Feb 28, 2024
दाता सन्मान दानतः

माझ्या राणीचा दरबार 4

Read Later
माझ्या राणीचा दरबार 4

4
नेहाने मयंकची अर्धांगिनी म्हणून गृहप्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या संसाराला सुरुवात झाली. मयंक तर तिच्या राणीचा दरबार फुलवायला सज्ज झाला होता. त्याच्या स्वप्नातील राजकुमारी आज त्याच्या आयुष्यात आली होती त्यामुळे त्याला आकाश ठेंगणे झाले होते. घरामध्ये पाहुण्यांची वर्दळ आणि त्यात या दोघांचे फुलणारे हळुवार प्रेम. दोघांचे तर कुठले यामध्येही मयंक नेहमी पुढाकार घ्यायचा. नेहा मात्र तशीच शांत राहायची. जशी पहिल्या दिवशी होती तशीच आजही नेहा शांतच होती.

आत्ताच या नव्या घरात पाऊल टाकले आहे. नवे लोक, नवी माणसे, नवीन जागा यामुळे कदाचित ती शांत बसली असेल. इथून पुढे तर आमचा संसार खुलणारच आहे. नंतर नंतर आयुष्यभर तिचेच बोलणे मला ऐकून घ्यायचे आहे असे स्वगत बोलून मयंक शांत राहायचा. घरातले सुद्धा नवीन आहे नवीन जागा असल्यामुळे ही अशी शांत राहत असेल असे म्हणत होते. प्रत्येक जण नेहाशी अगदी आपुलकीने, मायेने बोलायचे. तिचे काही चुकले तर सावरून घ्यायचे. तिला कधीच कोणी मोठ्या आवाजात बोलत नव्हते.

नवीन घरात प्रवेश करणारी नेहा मात्र शांत असायची. वरून जरी ती शांत असली तरी मनात तिच्या खूप वादळं निर्माण झाली होती. पण ही नेमकी वादळं कशाची होती? कशासाठी होती? आणि का होती? हे मात्र कुणाला कधी कळलेच नाही.

नवीन लग्न झालेला मयंक मात्र आनंदाने नेहाला कुठेतरी बाहेर फिरून जावे या विचाराने नेहाकडे गेला. नेहा देखील त्या विचाराने आनंदून गेली. का कोणास ठाऊक तिला थोडे बरे वाटले.

"नेहा, आपण फिरायला नक्की कुठे जायचे? तू कोणते ठिकाण हवे ते सांग. आपण त्या ठिकाणी जाऊया. कितीही दिवस लागू देत मी तुझ्यासोबत तिथे एन्जॉय करायला तयार आहे. त्या ठिकाणी फक्त तू आणि मीच असणार आहे. तेव्हा तर मला तुझ्या मनाचा उलगडा करता येतो का हे पाहायचे आहे." मयंकचे हे बोलणे ऐकून नेहा थोडीशी भांबावली. तिला काय बोलावे तेच समजेना.

"तुम्हाला जे ठिकाण आवडेल तिथे आपण जाऊ. माझे असे काहीच म्हणणे नाही." नेहा म्हणाली

"नाही हा. यावेळी मात्र तूच सांगायचे. तू ज्या ठिकाणी सांगशील त्या ठिकाणी मी तुला घेऊन जाईन पण जिथे जायचे आहे ते ठिकाण मात्र तुला सांगायचे आहे." असा मयंकने आग्रह केल्यावर नेहाने काश्मीरला जाण्याचे सांगितले. तेव्हा मात्र मयंकला खूप आनंद झाला. त्याने दोघांचीही तिकीटं काढण्याची तयारी सुरू केली. नेहा बॅग भरण्यास सुरुवात केली. दोघांचा संसार आता मात्र छान खुलत होता. नेहाच्या मनाची चलबिचलता आता कमी वाटत होती. फिरायला जाऊन आल्यानंतर त्या दोघांमध्ये मोकळीक निर्माण होईल असे मयंकला वाटत होते आणि त्याच्या घरच्यांनाही तेच वाटत असल्यामुळे त्यांनी त्यांना लवकरात लवकर फिरायला जाण्यासाठी आग्रह केला होता.

मस्त फिरून आल्यानंतर नेहाच्या आणि मयंकच्या नात्यामध्ये आता थोडासा बहर आला होता. ते पाहून घरच्यांना खूप आनंद झाला. नेहा आता घरामध्ये रुळत चालली होती. घरातील कामं ती करत होती. तसे म्हणायला घरामध्ये नोकरचाकर होते पण बाकीचे काही ती आपुलकीने करत होती. ते पाहून मयंकच्या आईला खूप बरे वाटले.
क्रमशः 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

उंच भरारी घेऊ चला..

//