मी कशाला आरशात पाहू गं ( प्रज्ञा बो-हाडे) भाग २

आपल्या कर्तृत्वाला आरशात चमकण्याइतकी झळाळी असते.

©®प्रज्ञा बो-हाडे

मी कशाला आरशात पाहू गं भाग - २


गीता ने बहिणीला आवाज दिला होता तरी बहिण आली नव्हती. शेवटी आवाज ऐकून आई धावतपळत आली. गीता झोपली असताना अचानक कमरेत चमक निघाल्याने उठता येत नव्हते. त्यात मोठ्या आवाजामुळे पाळण्यातली परी रडायला लागली होती. तिलाही पटकन उठून घेता येत नव्हते.

आई रुममध्ये येताच गीताला सावकाश उठवले. बाळाला जवळ घेवून गीताच्या हाती दिले.

गीता : रीमा कुठे आहे. किती हाक मारली तिला मी. तू किचन मध्ये काम करत असशील मला वाटले ती येईल धावतपळत माझ्या मदतीला.

आई : अग रीमाला उद्या काॅलेजमध्ये प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे. मैत्रिणी़बरोबर तिचे फोनवर बोलणे चालू होते. तुझी हाक नसेल ऐकू आली तिला.

गीता : हो का. बर अग मी माझ्याच दुनियेत रममाण. रीमाला काॅलेजचा अभ्यास असणार हि बाब लक्षातच आली नाही माझ्या.

आई : बर चल तुझ्यासाठी मेथीची लपथपित भाजी बनवून झाली, भाकरी चुरुन आणते,ती खावून घे. आणि लाडू आणते सोबत.

गीता : नको आई, तो तिखट लाडू. खावासा नाही वाटत मला.

आई : स्त्रीच शरीर नाजूक असते. उर्जेची अधिक गरज या दिवसात मिळावी म्हणून मेथी दाणे घालून डिंकाचा लाडू खायला देतात. त्याने पोषकतत्व मिळतात.

गीता : तो सासूबाईंनी पाठवलेला अळीवाचा लाडू दे. छान लागतो.

आई : तू लाडू खाणे महत्वाचे. आज अळीव संध्याकाळी मेथीदाण्याचा लाडू खात जा.


गीता : हो आई. तू सांगणार आहे ते माझ्याच हिताच असणार. पण न राहून एक गोष्ट तुला विचारायची आहे.

आई : नि:संकोचपणे विचार. काय झाल?

गीता : रीमा एवढी बिझी आहे का. बाळाला बघायला हल्ली येत नाही ती. काय झाल तिला. आधी तर किती बोलत होती. मी माझा अभ्यास करुन बाळाला सांभाळणार आता?

आई : तिला काय झाल तेच समजत नाही. स्वत:च्याच विश्वात असते. मला सुद्धा रीमाला दोन वेळा सांगावे लागते.


गीता : बर जावू दे. असेल काही अभ्यासाचे टेन्शन. अजून एक गोष्ट खटकते आहे आई.

आई : बोल ग बेटा. मनात कोणतीच गोष्ट ठेवू नको.

गीता : आता तीन महिन्याचा कालावधी उलटून गेला. श्याम मला पाच ते सहा वेळा भेटायला आले होते. तेव्हा फक्त मी कशी आहे तेवढेच विचारायचे. निघायच्या वेळी एक कटाक्ष बाळावर टाकायचे. ते सुद्धा माझ मन राखण्यासाठी.

आई : अग कामाचा लोड वाढला असणार. तुझ्या डिलेवरी वेळी सुट्टया देखील झाल्या तेव्हा असेल काही अडचणी. तू नको टेन्शन घेवू. आता बाळ आणि स्वत:ला जपणे महत्वाच आहे.


गीता : आता सासरी जाण्याची वेळ जवळ आली मनातली धाकधुक वाढत चालली बघ.

आई : अग तू काय पहिल्यांदाच चालली का नव्या नवरी सारखी सासरी. त्यात काय घाबरायच बाळा.

गीता : सासूबाईंना नातू हवा होता तो ही गोरापाण. आणि मला तर मुलगी झाली. कस होणार माझ. श्यामला देखील गोरी मुलगी हवी होती. मी या सगळ्या प्रकारांना कशी सामोरी जाणार देवाला ठावूक.


आई : नको काळजी करु होईल सर्व चांगल. मनात चांगले विचार आण उगाच ताण घेवून आहे तो दिवस कशाला खराब करते, गोडूली बघ किती प्रेमाने पाहते बघ तिच्याकडे. आता तिच्याकरता ताणतणाव विसरुन आनंदाने राहायच बघ.

गीता : तुझे बोल मला नेहमी आधाराची भक्कम साथ देतात. त्यामुळे मी जीवनाचा भरभरुन आनंद घ्यायला शिकले आहे.

आई : ह्यालाच तर जीवन म्हणतात. गुणाची बाय माझी. चल आता तुझे कपडे बॅगेत भरायला घे. जावई बापू घ्यायला येणार आहेत उद्या. घर कस तूझ्या आणि बाळामुळे भरलेल वाटत होत. आता उद्यापासून काहीतरी चुकल्यासारख वाटेल ग.

गीता : तूच अशी हळवी झाली की मलाही रडू येईल. इथे हक्काने मी तुझ्याकडून लाड करुन घेतले. तश्या सासूबाई बाळाला प्रेमाने जवळ घेतील का नाही? मला काही हव असल्यास सगळ काम बाजूला ठेवून माझ्याकरता धावतपळत येतील का?


आई : दुधावरची साईला स्वत:पेक्षा जास्त जपतील विहिनबाई.


गीता सासरी गेल्यावर बाळाला आपलेपणाने वागवतील का? पाहूया पुढच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all