©®प्रज्ञा बो-हाडे
अष्टपैलू कथामालिका स्पर्धा
दुसरा राऊंड जलद कथामालिका
श्याम आणि गीताच्या लग्नाला नुकतेच वर्ष उलटून गेले होते. गोड बातमीची चाहूल संसाराच्या वेलीवर फुलायला लागली. होणार बाळ कसे असेल?? मुलगा असेल की मुलगी याचे स्वप्न दोघांबरोबरच घरातली इतर मंडळी देखील पाहत होते. गीताच्या सासूबाईंना पहिला नातूच हवा होता.
श्यामला मात्र गोड परी गीता सारखीच गोरीपान हवी होती. आपल्या होणा-या मुलीचे नाव देखील श्याम ने सुंदरा मनानेच ठरवले होते. गीताला बाळ सुखरुप जन्माला येणे जास्त महत्वाच वाटत होते.
गीताचे डोहाळेजेवण थाटामाटात पार पडले. प्रकृती नाजूक असल्याने गीता डोहाळेजेवणा नंतर सातव्या महिन्यातच माहेरी आली. आईने आणि बहिणीने गीताचे सर्व डोहाळे आवडीने पुरवले. रोज नवनविन पदार्थ गीताला खाण्यासाठी सज्ज असायचे. गरदोरपणात रोज एक पान खाल्ले तर होणारे बाळ गोरे जन्माला येते. श्यामने सांगितल्याप्रमाणे गीताच्या आईने मार्केट मधून पाने, फळे, पालेभाज्या एकदमच आणून ठेवल्या. गीताला वाटायचे या सर्व खाण्यातून माहेरी तरी सुटका होईल. परंतु आहारातला फरक जेवणाची एक टाईमाची वेळ चुकवायचा.
गीताला गोंडस मुलगी झाली. श्यामला हवी असणारी मुलगी लक्ष्मीच्या रुपाने संसारात दाखल झाली. सगळीकडे जल्लोषाचे वातावरण पसरले. मुलगी झाली म्हणून मुलीला पाहण्या अगोदर सर्व नातेवाईंकांना फोन करुन सांगितले. जवळच्या दुकानात जावून बर्फी आणून ती दवाखान्यात नर्स, मावशींना वाटली.
अंधुकसे दिसण्याच्या झोतात गीताला श्याम डोळे पुसताना दिसत होता. गीताने विचारण्याचा प्रयत्न केला. ग्लानीत असल्यामुळे गीता फार काही बोलू शकली नाही. तिचे डोळे मिटत होते. काही तास उलटून गेल्यावर गीता शुद्धीत आली.
बाळाला पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. बाळ हातात घेताच तो इवलासा स्पर्श गीताला सुखावून गेला. गीताला आता स्पष्ट आठवले बाळाचा रंग सावळा आहे. म्हणून श्यामच्या डोळ्यात अश्रू तरंगले असावे? सासूबाईंना देखील गोर नातवंड हव होत आणि हि तर मुलगी सावळ्या रंगाची झाली. भीतीने गीताच्या मनाची परीस्थिती कावरीबावरी झाली होती. डोळ्यातून अश्रूंच्या धारा कोसळू लागल्या होत्या.
बाळाचे आगमन होणार म्हणून घराची सजावट केली होती. घराला तोरण, फुले, फुगे, रांगोळ्या काढल्या होत्या. आई आणि बाळाची रुम सजवली होती. छोटा पाळणा आणून त्याला फुलांच्या माळ्यांनी सुशोभित केले होते. स्वागत अस रुम मध्ये फुलांच्या पाकळ्यांनी साकारले होते.
गीताची सावली सारखी काळजी घेणारी बहिण आज वेगळीच भासत होती. तिला देखील बाळाचा सावळेपणा खटकत होता.
गीताला आयुष्यात आणखी कोणत्या गोष्टी खटकणार आहे ते पाहूया पुढिल भागात.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा