मी तुला माझ्यात जपणार आहे 2

कथा एका विषाची... त्याचा परीक्षेची....

भाग 2 

पूर्वार्ध: 

"मीरा, तुला एका आयुष्याची किंमत माहिती आहे ना? बघतेस ना हॉस्पिटलमध्ये, पेशंटचे आईवडील कसे जीवाची भिक मागत असतात? त्यांची अवस्था किती वाईट असते? तुला त्यांच्या जागेवर तुझे आई वडील दिसले नाही काय? तू डॉक्टर असून अशी कशी वागू शकते?" श्री थोडा रागावूनच बोलत होता. 

"तू सगळ्या अटी मान्य केल्यास?" 

"हो! पण हे जे काय तू केले आहे, मी तुला अजिबात माफ….." 

       त्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच त्याच्या ओठांवर एक मुलायम स्पर्श झाला आणि त्याचे ओठ तिच्या ओठांत लॉक झाले होते. तिचे असे अचानकपणे वागण्याने त्याचे डोळे आपोआप बंद झालेत आणि त्याचा वेदना अश्रूरूपाने गालांवर ओघळले. दोघांचा पण तो पहिला किस होता. तिच्या साठी आनंद तर त्याच्यासाठी वेदनादायी होता.

_________________________

          मीराला हॉस्पिटल मधून सुट्टी मिळाली होती. अजूनही पायाच्या फ्रॅक्चरचे प्लास्टर निघाले नव्हते. ते आणखी काही दिवस ठेवावे लागणार होते. मीराचा श्री सोबतच घरी येण्याचा हट्ट असल्यामुळे बाकी सगळे तिची वाट बघत उभे होते. 

           एक काळी लांब कार बंगल्याच्या दारात येऊन थांबली. 

"श्वेता, मीरा आली, औक्षणचं ताट घेऊन ये लवकर!" म्हणतच संजय (मीराचे बाबा) लगबगीने बाहेर आले. त्यांच्या पाठोपाठ श्वेता आरतीचे ताट घेऊन आल्या. सोबतच विक्रांत वृषाली (श्रीचे आई बाबा) सुद्धा होते.  

        श्री कारमधून उतरून बाहेर आला, आणि मीरासाठी दरवाजा उघडायला जाणार की तेवढयात प्रसादने दार उघडले आणि मीराला हाताने आधार देत कारच्या बाहेर काढले. प्रसादला पुढे गेलेले बघून श्री जागीच थांबला होता. 

"श्री, ये ना इथे, माझ्याजवळ!" मीराने आवाज दिला, तसे श्री तिच्याजवळ येऊन उभा राहिला. मीराला अजूनही नीट उभं राहता येत नव्हते, त्यामुळे तिचाचा तोल गेला. प्रसाद तिला आपल्या हातांवर उचलून घेणार की तेवढयात मीराने त्याला अडवले.

"दादू प्लीज.." प्रसादला डोळा मारत मीराने काहीतरी खुणावले, तसे प्रसादने आपले हात मागे घेतले. 

"श्री, उभं राहायला त्रास होतोय.." मीरा. 

      श्रीने एकदा आपल्या वडिलांकडे बघत आईकडे बघितले. आईने त्याला खुणेनेच काही सांगितले.

       श्रीने एक हात तिच्या कंबरेत पकडत दुसरा हात पायांकडे नेत तिला आपल्या दोन्ही हातांवर उचलत आपल्या कुशीत घेतले, प्रसाद मात्र त्याला खुन्नस देत बघत होता. 

"ये दादू, बस ना,माझ्या ऐश्वर्यालादृष्ट लावशील काय!" मीरा मस्करीत म्हणाली. ते ऐकून श्रीचे ओठ सुद्धा रुंदावले. 

"ऐश्वर्या म्हणे.." प्रसादने डोक्यावर हात मारून घेतला.

"याची ही दाढी काढली ना, तर बघ की ऐश्वर्याची सुंदरता सुद्धा मागे पडेल. आणि डोळे तर बघितलेच आहे तू, कसले कातील आहे ते.. श्री तो डोळ्यांवरचा गॉगल काढ ना?" मीरा.

श्रीने खुणेनेच हातात तू आहेस असे सांगितले. 

"Oh yes!" म्हणत तिने आपल्या हातांनी त्याच्या डोळ्यांवरचा गॉगल काढला. 

"बघ रे दादू, किती सुंदर आणि किती निरागसता आहे माझ्या श्रीच्या डोळ्यांमध्ये." मीरा. 

"तेच तर नाही बघवले जात.." प्रसाद स्वतःशीच पुटपुटला आणि आपली मान पलीकडे वळवली. 

"श्री, हसलास की बघ किती गोड दिसतोस." मीरा आपला एक हात त्याच्या मानेवर आणि दुसऱ्या हाताने त्याच्या शर्टाची कॉलर घट्ट पकडत म्हणाली. एक छोटीशी स्मायल करत त्याने तिच्याकडे बघितले. 

"Cutiee!" मीराने पण त्याला छानशी स्मायल दिले.

"आता तिथेच गप्पा मारणार आहात की आतमध्ये पण येणार?" श्वेता. 

"चला!" श्रीकडे बघत वाकडं तोंड करत प्रसाद म्हणाला आणि पुढे गेला. 

"चला डॉक्टर!" मीरा. तसे श्री प्रसादच्या मागे आतमध्ये मुख्य दाराजवळ आला.  

श्वेताने मीराला औक्षण करायला कुंकू लावले.

"आई, श्रीला पण लाव. आता आम्ही दोघं काय वेगळे आहोत काय, एक झालोय." मीरा.

"हो ग माझी प्रिन्सेस!" श्वेताने हसतच श्रीच्या कपाळाला सुद्धा कुंकू लावले आणि औक्षण केले. 

"मीराला आरामाची गरज आहे, श्री तुझे पण हात दुखले असतील, तिला आतमध्ये घेऊन जा." संजय म्हणाले. श्री होकारार्थी मान हलवत मीराला तिच्या रूममध्ये नेत तिला तिच्या बेडवर झोपवले आणि तो मागे सरकणार की मीराने पकडलेली त्याच्या शर्टाची कॉलर आपल्याकडे खेचली, तो तिच्यावर पडणारच होता की त्याने आपला एक हात तिच्या बाजूने बेडवर टेकवत स्वतःचा तोल सांभाळला. 

"काय हे मीरा, आता तुझ्यावर पडत होतो. माझी कॉलर सोड."

"तेच तर हवे होते. आणि मी हे सोडण्यासाठी नाही पकडलेय. ही कॉलर पण माझी आणि हा तू पण माझा!" म्हणत तिने त्याचे नाक आपल्या बोटांच्या चिमटीत पकडत ओढले. 

"मीरा गं.." तो तिच्या बाजूला थोडा नीट बसत आपले नाक चोळत म्हणाला. 

"तुझी ही सवय नाही जाणार ना मीरा गं म्हणायची? लोकं लागल्यावर आई ग म्हणतात, तू मीरा गं म्हणतो."

"असू दे, मला माझी ही सवय आवडते." 

"आणि म्हणूनच मग मला आणखी आणखी तुझा लोभ येतो." तिने परत त्याच्या कॉलरला आपल्याकडे ओढले आणि त्याला कळायच्या आत त्याच्या गालावर किस केले. 

 "Yuck!" कसातरी चेहरा करत त्याने तिचा हात हातात पकडत, तिच्याच हाताने किस केलेला गाल पुसत म्हणाला. 

"I know, पण तू माझा आहेस, आणि मी तुझ्यासोबत काही पण करणार.. कळतंय का काहीपण म्हणजे काहीही.."..हसतच ती त्याला चिडवत म्हणाली. तिला माहिती होते, त्याचा थोडं जवळ जरी गेले तर तो किती वैतागतो, पण तरीही ती त्याला असाच गोड त्रास देत असायची. 

"तू आराम कर, डिनरची वेळ झाली की घ्यायला येतो." म्हणत तो उठला आणि रूम बाहेर जायला निघाला. 

"श्री.."

"हा? काय हवेय काय?" तो परत तिच्याजवळ गेला. 

"तू प्रॉमिस कर, मला कधीच स्वतःपासून दूर करणार नाही? नाहीतर मी खरंच मरुन जाईल." तिच्या डोळ्यात पाणी आले होते. तिच्या आवाजातली ती आर्त वेदना त्याला जाणवत होती. त्याने एका हाताने तिचे डोळे पुसले आणि दुसऱ्या हाताने तिला जवळ घेतले. 

"एका अटीवर…" श्री.

"हो मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत."

"कुठलाही, कितीही वाईट प्रसंग आला, तरी तू आता वागली तशी कधीच वागणार नाहीस. मी सोबत असेल वा नसेल, पण अशा मरणाच्या तर अजिबात गोष्टी करणार नाही." 

"तू मला माझ्याजवळच हवा आहे."

"Be practical मीरा, तू डॉक्टर आहेस, तुला सगळं कळतं की इथे आयुष्याची हमी कोणीही देऊ शकत नाही, फक्त प्रयत्न करू शकतात. मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. आणि मी तुला प्रॉमिस करतो माझ्या आयुष्यात दुसरी कुठली स्त्री वा पुरुष येणारही नाही. पण आता हा असा वेडेपणा कधीही करायचा नाही, काहीही झाले तरी.." 

"पुरुष?" मीरा चकित होत त्याचाकडे बघत होती. 

"मला म्हणायचं होते, तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नसणार आहे. तू आणि फक्त तूच माझी बेस्टी आहेस." 

     तिने आनंदाने त्याला होकार दिला. श्रीने पण तिच्या गालावर मायेने थोपटले आणि तो तिच्या रूमच्या बाहेर पडला. 

"श्री…" 

     श्रीने मागे वळून बघितले तर प्रसाद उभा होता.

"हे सगळं तुझ्यामुळे घडलं आहे." प्रसाद.

"तू पण तिला थोडा वेळ दिला असता तर ती सावरली असती." श्री. 

"उगाच माझ्यासोबत वाद घालू नकोस. हवे तर ही लास्ट वारनिंग समज. माझ्या मीराच्या डोळ्यात आता मला एकही अश्रू आलेला चालणार नाही. नाहीतर मी तुला बरबाद करण्यात मागेपुढे बघणार नाही."

"Ohh really? म्हणूनच तिची इतकी नाजूक परिस्थिती असताना सुद्धा तू मला तिला भेटू देत नव्हता.." श्री थोडा कुत्सितपणे हसला. 

"श्री आगाऊपणा करू नकोस, आणि मला तू काय आहे हे चांगलंच माहिती आहे. मीरा अन् बाकीचे लोकं आंधळे असतील, पण मी नाही." 

"तुला माहिती ना मी काय आहो, मग तरीही तिला भेटायला तू माझ्यापुढे लग्नाची अट ठेवली? ती मरणाच्या दारात होती आणि तुला लग्न सुचत होते? ते पण माझ्यासोबत? Disgusting!"

"मी तिला तू काय आहे ते सांगणारच होतो, पण त्या आधीच तिने हे असे करून घेतले. मला तर वाटले तू लग्नाला नकार देशील, पण तू तर game खेळला." 

"मी माझ्या मैत्रिणीसाठी काहीही करू शकतो, अगदी जीव द्यायची वेळ आली तर मागेपुढे बघणार नाही. पण तू तर तिचा भाऊ आहेस, माझ्यासोबत लग्नाची अट घालून तू तिचं भविष्य खराब करतोय." 

"तिच्या आयुष्यासाठी, तिच्या आनंदासाठी. तिचा जीव तुझ्यात वसतो. ती तुझ्यामागे वेडी आहे. लग्नाची अट नसती घातली, तर तू तिला सोडून गेला असता, आणि मग तिने परत असेच काही केले असते. मला आता काहीच रिस्क नकोय." 

"मी तिला सगळं खरं सांगतोय."

"श्री, खबरदार तिला काही सांगितले तर, माझ्यापेक्षा दुसरा कोण वाईट नसणार मग." 

"मीरा ग!" श्री हतबल झाला. 

"कसा भाऊ आहेस रे तू? तुला का कळत नाहीये, माझ्यासोबत तिचं काहीच भविष्य नाहीये. मी तिच्या योग्यतेचा नाही" श्री.

"तू एक माणूस म्हणून खूप चांगला व्यक्ती आहेस आणि आमच्या सगळ्यांपेक्षा तू तिला जास्त माया लावली आहे. मीराची जान आहे तू."

"जान" ऐकून श्री बराच व्याकूळ झाला. 

"फक्त यासाठी, नाहीतर कधीच तुला बाहेर काढून फेकले असते. ऑलरेडी तिने दोनदा तुझ्यासाठी आपला जीव धोक्यात घातला आहे, तुझ्यामुळे तिचा पाय तुटला, तिच्या पायात रॉड घालावी लागली, आता हे suicide प्रकरण.. आता पुढे आणखी काही नकोय, तिचा जीव मला खूप प्रिय आहे. परत सांगतोय लक्षात ठेव, काय हवं ते कर, पण तिच्या डोळ्यात मला पाण्याचा एक थेंब पण दिसायला नको." 

"मला पण तिच्या ओठांवर हसूच हवे आहे." म्हणत श्री तिथून निघून आला. 

         रात्रीचे जेवण वगैरे आटोपून सगळे काही डिस्कस करण्यासाठी एकत्र आले. 

"विक्रांत, आपली मैत्री आता नात्यात बदलणार. विहिणबाई आता हक्काने तुमचं कौतुक करू शकतो बरं काय आम्ही, ते पण तुमच्या यजमानांपुढे!" संजय हसत म्हणाले.  

"अभिनंदन संजय, श्वेता वहिनी!" विक्रांत हसत म्हणाले. 

"श्री साहेब, दोन दिवसांनी तुमची एंगेजमेंट ठरवली आहे." संजय. 

"काय?" श्री शॉक होत बघत होता तर मीरा आनंदाने हसत होती. तिने एकही क्षणासाठी त्याचा हात सोडला नव्हता..त्याचा एक हात तिने आपल्या हातात गुंफून धरला होता. 

"का, काय झालं? लग्नासाठी तू होकार दिला आहे. आता सावधान झाले तरी पळता नाही यायचं. सुखी आयुष्य हवे असेल तर यांच्या मुठ्ठीत जाण्यातच शहाणपणा आहे." संजय श्रीची मस्करी करत म्हणाले. श्री कसानुसा चेहरा करत आपल्या आईकडे बघत होता. 

"अरे, तू दोन दिवसांनी परत नाही का चालला तुझा तो कोणता कोर्स पूर्ण करायला.. मग एकदम सहा महिन्यांनी येशील. आता लग्न जमले आहे तर साखरपुडा तरी करून घेऊया." वृषाली. 

"तू तयार आहेस? खूप घाई होतेय असे तुला वाटत नाहीये?" श्रीने हळूच मीराला विचारले. ती तर ते ऐकून लाजून गुलाबी झाली होती. ते बघून त्याने आपला चेहऱ्यावर हात ठेवला आणि एक हतबल असा मोठा श्वास घेतला.

"तुम्ही मोठे आहात, तुम्ही जसे म्हणाल तसे." तो नाईलाजाने म्हणाला. 

________________________

                 साखरपुडा मीराच्या राहत्या घरीच करण्याचे ठरले होते. पूर्ण बंगला, समोरचा लॉन फुलं, लायटिंग, रंगीबिरंगी पडदे यांनी अप्रतिम असा सजला होता, त्यात सॉफ्ट म्युझिक वातावरण आणखीच गोड करत होते. दोन दिवसांत साखरपुडा ठरला होता, जरी इतक्यात घाईत सगळं ठरलं होते तरी, होणाऱ्या कार्यक्रमात एकही कमतरता ठेवली नव्हती, शेवटी मीरा एका मोठ्या बिजनेसमन संजय सरपोतदार यांची मुलगी होती. आणि श्री, तो सुद्धा विक्रांत राज्याध्यक्ष यांचा एकुलता एक मुलगा होता, ते फार श्रीमंत नसले तरी, त्यांची पण समाजात पिढीजात चांगलीच ख्याती होती. 

           कार्यक्रमाची वेळ झाली होती. दोन्ही परिवारातील लोकं खूप खुश होती. सगळ्यांचा आनंद, उत्साह चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. श्री मीराने त्याचसाठी सिलेक्ट केलेल्या थ्री पिस सूटमध्ये भयंकर सुंदर दिसत होता पण त्याच्या चेहऱ्यावर अजिबात कुठलाही आनंद दिसत नव्हता, अन् त्याची नजर फक्त मीराच्या वाटेवर खिळली होती. मीरा एकच अशी व्यक्ती होती, जी फक्त त्याची होती, बाकी इथे सगळे त्याला अनोळखी वाटत होती. आणि त्याची प्रतीक्षा संपली, बेबी पिंक रंग त्याला कुंदनचे काम केलेले नाजूक लाल बॉर्डरच्या घेरदार घागऱ्यामध्ये त्याची गोडुली मीरा चेहऱ्यावर एक गोड हसू घेऊन त्याचा पुढे उभी होती. तिला बघून त्याचा ओठांवरसुद्धा बऱ्याच वेळाने हसू उमलले. 

_________

"मीरा, हे ठीक नाहीये, प्लीज!" श्री. 

*******

क्रमशः 

          

        

🎭 Series Post

View all