मी जेवायला बसू का?
" अजून कोणाला काही वाढायचे आहे का?" नीताने विचारले..
" नको.." असा आवाज आल्यावर नीताने पोळी तव्यावर टाकली..
"मग मी जेवायला बसू का?"
"आई.. थोडा भात वाढतेस का?" लेकीने विचारले.. तिला भात वाढून येईपर्यंत पोळी थोडी करपली.. तिने दुसरी पोळी तव्यावर टाकली.. हि पोळी करपू नये म्हणून गॅस मंद केला आणि तूप, वरण वाढायला धावली..
गॅस मंद ठेवल्यामुळे ती नीट भाजली गेली नव्हती.. पण पोटात भुकेचा डोंब उसळला होता म्हणून तशीच जेवायला बसणार एवढ्यात नवर्याने आवाज दिला..
"एक पापड देशील का ग?"
तसेच उठून तिने त्याला पापड भाजून दिला.. सगळ्यांना सुट्टीच्या दिवशी तरी गरम जेवायला मिळावे असा आग्रह धरणाऱ्या तिच्या पानात एक करपलेली आणि एक थोडी कच्ची पोळी थंड होऊन पडली होती..

*********************
"अतुल बाळ खेळतो आहे , तोपर्यंत मी जेवायला बसू का?" जेवून मोबाईल खेळणाऱ्या नवर्याला तिने विचारले..
" त्यात काय? मी आहे ना.. तू जा बिनधास्त.."
" नीट बघ हा.. सध्या ना तो रांगायला शिकला आहे.. इथून तिथे फिरत असतो.."
" मी आहे ग.."
अतुल मोबाईलवर एवढा रंगला होता कि त्याचा लेक कधी दरवाजापर्यंत गेला आणि त्याला अडखळून पडला त्याला कळलेच नाही.. त्याचा आवाज ऐकून जेवणाच्या ताटावर बसलेली ती तशीच उठली.. रडणार्या बाळाला शांत केले.. झोपवले.. गरम केलेले जेवण थंडगार होऊन जेवणारीची वाट पहात होते..
******************
" तुमच्या सगळ्यांचे पोट भरले का?" सईने विचारले..
" हो.. " मुलांचा आणि मुलांच्या बाबांचा होकार आला..
" मग मी जेवायला बसू का?"
" हो.."
तिने ताट वाढून घेतले.. जेवायला सुरुवात केली..
" आई.. मला शी..." तिचा पाच वर्षांचा लेक सांगत आला..
" आज बाबा घरी आहेत.. त्यांना सांग. मी जेवते आहे.."
" काकांचा फोन आला होता.. बाबा मगाशीच खाली गेले.." धाकटा पोट आवळत म्हणाला.. जेवण अर्ध्यावर टाकून ती तशीच बाथरूमच्या बाहेर उभी राहिली.. त्याचे त्यानेच सर्व केले, पण त्या वासाने तिची मात्र जेवण्याची इच्छाच मरून गेली..

आज उमाच्या घरात कोणी नव्हते.. त्यामुळे ना स्वयंपाकाचे टेन्शन ना कोणाला वाढायचे टेन्शन.. तिने स्वतःपुरती वरणातली फळे केली.. ती शिजेपर्यंत दोन मिनिटे बसायला गेली. तोच बेल वाजली.. दरवाजात कामाच्या मावशी..
" मावशी आज लवकर?"
" हो वहिनी.. आताच घरून फोन आला.. पाहुण्यांकडे मयत झाले आहे. निघायला पाहिजे मला. उद्या यायला जमेल कि नाही माहित नाही. म्हणून आता कचरा काढून जाते.. फरशी काय पुसत नाही.. भांडी करायची असतील तर रिकामी करून द्या.."
मावशींना सगळे रिकामे करून देईपर्यंत ती वरणफळे गार झाली होती.. मग तीच वरणफळे दोघींनी मिळून संपवली..

*************
कारण काहिही असो.. घरच्या बाईला गरम जेवता येत नाही, हि परिस्थिती काही बदलत नाही..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा