एम.बी.ए. माहिती (MBA Information In Marathi)

Information About MBA Course In Marathi
सगळ्याच विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्यार्थी जीवनात कोणता कोर्स निवडावा? कोणती शाखा निवडावी हा प्रश्न पडलेला असतो. जर तुम्हाला व्यवसाय आणि व्यवस्थापनात रस असेल तर एम.बी.ए. (MBA) हा कोर्स तुमच्यासाठीच आहे. या कोर्सचे अनेक फायदे आहेत. मल्टी नॅशनल कंपनीमध्ये एम.बी.ए. झालेल्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. हा एक पदव्युत्तर म्हणजेच पोस्ट गॅज्युएट कोर्स आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता याबद्दल अधिक जाणून घेऊ.

• एम.बी.ए.चा फुल फॉर्म काय?
–: मास्टर ऑफ बिजनेस अॅडमिनिस्ट्रेशन (Master of Business Administration)

या कोर्समध्ये आपल्याला व्यवसायाचे प्रशासन आणि व्यवस्थापन याबद्दल शिक्षण दिले जाते. हा एक पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे.

• एम.बी.ए.साठी शैक्षणिक पात्रता काय असावी?
–: जर तुम्हाला MBA करायचे असेल तर खालील अटी पूर्ण कराव्या लागतात.

१. तुमचे कोणत्याही शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण झालेले असावे. मान्यतप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असावी.

२. पदवी परीक्षेत खुल्या वर्गासाठी कमीतकमी ५०% गुण तर आरक्षित वर्गासाठी ४५% गुण असणे आवश्यक आहे.

३. सर्वच महाविद्यालये आणि विद्यापीठे MBA च्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतात त्यात उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.

• एम.बी.ए.ची प्रवेश प्रकिया कशी असते? (Admission Process of MBA)
–: जर तुम्हाला MBA ला प्रवेश मिळवायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी प्रवेश परीक्षा पास करावी लागते. या परीक्षा झाल्यावर त्याची मेरिट लिस्ट लावण्यात येते आणि त्यात जर तुमचे नाव सिलेक्ट झाले तर तुम्हाला यात प्रवेश घेता येतो. ज्यांना चांगले गुण असतात त्यांना त्यांच्या प्राधान्य क्रमानुसार कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो परंतु कमी गुण असलेल्या विद्यार्थांना ज्या कॉलेजमध्ये जागा रिक्त असेल तिथे प्रवेश घ्यावा लागतो.

• एम.बी.ए. साठी प्रवेश परीक्षा कोणत्या असतात? (Entrance exams for MBA)

एक्स.ए.टी (XAT)
एन.एम.ए.टी (NMAT)
सी.ए.टी (CAT)
सी.एम.ए.टी (CMAT)
एस.एन.ए.पी (SNAP)
एम.ए.टी (MAT)

• एम.बी.ए. कोर्स किती वर्षांचा असतो?
–: MBA हा कोर्स दोन वर्षांचा असतो परंतु काही महाविद्यालयात तो एका वर्षाचा आहे.

• हा कोर्स करताना तुम्हाला किती खर्च येईल? MBA ची फी काय?
–: हा कोर्स पार्ट टाईम आणि फुल टाईम अश्या दोन विभागात मोडतो. जर तुम्ही पार्ट टाईम कोर्स करणार असाल तर तुम्हाला खर्च कमी येतो आणि फुल टाईमसाठी खर्च जास्त असतो. यातही तुम्ही कोणते कॉलेज निवडता यावर खर्च आधारित असतो. शिवाय तुम्ही किती वेळात हा कोर्स पूर्ण करणार आहात यानुसार खर्चात कमी जास्त होते. साधारणपणे तीन ते दहा लाख रुपये इतका खर्च हा कोर्स पूर्ण करायला येतो.

• एम.बी.ए. कोर्सचे प्रकार कोणते?
१. एक वर्षाचे MBA:- जर तुम्हाला एका वर्षात हा कोर्स पूर्ण करायचा असेल तर यासाठी तुमच्याकडे संबंधित कार्यक्षेत्रात पाच ते दहा वर्षांचा अनुभव तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे बंधनकारक आहे.

२. ऑनलाईन MBA:- यासाठी तुमच्याकडे फक्त मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.

३. पार्ट टाईम MBA:- यासाठी तुम्हाला दरवेळी महाविद्यालय हजर असणे आवश्यक नाही. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी कमीतकमी ५०% गुणांसह असणे आवश्यक आहे.

४. डीस्टेंस MBA:- यासाठी तुमच्याकडे ५०% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि तीन वर्षांचा संबंधित कार्यक्षेत्राचा अनुभव असणे आवश्यक आहे.

५. एक्झिक्युटिव्ह MBA:- हा कोर्स करण्यासाठी एक ते दोन वर्षाचा कालावधी लागतो. यासाठी उमेदवाराला एखाद्या प्रतिष्ठित कंपनीत तीन ते पाच वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. याच बरोबर बिझनेस इंडस्ट्री बद्दल माहिती असणे गरजेचे आहे.

६. इवनिंग एम.बी.ए.:- हाही एक फुल टाईम MBA कोर्स आहे. यात फरक फक्त एवढाच आहे की, यात सकाळच्या ऐवजी संध्याकाळी कॉलेज असते.

• एम.बी.ए. स्पेशलायझेशन (MBA Specialization) कशात करता येते?
–: खाली नमूद केलेल्या काही क्षेत्रांमध्ये तुम्ही स्पेशलायझेशन करू शकता.

१. फायनान्स मॅनेजमेंट
२. रुरल मॅनेजमेंट
३. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट
४. हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट
५. हेल्थ केअर मॅनेजमेंट
६. स्पोर्ट्स मॅनेजमेंट
७. मार्केटिंग मॅनेजमेंट
८. डिजिटल मार्केटिंग
९. ट्रायव्हल अँड टुरिझम
१०. इव्हेंट मॅनेजमेंट
११. लॉजिस्टिक्स अँड सप्लाय चेन इत्यादी...

• एम.बी.ए. कोर्स मध्ये काय काय शिकवले जाते?
–: यात थिअरी, प्रॅक्टिकल आणि इंटर्नशिप असे प्रकार पडतात आणि यानुसार अभ्यासक्रम शिकवला जातो.

• एम.बी.ए. कोर्सचा अभ्यासक्रम काय असतो? (What is the syllabus of MBA course?)
–: हा कोर्स दोन वर्ष आणि चार सेमीस्टर म्हणजेच सत्रांत परीक्षेत विभागला गेलेला आहे.

प्रथम वर्ष (First Year of MBA):-

सेमीस्टर १ चे विषय:-
★ मॅनेजरियल इकॉनॉमिक्स
★ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट
★ बिझनेस कम्युनिकेशन
★ मार्केटिंग मॅनेजमेंट
★ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट
★ क्वांटिटेटिव्ह मेथड्स
★ ऑरगनायझेशनल बिहेवियर
★ फिनांशियल अकाउंटिंग

सेमीस्टर २ चे विषय:-
★ मार्केटिंग रिसर्च
★ मॅनेजमेंट अकाउंटिंग
★ फायनांशियल मॅनेजमेंट
★ मॅनेजमेंट सायन्स
★ मॅनेजमेंट ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टीम
★ ऑर्गेनाइजेशन इफेक्टिवेनेस अँड चेंज
★ इकोनॉमिक एनवायरमेंट ऑफ बिजनेस
★ ऑपरेशन मॅनेजमेंट

द्वितीय वर्ष (Second Year of MBA):-

सेमीस्टर ३ चे विषय:-
★ एलेक्टिव कोर्स
★ लिगल एनवायरमेंट ऑफ बिजनेस
★ बिजनेस एथिक्स अँड कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी
★ स्ट्रेटेजिक ऍनालिसीस

सेमीस्टर ४ चे विषय:-
★ एलेक्टिव कोर्स
★ प्रोजेक्ट स्टडी
★ इंटरनॅशनल बिझनेस एनवायरमेंट
★ स्ट्रेटेजिक मॅनेजमेंट

• एम.बी.ए.साठी चांगले कॉलेज/ युनिव्हर्सिटी कोणत्या आहेत? (Best collages/University for MBA)

१. आय.आय.एम. बँगलोर
२. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीअल इंजीनिअरिंग – मुंबई
३. आय.आय.एम अहमदाबाद
४. अमृता स्कूल ऑफ बिजनेस – कोइम्बतुर
५. आय.आय.एम इंदौर
६. एफ.एम.एस. दिल्ली
७. सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंट – पुणे
८. आय.आय.एम. कोलकता
९. एक्स.एल.आर.आय जमशेदपूर
१०. आय.आय.एम. कोझिकोडे
११. इंडिअन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी – दिल्ली
१२. आय.आय.टी. खडगपूर
१३. मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट – गुडगाव
१४. वोक्सेन युनिव्हर्सिटी – हैदराबाद
१५. के.आय.आय.टी. स्कूल ऑफ मॅनेजमेंट – भुवनेश्वर
१६. आय.आय.एम. लखनऊ
१७. आय.आय.टी. मद्रास

• एम.बी.ए. केल्यानंतर पगार किती असतो? (Packages for MBA student)
–: हा कोर्स केल्यानंतर फ्रेशरला कॅम्पस प्लेसमेंटमध्ये एक लाख वीस हजार ते दोन लाख यादरम्यान पगार असतो. जर हाच कोर्स नामांकित कॉलेजमध्ये पूर्ण केला गेला असेल आणि योग्य अनुभव आणि कौशल्य असल्यास पंचवीस लाख प्रती वर्ष असा पगार असू शकतो. जर विदेशी कंपनीत संधी मिळाली तर हाच पगार अजून जास्त असू शकतो.

• एम.बी.ए. करण्याचे फायदे:-
- या कोर्समुळे स्टार्टअप किंवा स्वतःचा ब्रँड स्थापित करता येतो.
- यामुळे चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते.
- यामुळे लीडरशिप आणि कम्युनिकेशन स्किल्स म्हणजेच नेतृत्व आणि संभाषण कौशल्य वृद्धिंगत होते.
- यामुळे मॅनेजमेंट स्किल्स वृद्धिंगत होतात ज्याचा फायदा मिळतो.
- यामुळे आर्थिक विकास होण्यास मदत होते त्यामुळे करिअर चांगले घडते.

• MBA केल्यावर जॉब कसा आणि कुठे करता येतो?
–: हा कोर्स केल्यावर जॉब करण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध असतात. या कोर्स नंतर खाजगी किंवा सरकारी नोकरी करता येते. आयटी, एच.आर. मॅनेजर, फायनांशियल मॅनेजर, फायनांशियल अँडव्हायझर इत्यादी पदांवर काम करता येते.

🎭 Series Post

View all