Jan 19, 2022
कविता

मी पतंग व्हावे, तू माझी डोर व्हावे..

Read Later
मी पतंग व्हावे, तू माझी डोर व्हावे..

मी पतंग व्हावे, 

तू माझी डोर व्हावे.. 

तुझ्याच सोबतीने मी, 

नभात या मुक्त स्वच्छंद उडावं.. 


मी पतंग व्हावे, 

तू माझी डोर व्हावे.. 

अंधारलेल्या आयुष्यास माझ्या

तू तुझ्या प्रकाशाने प्रकाशित करावे.. 


मी पतंग व्हावे, 

तू माझी डोर व्हावे.. 

माझ्यासारख्या एकांतात जगणाऱ्याने, 

तुझ्या सहवासात जगण्यासाठी देवाकडे साकडं घालावे.. 


मी पतंग व्हावे, 

तू माझी डोर व्हावे.. 

तुझ्या माझ्या नात्याला, 

तुझ्या होकाराने चार चॉंद लागावे.. 

✨❣️श्रावणी ✨❣️ "BOKEE "ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

✨❣️श्रावणी ❣️✨"BOKEE"

विद्यार्थी

#एकांतात रमणारी.. #निसर्गप्रेमी.. # शिवकन्या..