नाही चा अर्थ.

गरजेला नाही म्हणूता आल पाहीजे, आपली माणस समजुन घेतात.

" झेपत नाही तर, नाही म्हणायच ना, कशाला जीव तोडत चालला आहेस?? " मित्र

त्याला आधीच थोडा ताप होता, विकनेस  होता, तरी ऑफीस च्या कामासाठी दुस-या गावाला चालला होता. म्हणुन त्याचा मित्र त्याला झाले होता. 

" अरे दुसर कोणी नाही ना जायला, सर मुंबईला जाणार आहेत, दुसरा माणुस आहे तो गावाला जाणार आहे, आणि तिसरा आहे त्याला सध्या एवढी माहीती नाही त्यातली, म्हणून बाकी काही नाही. " तो. 

" म्हणजे एखाद्याच्या जिवापेक्षा गाव महत्त्वाचे आहे काय? " मित्र. 

" जाऊदे रे, असेल त्याच काही काम " मित्र. 

" त्याने सांगितले आणि तु एक्स ना?? " मित्र. 

तो मित्राकडे बघुन हसला आणि बोलला. 

" तुला माहीतायेना मला कोणाला नाही म्हणता येत नाही ते. " तो

" हा काय?? आणि आम्हाला डायरेक्ट नाही म्हणतोस ते काय असते?? " मित्र. 

तो हसतो. 

" कस आहे ना, आपल्या माणसाला नाही बोलण थोड सोप असत, बोलण्याच्या टोन वरुनच   " नाही " चा अर्थ त्यांना समजुन जातो. आणि बाकीच्या माणसांना मात्र सांगूनही समजत नाही." तो. 

" ह्याच काहीच होउ शकत नाही. " मित्र

तो हसतो. 

" तु कुठेही जाणार नाही येस, तुझ्या ऑफीस मध्ये तस कळवलय मी. " मित्र. 

" अरे पण का?? " तो. 

" तुला जरा नाही सांगायला शिकवतो आज जरा, चल जरा घरी " मित्र जरा रागात. 

" हो बाबा, नाही जात पण तिथे घरात बोंबलत नकोस " तो. 

दोघेही हसतात आणि घरी जातात.