मीरा...ती आहे.. स्पर्धात्मक प्रेरणादायक लघुकथा

सगळे मीराची मुलाखत घ्यायला आले होते,करणं मीरा त्यांच्या कॉलेज मधून आणि गावातून पहिली तर जिल्ह्यातून तिसरी आली होती. तिच्या आईवडिलांना तिच्यावर गर्व होता, फार कौतुकाने तिच्याकडे बघत होते.

काही लोक खूपच प्रेरणादायक असतात, त्यांचं आयुष्यच एक प्रेरणा असते, पण काही लोक अस काही करतात की त्यांच्या त्या कार्याला कोटी कोटी नमन करावे, अशीच ही एक कथा आहे, मीराची...

अतिशय हुशार, समंजस व देखण्या मीराची...

 बारावीच्या निकालाचा दिवस होता, मीराने नेट वर बघितलं, 98% मिळालेले तिला... आईबाबा बघा मला 98% मिळालेत, अस सांगत धावतच ती तिच्या आई कडे गेली, भारीच खुश होती ती. तितक्यात दारावरची बेल वाजली, आईने दार उघडलं. समोर प्रेसची मंडळी आणि मीराच्या कॉलेजचे प्रिन्सिपॉल सर उभे होते, क्षणभर तिच्या आईला आणि तिला काही समजलेच नाही.

सगळे मीराची मुलाखत घ्यायला आले होते,करणं मीरा त्यांच्या कॉलेज मधून आणि गावातून पहिली तर जिल्ह्यातून तिसरी आली होती. तिच्या आईवडिलांना तिच्यावर गर्व होता, फार कौतुकाने तिच्याकडे बघत होते.

थोड्यावेळाने सगळे गेले, मीरा तिच्या आई वडिलांना म्हणाली, मला माझ्या स्वप्नांच्या एक पाऊल जवळ गेल्यासारखं वाटतं आहे. मी सुद्धा डॉक्टर होणार तुमच्या सारखी, मला सर्जन व्हायचं आहे. आता मला NEET क्रॅक करायची आहे.

मीराने NEET दिली, सुट्टीच्या दिवसांत ती तिच्या आई वडिलांना बरोबर हॉस्पिटलला जात असे. थोड्याच दिवसात परीक्षेचा निकाल लागणार होता, पण...

पण दुर्दैवाने निकालाच्या 2 दिवस आधी, मीरा हॉस्पिटल मधून घरी येत होती त्यावेळी रस्त्यात इमारतीचे बांधकाम सुरू होते, तिथे क्रेनने काम सुरू होते आणि क्रेनला लटकलेल्या विटांचा बॉक्स सटकला आणि नेमकी त्याचवेळी खालून जाणाऱ्या मीराच्या अंगावर पडला. ती त्या बॉक्स खाली दाबली गेली, ती खूप घायाळ झाली होती, तिथल्या लोकांनी लगेच तिला हॉस्पिटल मध्ये भरती केलं, तिचे आई बाबा पण तोपर्यंत आले होतें.

तिच्यावर उपचार सुरू झाले. डोक्याला बरच मार लागला होता. ती शुध्दीवर नव्हती, तिला वाचवण्या साठी ती शुध्दीवर येणं फार गरजेचं होतं.

तिला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू होती. आई वडील डॉक्टर असल्यामुळे, दुसऱ्या हॉस्पिटल मधले डॉक्टर्स पण ओळखीचे होते.

दोन दिवसांनी तिचा NEET चा रिझल्ट लागला, त्यात सुद्धा ती टॉपर होती. तिची आई तिला सांगत होती, आईच्या डोळ्यात अश्रुधारा होत्या, मीरा उठ बरं, तुला डॉक्टर व्हायचंआहे ना, बघ कितीछान मार्क आलेत तुला... उठ ना रे बाळा..आई तिला उठवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती, किती आनंदाची बातमी होती मीरा साठी पण, मीरा...

त्याच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे accident च्या तिसऱ्या दिवशी मीराला शुद्ध आली. तिला तिचा निकाल सांगितला, ती बोलू शकत नव्हती, ती हसली, पण त्यात सुद्धा तिला वेदना होत होत्या.
मीरा शुध्दीवर आल्यावर तिचे काही रिपोर्ट्स काढण्यात आले, त्यात तिची परिस्थिती तितकीशी चांगली नव्हती, हे सगळ्यांच्याच लक्षात आले. म्हणजे तिचे वाचण्याचे चांचेस नहीच्या बरोबर होते. पुढील आठ दिवस ती वेदनेने जीवन मरणाशी लढत होती.
एक दिवस तिने खूप प्रयत्नांनी आणि कष्टांनी नर्सला काहीतरी सांगितले. नर्स चकित होऊन तिच्या कडे बघत होती, तिच्या सांगण्यावरून नर्सने एक फॉर्म आणला, तो तिने इशाऱ्यानेच तिच्या वडिलांना द्यायला सांगितला.

तो फॉर्म बघून तिच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी होतं. आई ने सुद्धा तो फॉर्म बघितला. त्यानी सही करण्यास नकार दिला. पण तिच्या डोळ्यातले भाव आणि वेदना त्यांना समजत होत्या, सत्य स्थिती त्यांना सुद्धा माहीत होती. ती मोठ्या कष्टाने फक्त please म्हणाली. तिच्या डोळ्यात पाणी होतं.

शेवटी त्यांनी त्या फॉर्म वर सही केली, मीरा कडे बघितलं, आता तिच्या चेहेऱ्यावर समाधान होतं. नंतर तिला झोप लागली. तिचे वडील त्या फॉर्म कडे बघत होते, त्यांना मीराचे बोलणें आठवत होते, ... बाबा मी ना मोठी सर्जन होणार, लोकांना बरं करणार, त्यांना नवीन जीवन देणार, आणि हो माझी एकाच इच्छा आहे, मी मरेल तेव्हा माझे अवयव मी दान करणार आहे. त्यानी एखाद्याचा तरी जीव वाचला तर माझं समाधान होईल. माणसानं कमीत कमी एकतरी चांगला काम करावं ज्यांनी कोणाचा तरी जीव वाचेल असं मला वाटतं.

कुठेतरी मीराला पण तिचं मरण अटळ आहे हे कळून चुकलं होतं. किती मोठं निर्णय घेतला होता तिने, ऑर्गन डोनेशन चा. तिची ही शेवटची इच्छा होती.

दुसरीकडे डॉक्टरांची गडबड सुरू झाली. इतर हॉस्पिटल मधूनच आलेल्या ऑर्गन डोनर च्या रिक्वेस्ट बघून त्या हॉस्पिटल्सला त्यानी कॉन्टॅक्ट केला.

आणि मग मीराला तयार करण्यात आले ओ.टी साठी. तिचे आई वडील रडत होते, पण त्यांना आता सुद्धा तिचा अभिमान वाटत होता. मीरा मात्र आता खुश होती, तिच्या चेहेऱ्यावर समाधान होते, की मी कोणावर उपचार करूनही शकले पण कमीत कमी कोणाचा जीव वाचवण्यात यश आले.

अखेर मीराची जीवन ज्योत मालवली पण जाताना ती तीन लोकांचे जीवन वाचून गेली. तिचे हार्ट, किडनी, लिव्हर, असे अवयव तीन जणांना देण्यात आले.

ह्या घटनेच्या साक्षी असलेल्या प्रतेक व्यक्तीची ती प्रेरणा बनली. तिच्या स्मरणार्थ तिथे एक स्मारक उभारण्यात आले. आणि जमलेल्या प्रत्येकाने मरणोत्तर ऑर्गन डोनेशन साठी नाव नोंदवले, त्यात सर्व प्रथम तिचे आई आणि वडील होते.

फक्त अठरा वर्षांची, आई वडिलांची एकुलती एक मुलगी, मीरा जगाचा निरोप घेताना किती मोठं कार्य करून गेली, ती या जगात नाही, पण तरी जिवंत आहे. धान्य ते आई वडील.


धन्यवाद

सादर कथा पुर्णतः काल्पनिक आहे.
मित्रानो तुम्हाला माझी ही कथा कशी वाटली नक्की सांगा, आणि लाईक करायला विसरू नका. तुमचा प्रतिसाद लिखाणाला नवी स्पूर्ती देतो. पुन्हा भेटू नवीन कथेसह...