मी लाज टाकली.. अंतिम भाग

व्यथा तिची

style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">

मी लाज टाकली.. भाग ४मागील भागात आपण पाहिले जयेशकडून दुखावलेली रेखा सुमेधच्या आग्रहाने खरेदीला जाते. जयेश तिचा पाठलाग करतो. आता पाहू पुढे काय होते ते.." हॅलो मॅम.. खूप छान दिसताय." सुमेध रेखाला बघून म्हणाला.


" मस्का लावणे बंद कर. तुला काय खरेदी करायचे आहे ते सांग." रेखा हसत बोलली.


" मॅम त्याआधी लस्सी? इथे खूप छान मिळते."


" आज तू म्हणशील तसे." दोघे लस्सी प्यायला गेले. लस्सी पिताना आलेली मिशी बघून दोघेही हसायला लागले. त्या दोघांना हसताना पाहून जयेश मात्र तडफडत होता. एक गोष्ट त्याने स्वतःशीच कबूल केली, नेहमी खळखळून हसणारी रेखा आजकाल हसणे विसरत चालली होती. आधीच त्याच्या आईबाबांना जोरात हसणे, बोलणे चालायचे नाही. त्यामुळे घरात तिच्या वागण्याबोलण्यावर नेहमीच मर्यादा असायची. खरंच गेल्या दहा बारा वर्षात ती कोमेजून गेली होती. तो दुरूनच बघत होता, ती आणि सुमेध हसत खरेदी करत होते. आपण गेलो कधी तिच्या सोबत खरेदीला, एवढ्या चांगल्या मूडमध्ये? रेखा खरंच सुमेध सोबत गेली तर? त्या विचारानेच त्याला कापरे भरले.


जयेश घरी आला. काल रेखाने जशी तयारी केली होती, तशी त्याने तयारी करून ठेवली. तिच्या येण्याची तो वाट बघू लागला. रेखा थोडी उशीराच आली. सुमेध सोबत बोलून तिचे कालचे दुःख थोडे बोथट झाले होते. यापुढे हेच आपले प्राक्तन अशी तिने स्वतःची समजूत काढली होती. तिने दरवाजा उघडला, दिवे लावले. घर छान फुलांनी सजवले होते. जयेश तिची वाट बघत होता. ती काहीच न बोलता आत निघून गेली.


" बोलणार नाहीस का?" जयेशने पाठून हळूच येत तिला विचारले.


" काय बोलायचे? जे बोलायचे होते ते काल बोलून झाले, ऐकूनही झाले."


" सॉरी ना.. विसर ना ते.." जयेश रेखाच्या जवळ जात बोलला.
style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">


" विसर, म्हणून विसरता येते? लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच स्वतःहून तुझ्याकडे आले होते. तर तू छचोर म्हणालास मला.. इच्छा नाही म्हणालास.. आणि मी? इच्छा असो वा नसो तू म्हणालास की तुझ्यासाठी तयार रहायचे? नवीन लग्न झाल्यावर ते चार दिवसही तुला धीर धरता यायचा नाही. पाचव्या दिवशी सगळी कसर भरून काढायचास. मला नाही वाटत मी कधी बोलले आहे, आज मूड नाही म्हणून. ते सगळे तुझे प्रेम मानून मी स्वीकारले. मिहीर झाल्यानंतर दोनच महिन्यांनी तू तुझी इच्छा सांगितलीस. तेव्हा मी नाही बोलले, बाहेर शोध कोणीतरी. कारण मला खात्री आहे, शोध बोलले असते तर तू नक्की शोधली असतीस. पहिल्यांदा स्त्रीसुलभ लाज सोडून तुझ्याजवळ आले तर ती फालतुगिरी झाली?", रेखा उद्वेगाने बोलत होती.


" आता उठाबशा काढू का? तू आजपर्यंत कधी पुढाकार घेतला नाहीस म्हणून माझा अहंकार दुखावला गेला. खूप मूर्खासारखा वागलो मी. मनापासून माफी मागतो. परत अशी चूक होणार नाही हे शपथेवर सांगतो." जयेश नाटकीपणे शपथ घेत बोलला. तरिही रेखा काही बोलली नाही हे बघून त्याने खरेच उठाबशा काढायला सुरुवात केली.. ते बघून रेखाला हसायला आले.


" बस झाला नाटकीपणा." ती त्याला थांबवत म्हणाली.


" नाटकीपणा तर अजून सुरू व्हायचा आहे.." जयेश रेखाला बेडरूममध्ये नेत बोलला..स्त्रीवर तिच्या इच्छेविरुद्ध झालेल्या बलात्कारावर अनेकदा लिहिले जाते, त्यावर सहानुभूती दाखवली जाते. पण तिच्या कामेच्छा जेव्हा दडपल्या जातात तेव्हा मात्र कोणाला समजतही नाही. अशावेळेस तिची होणारी तडफड मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न होता. कसा वाटला ते सांगायला विसरू नका.


सारिका कंदलगांवकर

दादर मुंबई
style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">


🎭 Series Post

View all