचा आवाज ऐकूणच संदेशला तिचा राग यायला लागतो. तिला पाहण्याची त्याला बिलकुल ईच्छा नाहीये. अशोक मुद्दाम खुर्ची घेऊन दारात जातो व तिच्याशी बोलत बसतो. ती त्याला सांगत आहे की, " यार कुठेही काम मिळत नाहीये मला..... घरी बसून वैताग आलाय.".....अशोक तिला बोलतो, ...."नको टेन्शन घेऊ ग मिळेल काम....." संदेशला चिडवण्यासाठी पुढे बोलतो,...तु संदेशला का नाही विचारत ,,त्यांच्या ऑफिसमध्ये गरज असू शकते."....संदेश आतमध्ये सर्व ऐकत आहे. मीरा बोलते, "जाऊदे, काही माणसं Fb वर साधी फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करत नाहीत तर काम कधी शोधणार." ........हे ऐकल्यावर अशोकला बोलण्यासाठी विषय मिळतो लगेच तो बोलतो, "संदेश.....काय रे .....तिची रिक्वेस्ट का ऍक्सेप्ट केली नाहीस.....बिचारीची...... अरे तिने आणखी मलासुद्धा रिक्वेस्ट पाठवली नाही पण तुला पाठवली. कसा रे तू?"...... संदेशला खूप राग येतो, "कसली आहे ही मुलगी?....तिला आपण घास पण टाकत नाही पण सगळ्यांना सांगत सुटली ही"...... अशोक पुन्हा बोलतो, "अरे तुझ्याशी तिला काहीतरी बोलायचे असेल, कर ना तिची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट."........तसा संदेश बाहेर येतो व बोलतो, "ये गप रे तू....काय लावलंय रे ऍक्सेप्ट कर, ऍक्सेप्ट कर......आणि (मीराला) तुझं काय काम असतं ग रोज इकडे? .....मीरा बोलते, "मी तुझ्याशी कुठं बोलतेय, अशोकशी बोलतेय." .......जे काय बोलायचं असेल ना ते तिकडे पॅसेजमध्ये बोलायचं.....जा..... परत इकडे यायचं नाही...... उठ रे अशोक.".......अशोक बोलतो, "एवढ काय झालंय रागवायला.....ती माझ्याकडे येते, समोरच्या मुलींकडे येते." ......मीरा थोडी घाबरते ती तिथून निघून जाते. संदेश, " अशोक तू तिची बाजू घेऊन कशाला बोलतोस, मला हे आवडत नाही आ." अशोक बोलतो, कसा रे तू, बिचारी काम शोधतेय, तिला मदत करणं आपलं कामय....." आणि अशोक गालातल्या गालात थोडा हसतो.

🎭 Series Post

View all