मी लाज टाकली..

व्यथा तिची

style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">





मी लाज टाकली..





" आज घाई नाही का जायची?" वर्षाने रेखाला विचारले.


" तू ना म्हातारी होत चालली आहेस. कालच सांगितले ना तुला, आईबाबा आणि मुले गावी गेली आहेत लग्नासाठी. चार दिवसांनी आम्ही पण जाऊ." रेखा उत्तरली.


" हो ग बाई.. मुले, घरदार आणि संसार यामुळे ना खरंच पस्तिशीतच म्हातारपण आल्यासारखे वाटते आहे. पण तुझी मजा आहे. घरात कोणी नाही. दोघे राजाराणी मस्त हनिमून एन्जॉय करा.. दुसरे की तिसरे तुम्हालाच माहीत." डोळा मारत वर्षा म्हणाली.


" तू पण ना, दिवसेंदिवस चहाटळ होत चालली आहेस." रेखा लाजली..


" मी आणि चहाटळ.. बरं मग बोलतच नाही काही." वर्षा फुगून बसली.


" चिडतेस काय, लहान मुलांसारखे? खरं सांगू? सध्या ना जयेश खूप विचित्र वागतो ग. आम्हाला काही प्रायव्हेट आयुष्य आहे हेच विसरून गेलो आहे. प्रेमाने जवळ घेणे सोड, प्रेमाने बोलता येते हे ही तो विसरला आहे." बोलता बोलता रेखाच्या डोळ्यात पाणी तरळले.


" अग वेडाबाई, रडतेस कशाला? आपल्या सारखेच त्यालाही टेन्शन असेलच ना. तो बोलून दाखवत नसेल. मी तर म्हणते, घरी कोणी नाही ना.. सगळे शारिरीक, मानसिक दुरावे दूर कर.."


" तुला मस्करी वाटते आहे?"


" नाही ग.. सिरियसली बोलते आहे. आपण ना छोट्या छोट्या गोष्टींचा उगाचच बाऊ करतो. मग राईचा डोंगर कधी होतो समजतच नाही. त्यापेक्षा थोडासा दुरावा आहे तर मिटवून टाक. छान वन पीस घाल, कँडल नाईट डिनर आणि मग... रूक्मिणी, रुक्मिणी.. शादी के बाद क्या क्या हुआ?" वर्षा थांबतच नव्हती.


" तुझ्याशी ना आज बोलण्यात अर्थच नाही. चल मी निघते."




style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">


" थांब. मी पण येतेच आहे." वर्षासुद्धा रेखासोबत निघाली.. जाताना वर्षाची बडबड सुरू होती. रेखाचे तिच्याकडे लक्षच नव्हते. ती स्वतःच्याच विचारात होती. "खरेच किती दिवस झाले मनापासून जयेशच्या जवळ जाऊन. आजकाल जो काही सहवास घडतो तो ही यांत्रिक झाला आहे. लग्नाआधी आणि लग्नानंतरही किती रोमँटिक होता तो. आणि आता? फक्त काम. ते नसेल तेव्हा वेबसिरीज किंवा शेअरबाजार. काही विचारले की म्हणायचे, तुमच्यासाठी करतो आहे ना? आमच्यासाठी करतो आहेसच पण कधीतरी तू ही ये ना वाट्याला. हे शब्द कितीदा ओठावर आले आणि भांडण नको म्हणून गिळून टाकले. आज देऊ या का त्याला सरप्राईज?" विचारात असलेल्या रेखाला ती कधी घरी पोहोचली तेच समजले नाही. वर्षाचे बोलणे ऐकून तिच्या मनाला गुदगुल्या झाल्या होत्या. किती तरी दिवसांनी स्वतःहून जयेशला समर्पित होण्याची इच्छा तिला झाली होती.

घरी आल्यावर तिने आधी पटापट घर आवरले. जयेशच्या आणि तिच्या आवडीचे जेवण ऑर्डर करून ठेवले. कुठेतरी गिफ्ट मिळालेल्या, नंतर वापरू म्हणून ठेवलेल्या कँडल्स काढल्या. त्या छान सजवून ठेवल्या. बेडरूममध्ये छान परफ्यूम मारला. पाण्यात सुगंधी तेल टाकून अंघोळ केली. छानसा वनपीस घातला. पुसटसा कळेल न कळेल असा मेकअप केला.. आणि एखाद्या अभिसारिकेसारखी ती जयेशची वाट पाहू लागली.





जयेशला आवडेल का रेखाचे हे सरप्राईज? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा..


सारिका कंदलगांवकर

दादर मुंबई




style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">


🎭 Series Post

View all