Jan 26, 2021
प्रेम

माझ्यातली तु

Read Later
माझ्यातली तु

नको विचारत जाऊस 
सारखे सारखे प्रश्न ... 
नाही बोलता येत मला 
तुझ्याशी खोटं... 
मला होतोय त्रास... पण नाही
सांगायचाय मला तुला, 
सतत तुझी काळजी,
सतत तुझे उपदेश, 
नकोस वाटतं मला हे सगळचं.... 
मान्य आहे सगळंच!
पण थांब की थोडं...
होऊ दे माझं मलाच शांत, 
नाही तर गुदमरेन ह्या 
न संपणाऱ्या गोंधळाने, 
हरवुन बसेन मी स्वत:लाच कुठं तरी ह्या न  संपणाऱ्या प्रश्नांनी......
कधी तरी वाटु शकतच ना
 कि कोणीच नसावं 
मी आणि माझा निवांत वेळ फक्त माझ्या पुरताच असावा...
कधी तरी त्याक्षणा पुरती तरी
 तु ही नकोस मला,
नको ती काळजी, 
नको ते सोपस्कार,
मग ते उपदेश ही नकोत,  
मग नकोच कोणाचीच गडबड
त्या क्षणी पुरती तरी...
तरी ही मग त्याच क्षणी 
पुन: तुझ्या पाशी यावसं वाटतं, तुझ्या कडे मन मोकळं करावसं वाटतं ..
नाही माहीती का किती ही नकोस वाटत असलं तरी ही तु त्या क्षणी सुद्धा हवीशी वाटतेस...