मतलबी नातीगोती भाग -२

नात्यांमध्ये फक्त फायदा शोधणारी नातीगोती


..सरिता घरी आली .काय?, होणार व कसं करायचं ह्याचं विचारात होती ती.समिर आला तीने झालेला सर्व प्रकार सांगितला.समिरही टेन्शन मध्ये आला..‌आताच बिझनेसमध्ये त्याने पैसे लावले होते...तसा सर्जरीचा खर्च लाख दोन लाख होता.
समिरने वहिनीला फोन केला.
"वहिनी तुमच्या माहेरहून काही व्यवस्था होईल का?,हो पैशांची.. दोघं भाऊ नोकरी करतात . असतील पैसे त्यांच्याकडे एक महिन्यात परत करीन मी."

"काय,?समिर भाऊ म्हणजे तुम्ही फक्त नावाला मोठे का?मी बघून घेईन आता काय? करायचं ते...काल तर खुपच मोठ्या मोठ्या गोष्टी करत होता... आमच्या वेळीच संपलं का? सारं"
समिर शांतच झाला.लगेचच दादाचा फोन आला.
"काय ?,रे मरू दे मला आता सासरवाडीचे लोक मला निट करतील काय? तुला बोलवलं कसं?,रे ... लोकांना करतो ना?मग भावाला पैसे संपलेत का?..., पैसेवाले लागतात लोकांना,गरिबाला कोणी विचारतं नाही.."

आता प्रकरण नको तिकडे जाऊ लागल्याने त्याने फोन ठेवला..सरिता सारं बघत होती .तीने हातातल्या बांगड्या काढल्यात व समिरच्या हातावर ठेवल्यात.
"अगं काय? हे मी बघतो कुठेतरी"
"अहो महिन्यात सोडवून द्या मला..असंही मी रोज कुठे घालते त्या जा आता करा तयारी..‌"

समिरने भावासाठी बायकोच्या बांगड्या गहाण ठेवल्यात व सारं काही सुरळीत केलं..सोबत दोन महिन्यांचा किराणा चिऊसाठी खाऊ व खर्चाला वरून पाच हजार रूपये दिलेत..काही महीन्यात दादाला बरं वाटू लागलं..समिरने ओळखीने एका चांगल्या कंपनीत काम मिळवून दिलं...मुलांच सारं समिरच करत होता.दादा आता पर्मनंट झाला..तीस पस्तीस हजार आता महिन्याला हातात मिळू लागले..‌समिरला व सरिताला आनंद झाला.

जबाबदारीचं एक पान संपलं होतं.पण दादाला लागलेली सवय काय?जात नव्हती , मज्जा मस्तीत पैसे खर्च करायचे व घरखर्च अजूनही समिरनेच करायचा हेच होत..
एक दिवस समिर चिडला ...कारण आता काही महिन्यांत सरिता ही आई होणार होती..

"दादा अरे आता माझी जबाबदारी वाढणार आहे जरा पैशांची बचत करत जा?"
पण पगार पुरत नाही हेचं कारण पुढे येत होतं..

सरिता आता पोटुशी होती.पण जास्त दगदग व अती एक्झरसाईजने ती खचली होती.‌डाॅक्टरांनी पुर्णता बेडरेस्ट घोषित केली होती...आता माञ समीरची परिक्षा होती.सरिताच माहेर तसं लांबच कोणी मदतीला नाही.. तेव्हा वहिनी मदतीला नक्कीच येईन किंवा डबा पाठवेन म्हणून तो निश्चित होता..पण घडलं वेगळंच दादा व वहिनीने फक्त बघून घेतलं व आपल्या घराची वाट धरली.सरिता व समिरला काय?ते कळून चुकलं होतं..समिरने मग सरिताच्या मदतीला एक मदतनीस लावून घेतली...
दिवस संपतात व चांगल्या माणसांच चांगलंच करतो परमेश्वर..सरिताने एका गोंडस मुलाला जन्म दिला..
आता समिरचा परिवार पुर्ण झाला होता.पण जबाबदाऱ्या काही पाठ सोडत नव्हत्या...भाऊ व वहिनींच्या वागण्याकडे दूर्लक्ष करत दोघेही कर्तव्यात मग्नच होते. आता भाऊच तर उरलाय म्हणून त्याला मान देत होता समिर , सारं समिर करत होता पण मोठा भाऊ फक्त नावाला... नात्यांच्या बंधनात समिरने स्वतः ला पुर्ण पुणे अडकवून घेतलं होतं...
माञ सरिताला हळूहळू स्वभाव लक्ष्यात येवू लागला होता..
लग्न झाल्यापासून सारं करणारी सरिता संकटात असताना सगळ्यांनी पाठ फिरवली होती...कोणी आवाज दिला तर लगेचच धावत जाणारी सरिता थोडी कठोर होवू लागली होती ते समिरला बिलकूल मान्य नव्हतं..मग काय?,मनावर दगड ठेवून ती तीचं कर्तव्य करतंच होती...

समिरला काही कमी नव्हतं.देवाने भरभरून दिलं होतं..मुलगा साईही हुशार देखणा होता.. सगळीकडे वेगळीच थाप होती त्याची.पण साईचा सगळेच हेवा करत असतांना कुठेतरी तिरस्कारही होतांच...सरिताला वाटे माझं नको पण मी केलेल्या उपकाराची परतफेड नाही केली तरी मुलांचं तरी कौतुक व्हावं पण तेही होत नव्हतं..

आता जवळपास सर्व नातलगांची परिस्थिती चांगली झाली होती.त्यामुळे समिरचा संबंध संपत होता... म्हणतात ना "गरज सरो वैद्य मरो"तसंच.समिरची कोणालाच गरज नव्हती आता त्यांची वेळ निघून गेली होती.समिरला टाळणं किंवा त्यांच्या विरोधात वागणं सुरू झालं होतं..समिरला त्याचा फरक पडत नव्हताच...चर्चा, बदनामी होत होती.पण आपण ऐकलं नाही किंवा आपलीच माणसं असं नाही करणार हा खुप मोठा आत्मविश्वास समिरला होता...

दादाही आता त्याचा परिवार बघू लागला होता.सार समिर करत होता तोवर समिर लागतं होता.आता समिर जेथे नसेल तेथे दादांची उपस्थिती व समिरची जागा घेण्यासाठी दादांची धडपड होती...नातलगांसोबत समिरचा तिरस्कार करण्यात दादाही होताच..पण समिरला ते कधीच सत्य वाटलं नाही...

"सरिता भाऊ आहे तो माझा इतक्या खालच्या स्तरावर जाणार नाही..जीव आहे त्यांचा माझ्यावर .."
हा अंधविश्वास होता..

समिरचा व्यवसायच .. आजवर कमवलेलं सारं समिरने नातीगोती जपण्यात...नाती सांभाळण्यात , मदतीसाठी सारंच खर्च केल होत.मी चांगलंच करतो आहे तर परमेश्वर किही कमी पडू देणार नाही हिच धारणा होती.सरिताही बिनधास्त होती..पण


क्रमशः

समिरच्या बाबतीत काय?होतं बघू पुढच्या भागात...


🎭 Series Post

View all