माझ्या यशाची भागीदार माझी आई

माझी आई

गोष्ट छोटी डोंगराएवढी.                                        विषय:- माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण.....                                          माझ्या यशाची भागीदार माझी आई                                                                       प्रत्येकाच्या आयुष्यात खूप क्षण येतात त्यातील एखादा क्षण असा असतो की तो विसरता येत नाही. "प्रत्येक अविस्मणीय क्षण हा जीवनाचे ध्येय झाला पाहिजे, तेव्हाच जगण्याला उभारी येते.नवीन क्षितिजे दिसू लागतात"...                                                                     असे काही माझ्या बाबतीत झाले... मी बारावीला असतानाची गोष्ट.... मी अभ्यास तर करायचे पण आईच्या दृष्टीने तो कमी होता... आई नेहमी म्हणायची "आयुष्य तुझ्यासाठी एकदाच आहे ते वाया घालवु नको येणारा प्रत्येक क्षण हा परत मिळणार नाही".                                                                         "कमळाला उगायावचे असेल तर ते चिखलातच उगवते तसेच तुमच्यासमोर कशीही परिस्थिती असली तरी तुम्हाला उभे राहायचे आहे कमळ म्हणते का तिथे चिखल आहे आणि मी उगवणार नाही"???...मग तुला पण खूप अभ्यास करून चांगले गुण मिळवायचे आहे ...   हेच वाक्य मनावर इतके कोरले गेले की मी त्या वर्षी कॉलेज मध्ये पहिली आले आणि पुढे शिक्षण घेताना सुध्दा ते खूप उपयोगी पडले.                                                          खरचं आईच्या बोलण्यात खूप काही ताकद असते आणि ते जर आई वडिलांनी प्रेमाने किंवा कधी कठोर होऊन सांगितले तर अशक्य गोष्ट सुध्दा शक्य होते .... 'यशाची हवा कधीही डोक्यात जाऊ द्याची नाही.आपले पाय नेहमी जमिनीवरच ठेवायचे.एकदा यश मिळाले म्हणजे परत मिळेल असे नाही ... त्यासाठी अजून प्रयत्न करायला हवे'.. आयुष्याची फक्त एक लढाई आपण जिंकलो अजुन खुप लढाया लढ्याच्या आहे.आयुष्य कायमचे बदलले म्हणजे काय हे त्या दिवसाने शिकवले. त्या दिवसाने अनेक गोष्टी सिद्ध केल्या की आपल्या पाठीमागे आई वडील उभे असतील तर कोणतीच गोष्ट अवघड नाही..मेहनत घेतली आणि प्रामाणिक कष्ट केले तर त्याचे एक ना एक दिवस फळ नक्की मिळते....                                                                       जेव्हा मला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी मिळाली तेव्हा आईच्या डोळ्यात आनंदश्रू आले कारण ट्रॉफी जरी मला मिळाली असली तरी प्रत्यक्षात ती जिंकली होती .... आणि तिच्या चेहऱ्यावर एक हास्याचा क्षण आणण्यास मी कारण झाले याचा मला खूप अभिमान आहे.....