मी लाज टाकली.. भाग २

व्यथा तिची

style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">



मी लाज टाकली.. भाग २





मागील भागात आपण पाहिले की रेखा जयेशची आतुरतेने वाट बघते आहे. बघू जयेशला हे सरप्राईज आवडते का?



" जरा जरा बहकता है, महकता है आज तो मेरा तनबदन मैं प्यासी हूं, मुझे भरले अपनी बाहोंमें.." बॉम्बे जयश्री गात होती. जयेश अजूनही आला नव्हता. त्याला फोन लावू का? तिने विचार केला. तिला स्वतःला ती कॉलेजला जाणारी अल्लड तरूणी असल्यासारखे वाटत होते. बेल वाजली. तिने उत्साहाने जाऊन बघितले तर जेवण आले होते. तिने ते जेवण भांड्यांमध्ये छान सजवून ठेवले. आणि परत गाणी ऐकायला लागली. "तुम आये तो आया मुझे याद, गलीमें आज चांद निकला.." त्या गाण्यात ती एवढी रंगून गेली होती की बेल वाजलेली तिला ऐकूच आली नाही. दरवाजा उघडून चिडलेला जयेश आत आला होता.


" काय कटकट आहे. घरी आहेस तर दरवाजा उघडायला काय होते? काय ती गाणी लावून बसली आहेस? डोकं उठलं माझं.." आल्या आल्या जयेशची सुरुवात झाली. ते ऐकून रेखाचा मूड ऑफ झाला. तो चेहर्‍यावर न दाखवता तिने गाणे बंद केले. जयेश फ्रेश होऊन येईपर्यंत तिने चहा तयार ठेवला.

" जेवायला लगेच बसणार की वेळ आहे?" तिने प्रेमात विचारायचा प्रयत्न केला.


" आता चहा पितो आहे ना? थोड्या वेळाने बसू.." त्याचे अजूनही तिच्याकडे लक्ष गेले नव्हते. जयेश तिथेच टिव्ही बघत बसला होता.. त्याचा मूड बघून मग तिनेही पुढे बोलणे टाळले. दोघेही जेवायला बसले. तिने स्पेशल क्रॉकरी काढली होती. कँडल्स पेटवल्या.


" हे काय नवीन?" त्याने आश्चर्याने विचारले.


" अशीच गंमत.."


" आज जेवण बाहेरचे? काही स्पेशल आहे का?"


" हो.. जेवणानंतर."





style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">


जेवणानंतर त्याचा मूड हलका झाला आहे ते बघून तिने परत गाणे लावले. " मालवून टाक दीप.. चेतवून अंग अंग." जयेशच्या चेहर्‍यावर काही भाव दिसत आहेत का? ती बघत होती.. पण अजूनही तो निर्विकार होता. तिने सगळे पटापट आवरले. तशीच ती त्याच्या जवळ गेली. त्याने तिची दखलही घेतली नाही. तरिही तिने त्याला मिठी मारायचा प्रयत्न केला..


" काय फालतुगिरी चालवली आहेस?" जयेश दूर होत म्हणाला.


" हिच फालतुगिरी करण्यासाठी लग्नाच्या आधी तू मस्का मारत होतास मला. विसरलास का?" त्याच्या अजून जवळ जात त्याच्या छातीवर नाक घासत रेखा कुजबुजली.


" मला हा प्रकार अजिबात आवडलेला नाही.." जयेश तिला झटकत म्हणाला.


" पण मला आवडतो आहे ना.." आज रेखा पाठी हटायला तयार नव्हती.


" माझी इच्छा नाही.." जयेश निर्वाणीचे बोलला.


" का? आज काय कारण आहे? घरात आपण दोघेच आहोत, मुले नाहीत. मला उद्याच्या डब्याचे टेन्शन नाही. एक रात्र माझ्या मनाप्रमाणे घालवली तर काय बिघडते?" रेखाचा स्वर दुखावलेला होता.


" नाही म्हटलेलं समजत नाही?" जयेश बेडरूममधून उठून बाहेर जाऊ लागला.


"मी नाही तुला जाऊ देणार. आज तू मला हवा आहेस.." रेखाने त्याचा हात पकडला.


" हा छिचोरपणा बंद कर. शोभत नाही तुला. दोन मुलांची आई झाली आहेस."


" आई झाले म्हणून गरजा संपत नाही ना?"


" अरे व्वा.. आज जास्तच बोलते आहेस."


" तू बोलायला लावतो आहेस.."


" मला जमणार नाही. हवं तर शोध कोणी बाहेर." छद्मी हसत जयेश बोलला. जाताना आपल्या शब्दांचे वार करून गेला.. रेखाने मेणबत्त्या विझवल्या. ड्रेस बदलला. ती झोपायला गेली. तिच्या डोक्यात ते शब्द घर करून बसले होते.




काय होईल रेखा आणि जयेशच्या संसाराचे? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा..


सारिका कंदलगांवकर

दादर मुंबई




style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">


🎭 Series Post

View all