मीच माझा शिल्पकार जरी

आयुष्यात यश मिळवण्यासाठी गुरुचे मार्गदर्शन नेहमी कामी येते परंतु असे जरी असले तरी यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास आणि मेहनत करण्याची स्वतःची तयारी देखील तितकीच महत्त्वाची असते.


कवितेचे नाव - मीच माझा शिल्पकार जरी..
विषय - मीच माझा शिल्पकार
फेरी- राज्यस्तरीय करंडक कविता

********************************************

थोरा मोठ्यांचे आशीर्वाद
कामी येतात यशस्वी वाटचालीसाठी..
गुरुचे मार्गदर्शन नेहमी
गरजेचे असते आयुष्यात पुढे जाण्यासाठी..ll१ll

प्रयत्नांना हवी असते
कायम जिद्दीची जोड..
यशाला गवसणी घालण्यासाठी
आत्मविश्वासाला नसावी कसलीच तोड..ll२ll

मीच माझा शिल्पकार जरी
अनुभवाची शिदोरी असते महत्त्वाची..
त्यासाठी हवी फक्त
कष्ट करण्याची तयारी मनाची..ll३ll

जिद्दीचे सामर्थ्य नेहमी
कर्तृत्वातून समोर येते..
प्रगतीचे पंख लेवूनी
यश उंच गगनी भरारी घेते..ll४ll

यश अपयशाचा खेळ इथे
रोजच रंगत असतो न्यारा..
सुखामागून दुःख झेलण्या
सहारा असतो कणखर मनाचा..ll५ll

एक सुबक शिल्प म्हणजेच
गुरूच्या मार्गदर्शनाचे खरे फळ..
परंतु ते साकरण्या हवे
स्वतःच्या पंखातही तितकेच बळ..ll६ll

मीच माझा शिल्पकार जरी
गुरुच्या आदर्शाचा खरा पाईक..
गुरुने दाखवलेल्या मार्गावर चालणारा
यशस्वी जीवनाचा खरा नाईक..ll७ll

विश्वासाने लढावी नेहमी
लढाई आयुष्यातील संघर्षाची ..
मीच माझा शिल्पकार म्हणत
चालावी वाट नेहमी यशोशिखराची ll८ll

©® कविता सुयोग वायकर
(जिल्हा पुणे)