माझ्या हक्काचे ते 4 दिवस

...


"आई गं, खुप दुखतेय गं पाठ. सरळ ही होता येत नाहीये. काय करू?? कस उठू? उठता येईना, पण उठावे लागेल राणी.  भरपूर काम पडलेत आपल्याशिवाय कोण करणार आहे."राणी
स्वतःशीच बोलत होती.

डाव्या कुशीवर होऊन बेडच्या साहाय्याने कशीबशी राणी उठून बसली.
राणी ला कालच मासिक पाळी आली होती , त्यामुळे पाठ दुखत होती.
हे नेहमीचंच होत तिच्यासाठी 4 दिवस भयानक त्रास होत असे.
उठून थांबण्याइतपत ही ताकत तिच्यात राहत नसे.
अंगावरचे ही जास्त जाई आणि सोबत पाय दुखणं, पाठ दुखणं पूर्ण गळून जात होती त्या चार दिवसात.

नेहमीप्रमाणे उठून घर झाडून घेऊ लागली पण पाठीमुळे तिला नीट वाकता येईना.
"काय हे राणी, कसलं घर झाडत आहेस? जिकडे बघेल तिकडे कचरा."

"अहो आई, त्रास होतोय, पाठ दुखत आहे. पाळी आली तुम्हाला तर माहिती ना मला पाळीमध्ये किती त्रास होतो."

"राणी, हे तुझं नेहमीचंच झालंय . आम्हांला काय पाळी आल्या नव्हत्या का आम्हांला त्रास नव्हता, तरीही सगळं करायचो आम्ही." सासूबाई तावातावत बोलून निघून गेल्या.

राणीने त्यांच्या बोलण्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केल आणि कामाला लागली.
भांडी घासली, पिण्याचं पाणी भरली, सगळ्यांसाठी नास्ता बनवला, स्वतःच आवरलं आणि आता थोडं खाऊन आराम करू म्हणजे बरं वाटेल असा विचार करत राणीने पोह्यांची प्लेट भरली.
तितक्यात सासूबाई आल्या, "राणी आज पाणी येत ना बाहेरून तर या 2 गोधड्या धुवून टाक आणि ते बेडशीट पण."

पोह्यांची प्लेट राणीने तशीच ठेवली आणि गोधड्या भिजत टाकल्या. राणीचा स्वभाव होता काम समोर दिसत असताना तिला घास गिळत नसे.

गोधड्या भिजत घालून राणी प्लेट घेऊन रूम मध्ये आली.
तोंडात पहिला घास टाकलाच होता की घराची बेल वाजली.

"राणी, बघ जरा कोण आलंय?" सासूबाई ने आवाज दिला.
राणीने प्लेट तशीच ठेवली आणि दार उघण्यासाठी हॉल मध्ये आली.
दार उघडल आणि समोर नणंदबाई त्यांच्या दोन मुलींसोबत आल्या होत्या.

क्षणभर राणी त्यांना पाहतच राहिली कारण त्या येणार हे तिला माहितीच नव्हतं.

"ये वहिनी, अशी काय बघत आहेस गं? जसे काय तुला माहितीच नव्हतं आम्ही येणार ते??"

"ताई, मला खरंच माहिती नव्हतं."

तेवढ्यात सासूबाई बोलल्या "माझी मुलगी या घरात कधीही येऊ शकते त्यासाठी दुसऱ्या कोणाची परमिशन कशाला हवी?"

तिने नणंदबाई च स्वागत केल.

झालं. नणंदबाई आणि त्यांचा दोन मुली. \"वहिनी हे कर गं. मामी मला हे हवयं.\"

त्यात राकेश चे कपडे, त्याचा टिफिन सगळं आवरून दिले.

राणीने शांतपणे सगळ्यांच सगळं केलं. सगळं आवरता आवरता रात्रीचे 11 वाजले आणि राणीला बेडवर पडल्या पडल्या झोप लागली.

राकेश ला घरी यायला आज उशीर झाला होता.

रूम मध्ये आला तेव्हा राणी झोपली होती.

त्यांनी स्वतःच आवरलं आणि बेडवर पडल्या पडल्या त्याचा हाताला काहीतरी लागलं. त्यांनी लाईट ऑन केली आणि पाहिले तर राणी झोपलेला जागी पूर्ण लाल लाल झाले होते.
राकेश च्या लक्षात आलं.

त्यांनी राणी ला आवाज दिला, " राणी, राणी, उठ राणी. "
राणी काहीच रिस्पॉन्ड करत नव्हती.

त्यांनी आईला आवाज दिला.. राकेश खुप घाबरला होता . त्यांनी गाडी काढली आणि राणी ला घेऊन हॉस्पिटल गाठलं.
हेवी वर्क लोड मुळे तिला खुप जास्त ब्लीडींग झालं आणि दिवस भर काही नीट न खाल्यामुळे चक्कर येऊन बेशुद्ध झाली होती.

त्याला स्वतःवर राग आला, कारण सकाळी तिने कपडे उशिरा दिले म्हूणन तिच्यावर किती चिडला होता तो. तिचा मलूल चेहरा पाहून ही आपण सकाळी साधी तिची विचारपूस केली नाही.

डॉक्टरांनी काही वेळाने राकेशला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलवलं.

" राकेश, तुमच्या पत्नीची कंडिशन खुप नाजूक झाली आहे. तिला आरामाची सक्त गरज आहे. "

"हो डॉक्टर, मी लक्ष देईन." राकेश बोलला

" एक काम करा, महिन्याचे हे चार दिवस तिला फक्त बाजूला बसू द्या. "

"म्हणजे डॉक्टर मला समजलं नाही, तुम्ही नेमका काय बोलत आहात? "

"राकेश, अरे पूर्वीच्या काळात कस, मासिकपाळी आल्यास वेगळ्या रूम मध्ये बसवलं जायचं, अगदी तसेच नाही पण चार दिवस तिला आराम मिळावा असा काही करा."

"राकेश, पूर्वीच्या लोकांनी खुप छान छान गोष्टी करून ठेवल्या होत्या. त्यामधली एक म्हणजे हे बाजूला बसणं. या चार दिवसामध्ये स्त्रियांमध्ये खुप मानसिक आणि शारीरिक बदल होत असतात.
त्यांच्यात होणारे हॉर्मोनल बदल मुळे त्यांची चिडचिड, मूड स्विंग होत असतात.
आधीच्या काळात पाळी मध्ये बाजूला बसण्याचा मागे कारणे होती.
एक म्हणजे त्या स्त्रीला भरपूर आराम भेटावा. त्या चार दिवसात भरपूर आराम करून पुढच्या दिवस तिने आनंदाने घालवावे आणि स्वयंपाक करण्यास मनाई होती कारण हॉर्मोनमध्ये बदल झाल्यामुळे होणारी चिडचिड, मनात येणारे नकारात्मक विचार त्या स्वपाकमधून खाणाऱ्या लोकांपर्यंत जाऊन त्यांना ही ती नकारात्मक भावना पोहचू नये म्हणुन तिला स्वयंपाक घरात पाय ठेवणं ही वर्ज्य होते."

"त्या काळात असं काही पटवून दिल्यास लोक विश्वास ठेवत नसत म्हूणन मग त्यांनी देवाच्या नावावर शुभ अशुभ असे निम्मित देऊन स्त्रियांना या दिवसात कंपलसरी आराम दिलाच."

"आपल्या काळात काय होत आहे माहिती, लोक आम्ही पुढारलेल्या विचारांचे आहोत आम्ही असं बाजूला बसणं पाळत नाही. आम्हाला असं मान्य नाही वगैरे वगैरे सांगुन त्या सुनेला बैलगाडी ला जुपलेल्या बैलाप्रमाणे काम करून घेतात."

"तिला या काळात मानसिक आधाराची गरज असते. तिला कोणी एकदा विचारलं जरी की कस वाटतंय तुला, बरी आहेस ना? तिला खुप रिलॅक्स फील होते. तिला या 4 दिवसात 1% जरी मदत केलात ना ती पूर्ण मंथ तुमच्या मागे पुढे करेल."

" मि. राकेश, माफ करा जर मी जास्त बोलले असेल पण मी माझ्या प्रत्येक पेशंट ला सांगते हक्काचे चार दिवस मागून घ्या पण घ्या. या काळात आराम खुप गरजेचं असतो. "

राकेश ने डॉक्टर च्या सल्लानुसार घरी आल्यास आईशी या विषयावर चर्चा केली आणि राणीला प्रत्येक मंथ मध्ये ते तिच्या हक्काचे चार दिवस देऊ लागले. त्यात तिला जमेल तितके काम ती करायची आणि बाकी वेळेत ती बुक वाचायची. वुलन काम तिला आवडायचं ती ते करू लागली.

खरंच ते चार दिवस जो त्रास असतो, त्यापेक्षा घरातील कामाचा लोड जास्त वाटतो.
मैत्रिणींनो ते हक्काचे चार दिवस मागून घ्या सासू कडून. त्या चार दिवसात स्वतःला जपा. स्वतःच्या आवडी जोपासा.
काम, बाळ, नौकरी या सगळ्यामध्ये आपला मी टाइम मात्र आपल्याला भेटत नाही, मग नुसतं वाचत काय बसलात ठरवून टाका या हक्काच्या दिवसात काय काय करायचं आहे तुम्हांला.
मी तर मनसोक्त वाचन करत आहे.
तुम्ही ही सांगा तुम्ही काय करता.
विचार आवडला तर लाईक करा.. नाही आवडला तर माफ करा.